11 October 2023

वि.दा. सावरकर विषयी माहिती

▪️वि.दा. सावरक यांचा जन्म 1883 मध्ये भगूर (जि. नाशिक) येथे झाला.

▪️प्रभाव – इटालियन देशभक्त जोसेफ मॅझिनी

▪️विचार – ब्रिटिशविरोधासाठी शस्त्राशिवाय पर्याय नाही.

▪️1900 रोजी पुण्यात ‘मित्रमेळा संघटना’ स्थापना केली.

▪️1904 रोजी मित्रमेळ्याचे रूपांतर ‘अभिनव भारत’ संघटनेत.

▪️‘शिवाजी स्कॉलरशिप’ मिळवून 1906 ला इंग्लंडला शिक्षणासाठी गेले.

▪️वि.दा. सावरकरांच्या अनूपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे बंधु गणेश सावरकरांनी चालवले.

▪️सावरकरांनी अभिनव भारततर्फे पांडुरंग महादेव बापटला (सेनापती बापट) बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पॅरिसला पाठवले.

▪️1908 – सावरकरांच्या घरावर धाड गणेश सावरकरांवर जॅक्सनने खटला चालवला. त्यास ‘नाशिक खटला’ असे म्हणतात.

▪️अनंत कान्हेरेने 1909 मध्ये न्या. जॅक्सनची हत्या केली.

▪️न्या. जॅक्सनच्या हत्येतील सहभागाच्या आरोपावरून सावरकरांना 1911 मध्ये 50 वर्षांच्या काळ्यापाण्याची जन्मठेपेची शिक्षा दिली गेली.

▪️1924 मध्ये रत्नागिरी जिल्ह्याची हद्द न सोडणे व राजकरणात सहभागी न होणे या अटीवर सावरकराची मुक्तता करण्यात आली.

▪️वि.दा. सावरकरांनी ‘भारतीय इतिहासाची सहा सोनेरी पाने’, हिंदू पदपादशाही, ‘माझी जन्मठेप’, ‘हिंदुत्व’ ‘1857 चे भारतीय स्वातंत्र्य युद्ध’ इत्यादीचे लिखान केले.

महाराष्ट्राचा भूगोल

✳️पराकृतिक विभाग


१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश


२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा


३. महाराष्ट्राचे पठार


४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा


✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली


🅾️पश्चिम वाहिनी नद्या


१. तापी-पूर्णा नदी प्रणाली


२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.


🅾️पर्व वाहिनी नद्या


१. प्राणहिता नदी प्रणाली


२. गोदावरी नदी प्रणाली


३. कृष्णा नदी प्रणाली


४. भीमा नदी प्रणाली


🅾️हवामान


महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात. 

(१) नैऋत्य मोसमी हवामान

(२) ईशान्य मोसमी हवामान


✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक


१. भौगोलिक स्थान


२. अक्षवृत्तीय विस्तार


३. मोसमी वारे


४. सागरी सान्निध्य


५. प्राकृतिक रचना


✳️मदा


१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)


२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)


३. खोल काळी मृदा


४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा


५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा


६. पिवळसर तपकिरी मृदा


७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा


८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन


✳️वनस्पती


महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.


🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:


१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती


३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती


४. आर्द्र-पानझडी वनस्पती


५. शुष्क पानझडी वनस्पती


६. रूक्ष काटेरी वनस्पती


७. खाजण वनस्पती