Sunday 20 June 2021

आयझॅक हर्जोग: इस्राएलचे 11 वे राष्ट्राध्यक्ष...


📀आयझॅक हर्जोग यांची इस्राएल देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाली आहे.


📀आयझॅक हर्जोग इस्राएलचे 11 वे राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. ते देशाचे मावळते राष्ट्राध्यक्ष रेयूव्हन रिव्हलिन यांच्याकडून राष्ट्राध्यक्ष पदाचा भार स्वीकारतील.


🕹इस्राएल देश...


📀इस्राएल हा पश्चिम आशियातील नवोदित ज्यू-राष्ट्र आहे. देशाच्या सीमा उत्तरेला लेबाननशी, पूर्वेला जॉर्डनशी व सिरियाशी, दक्षिणेला व पूर्वेला ईजिप्तशी आणि पश्चिमेला गाझा पट्टीशी भिडल्या आहेत.


📀इस्राएल हे सार्वभौम लोकसत्ताक राज्य आहे परंतु या देशाचे संविधान लिहिलेले नाही. देशातील राज्यव्यवस्था 1950च्या कायद्याप्रमाणे, सरकारी धोरणानुसार चालत असून क्रमाक्रमाने काही मूलभूत कायदे अंमलात आणून कालांतराने ते देशाच्या संविधानात समाविष्ट करावयाचे आहेत.


📀इस्राएली लोकसभेला ‘नेसेट’ म्हणतात. 18 वर्षावरील इस्राएली नागरिक राष्ट्राध्यक्षाची निवड करतात. राष्ट्राध्यक्ष पदाची मुदत पाच वर्षांकरिता असून तो सामान्यत: पुन्हा एकदाच निवडणुकीस पात्र असतो.