संपूर्ण मराठी व्याकरण अर्थासह मराठी म्हणी

1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे
2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे
4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा
7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा
12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे
13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर
15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो
17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी
22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते
21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती
23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे
24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे
26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
29. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे
30. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
31. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे
32. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
33. कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
34. गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
35. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे
36. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे
37. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे
38. वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
39. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?
40. खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
41. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे
42. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी
43. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
44. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
45. गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही
46. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही
47. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे
48. कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
49. दगडावरची रेघ- कायमची गोष्ट

मराठी व्याकरण - भाषेतील रस

रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे (सहा रस) आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव** कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.
साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.
मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.
साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती –  शृंगार
हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन
उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर
हा रस कुठे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात
उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण
हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात
उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र
हा रस कुठे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन
उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य
हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.
उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय**

रसनिर्मिती- भयानक
हा रस कुठे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.
उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स
हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.
उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत
हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात
उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत
हा रस कुठे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.
उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

मराठी व्याकरण: अलंकार

अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात. शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात. विशेषत: पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात. गद्यसुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. ‘मुख सुंदर दिसते’ किंवा ‘मुख सुंदर आहे’ ही साधी (गद्य) वाक्ये झाली; ‘परंतु ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ किंवा ‘मुख जणू कमलच आहे’ असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते. यालाच अलंकारिक भाषा म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते. त्यांत एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते.
पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्दचमत्कृतीची पद्यात योजना असली, तर त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो. पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो.
अलंकारांचे ‘शब्दालंकार’ आणि ‘अर्थालंकार’ असे दोन मुख्य प्रकार आहेत.

  शब्दालंकार:

जे अलंकार शब्दांच्या केवळ विशिष्ट रचनेवरच अवलंबून असतात, शब्दांची चमत्कृती शब्दांचा अर्थ आणि शब्दयोजना यांच्यावर आधारीत अलंकारांना ‘शब्दालंकार’ म्हणतात.
प्रकार-

अनुप्रास – कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो.
उदा. गडद निळे गडद निळे जलद भरुनि आले,
शीतल तनु चपल चरण अनिलगण निघाले
( गडद गडद जलदची पुनरावृत्ती)

यमक - शब्दालंकाराचे अनेक प्रकार आहेत. त्यांत ‘यमक’ हा अलंकार महत्वाचा आहे. एखादा शब्द किंवा अक्षर पुनःपुन्हा पद्यात चरणांती आले, की तेथे ‘यमक’ हा अलंकार होतो.
उदा.

मना चंदनाचे परी त्वा झिजावे |
परी अंतरी सज्जना नीववावे ||

या वैभवाला तुझ्या पाहुनिया, मला स्फूर्ति नृत्यार्थ होते जरी |
सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी, तसे पहिले मी न कोठे तरी |

अशा शब्दांनी नादमाधुर्य निर्माण झालेल्या पद्यपंक्ती तुमच्या पाठ्यपुस्तकातील कवितांतून निवडून काढा.

श्लेष - एकच शब्द वाक्यात दोन अर्थानी वापरल्यामुळे जेव्हा शब्दचमत्कृती निर्माण होते तेव्हा ‘श्लेष’ हा अलंकार होतो.
उदा.

मित्राच्या उद्याने कोणास आनंद होत नाही. (मित्र = सखा, मित्र = सूय)

श्रीकृष्ण नवरा मी नवरी |
शिशुपाल नवरा मी न-वरी ||

अर्थालंकार  :

दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थचमत्कृती आणली जाते. तेथे अर्थालंकार होतो. बहुतेक अर्थालंकार अशा साम्यावर आधारित असतात. त्यात चार गोष्टी महत्वाच्या असतात.

ज्या गोष्टीचे वर्णन कवी करत असतो, तिला अलंकारात ‘उपमेय’ असे म्हणतात. ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ या वाक्यामध्ये मुखाचे वर्णन कवी करत आहे, म्हणून ‘मुख’ हे ‘उपमेय’ आहे.

उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी कवी दाखवतात, तिला ‘उपमान’ असे म्हणतात. वरील वाक्यात मुखाचे साम्य कमलाशी दाखवले आहे, म्हणून ‘कमल’ हे तेथे ‘उपमान’ आहे.

उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या गुणधर्माला ‘साधर्म्य’ किंवा ‘समान धर्म’ असे म्हणतात. वाक्यात उपमेय ‘मुख’ आणि उपमान ‘कमळ’ यांमध्ये साम्य दाखवणारा गुण सुंदरता हा आहे.

उपमेय आणि उपमान यांमधील साम्य दर्शवणाऱ्या शब्दाला ‘साधर्म्यसूचक शब्द’ किंवा ‘साम्यसूचक शब्द’ म्हणतात.

वरील वाक्यात ‘कामलासारखे मुख’ यातील ‘सारखे’ हा ‘साधर्म्यसूचक’ शब्द आहे.
प्रकार -

उपमा – उपमेय हे उपमानासारखेच आहे, असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उपमा’ हा अलंकार असतो.
उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, सदृश, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

लाट उसळोनी जळी खळे व्हावे,
त्यात चंद्राचे चांदणे पडावे,
तसे गाली हासता तुझ्या व्हावे,
उचंबळूनी लावण्या वर वहावे ||

उत्प्रेक्षा –उपमेय हे उपमानच आहे असे जेथे वर्णन असते, तेथे ‘उत्प्रेक्षा’ हा अलंकार असतो.
उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणूकाही, जणूकाय, की, गमे, वाटे, भासे, म्हणजे यांपैकी एखादा साधर्म्यसूचक शब्द असतो.

विद्या हे पुरुषास रूप बरवे, की झाकले द्रव्यही

तिच्या कळ्या | होत्या मिटलेल्या सगळ्या |
जणू दमल्या | फार खेळूनी, मग निजल्या ||

व्यतिरेक –या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते.
उदा.

अमृताहुनीही गोड नाम तुझे देवा

तू माउलीहुनी मायाळ | चंद्राहूनी शीतळ
पाणियाहूनी पातळ | कल्लोळ प्रेमाचा

अतिशयोक्ती -कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी हा अलंकार होतो.
उदा.
दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं न्हाण झालं ||
मामंजीची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली ||
उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला |
वेशीपर्यंत ओघळ गेला त्यात उंट पोहून गेला |
जॉईन करा 

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) पर्यायी उत्तरांतील कोणत्या वाक्यात क्रियाविशेषणाचा उपयोग केला आहे?

   1) मी ते काम करून टाकेन    2) मी येथून जाऊन येत आहे
   3) मी परीक्षा उत्तीर्ण होणारच    4) मी बाजारातून आंबे आणले

उत्तर :- 2

2) पुढील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘भर’

   1) परिणामवाचक    2) दिक्वाचक   
   3) भागवाचक      4) संबंधवाचक

उत्तर :- 1

3) ‘भिका-याला मी एक सदरा दिला, शिवाय त्याला जेवू घातले.’
     या विधानातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

   1) विकल्पबोधक    2) समुच्चयबोधक   
   3) परिणामबोधक    4) स्वरूपबोधक

उत्तर :- 2

4) केवलप्रयोगी अव्ययाविषयी विचार करा.

   अ) केवलप्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून ठरवितात.
   ब) केवलप्रयोगी अव्ययांचे वर्गीकरण त्यांच्या ती अव्यये कोणती भावना व्यक्त करतात त्यावरून ठरवितात.

   1) फक्त अ बरोबर    2) फक्त ब बरोबर
   3) अ आणि ब बरोबर    4) अ आणि ब चूक

उत्तर :- 2

5) “मी पत्र लिहित असेन” या वाक्यातील काळ ओळखा.

   1) साधा भविष्यकाळ    2) रीती भविष्यकाळ 
   3) पूर्ण भविष्यकाळ    4) अपूर्ण भविष्यकाळ

उत्तर :- 4

6) पुढीलपैकी केवलप्रयोगी शब्द ओळखा.

   1) परंतु    2) शाबास   
   3) त्यासाठी    4) तेथे

उत्तर :- 2

7) ‘ला’ ख्यातावरून कोणता काळ ओळखला जातो ?

   1) वर्तमान    2) भूत     
   3) भविष्य    4) रीतिवर्तमान

उत्तर :- 2

8) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग व स्त्रीलिंग अशा दोन्ही प्रकारे होतो ?

   1) बाग      2) वेळ     
   3) वीणा    4) सर्व

उत्तर :- 4

9) खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही.

   अ) संबोधन      ब) व्दितीया   
   क) प्रथमा      ड) षष्ठी

   1) अ आणि ड    2) फक्त अ   
   3) ब आणि क    4) फक्त ब

उत्तर :- 4

10) खालील मिश्र वाक्याचे केवल वाक्य करा.
     “आपण अपराधी आहोत हे त्याने कबूल केले.”

   1) आपण अपराधी असल्याचे त्याने कबूल केले.    2) अपराध केला म्हणून तो कबूल झाला.
   3) त्याने आपला अपराध कबूल केला.      4) तो अपराध करून कबूलही झाला.

उत्तर :- 1

समानार्थी शब्द

अलक्ष - परमेश्वर, ईश्वर, देव, अलख, ईश, भगवान
 
अमृत - सुधा, पीयूष, संजीवनी
 
अरण्य - वन, जंगल, रान, विपिन
 
अग्नी - विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल
 
अश्व - तुरंग, घोडा, वारू, वाजी
 
अर्जुन - पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत
 
अमर्याद - असंख्य, अगणित, अमित
 
अंबर - गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ
 
अपयश - पराभव, हार, अपमान, अयश
 
अवधी - समय, वेळ, काळ, अवकाश
 
आई - जननी, माऊली, माय, माता, जन्मदात्री
 
आठवण - ध्यान, स्मरण, संस्मरण, स्मृती
 
आकांत - हंबरडा, आक्रोश, रुदन
 
आनंद - उल्हास, हर्ष, संतोष, मोद
 
आशय - भावार्थ, अर्थ, तात्पर्य
 
आशा - आस, इच्छा, अपेक्षा, वासना, आकांक्षा
 
इंद्र - वज्रपाणी, शक्र, वासव, देवेंद्र, सहस्त्राक्ष
 
इष्ट - आवडते, प्रिय मानलेले
 
इब्लिस - बदमाश, खोडकर, विचित्र
 
उकल - उलगडा, सुटका, मोकळे
 
उधळणे - फेकणे, पसरणे, फाजील खर्च करणे, स्वैर धावणे
 
उपाय - तजवीज, इलाज, उपचार
 
उमाळा - तरंग, लोट, उकळी
 
ऊब - आधार, सुख, उष्णता, वाफ
 
उत्कर्ष - प्रगती, संपन्नता, भरभराट, चलती एक

एकता - ऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ 

ऐश्वर्य - सता, संपत्ती, वैभव, सामर्थ्य 

ओज - तेज, पाणी,

ओढ - कल, ताण, आकर्षण 

ओवळा - अपवित्र, अमंगल, अशुद्ध 

ओळख - माहिती, जामीन, परिचय 

कच्छ - कासव, कूर्म, कमट, कच्छप 

कळकळ - चिंता, काळजी, फिकीर, आस्था

श्रीकृष्ण - वासुदेव, कन्हैया, केशव, माधव 

कपाळ - ललाट, भाल, निढळ 

कमळ - पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज 

कृपण - चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार 

काक - कावळा, वायस, एकाक्ष 

किरण - रश्मी, कर, अंशू 

काळोख - तिमिर, अंधार, तम 

कलंक - बट्टा, दोष, डाग, काळिमा 

करुणा - दया, माया, कणव, कृपा कसब - कौशल्य नैपुण्य, खुबी 

कर्तबगार - कार्यक्षम, दक्ष, कुशल, निपुण 

कुरूप - विद्रूप, बेढब, विरूप 

कोमल - मृदु, हळवा, मऊ, नाजुक 

खग - शकुंत, पक्षी, व्दिज, अंडज, पाखरू 

खजिना - द्रव्य, कोष, भांडार, तिजोरी 

खच - गर्दी, दाटी, रास खट्याळ - खोडकर, व्दाड, खट

10 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे

1) कोणत्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो?
उत्तर : 23 डिसेंबर

2) कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय गणित दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 22 डिसेंबर

3) "हेल्थ अँड वेल बीइंग इन लेट लाइफ: पर्स्पेक्टिव्ह्ज अँड नॅरेटीव्ह्ज फ्रॉम इंडिया" पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : प्रसून चटर्जी

4) कोणत्या ठिकाणी जंगलाचे सर्वात प्राचीन जीवाश्म सापडले?
उत्तर : न्यूयॉर्क

5) अंतराळ तंत्रज्ञानाच्या संदर्भात असलेले ‘CBERS-4A’ हे काय आहे?
उत्तर : चीन आणि ब्राझिल यांचा उपग्रह

6) कोणत्या संस्थेनी पुणे या शहरात ‘वॅक्सिनेशन ऑन व्हील्स’ क्लिनिकचा शुभारंभ केला?
उत्तर : IIT हैदराबाद

7) ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ या कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
उत्तर : देवेश श्रीवास्तव

8) ‘प्रवेशयोग्य निवडणुका’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा कोठे पार पडली?
उत्तर : नवी दिल्ली

9) कोणत्या संघटनेनी ICC सोबत महिला सक्षमीकरणाबाबत भागीदारीची घोषणा केली?
उत्तर : संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF)

10) "टर्ब्युलंस अँड ट्रायम्फ - द मोदी इयर्स" या पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : राहुल अग्रवाल