01 January 2024

महत्वाचे करंट अफेअर्स-


🔖 प्रश्न - जगामध्ये इलेक्ट्रॉन वस्तू निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

ANS - चीन - चीनचा जगाच्या एकूण वाट्यापैकी ३४ टक्के वाटा आहे. 



🔖 प्रश्न - महाराष्ट्र सरकारने नवीन कोरोना टास्क फोर्स च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती केली आहे ?

ANS - डॉ. रमण गंगाखेडकर यांची 


🔖 प्रश्न - भारतीय कुस्ती महासंघाचे कामकाज पाहण्यासाठी अंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने किती सदस्यांची समिती स्थापन केली ?

ANS - ३ सदस्यांची


🔖 प्रश्न - देशातील पाहिल्या सायबर सुरक्षा केंद्राची स्थापना कोठे करण्यात आली आहे ?

ANS - चंदीगड येथे 


🔖 प्रश्न - सध्या चर्चेत असलेला गेलेफु स्मार्ट सिटी प्रकल्प कोणत्या देशाचा आहे ?

ANS - भूतान



🔖 प्रश्न - टेस्ट अटलास या आंतरराष्ट्रीय पर्यटन ई मासिकाने जगभरातील सर्वोत्कृष्ट १०० खाद्य नगरीची यादी जाहीर केली असून, प्रथम स्थानी कोणते शहर आहे ?

ANS -  रोम शहर


🔖 प्रश्न - १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण आहेत ?

ANS - डॉ. जब्बार पटेल 


🔖 प्रश्न - BBC sport personality of the years २०२३ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे ?

ANS - मैरी ईअर्स 


🔖 प्रश्न - ८५ व्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले ?

ANS - चिराग सेन यांनी 


🔖 प्रश्न - ८५ वी वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा कोठे पार पडली ?

ANS - गुवाहटी


🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले आहे

ANS - अबुधाबी शहर



🔖 प्रश्न - बँक ऑफ बडोदा च्या अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशांच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे ?

ANS - तिसऱ्या क्रमांकावर - भारतात महागाईचा दर ५.६ टक्के आहे. 


🔖 प्रश्न - केंद्र सरकारच्या अहवालानुसर देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे ?

ANS - राजस्थान - येथे १४६ कारागृहाची संख्या आहे


🔖 प्रश्न - २०२३ या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ अंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्या मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे ?

ANS - भारत 


🔖 प्रश्न - डॉ. सादिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला ?

ANS - उर्दू  भाषेतील - त्यांना राजदेव की आमराई या कादंबरी साठी हा पुरस्कार जाहीर झाला. 


🔖 प्रश्न - भारताकडून ऑस्कर २०२४ साठी पाठविण्यात आलेला २०१८: एव्हरिवन इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे ?

ANS - मल्याळम 


🔖 प्रश्न - भारतातील सर्व प्रमुख भाषांना जोडणारी भाशीनी ही कृत्रिम तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा कोणत्या मंत्रालया अंतर्गत राबविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे ?

ANS - इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान मंत्रालया अंतर्गत (जॉईन SAIMkatta टेलिग्राम)


🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणाला जलमित्र पुरस्कार जाहीर झाला ?

ANS - प्रा.डॉ.रामचंद्र मोरवंचीकर यांना 


🔖 प्रश्न - आर्क्टिक प्रदेशावर —– चा आजवरचा सर्वात उष्ण उन्हाळा ठरला आहे ?

ANS - २०२३


🔖 प्रश्न - सन १९०० नंतर २०२३ हे कितवे सर्वात उष्ण वर्षे ठरले आहे ?

ANS - सहावे


🔖 प्रश्न - राज्याच्या पोलिस महासंचालक पदी कोणाची निवड करण्यात आली ?

ANS - रश्मी शुक्ला यांची


🔖 प्रश्न - संयुक्त जनता दल पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे ?

ANS - नितीश कुमार यांची 


🔖 प्रश्न - ६७ व्या राष्ट्रीय शालेय बॉक्सिंग स्पर्धा कोठे पार पडल्या आहेत ?

ANS - अकोला येथे  


🔖 प्रश्न - कोणत्या राज्याच्या उल्फा या बंडखोर संघटनेने केंद्र सरकार सोबत शांतता करार केला आहे ?

ANS - आसाम 


🔖 प्रश्न - कोणत्या राज्यात ५० व्या वर्षी निवृत्ती वेतन मिळणार असल्याची घोषणा तेथील राज्य सरकारने केली आहे ?

ANS - झारखंड सरकारने


🔖 प्रश्न - भारताचे कोणत्या देशातील उच्चायुक्त म्हणुन संतोष झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे ?

ANS - श्रीलंका 


🔖 प्रश्न - कोणत्या राज्याच्या सरकारने मिशन ड्रोन प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे ?

ANS - महाराष्ट्र - या प्रकल्प अंतर्गत एकूण १२ जिल्ह्यात ड्रोन केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. 


🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्याचे नवीन सहकार धोरण ठरविण्यासाठी कोनाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे ?

ANS - सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली


🔖 प्रश्न - कमांडर डोंग जुन यांची कोणत्या देशाच्या संरक्षण मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली आहे ?

ANS - चीन 


🔖 प्रश्न - SLIM ही चंद्रयान मिशन मोहीम कोणत्या देशाची आहे ?

ANS -  जपान 


🔖 प्रश्न -  भारतीय नौदल शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रतिबिंब असलेल्या नवीन गणवेश कधी पासून स्वीकारणार आहेत ?

ANS - १ जानेवारी २०२४ पासून


राज्यसेवा परीक्षा जीवनसत्वे व त्याचे स्त्रोत


 👉 सर फ्रेडीरिक गॉवलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने जिवनसत्वाचा शोध लावला.


📌1. सत्व – अ  


शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस


📌2. सत्व – ब1


शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,


📌3. सत्व – ब2


शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे


📌4. सत्व – ब3


शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी


📌5. सत्व – ब6  


शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या


📌6. सत्व – ब10  


शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत


📌7. सत्व – क  


शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि


📌8. सत्व – ड  


शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे


📌9. सत्व – इ  


शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या


📌10. सत्व – के 

 

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी.       


MPSC राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी यशाचा राजमार्ग

     अभ्यास सुरू करताना आजपर्यंत कसे प्रश्न विचारले गेले ते पाहावे आणि अभ्यास करताना मनातल्या मानत प्रश्न तयार करावेत त्याचबरोबर जो भाग लक्षात राहणार नाही अथवा महत्वाचा वाटतो त्याच्या शॉर्ट मध्ये नोट्स काढा..वाचताना घाई करू नका..शांतपणे समजून उमजून वाचा..एखादा कन्सेप्ट समजत नसेल तर आपल्या ज्याला चांगली त्या विषयावर पकड आहे त्यांना विचारा..त्यावर अधाररीत प्रश्न कोणत्याही मार्केटमधील प्रश्नसंच मधून सोडवा..
     आपण मागील परीक्षेत का fail झालो याची कारणे शोधा आणि ती एका डायरी मध्ये लिहा आणि त्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा..अभ्यासासाठी छोटासा ग्रुप तयार करा..एकमेकांना नोट्स शेअर करा..खूप वेगवेगळ्या पुस्तकसूची आणि अभ्यासाच्या strategy मुळे गोंधळून जाऊ नका.कोणतेही तुम्हाला योग्य वाटेल ती वापरा.हि परीक्षा पास होण्याचा कोणताही एक विशिष्ट मार्ग नाही.वेगवेगळ्या मार्गाने यशस्वी होता येते.कोणतापण एक चांगला मार्ग निवडा.कोणतेही पुस्तकसूची वापरा.भरमसाठ पुस्तके खरेदी करू नका.कोणतेही एकच चांगले पुस्तक करा.हि परीक्षा पुस्तकांची परीक्षा नाही.आपण जे वाचले आहे त्यावर confident राहावा.खाली
     मी मोबाईल चा वापर कसा करता येईल ते लिहले आहे ते बघा तुम्हाला जमले तर use करा...किती तास अभ्यास केला यापेक्षा किती तो अभ्यास आत्मसात झाला यावर भर द्या..भरपूर प्रश्न हे शालेय पुस्तके,इकॉनॉमिक सर्व्हे, लोकराज्य मासिके,शासनाच्या वेबसाईट्स यावर आधारित असतात.त्यांचा चांगला अभ्यास करा...लक्षात घ्या हि तुमची आत्मविश्वासाची परीक्षा आहे..
      जे उमेदवार upsc आणि mpsc या दोघांचा अभ्यास करतात त्यांनी कोणत्यातरी एक परीक्षा द्यावी कारण दोघांचा अभ्यासक्रम, अभ्यास approach आणि परिक्षपद्धती मध्ये फरक आहे..जर तुम्ही upsc चा अभ्यास  सुरु केला नसेल तर mpsc द्या आणि जर तुमचा optional विषयाचा अभ्यास चांगला पूर्ण होत आला असेल तर  upsc करा..
        जे लोक नोकरी करत असतील त्यांना दिवसातून 5 ते 6 तास अभ्यास suffucient राहील....आणखी   या क्षेत्रात  नव्याने येणाऱ्या उमेदवारांनी जर तुमचा खरंच इंटरेस्ट असेल तर तयारी करा.competition खूप वाढले आहे आणि जागा त्या प्रमाणात कमी आहेत.अनिश्चितीता वाढली आहे..तुमचे आवडते क्षेत्र निवडा(कोणी सांगितले म्हणून अथवा कोणतातरी जाहिरात,विडिओ पाहून या क्षेत्रात येऊ नका)

प्रथमतः ही पुस्तके वाचण्याची परीक्षा नाही..आपण कशासाठी आणि का अभ्यास करतो याची जाणीव आपणास सतत असणे आवश्यक आहे...परीक्षेचे स्वरूप पहा..अभ्यासक्रम पहा..कोणत्या विषयावर आपली कमांड नाही तो विषय पाहीले घ्या..एक विषय एकदाच घ्यायचा आणि अभ्यास पूर्ण करायचा..प्रश्न सोडवायचे.. शॉर्ट नोट्स काढायच्या आणि प्रत्येक विषयात पारंगत परीक्षेच्या दृष्टीने होणे गरजेचे आहे..अभ्यासाबरोबर स्वतःवर विश्वास आणि कंट्रोल असणे आवश्यक आहे

जर अभ्यास करताना एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा प्रथम बेसिक चांगले करून घ्या
--अभ्यास करताना घाई करू नका
--जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढचा टॉपिक घेऊ नका
--आपल्या मित्रकडून समजून घ्या
--त्या टॉपिक च्या शॉट मध्ये नोट्स काढा
जास्तीतजास्त प्रश्न सोडवा
मुख्य परीक्षेला जवळजवळ 40% भाग हा पूर्व परीक्षेतील syllabus मध्ये आहे..जो विषय तुम्हाला अवघड जातो त्याचा दररोज अभ्यास करा..कोणताही विषय optionla नका ठेऊ..अजून भरपूर वेळ आहे..सर्व कव्हर करू शकता..दररोज केलेल्या अभ्यासाची त्याच दिवशी revision करा(9pm rule--रात्री 9 नंतर कोणताही नवीन टॉपिक  वाचायचा नाही दिवसभर केलेल्या अभ्यासाची revision करायची..दररोज आपण काय अभ्यास करणार आहोत याची सकाळीच तयारी करायची आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करायचा..त्यामध्ये किती pages वाचणार असे नसावे तर syllabus चा किती भाग पूर्ण करणार असे नियोजन असावे..आपण केलेला अभ्यास फावल्या वेळेत आपल्या मित्राला सांगणे आपण काय अभ्यास केला ते..सांगितल्यामुळे अभ्यास आणखी पक्का होतो..
  


MPSC राज्यसेवा पूर्व मागील 2013  ते  2020 पर्यंत 🙏cut off... 🤔🤔


♦️2013- 177


♦️2014- 138


♦️2015- 125


♦️2016- 153


♦️2017- 189


♦️2018- 247


♦️2019- 197


♦️ 2020- 203.50


⚠️ मागील वर्षी चे cut off तुम्हाला idea यावी म्हूणन share केलेले आहेत..


राज्यसेवा, PSI-STI-ASO मुख्य परीक्षा प्रश्नसंच


📚 कोणत्याही यूरोपीयन सत्तेद्वारा एखाद्या सुसंस्कृत जनतेच्या देशात प्रशासन चालविण्याचा पहिला प्रयत्न म्हणजे कोणता कायदा होय?

= नियामक कायदा,1773(The Regulating Act,1773)


📚 एकूण 11 वर्षे अंमलात असणारया  नियामक कायद्यांतर्गत प्रशासन चालविणारा एकमेव गव्हरनर  जनरल?

= वाॅरन हेस्टिंग्ज 


📚 भारतात सर्वप्रथम कंपनी मधिल मुलकी सेवेच्या अधिकार्याना प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न करणारा पहिला व्यक्ती?

= लॉर्ड वेलस्ली


📚 भारतात मुलकी सेवेच्या सुधारणा करणारा पहिला व्यक्ती?

= रोबर्ट क्लाईव्ह 


📚 भारतात मुल्की सेवेचा खरा पाया रचनारा पहिला व्यक्ती?

= लॉर्ड कॉर्नवॉलीस


📚 परथम व्यक्ती ज्याने सर्वप्रथम यूरोपीयन सैन्य हे  भरतीय राज्यस पैशाच्या मोबदल्यात देवू केले?

= जोसेफ फ्रन्सीस डुप्ले


📚 कषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी सुरुवातीची पाऊले उचलणारा प्रथम गव्हर्नर जनरल ?

- लॉर्ड बेंटींक 


📚 भारतात रेलवे स्थापन करण्याचा प्रथम निर्णय कोठे घेण्यात आला?

- मद्रास


📚 मलकी सेवांमधील नेमणूकीसाठी स्पर्धा परीक्षेच्या तत्वाचा स्विकार करण्याची शिफारस करणारा प्रथम व्यक्ती?

- लॉर्ड मेकॉले


📚 रलवे सुरु करण्याची सर्वप्रथम योजना कोनी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


📚 इग्रजांनी भरतातील पहिली वखार ही कोठे स्थापन केली?

- सुरत


📚भरतातील पहिली राजकिय संघटना कोणती?

- लैंड होल्डर्स सोसायटी.


📚 भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन करणारे?

- नारायण मेघाजी लोखंडे


घटनात्मक संस्था ,वैधानिक संस्था व कार्यकारी किंवा सह - संघटना यातील फरक.

▪️'कायदेशीरदृष्ट्या मंडळ व आयोग तीन प्रकारचे असतात—


💥घटनात्मक संस्था


(अ) प्रत्यक्ष राज्यघटनेनुसार किंवा राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार राष्ट्रपतीने स्थापन केलेले मंडळ किंवा आयोग यांन घटनात्मक मंडळ किंवा आयोग म्हणतात.


🎯 यामध्ये खालील मंडळांचा/आयोगांचा समावेश होतो


(१) निवडणूक आयोग 

(२) केंद्रीय लोकसेवा आयोग

(३) राज्य लोकसेवा आयोग

(४) वित्त आयोग

(५) अधिकृत भाषा आयोग

(६) मागासवर्ग आयोग

(७) अनुसूचित जातींसाठी राष्ट्रीय आयोग. (८) अनुसूचित जमातींसाठी राष्ट्रीय आयोग.


💥वधानिक संस्था.


(ब) संसदेच्या विशेष कायद्यानुसार बनविलेले मंडळ व आयोग यांना वैधानिक संघटना म्हणतात. 


🎯यामध्ये खालील संघटनांच समावेश होतो.


(१) विद्यापीठ अनुदान आयोग

(२) तेल व नैसर्गिक वायू आयोग

 (३) प्रत्यक्ष कर केंद्रीय मंडळ

(४) उत्पादन व आयातशुल्क केंद्रीय मंडळ

(५) रेल्वे मंडळ

(६) अणुऊर्जा आयोग

(७) पूर नियंत्रण मंडळ.

(८) महिलांसाठी राष्ट्रीय आयोग 

इत्यादी.


💥कार्यकारी किंवा सह - संघटना.


(क) केंद्र सरकारच्या कार्यकारी ठरावाने किंवा आदेशाने बनविलेले मंडळ आणि आयोग. याला सह- संघटना म्हणतात. व संबंधित मंत्रालयाच्या थेट नियंत्रणाखाली असतात. 


🎯यामध्ये खालील संघटनांचा समावेश होतो.


(१) अखिल भारतीय हातमाग मंडळ

(२) नियोजन आयोग

(३) कर्मचारी निवड आयोग

(४) अखिल भारतीय हस्तकला मंडळ इत्यादी.

(५) निती आयोग.


महत्वाच्या घटनादुरुस्त्या व त्यांचे विषय

क्र.:-घटना दुरूस्ती:-वर्ष:-घटना दुरूस्तीचा विषय


1.:-1 ली घटना दुरूस्ती:-1951:-नवव्या परिशिष्टामध्ये जमीन सुधारण्याचा विषय समाविष्ट करण्यात आला.


2.:-5 वी घटना दुरूस्ती:-1955:-राज्यांची सीमा, नावे, आणि क्षेत्रफळ यात बदल करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला.


3.:-15 वी घटना दुरूस्ती:-1963:-उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची निवृत्तीचे वय 60 वरून 62 करण्यात आले.


4.:-26 घटना दुरूस्ती:-1971:-संस्थानीकांचे तनखे बंद करण्यात आले.


5.:-31 वी घटना दुरूस्ती:-1973:-लोकसभेचा सभासदांची संख्या 545 करण्यात आली.


6.:-36 वी घटना दुरूस्ती:-1975:-सिक्कीमला घटक राज्याचा दर्जा बहाल करण्यात आला


7.:-42 वी घटना दुरूस्ती:-1976;-मूलभूत कर्तव्यांचा समावेश, लोकसभा आणि विधानसभेचा कार्यकाल पाच वर्षांचा करण्यात आला. मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद या दोन शब्दांचा समावेश करण्यात आला.


8.:-44 वी घटना दुरूस्ती:-1978:-संपत्तीचा अधिकार मूलभूत हक्कातून वगळण्यात आला.


9.:-52 वी घटना दुरूस्ती:-1985:-पक्षांतर बंधी कायदा आणि 10 व्या परिशिष्टाची निर्मिती


10.:-56 वी घटना दुरूस्ती:-1987:-गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.


11.:-61 वी घटना दुरूस्ती:-1989:-मतदारांची वयोमर्यादा 21 वरून 18 करण्यात आली.


12.:-71 वी घटना दुरूस्ती:-1992:-नेपाळी, कोकणी व मणिपुरी भाषांना घटनात्मक दर्जा देण्यात आला.


13.:-73 वी घटना दुरूस्ती:-1993:-पंचायत राज, घटनात्मक दर्जा व अकरावी सूची


14.:-74 वी घटना दुरूस्ती:-1993:-नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक दर्जा व बारावी सूची


15.:-79 वी घटना दुरूस्ती:-1999:-अनुसूचीत जाती-जमातीच्या राखीव जागांमध्ये कालावधीत वाढ 2010 पर्यंत


16.:-85 वी घटना दुरूस्ती:-2001:-सरकारी नोकर्‍यांमध्ये अनुसूचीत जाती-जमातींना बढतीमध्ये आरक्षण


17.:-86 वी घटना दुरूस्ती:-2002:-6 ते 14 वयोगटांतील मुलामुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण


18.:-89 वी घटना दुरूस्ती:-2003:-अनुसूचीत जाती जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना


19.:-91 वी घटना दुरूस्ती:-2003:-केंद्रीय मंत्रिमंडळ आणि घटक मंत्रिमंडळात एकूण सभासदांच्या 15% मंत्र्यांची संख्या निर्धारित करण्यात आली.


20.:-97 वी घटना दुरूस्ती:- -:-सहकारचा विकास


21.:-108 वी घटना दुरूस्ती;- -:-महिलाना लोकसभा व विधानसभेमध्ये 33% आरक्षण


22.:-109 वी घटना दुरूस्ती:- -:-मागासवर्गीयांची राजकारणातील आणि शासकीय नोकर्‍यांमधील आरक्षणाची मुदत 10 वर्षानी वाढवण्यात आली.


23.:-110 वी घटना दुरूस्ती:- -:-महिलांना स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायत राजमध्ये 50% आरक्षण


24.:-113 वी घटना दुरूस्ती:- -:-ओडिशा राज्यातील नावातील बदल


25.:-115 वी घटना दुरूस्ती:-2011:-जिएसटी कराच्या संदर्भात

चालू घडामोडी :- 31 डिसेंबर 2023


◆ डॉ. नितीन करीर यांची मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ मराठी भाषा गौरव दिन 2024 संकल्पना :- '३५० वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव मराठी भाषा गौरव दिनाचा'


◆ दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी "विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज" यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.


◆ ठाणे या ठिकाणी जगातील सर्वात मोठा क्लस्टर प्रकल्प साकारला जात आहे.


◆ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त PM विश्वकर्मा योजना सुरू केली.


◆ परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाची पहिली प्रत त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.


◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरविंद पनगरिया यांची 16 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.


◆ अरविंद पनगरिया यांची सप्टेंबर 2015 मध्ये G20 चर्चेसाठी भारताचे शेर्पा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


◆ अरविंद पनगरिया यांना अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल 2012 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने प्राप्त.


◆ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) मे 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती.


◆ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर ठरल्या देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका.


◆ अजेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी ब्रिक्स सदस्यत्व नाकारले आहे.


◆ BRICS मधील देशांचा समावेश असलेल्या G20 गटामध्ये इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिराती हे 5 देश 01 जानेवारी 2024 रोजी सामील होणार.


◆ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 डिसेंबर 2023 रोजी महास्वच्छता अभियानाची सुरवात "गेट वे ऑफ इंडिया" या ठिकाणावरून केली.