🚇 अस्वच्छ फलाट, सदोष तिकीट मशिनमुळे झालेली गर्दी, स्वच्छतागृहांत दुर्गंधी... अशी ओळख असलेल्या मुंबई रेल्वेवरील स्टेशनांमध्ये मुंबई सेंट्रलने आदर्श स्थानक म्हणून वेगळा ठसा उमटवला आहे.
🚇आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणपूरकतेच्या तब्बल १२ कसोट्यांवर पात्र ठरल्याने स्थानकाची दखल आतंरराष्ट्रीय संस्थेने घेत स्थानकाला iso 14001 : 2015 या प्रमाणपत्राने गौरविण्यात आले आहे.
🚇विशेष म्हणजे, आयएसओ प्रमाणित मुंबई सेंट्रल स्टेशनाचा पॅटर्न अन्य ३८ रेल्वे स्टेशनांवर राबवण्याचे नियोजन पश्चिम रेल्वेने केले आहे.
🚇रेल्वेच्या निकषांनुसार रेल्वे स्टेशनातील एकूण जागेपैकी ३० टक्के जागेवर उद्यान उभारणे आवश्यक आहे. मुंबई सेंट्रलमध्ये जागेची अडचणी असल्याने टप्प्या टप्प्यांमध्ये छोटेखानी उद्यानांची निर्मिती करण्यात आली.
🚇स्टेशन आणि फलाटाची स्वच्छता, कचरा आणि मलजलाच्या विल्हेवाटीसाठी बायोगॅस यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. विजेच्या बचतीसाठी सूर्यप्रकाश परावर्तित करणारे दिवे छतावर बसविण्यात आले.
🚇या दिव्यांचे आयुर्मान २० वर्षांपेक्षा अधिक असल्याने वीज संवर्धनामुळे कार्बन उत्सर्जनावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल. या पर्यावरणीय प्रकल्पांमुळे आंतरराष्ट्रीय संस्थेने दखल घेत मुंबई सेंट्रल स्टेशनाला गुणवत्तेच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्राने गौरविण्यात आल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
🚇 मे-२०१९ ते मे-२०२२ पर्यंत पर्यावरण प्रकारातील आयएसओ प्रमाणपत्रधारक स्टेशन म्हणून ओळखले जाणारे मुंबई रेल्वेवरील हे एकमेव स्टेशन आहे.
🚇एटीव्हीएम, तिकीट खिडकी यांसह दिव्यांगासाठी रॅम्प, कार्यरत असणाऱ्या लिफ्ट यांमुळे प्रवाशांना स्थानकात आल्यानंतर दिलासा मिळतो. मुंबई सेंट्रल स्थानकातील सर्व मेल-एक्स्प्रेसमध्ये बायोटॉयलेट कार्यान्वित करण्यात आले आहे.
🚇आंतरराष्ट्रीय आयएसओ प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पश्चिम रेल्वे मुख्यालय आणि मुंबई विभागाने विशेष प्रयत्न केले होते. पर्यावरण आणि प्रवासी सुविधा दर्जेदार असल्यामुळे मुंबई सेंट्रल स्थानकाला आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ प्रमाणपत्र मिळाले.
🚇 येणाऱ्या काळात या सुविधा टिकवणे अधिक गरजेचे आहे. मुंबई रेल्वेवरील अनेक रेल्वे स्टेशनांत पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट या सुविधा आहेत.
🚇मात्र देखभालीअभावी त्या सुविधाच गैरसोयीचे मुख्य कारण ठरत आहेत.
🚆आयएसओ म्हणजे काय 🚆
🚇 देशातील एखाद्या गुणवत्तेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयएसओ अर्थात 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डडायझेशन' मानांकन घेतले जाते.
🚇आंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनाची गरज लक्षात घेता १२० देशांनी एकत्र येऊन एक प्रमाण निश्चित केलेले आहे.
🚀आयएसओचे प्रकार🚀
🚇 आयएसओ ९००१ - गुणवत्ता व्यवस्थापन
🚇आयएसओ १४००१ - पर्यावरण व्यवस्थापन
🚇 आयएसओ २७००१ - माहिती सुरक्षा व्यवस्थापन
🚇आयएसओ २२००८ - अन्न सुरक्षा व्यवस्थापन
🚂🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃🚃