Monday 25 April 2022

महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण

महाराष्ट्र वाहतूक व दळणवळण




राज्यात रस्ते, हवाई, रेल्वे व जलमार्ग या प्रमुख मार्गानी वाहतूक केली जाते

रस्ते वाहतूक - राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, जिल्हा मार्ग व ग्रामीण सडका
रस्ते विकास योजना - डॉ जयकर आयोग (१९२७) व नागपुर योजना (१९४३)
नागपुर योजनेनुसार - १९६१ ते १९८१ व १९८१ ते २००१ अशा २० वर्षाच्या कालावधीच्या 'सुधारित रस्ते विकास योजना' कार्यान्वित करण्यात आल्या
महाराष्ट्रातून जाणारे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग:
राष्ट्रीय महामार्ग ३ - मुंबई ते आग्रा, ठाणे-भिवंडी-नाशिक-धूले मार्गे (३९१ किमी)
राष्ट्रीय महामार्ग ४ - मुंबई ते चेन्नई, पुणे-सातारा-बेलगाव मार्गे (३७५ किमी)
राष्ट्रीय महामार्ग ४ ब - न्हावाशेवा ते पलस्पे, कलंबोली मार्गे (२७ किमी)
राष्ट्रीय महामार्ग ६ - धुले ते कोलकाता, धुले-अकोला-बडनेरा-नागपुर मार्गे (६८६ किमी)
राष्ट्रीय महामार्ग ७ - वाराणसी ते कन्याकुमारी, बोरी-नागपुर-रामटेक (२३२ किमी)
राष्ट्रीय महामार्ग ८ - मुंबई ते दिल्ली, भायंदर-मनोर मार्गे (१२८ किमी)
राष्ट्रीय महामार्ग ९ - पुणे ते मचलिपत्तानाम, इंदापूर-सोलापुर मार्गे (३३६ किमी)
राष्ट्रीय महामार्ग १३ - सोलापुर ते मंगलूर विजापुर मार्गे (४३ किमी)
राष्ट्रीय महामार्ग १६ - निज़ामाबाद ते जगदलपुर, विदर्भ मार्गे (४० किमी)
राष्ट्रीय महामार्ग १७ - पनवेल ते एडापल्ली, रायगड-सावंतवाडी-पणजी मार्गे (४८२ किमी)
राष्ट्रीय महामार्ग ५० - पुणे ते नाशिक, पुणे-नाशिक (१९२ किमी)
राष्ट्रीय महामार्ग ६९ - नागपुर ते अब्दुल्लागंज (५५ किमी)
राष्टीय महामार्ग २०४ - रत्नागिरी ते नागपुर, पाली-कोल्हापुर-सांगली-सोलापुर-लातूर-वर्धा (९७४ किमी)
रस्ते वाहतूक वैशिष्ट्ये:
न्हावाशेवा-कलंबोली-पलस्पे रा. म. ४ ब हा राज्यातील सर्वात कमी लांबीचा महामार्ग असून त्याचा वापर न्हावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या बंदरावर जाण्यासाठी केला जातो
मार्च २०११ अखेर राज्यातील सर्व प्रकारच्या रस्यांची लांबी - २.४० लाख
दर १०० चौकिमी मागे राज्यामध्ये रस्त्यांची लांबी ९३ किमी आहे
राज्यातील राष्ट्रीय महामार्गांची एकुण लांबी ४,३७६ किमी आहे
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ १९४८ ला स्थापन करण्यात आले
२०११ अखेर रा. म. २११ (सोलापुर ते धुले) व रा. म. २१४ (कल्याण ते भोकर) हे घोषित करण्यात आले
कोकण व पठारावारिल प्रमुख घाट:
थळ (कसरा) घाट - मुंबई - नाशिक
बोर घाट - मुंबई - पुणे
कुंभर्ली घाट - कराड - चिपलुण
आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी
फोंडा घाट - कोल्हापुर - पणजी
अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी
खंबाटकी घाट - सातारा - पुणे

_________________________________

दळणवळण


इतर भाषांत वाचा


Download PDF


पहारा


संपादन करा


उत्तम दळणवळण हे आजच्या काळातील महत्त्वाची गरज बनली आहे. भुतलावर, जलाशयावरून व आकाशातून दळणवळण होउ शकते. दळणवळणासाठी वाहने लागतात पण खुष्की वाहतुकीसाठी वेगवेगळ्या ठिकाणांना जोडणारे रस्ते किंवा रुळमार्ग असावे लागतात.


भारतात रस्त्यांचे खालील प्रकार आहेत:

राष्ट्रीय महामार्ग: हे मार्ग देशाच्या विकासात फार मोठा हातभार लावतात. या रस्त्यांची बांधणी आणि देखभाल केंद्र सरकार करते.


राजकीय महामार्ग: हे महामार्ग राज्य सरकारच्या अखत्यारीत येतात.


प्रमुख जिल्हा रस्ता


इतर प्रमुख जिल्हा रस्ता


ग्रामीण रस्ता


द्रुतगतीमार्ग: प्रगत देशात विस्तृत जाळे असणारा पण भारतात नवीन असणारा हा रस्ता प्रकार गेल्या ५ वर्षात भारतातही अवतरला आहे. त्यात वर्षागणिक संख्येने व लांबीने वाढ होत आहे. या रस्त्यांवर कमीतकमी विशिष्ट गति असलेल्या वाहनांनाच प्रवेश असतो.


वाहनांचे प्रकार:

१. रस्त्यावरची वाहने

२. रेल्वे

३. जहाज

४. विमान

याशिवाय दळणवळणाचे आणखी प्रकार :-

१. दूरध्वनी (टेलीफोन)

२. रेडियो

३. दूरदर्शन

४. अंतरजाल (इंटरनेट)

_____________________________

रस्त्यावरील वाहनांचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. १) इंधनावर चालणारी वाहने २) इंधनरहित वाहने

या व्यतिरीक्त वाहनांचे १) प्रवासीवाहू वाहने, व २) मालवाहू वाहने असे प्रकार पाडता येतात.


इंधनावर चालनारी वाहनेसंपादन करा

स्कूटर / फटफटी/मोटार सायकलसंपादन करा

स्वातंत्र्याच्या आघी भारतात स्कूटर नसाव्यात. फटफटी होती पण भारतात बहुतेक बनत नव्हत्या. त्यांची किंमतही परवडण्यापलीकडे असावी. त्यामुळे भारतीय उत्पादकांनी स्कूटरपासून सुरुवात केली. कौटुंबिक वाहन म्हणून स्कूटरला प्रचंड लोकप्रियता लाभली. १९५० ते १९९० ह्या काळात स्कूटर उत्पादक भरभराटीत राहीले व स्कूटर शहरी रस्यांवर साम्राज्य करीत राहीली. १९९० नंतर जेव्हा भारतात फटफटी बनू लागल्या तेव्हा भारतीय तरुणवर्ग तिच्या मर्दानी, अश्वारूढ अशा प्रसिद्धीमाध्यमांनी तयार केलेल्या प्रतिमेच्या प्रेमातच पडला. स्कूटर पर्वाला अवकळा आली तर फटफटींची वाढ प्रचंड वेगाने होऊ लागली आणि ती वाढ आजतागायत चालूच आहे. नोकरी लागलेला तरुण, आजकाल कौटुंबिक जबाबदाऱ्या झाल्याने, बऱ्याच अंशी त्याची पहिली मोठी खरेदी फटफटी घेऊन (हप्त्यानेका होइना) करतो.

कारसंपादन करा

कार हे आजकाल सर्वांना परिचीत असे वाहन आहे

हलका ट्रक/मालवाहू टेंपोसंपादन करा

हलक्या ट्रकची सामान क्षमता तुलनेने कमी असते पण ती वहातुकीत चालविणे जास्त सोपे असते. हलक्या ट्रकचा वापर प्रामुख्याने शहरात व जिल्ह्यापुरता केला जातो.

जड ट्रकसंपादन करा

जड ट्रक जास्तीचे सामान नेण्यास व आंतरराज्यीय वहातुकीसाठी होतो. दोन्ही प्रकारचे ट्रक व्यापारी व भाडे तत्त्वावर वापरतात.

इंधनरहित वाहनेसंपादन करा

सायकलसंपादन करा

दुचाकीचा वापर भारतात शतकाआघीपासून होत असावा. पुण्यात, फार पूर्वी, दुचाकी रात्री दिवा लावल्याशिवाय चालवल्यास ’गुन्हा’ म्हणून फौजदार सराफखान्यात नेत, असे आपण वाचतो. १९५० च्या कळात दुचाकी हेच प्रमुख वाहन होते. स्कूटर आल्यावर मात्र कनिष्ठ मध्यमवर्गीयांसाठी सायकल, मध्यमवर्गीयांसाठी स्कूटर व श्रीमंतांसाठी मोटार अशी वर्गवारी झाली. मर्यादित अंतरापर्यॅंत कामावर जाण्यायेण्यास व कौटुंबिक वाहन म्हणून दुचाकी योग्यतम ठरते. दुचाकी वाहनांना (मग त्यात स्कूटर व फटफटीहि आली) पायवाट सुद्धा पुरते. त्यामुळे गावात, शेतात, रानात कुठेहि चालवता येते. पायबळावर चालत असल्याने इंधनाचा खर्च नसतो. मोटार चालवताना यंत्र बंद पडण्याची असलेली भीती नसते. अधूनमधून खर्च होतो हवा भरण्यावर किंवा ट्यूबला छिद्र पडल्यास ते दुरूस्त करण्यात पण तो खर्च परवडण्यासारखा असतो. दुस्वारी, तिस्वारी इत्यादी प्रकार सर्व दुचाकी वाहनांना लागू पडतात.

___________________________________


लोहमार्ग हा एक प्रकारचा वाहतुकीचा मार्ग असून त्यावर आगगाडीद्वारे वाहतूक केली जाते. आगगाडी ज्या लोखंडी पट्ट्यांवरून धावते त्यांना रूळ असे म्हणतात. हा मार्ग लोहाचा म्हणजेच लोखंडाचा असून त्यात २ रूळ असतात. दोन रूळांमधील अंतराला रेल्वे गेज असे म्हणतात.

गिट्टीच्या बनलेल्या बेडवर रुळ
कॉंक्रिटच्या बनलेल्या बेडवर रुळ
रेल्वे मध्ये वेल्डेड संयुक्त
रेल्वे मध्ये विस्तार संयुक्त

लोहमार्ग वाहतूकसंपादन करा

रेल्वे वाहतूक हे प्रवासी व माल वाहतुकीचे एक साधन आहे. ही वाहतूक रेल्वे ह्या वाहनाद्वारे विशेषतः तयार केलेल्या रुळांवरून केली जाते. रेल्वेचे दोन भाग आहेत : सामान अथवा प्रवाशांसाठी वाघिणी अथवा डबे व हे वाहून नेण्यासाठी इंजिन. इंजिन कोळसाडिझेल इत्यादी इंधने वापरून चालवतात, तसेच विद्युतशक्तीचा देखील ह्यासाठी वापर केला जातो. गुळगुळीत रूळ वापरल्यामुळे रस्ता वाहतुकीपेक्षा रेल्वे वाहतुकीमध्ये कमी घर्षण विरोध असतो.

इतिहाससंपादन करा

जगातील सर्वात पहिल्या रेल्वे वाहतुकीचे पुरावे इ.स. पूर्व सहाव्या शतकात ग्रीसमध्ये सापडतात. तेव्हा वाहनासाठी इंजिनाऐवजी माणसांचा वापर केला जात असे. सोळाव्या शतकामध्ये युरोपातील अनेक कोळसा खाणींमध्ये नॅरो गेज रेल्वे वापरात होत्या ज्यांना वाहून नेण्यासाठी मनुष्य किंवा जनावरांचा उपयोग केला जायचा. ह्या रेल्वेमार्गांसाठी लाकडी रूळ वापरले जायचे.

अठराव्या शतकात युनायटेड किंग्डममध्ये वाफेच्या इंजिनाचा शोध लावला गेला व त्यानंतरच्या काळात मोठी रेल्वे क्रांती घडून आली ज्याचे औद्योगिक क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते. रेल्वे वाहतुकीमुळे सामानाचे दळणवळण स्वस्त, जलदगतीने व सुलभ करणे शक्य झाले. १८३० साली जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे मँचेस्टर व लिव्हरपूल ह्या शहरांदरम्यान धावली. ह्यासाठी वापरला गेलेला रुळांचा गेज (दोन रुळांमधील अंतर) नंतर जगभर मापदंड म्हणून (स्टँडर्ड गेज: १,४३५ मिमी) वापरला जाऊ लागला.

रेल्वे वाहतुकीसाठी प्रत्येक देशामध्ये रेल्वे कंपनी जबाबदार असते. काही देशांमध्ये ह्या कंपन्या सरकारी तर इतर ठिकाणी खाजगी आहेत. अनेक देशांमध्ये (उदा. जपान) एकापेक्षा अधिक रेल्वेकंपन्या कार्यरत आहेत. भारतात रेल्वेवाहतुकीची जवळजवळ संपूर्ण मक्तेदारी भारतीय रेल्वे ह्या सरकारी कंपनीकडे आहे.

नवनवीन तंत्रज्ञान व संशोधनामुळे सध्या जगात अवजड व अक्षम वाफेच्या इंजिनांचा वापर जवळजवळ पूर्णपणे संपुष्टात आला आहे. आजची रेल्वे इंजिने मुख्यतः डिझेल अथवा विद्युत ऊर्जेवर चालतात. २०१८ साली पर्यंत जगातील २६ टक्के रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

काळानुसार रेल्वेंचा वेग वाढत गेला आहे. सध्या अनेक देशांमध्ये द्रुतगतीने जाणाऱ्या रेल्वे आहेत (उदा. जपानमधील शिंकान्सेन व जर्मनीमधील इंटरसिटी एक्सप्रेस). ह्या द्रुतगती रेल्वेंसाठी वेगळे लोहमार्ग राखून ठेवलेले असतात.

लोहमार्गाचे प्रकारसंपादन करा

विद्युतीकृत लोहमार्ग / अविद्युतीकृत लोहमार्ग.

एकेरी लोहमार्ग, दुहेरी लोहमार्ग, तिहेरी लोहमार्ग इत्यादी.

लोहमार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी गँगमन नेमलेले असतात.

लोहमार्ग मापीसंपादन करा

लोहमार्ग मापी (रेल्वे गेज) म्हणजे हे लोहमार्गाच्या दोन रुळांमधील अंतर होय. रेल्वेची इंजिने व डबे केवळ त्यांच्या चाकांमधील अंतरानुसार ठरावीक गेजच्या मार्गावरूनच धावू शकतात.

भारतामधील लोहमार्ग मापीसंपादन करा

भारतीय रेल्वेने हाती घेतलेल्या गेज समानीकरण प्रकल्पाअंतर्गत देशामधील काही ऐतिहासिक गाड्या वगळता इतर सर्व गेजांचे रूपांतर ब्रॉड गेजमध्ये करण्यात येत आहे. आज २०२० साली देशातील ९४% रूळ ब्रॉडगेज आहेत. नॅरो गेज व मीटर गेज हे दोन्ही रेल्वेगेज कमी होत चालले

___________________________________________



जहाज,हे समुद्रावर चालणारे वाहन आहे. जहाजाचा तळाकडील विशिष्ट भाग हा नेहमीच समुद्राच्या पाण्याखाली असतो, त्यालाच 'ड्राफ्ट' असे म्हणतात. त्याच्याच बळावर जहाज तरंगत असते. जहाजाचे तरंगणे हे त्याने व्यापलेले क्षेत्र, त्यावर असलेला भार आणि त्याच्या बांधणीसाठी वापरलेला धातू याच्या गणितावर अवलंबून असते.

एक इटालियन जहाज


__________________________________

विषय प्रवेशसंपादन करा

विमान हे आजच्या जगातील एक महत्त्वाचे जलद दळणवळणाचे साधन बनले आहे. प्रवासी, माल, युद्धसाहित्य इत्यादींची वाहतूक करण्यासाठी विमानाचा परिणामकारक वापर करता येतो. विमान आकाशात उडण्यासाठी व आकाशातून उतरण्यासाठी विमानतळाचा वापर होतो.

ओळखसंपादन करा

विमानाची ढोबळ रूपरेषा, विमानाचे धडपंख आणि शेपूट अशी विभागता येते. धडामध्ये प्रवासी, माल, तथा युद्धसाहित्य, तसेच वैमानिक कक्षइंधन, नियंत्रणसाधने असतात. पंखांचा मुख्य उपयोग तरंगणे, उड्डाण, वळणे यासाठी होतो. शेपूट मुख्यतः वळण्यासाठी वापरले जाते.

बोइंग ७७७ प्रवासी विमान

उडण्याचे तत्त्वसंपादन करा

विमानाच्या पंखांचा आकार विशिष्ठ प्रकारचा (Aerofoil) असतो. विमानाने जमीनीवर धावताना वेग घेतला की पंखांखालील हवेचा दाब पंखांवरील हवेच्या दाबापेक्षा जास्त होतो आणि विमान हवेत उडू लागते.

◆इतिहास.संपादन करा

पौराणिक काळापासूनच धार्मिक/अध्यात्मिक ग्रंथात /पुस्तकात उडत्या गोष्टींचा उल्लेख सापडतो. रामायणातील प्रसिद्ध 'पुष्पक' विमान असे विविध उल्लेख प्राचीन भारतीय इतिहासात सापडतात.आणि महर्षी भरद्वाज यांनी वेग-वेगळे विमान कसे बनवावे यावर ५००० वर्षांपूर्वी पुस्तक ही लिहिले आहे.

आधुनिक काळात विमानाचा शोध हे शिवकर बापूजी तळफदे यांनी साल १८९५ मध्ये लावला. तेही भारतातील ५००० वर्ष पूर्वी महर्षी भरद्वाज यांच्या हत्ते लिखित पुस्तकातून तयार केला. जो १५०० फूट उंच उडाला.पण जगामध्ये राईट ब्रदर्स यांना याचा शोध करता म्हणून ओळखले जाते. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्याकाळी इंग्रजांची भारतावर सत्ता होती अन् शिवकर बापूजी तळफदे यांना फसवून विमानाची माहिती युरोप मध्ये नेहली अन् तीतून अमेरिकेत आली मग या राईट ब्रदर्स यांच्या हातात आली,त्यांनी विमानची नकल करून १९०३ मध्ये विमान १०० फूट उंच उडवली अन् ही शोध स्वतःच्या नावाने करून घेतले.

विमानांचे वर्गीकरणसंपादन करा

विमानांचे वर्गीकरण अनेक प्रकारे करता येते.

सेस्ना जातीचे पाण्यावर उतरणारे विमान

उपयोगानुसार:

संरचनेनुसार:

  • पंखयुक्त (फिक्स्ड विंग)
  • शिरचक्रयुक्त (रोटेटिंग विंग)
  • (गायरो?)

वेगानुसार:

  • स्वनातीत (सुपर सॉनिक)

शक्तीस्रोतानुसार:

  • दट्ट्यायंत्र (प्रॉपेलर)
  • उष्णवायुझोतयंत्र (जेट)

उड्डाणतत्त्वानुसार:

  • हवेपेक्षा जड (नेहमीचे विमान)
  • हवेपेक्षा हलके (वायुफुगा)




No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्त्वाची पदे

📕 भारताचे सरन्यायाधीश - धनंजय चंद्रचूड 📙 भारताचे लोकपाल - ए. एम. खानविलकर 📗भारताचे महान्यायवादी - आर. वेंकट रामणी 📒 भारताचे महालेखाप...