04 January 2024

पर्यावरणाशी संबंधित दिवस


जागतिक पाणथळ दिवस - 2 फेब्रुवारी 


जागतिक वन्यजीव दिवस - 3 मार्च


नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन - 14 मार्च


आंतरराष्ट्रीय वन दिवस - 21 मार्च


जागतिक जल दिन - 22 मार्च


जागतिक हवामान दिवस - 23 मार्च


पृथ्वी दिवस - 22 एप्रिल 


जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस - 22 मे  


जागतिक पर्यावरण दिन - 5 जून


जागतिक महासागर दिवस - 8 जून


आंतरराष्ट्रीय हवामान बदल दिवस - 21 जून


जागतिक पर्जन्यवन दिवस - 22 जून


जागतिक निसर्ग संवर्धन दिन

- 28 जुलै  


ओझोन दिवस - १६ सप्टें


जागतिक पर्यावरण आरोग्य दिन - 26 सप्टें


जागतिक नद्या दिवस - सप्टेंबरचा शेवटचा रविवार


जागतिक प्राणी दिवस - 4 ऑक्टोबर 


आंतरराष्ट्रीय हवामान कृती दिन - 24 ऑक्टो


जागतिक मत्स्य दिवस - 21 नोव्हें


जागतिक मृदा दिवस - 5 डिसेंबर


आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस - 11 डिसेंबर


काय आहे नवा 'हिट अँड रन' कायदा ? - ज्याचा ट्रक आणि बस ड्रायव्हर्स करत आहेत विरोध



🧐 तुम्हाला माहिती असेल, हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस होता. 


📝 त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर गेले आहेत. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.


🧑‍💻 मात्र हा 'हिट अँड रन' कायदा काय आहे ? हे अनेकांना माहिती नाही, दरम्यान या कायद्याविषयी सविस्तर माहिती आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊ. 


🤷‍♀️ काय आहे 'हिट अँड रन' नवीन कायदा ?


🚚 तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी आयपीसी कलम 304A अंतर्गत वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास त्याला फक्त दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागत होता. 


🏢 मात्र आता केंद्र सरकारने नवीन मोटार वाहन कायदा पारित केला आहे. नवीन कायद्यानुसार वाहनचालक अपघात करून फरार झाल्यास तसेच प्राणघातक अपघाताची माहिती पोलिसांना न दिल्यास चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास होण्याची शक्यता आहे. 


🚍 यासोबतच सात लाख रुपये दंड देखील आकारण्यात येणार आहे. यालाच हिट-अँड-रन कायदा असे म्हटले आहे. यापूर्वी या प्रकरणात आरोपी चालकाला काही दिवसांत जामीन मिळायचा - 


🗣️ आणि तो पोलिस ठाण्यातूनच बाहेर पडत असे. मात्र, या कायद्यांतर्गत दोन वर्षांच्या तुरुंगवासाचीही तरतूद करण्यात आली आहे. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🙏 'हिट अँड रन' कायद्याविषयी असलेली - ही माहिती आपण इतरांना देखील शेअर करा-


02 January - Current Affairs


🔖 प्रश्न - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाची नुकतीच कोणी पद व गोपनीयतेची शपथ घेतली?


ANS - रजनीश सेठ यांनी 


🔖 प्रश्न - २०२३ मध्ये विकिपीडियावर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटीमध्ये कोण प्रथम स्थानावर आहे?


ANS -  विराट कोहली 


🔖 प्रश्न - इस्रो ने कोणत्या राज्यातील श्रीहरीकोटा येथुन कृष्णविवराचा अभ्यास करण्यासाठी XPosat या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?


ANS - आंध्रप्रदेश 


🔖 प्रश्न - राज्यातील पहिल्या स्मार्ट कॅफे टॉयलेट ची निर्मिती कोणत्या नगरपरिषदेने केली आहे?


ANS - हिंगणघाट नगरपरिषदेने


🔖 प्रश्न - आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास कोणत्या देशाच्या धर्तीवर करण्यात येणार आहे?


ANS - सिंगापुर 


🔖 प्रश्न - दामोदर खोरे विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?


ANS - एस. सुरेशकुमार यांची 


🔖 प्रश्न - मागील तीन वर्षात स्टार्टअप च्या माध्यमातून देशात किती रोजगानिर्मिती झाली आहे?


ANS - ६ लाख १५ हजार


🔖 प्रश्न - मनरेगा अंतर्गत येणाऱ्या निधीसाठी केंद्र सरकारने कशाची सक्ती केली आहे?


ANS - आधारकार्ड ची 


🔖 प्रश्न - कोणत्या वयोगटातील व्यक्तींना रोजगारक्षम बनवविण्यासाठी राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाची अंमलबजावणी केली जाणार आहे?


ANS - १५ ते ४५


🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यातील महाविद्यालयात किती कौशल्य विकास केंद्रे सुरु केली जाणार आहेत?


ANS - १००

प्रजनन

अलैंगिक प्रजनन :

वनस्पती -

1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)

2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल

3. कलिकायन - किन्व यीस्ट

4. बिजाणूजन्य - बुरेशी

5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा


लैंगिक प्रजनन:

वनस्पती -

· सपुष्प वनस्पतीमध्ये फुलांचा लैंगिक प्रजननात सहभाग असतो.


प्राणी -

· नर आणि मादीच्या संयोगातून गर्भोशयात युग्मनज तयार होतो आणि वाढीतून नवीन जीव तयार होतो.

· वृक्काचे (किडनी) कार्य कृत्रिम पद्धतीने केले जाते. त्या क्रियेला 'डायलेसिस (व्याष्लेषण)' म्हणतात.

· बल्बच्या दिव्यात तंगस्टनची तार असते. तंगस्टनची संज्ञा W आहे. वुलफ्रेम (Wolfram) या जर्मन नावावरून ती घेतली आहे.

· आंदोलन काल (T) हा दोलकाच्या लांबीवर अवलंबून असतो. लांबी वाढवली की काल वाढतो.

· कुत्री, वटवाघूळ हे प्राणी अवश्राव्य ध्वनी एकू शकतात.

· परावर्तन होताना ध्वनीची येणारी दिशा आणि परावर्तीत दिशा लंबाशी सारखाच कोन करतात.

· जे सजीव स्वत:चे अन्न स्वत: तयार करतात त्यांना स्वयंपोषी म्हणतात. तर ज्यांना अन्नासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागते त्यांना परपोषी म्हणतात.

· विकरांच्या क्रियेमुळे अन्नातील घटकांचे विघटन होऊन तयार झालेल्या रसायनिक पदार्थांचे रक्तात शोषण होते आणि त्यांचा वाढीसाठी, झीज भरून काढण्यासाठी उपयोग होतो याला सात्मिकरन म्हणतात.

· हिरव्या वनस्पतींना अन्न तयार करण्यासाठी कार्बन डायोक्साइड, प्रकाश, हरितद्रव, पाणी या घटकाची गरज असते.

· आयोडीन द्रावणाने पदार्थ पिष्टमय आहे किंवा नाही याची परीक्षा करता येते.

विज्ञान प्रश्नसंच

मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

१) कोरनिआ  

२) इरीस✅✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅

४) स्पंदन


🌸 अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) स्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान

पराण्यांतील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Animals):

🌿काही प्राण्यांमध्ये नार आणि माधुरी ग्रंथी एकत्र असतात त्यांना उभयलिंगी प्राणी (Hermaphrodites) असे म्हणतात. उदा. लिव्हरफ्ल्यूक, हायड्रा, गांडूळ

🌿काही प्राण्यांमध्ये नार आणि मढी ग्रंथी भिन्न सजीवांमध्ये असतात त्यांना एकलिंगी प्राणी (Unisexual Animals) असे म्हणतात.

उदा. मानव, गुरे, कुत्रा, बेडूक, मासे, सॅप, पक्षी, पाल

🌿पराण्यांमधील प्रजनन प्रक्रियेसाठी ते अंडी घालतात किंवा पिल्लांना जन्म देतात या आधारे त्यांचे वर्गीकरण तीन गटात केले जाते.


🌷१) अंडज प्राणी (Oviparous) : जे प्राणी अंडी घालतात त्यांना अंडज प्राणी असे म्हणतात

उदा. बेडूक, कीटक, टोड, गोगलगाय, ऑकटोप्स, मासे, साप, पाल, पक्षी, (प्लॅटिपस आणि इकिडना सस्तनी प्राणी )


🌷२) जरायुज प्राणी (Viviparous): जे प्राणी पिल्लांना जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी असे म्हणतात.

उदा. मन, विंचू, झुरळ, देवमासा, शार्कमासा, समुद्री साप


🌷३) अंडजरायुज प्राणी (Oviviviparous): जे प्राणी फलित अंडी विकसित करतात आणि मादीच्या शरीरातून भ्रूण बाहेर सोडले जाते त्यांना अंडजरायुज प्राणी असे म्हणतात.

उदा. गप्पी मासे (Gambusia Fish), काही कीटक

कवक ( Fungus )



आर्. एच्. व्हिटकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी वर्गीकरणानुसार कवके ही सजीवांची एक स्वतंत्र सृष्टी आहे. जगात सर्वत्र कवके आढळतात. कवकांमध्ये पटल-आच्छादित केंद्रक आणि तंतुकणिकांसारखी पेशीअंगके असतात, मात्र त्यांमध्ये हरितलवके आणि हरितद्रव्य नसतात. त्यांमध्ये प्रकाशसंश्लेषण घडून येत नाही, ती परपोषी असतात. काही कवके एक-पेशीय असतात. बहुतांशी कवके बहुपेशीय असून ती शाखायुक्त तंतूंच्या गुच्छाप्रमाणे वाढतात. त्यांना कवकजाल म्हणतात.


कवकांचे तंतू कठिण पेशीभित्तीने वेढलेले असून त्यांमध्ये कायटीन, सेल्युलोज किंवा दोन्ही आणि इतर बहुशर्करायुक्त पदार्थ असतात. प्रकाशसंश्लेषण घडवून आणण्याची क्षमता कवकांमध्ये नसल्यामुळे ती अन्नासाठी सेंद्रिय (कार्बनी) पदार्थांवर अवलंबून असतात.


बहुतांशी कवके नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. मातीत व मृत पदार्थात ती आढळत असून वनस्पती, प्राणी आणि इतर कवकांमध्ये सहजीवन घडवून आणण्यात ती मोलाची कामगिरी बजावतात. सर्व परिसंस्थांमध्ये ती विघटन घडवून आणतात. पोषकद्रव्यांच्या चक्रातील आणि देवाण-घेवाणीतील ती अपरिहार्य घटक आहेत.


कवकांचे एकपेशीय तंतुमय तसेच बहुपेशीय भूछत्रांसारखे प्रकार आहेत. यांच्या अनेक जातींमध्ये अलैंगिक प्रजनन होते व बीजाणूंची निर्मिती होते. याच बीजाणूंपासून नवीन जीवांची उत्पत्ती होते. यांची संख्या, लैंगिक प्रजननाच्या पद्धती, जीवनचक्राचे प्रकार, वाढीचे स्वरूप आणि अलैंगिक प्रसाराच्या पद्धती यांनुसार कवकांचे वर्गीकरण केले जाते.


कवकांची परिचित उदाहरणे म्हणजे किण्व (यीस्ट), बुरशी, तांबेरा, काणी, भूछत्र वगैरे. कवक सृष्टीमध्ये यूमायकोफायटा (सत्यकवके) हा एकच संघ आहे, असे मानले जाते. काही वैज्ञानिक कवकातील बीजाणूंना प्रकेसल किंवा कशाभिका आहे किंवा नाही, यावरून दोन उपसंघ मानतात. काही वैज्ञानिक श्लेष्मबुरशी इत्यादींचाही समावेश कवकांमध्ये करतात. त्यांचा मिक्सोमायकोफायटा हा वेगळा संघ मानला जातो. कवके उपयुक्त तसेच नुकसान करणारीही आहेत. सफरचंद, बटाटा, गहू, द्राक्षे यांवरील भुरी आणि बाजरीवरील अरगट व तांबेरा असे वनस्पतींचे रोग कवकांमुळे होतात. तसेच चामड्याचे नुकसान, अन्न विटणे, कपड्यांना बुरशी लागणे इ. नुकसान त्यांमुळे होते. कवकांमुळे माणसांना तसेच प्राण्यांना गजकर्ण व नायट्यासारखे त्वचेचे रोग होतात.


कवकांच्या अनेक जाती मनुष्याला उपयुक्तदेखील आहेत. त्यांची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे व्यावहारिक क्षेत्रात त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. किण्वन प्रक्रियेमागील शास्त्र नीट समजण्यापूर्वीदेखील द्राक्षे आणि इतर पदार्थांपासून मद्यार्क (अल्कोहॉल) बनविण्यासाठी ब्रुअर यीस्ट वापरले जात असे. किण्वानामुळे तयार होणार्‍या अल्कोहॉलचा रासायनिक आणि औषधी उपयोग केला जातो. पाव बनविण्याच्या उद्योगात बेकर यीष्ट मोठ्या प्रमाणावर वापरतात. पेनिसिलियम कॅम्बर्टी यामुळे चीजला विशिष्ट वास प्राप्‍त होतो. चिनी खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे सोया सॉस हे विशिष्ट कवकांद्वारे किण्वन प्रक्रियेने बनवितात.


पेनिसिलियम नोटॅटम यापासून मिळणार्‍या पेनिसिलिनचा उपयोग करून पहिल्यांदा प्रतिजैविके तयार करण्यात आली. या कवकाची प्रतिजैविक क्षमता ब्रिटिश वैज्ञानिक अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंग यांनी १९२९ मध्ये दाखवून दिली. दुसर्‍या महायुद्धात केवळ ब्रिटिश आणि अमेरिकन वैज्ञानिकांनी संयुक्त संशोधन करून पेनिसिलियम क्रायसोजिनम यापासून प्रतिजैविकांचे जास्त उत्पादन देणारे उत्परिवर्ती वंशप्रकार मिळविले. तेव्हाच पेनिसिलियमचे औद्योगिक उत्पादन करणे शक्य झाले. या उद्योगाने जगभर मोठे रूप धारण केलेले आहे, मात्र सध्या उपलब्ध प्रतिजैविकांपैकी फक्त काहीच प्रतिजैविके कवकांपासून बनलेली आहेत. ग्लुकॉनिक, आयटोकॉनिक, सायट्रिक इ. सेंद्रिय आम्ले तयार करण्यासाठी तसेच इतर रासायनिक प्रक्रियांमध्ये विविध सूक्ष्मकवकांचा वापर होतो. दरवर्षी जवळजवळ एक लाख टन सायट्रिक आम्लाचे उत्पादन अ‍ॅस्परजिलस नायगरया कवकांद्वारे होते. काही देशांत पाव उद्योगासाठी आणि मांस टिकविण्यासाठी लागणारे अ‍ॅसिड प्रोटीझेस नावाचे विकर तयार करण्यासाठी कवकांची मुद्दाम वाढ करतात.

भारतीय अर्थव्यवस्था :- एक दृषक्षेप

▪️ देशाची एकूण लोकसंख्या (२०११) :- १२१.०८ कोटी


▪️जगाच्या लोकसंख्येच्या शेकडा प्रमाण :- १७.७%


▪️ लिंग गुणोत्तर (प्रती हजार पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण ):-  ९४३


▪️सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य :- केरळ  (१०८४)


▪️जन्मदर (२०१७) :- २०.२ प्रती एक हजार


▪️ मृत्यू दर(२०१७):- ६.३ प्रती एक हजार.


▪️महिला प्रजनन दर (२०१७) :-२.२


 अ) शहरी क्षेत्र :-१.७

 ब) ग्रामीण :- २.४


▪️शिशु मृत्यू दर(२०१७) :-

 ३३ (प्रती हजार जिवंत व्यक्ती)


अ) पुरूष:- ३२

ब) महिला :- ३२

क) ग्रामीण :- ३७

ड) शहरी:- २३


 ▪️सरासरी आयुष्मान:- ६८.८ वर्ष


अ) पुरूष:- ९७.३ वर्ष

ब) महिला :-७०.४ वर्ष

चालू घडामोडी :- 03 जानेवारी 2024

◆ ज्वारी उत्पादनात महाराष्ट्रातील पाहिले 5 जिल्हे :- 1] सोलापूर, 2] अहमदनगर, 3] बीड, 4] धाराशिव, 5] सांगली

◆ "प्रशासकीय योगायोग" पुस्तकाचे लेखक सेवानिवृत्त सनदी अधिकारी शेखर गायकवाड आहेत.

◆ "सुप्रशासन संधी आणि आव्हाने" पुस्तकाचे लेखक महापालिकेचे उपायुक्त राजीव नंदकर आहेत.

◆ 3 जानेवारी :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती, "महाराष्ट्र बालिका दिन" आणि "महिला शिक्षण दिन".

◆ अत्याचार, लैंगिक शोषण तसेच Acid हल्ल्यात बळी पडेलल्या महिलेला अर्थसाहाय्य तसेच पुनर्वसन करणे यासाठी राज्यात 2013 मध्ये मनोधैर्य योजना सुरू करण्यात आली.

◆ मनोधैर्य योजना विस्तारानुसार कायमचे अपंगत्व आल्यास अशा पीडित व्यक्तीस 10 लाख रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाणार आहे.

◆ केंद्र सरकार कडून सुरू करण्यात आलेल्या 'पीएम विश्वकर्मा' योजनेंतर्गत गरजूंना कर्ज दिले जाते आणि व्यवसाय करण्यास प्रोत्साहित केले जाते.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या सप्टेंबर 2023 मध्ये विश्वकर्मा जयंतीनिमित्त ही योजना सुरू केली होती.

◆ भारत संयुक्त अरब अमिरातीचा संयुक्त लष्करी मराव 'डेझर्ट सायक्लोन' राजस्थानमध्ये सुरू झाला आहे.

◆ 8 ते 13 जानेवारी 2024 दरम्यान गोवा इंटरनॅशनल पर्पल फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ सार्वजनिक सहभागाद्वारे सीएसआयआर - राष्ट्रीय समुद्रशास्त्र संस्थेने 59 वा स्थापना दिवस साजरा केला.

◆ महिला सशक्तीकरणाचे धोरण अनुसरत केंद्रीय निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतन धारक कल्याण विभागाने महिला सरकारी कर्मचाऱ्यांना कुटुंबनिवृत्तीवेतन मिळण्यासाठी पतीच्या ऐवजी एक/अनेक अपत्यांचे नाव नामनिर्देशित करण्याची परवानगी दिली.

◆ अनाहतने स्कॉटिश ज्युनियर ओपन स्क्वॉश सी शिपमध्ये अंडर-19 मुलींचे विजेतेपद पटकावले.

◆ भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी किरण देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ ब्रिक्स गटाची एकुण सदस्य संख्या 10 झाली असून ब्रिक्स गटाचे या वर्षीचे अध्यक्ष पद रशिया या देशाकडे आहे.

◆ केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमे अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे.

◆ दिप्ती शर्मा ही अंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट मध्ये 100 विकेट घेणारी चौथी भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे.

◆ कमलताई परदेशी(पुणे) यांचे नुकतेच निधन झाले. त्या "मसाला क्वीन" नावाने प्रसिद्ध होत्या.

◆ FIDE world रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 चे विजेतेपद मॅग्नस कार्लसन याने पटकावले.

◆ FIDE world रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा 2023 उझबेकिस्तान या देशात आयोजीत करण्यात आली होती.

◆ फेलिक्स त्सेसिकेदी यांची कांगो या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे.

वृक्क (Kidney)

आपल्या शरीरात दोन्ही बाजूस एक अशा दोन वृक्क असतात. वृक्कांचा आकार घेवड्याच्या बियांसारखा असून रंग लालसर तपकिरी असतो.वृक्कांची लांबी 10 ते 12 cm असून रुंदी 6 cm तर जाडी  4 cm असते.वृक्काचे वजन पुरुषांमध्ये 125-170 g असून स्त्रियांमध्ये 115-155 g असते.वृक्काच्या बाह्य आवरणाला वलकुट (Cortex) असे म्हणतात. त्यामध्ये 8-18 पिरॅमिड / शंक्वाकृती घटक असतात, त्यांना मध्यांश (Medulla) असे म्हणतात.मध्यांशासमोर मूत्रवाहिनेचे श्रोणी (Pelvis) नावाचा भाग असतो. तेथून वृक्काला ऑक्सिजनयुक्त रक्त पुरविणारी वृक्क धमनी (Renal Artery) आत शिरते तर कार्बन डायॉकसाईड रक्त वाहून नेणारी वृक्क शीर (Renal Vein) बाहेर निघते.प्रत्येक मध्यांशामध्ये एक लाख याप्रमाणे प्रत्येक वृक्कात सुमारे 10 लाख मूत्र जनक नलिका असतात. त्यांना वृक्कानू (Nephron) म्हणतात.
वृकानुमध्येच अशुध्द रक्त गाळण्याची मूलभूत क्रिया घडून येते.उजवे वृक्क हे डाव्या वृक्कापेक्षा थोडेसे खाली असते कारण त्याच्या वर यकृत ग्रंथी असते.आपल्या शरीरातील रक्त वृक्कामधून दररोज 400 वेळा गाळले जाते. म्हणजे एका मिनिटाला 125 मिली एवढे रक्त गाळले जाते.आपले वृक्क दररोज साधारणपण

💥वृक्काचे कार्य (Functions Of Kidney)

1) रक्तातील चयापचय क्रियेत तयार झालेले अमोनिया, युरिया व युरिक आम्ल यासारखे नायट्रोजनयुक्त टाकाऊ पदार्थ शरीराबाहेर टाकणे.

2) रक्तातील अयनांचे प्रमाण संतुलित ठेवणे.

3) रक्ताचा सामु (pH) संतुलित ठेवणे.

4) रक्ताचा परासरण दाब आणि आकारमान नियंत्रित करणे.

5) वृक्कामधून क्लीस्ट्रायॉल आणि एरिथ्रो पायोटीन हि संप्रेरके तर रेनिन हे विकार तयार होते.

6) वृक्कमुळे शर्करा, अमिनो आम्ले आणि पाणी यांचे पुनःअवशोषण घडून येते.

7) वृक्कमुळे आम्ल-आम्लरींचे संतुलन तसेच रक्तदाब नियंत्रित केला जातो.

8) वृक्कामुळे बायकार्बोनेटचे (HCO3)

9) ADH (Anti Diuretic Hormone) या वृक्कातील संप्रेरकामुळे पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवले जाते.


जीवनसत्त्व ई


» याचे रासायनिक नाव टोकोफेरॉल आहे. 

» ई जीवनसत्त्व आल्फा, बीटा, गॅमा व डेल्टा टोकोफेरॉल म्हणून नैसर्गिक रीत्या वनस्पतिज तेलांमध्ये असते. 

» नेहमीच्या अन्न शिजविण्याने या जीवनसत्त्वाचा नाश होत नाही; परंतु खरपूस तळण्याने या जीवनसत्त्वाचा नाश होतो.

» ई जीवनसत्त्व सर्व प्रकारच्या अन्नपदार्थांत आढळते. करडई, शेंगदाणा, मका व सरकी यांच्या तेलात, कडधान्ये, डाळी, हिरव्या पालेभाज्यांमध्ये ई जीवनसत्त्व असते. 

» सालीट (लेट्यूस) या पालेभाजीत व लसूणघास (आल्फा - आल्फा) या गवतात जास्त प्रमाणात तर गव्हाच्या अंकुरापासून काढलेल्या तेलात ई जीवनसत्त्व सर्वाधिक असते. 

» लोणी, अंड्यातील पिवळा बलक, यकृत यांतही ई जीवनसत्त्व आढळते. प्रौढ व्यक्तीला दररोज सु. १५ मिग्रॅ. ई जीवनसत्त्व लागते.

» ई जीवनसत्त्व निरनिराळ्या पेशींमध्ये प्रतिऑक्सिडीकारक आणि सहविकर म्हणून कार्य करते. 

» शरीरातील मेदाम्ले, अ तसेच क जीवनसत्त्वांचे ऑक्सिडीकरणापासून बचाव करते. 

» ई जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लिपिड पेरॉक्साइडे रक्तपेशीत साठविली जातात आणि पेशीपटलात विकृती निर्माण होऊन त्या पेशी लवकर नाश पावतात. 

» केशवाहिन्यांमधील रक्ताच्या पारगम्यतेवर विपरित परिणाम होऊन द्रवयुक्त सूज येते आणि पांडुरोग होतो. 

» ई जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे स्नायूंची वाढ खुंटते. 

» उंदरांवरील प्रयोगात मादीतील वंध्यत्व व नरात वृषण अपकर्ष यावर ई जीवनसत्त्व उपयुक्त ठरते असे आढळून आले आहे. 

» ते प्रजननासाठी आवश्यक असून वंध्यत्व, गर्भपात इ. विकृतींकरिता वापरतात. या जीवनसत्त्वाच्या अतिसेवनाने विषाक्तता होत नाही.

पचनसंस्था


★ पचनसंंस्थेत अन्ननलिका व पाचक  ग्रंथी यांचा समावेश असतो.

★ अन्ननलिका :- एकूण लांबी ९५० सेंमी ( ३२ फूट) 

★टप्पे :- 

१) मुखवास ( Buccal cavity)

२) ग्रासनी (Throat)

३) ग्रासिका (Oesophagus)

४) जठर ( stomach)

५) लहान आतडे (Small Intestine ) 

६) मोठे आतडे ( large Intestine )


🔸 मुखवास (Mouth ) 


● लाळ (saliva ) :- लाळ ग्रंथी 3

१) कर्णमूल ग्रंथी ( parotid gland )

२) अधोहणू ग्रंथी ( Sub- mandibular gland ) 

३) अधोजिव्हा ग्रंथी ( Sub lingual gland )

● या टप्प्यात अन्नाचे चवरण होते आणि त्यात लाळ मिसळते.

●लाळ किंचित आम्लधर्मी असते ,त्यामुळे अन्नातील जंतूंचा नास होतो.

●लाळे मध्ये टायलीन नावाचे विकर असते.हे विकर स्टार्चचे रूपांतर माल्टोज मधे करते.


🔸 गरासनी :- 


●ग्रासनी मध्ये अन्न व श्वसननलिका असते.

●श्वासनलीकेच्या तोंडावर epiglotis नावाचा पडदा असतो.हा पडदा अन्नाचा कण श्वसन्नलिकेत जाऊ देत नाही.


🔸 ग्रासिका :- 


● घश्यापासून जठरपर्यंत असते 

● तिची लांबी २५ सेमी 

●अन्न अन्ननलिकेत आल्यावर जठरात पोहचण्यासाठी सुमारे ८ सेकंद  लागतात.

●अन्ननलिकेतील स्नायू अंकूचन आणि प्रसरण होऊन अन्नाला पुढे ढकलतात.


🔸 जठर :- 

●स्थान - पोटात डावीकडे

●जठरामद्ये लक्षतावधी जाठर ग्रंथी ( grastic gland ) असतात. 

●जठरात अन्न सुमारे 5 तास थांबते.

●जठर ग्रंथीतून पुढील गोष्टी स्त्रावतात - 

१) जठर रस :-  

●यात Pepsin व  Renin ही दोन विकार असतात.

२) हायड्रोक्लिरीक ऍसिड - 

●अन्नातील जंतूंचा नाश

● पेप्सीन प्रोटीनचे रूपांतर peptonce मध्ये करते. 

● रेनिन हे विकर फक्त लहान मुलांमध्येच आढळत.हे विकर दुधातील केसीनचे रूपांतर पराकेसीन करते. 

●जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण होत नाही.फक्त पाणी ,अल्कोहोल व औषध यांचे शोषण होते.


🔸 लहान आतडे :- 


●लांबी - २० - २५ फूट

● शरीरातील सर्वांत लांब अवयव

● अन्नाचे मुख्यत्वे पचन येथे होते,उरलेले अन्न ६-८ तास रहाते .

● येथील अन्नमध्ये पुढील रसायने मिसळतात.

१)लायपेज 

२) अमायलेज {ठोस अन्नतील पोषक द्रव्यांचे शोषण}

३) ट्रीप्सिन

४) पित्तरस - मेदाचे विघटन

( पित्त रस यकृतात तयार होतो)


🔸 मोठे आतडे :- 


●लांबी - १.५ मी 

● मोठ्या आतड्यात द्रव अन्नातील पोषक द्रव्ये शोषले जातात. आणि त्याचे रुपांतर ग्लुकोज मध्ये होते.

● मोठया आतड्याच्या सुरवातीला एक नळी असते. त्या नळीला Apendix असे म्हणतात. 

ही नळचा अन्नपचनातील कोणत्याही कार्यात सहभाग होत नाही.

●  अशा प्रकारे अन्नातून ग्लुकोज ही उर्जा मुक्त होते आणि अन्नातील अनावश्यक भाग सौच्यामार्फत बाहेर टाकले जाते।

विज्ञान प्रश्नमंजुषा


1)सामन्यत: सूक्ष्मजीव ______ असतात.

एकपेशी

बहुपेशी

अतिसूक्ष्म

विविध आकारांचे 


A. एकपेशी

-----------------------------------------------------------------------------

2) प्रकाश संश्लेषनात _______ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

हरितद्रव्यामुळे

झथोफिलमुळे

कॅरोटीनमुळे

मग्नेशिंअममुळे 


A. हरितद्रव्यामुळे

-----------------------------------------------------------------------------

3) ज्या प्रक्रियेद्वारे सजीव आपले अन्न मिळवतात व ते ग्रहण करतात त्या प्रक्रियेस ____ म्हणतात.

पोषण

स्वयंपोषण

परपोषण

अंत:पोषण 


A. पोषण

-----------------------------------------------------------------------------

4) _______ पेशीमुळे विशिष्ट आकार प्राप्त होतो.

पेशी - भित्तिका

प्रद्रव्य पटल

पेशीद्रव्य

केंद्रक 


A. पेशी - भित्तिका

-----------------------------------------------------------------------------

5) _________ हे सजीवांच्या रचनेचे व कार्याचे एकक आहे.

पेशी

उती

अवयव

अणु 


A. पेशी

-----------------------------------------------------------------------------

6) ______ संघातील प्राण्यांचे शरीर खंडीभूत व पाय जोडयुक्त असतात.

प्लटिहेल्मिन्थस

पोरीफेरा

आर्थ्रोपोडा

ईकायनोडर्माटा 


C. आर्थ्रोपोडा

-----------------------------------------------------------------------------

7) किण्वन हा _________ चा प्रकार आहे.

ऑक्सिश्वसन

विनॉक्सिश्वसन

प्रकाशसंश्लेषण

ज्वलन 


B. विनॉक्सिश्वसन

-----------------------------------------------------------------------------

8) अहरित वनस्पती ______ असतात.

स्वयंपोषी

परपोषी

मांसाहारी

अभक्षी 


B. परपोषी

-----------------------------------------------------------------------------

9) सौरऊर्जा ___ स्वरुपात असते.

प्रकाश प्रारणांच्या

विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या

अल्फा प्रारणांच्या

गामा प्रारणांच्या 


B. विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या

-----------------------------------------------------------------------------

10) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर _____ प्रारणांचा मारा करतात.

अल्फा

बिटा

गामा

क्ष-किरण 


C. गामा

-----------------------------------------------------------------------------

11) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ......... इतकी असते.

M

N

A

X


B. N

-----------------------------------------------------------------------------

12) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण.........आहे.

०.०३%

०.३%

३%

०.००३%


A. ०.०३%

-----------------------------------------------------------------------------

13) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही.

फिलीसीनी

मुसी

लायकोपोडियम

इक्विसेटीनि 


B. मुसी

-----------------------------------------------------------------------------

14) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण..........हे विकर त्याच्या जठरात नसते.

सेल्युलेज

पेप्सीन

सेल्युलीन

सेल्युपेज 


A. सेल्युलेज

-----------------------------------------------------------------------------

15) पाण्याची घनता ................ ला उच्चतम असते.

४'C

२५'C

०'C

७३'C


A. ४'C

-----------------------------------------------------------------------------

16) आधुनिक जैवतंत्रज्ञान ............. पातळीवर कार्य करते.

अवअणू

अणू

रेणू

पदार्थ 


C. रेणू

-----------------------------------------------------------------------------

17) डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

आयोडीन-१२५

सामारिअम-१५३

ल्युथिनिअरम-१७७

सेसिअम-१३७ 


A. आयोडीन-१२५

-----------------------------------------------------------------------------

18) किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

१०० डी.बी.च्या वर

११० डी.बी.च्या वर

१४० डी.बी.च्या वर

१६० डी.बी.च्या वर 


A. १०० डी.बी.च्या वर

-----------------------------------------------------------------------------

19) इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन...

कमी होते

वाढते

सारखेच राहते

शून्य होते 


A. कमी होते

-----------------------------------------------------------------------------

20) 'फ्यूएल सेल' पासून विद्युत तयार करण्यासाठी वापरणाऱ्या हायड्रोजनची निर्मिती कशापासून केली जाते?

पाणी

अल्कोहोल

इथेनॉल

सेंद्रिय पदार्थ 

A. पाणी

-----------------------------------------------------------------------------

21) निष्क्रिय वायू हे...........

पाण्यामध्ये विरघळतात

स्थिर नसतात

रासायनिक क्रिया करू न शकणारे

रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील 


C. रासायनिक क्रिया करू न शकणारे

-----------------------------------------------------------------------

22) गाईचे दूध पुढीलपैकी कशाचा महत्वाचा स्त्रोत आहे?

' अ ' जीवनसत्त्व

' ब ' जीवनसत्त्व

' क ' जीवनसत्त्व

' ड ' जीवनसत्त्व 


A. ' अ ' जीवनसत्त्व

-----------------------------------------------------------------------------

23) खालीलपैकी कोणते खरे फळ आहे?

सफरचंद

काजू

अननस

नारळ 


D. नारळ

-----------------------------------------------------------------------------

24) ............या पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.

चांदी

पारा

पाणी

लोखंड 


C. पाणी

-----------------------------------------------------------------------------

25) सल्फ्युरिक आम्ल च्या बाबतीत सत्य असणारा संबध ...........

प्रसामान्यता = रेणुता

प्रसामान्यता = २*रेणुता

प्रसामान्यता = आम्लरिधर्मता

प्रसामान्यता = आम्लधर्मता 


B. प्रसामान्यता = २*रेणुता

-----------------------------------------------------------------------------

26) 'खोकला येणे व थुंकीतून रक्त पडणे' ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत?

हिवताप

कावीळ

क्षय

देवी 


C. क्षय

-----------------------------------------------------------------------------

27) जेव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन..........

वाढते

कमी होते

पूर्वीइतकेच राहते

शून्य होते 


D. शून्य होते

-----------------------------------------------------------------------------

28) खालीलपैकी कोणता रोग 'ड' जीवनसत्त्वाच्या अभावी?

स्कर्व्ही

बेरीबेरी

मुडदूस

राताधळेपणा 


C. मुडदूस

-----------------------------------------------------------------------------

29) 'जी.एस.आर' हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

मेंदूचे स्पंदन

हृदयाचे स्पंदन

डोळ्यांची क्षमता

हाडांची ठिसूळता


C. डोळ्यांची क्षमता

-----------------------------------------------------------------------------

30) आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

'ब-१' जीवनसत्त्व

'ब-४' जीवनसत्त्व

'ड ' जीवनसत्त्व

'के ' जीवनसत्त्व 


D. 'के ' जीवनसत्त्व

-----------------------------------------------------------------------------

31) ज्या निरीक्षणात काही घटकांची निरीक्षकाकडून दखलच घेतली जात नाही त्यास काय म्हणतात ?

अपूर्ण निरीक्षण

दुर्निरीक्षण

अनिरीक्षण

यापैकी नाही 


A. अपूर्ण निरीक्षण

-----------------------------------------------------------------------------

32) बरोबर उत्तर निवडा. ३०' से .तापमानाचे पाणी भरलेली सीलबंद बाटली अवकाशयानामधून चंद्रावर नेली. ती चंद्राच्या पृष्ठभागावर ठेउन तिचे झाकण उघडल्याबरोबर आतील पाण्याचे काय होईल?

पाणी उकळेल.

पाणी गोठेल.

ते अतिशीत होईल.

त्याचे H२ व O असे विघटन होईल.


A. पाणी उकळेल.

-----------------------------------------------------------------------------

33) ..........हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

प्लुटोनिअम

U -२३५

थोरीअम

रेडीअम 


A. प्लुटोनिअम

-----------------------------------------------------------------------------

34) पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ........कि.मी.इतकी आहे.

२००

३५०

५००

७५० 


D. ७५०


35) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी .......

जठर

यकृत

हृदय

मोठे आतडे 


B. यकृत

-----------------------------------------------------------------------------

36) खालीलपैकी भरपूर प्रमाणात 'अ' जीवनसत्वे देणारा पदार्थ.........

सफरचंद

गाजर

केळी

संत्री 


B. गाजर


37) जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ...........मुळे होतात.

जीवाणू (bacteria)

विषाणू (virus)

कवक (fungi)

बुरशी 


B. विषाणू (virus)

-----------------------------------------------------------------------------

38) खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

युरिया

नायट्रेट

अमोनिअम सल्फेट

कंपोस्ट 


D. कंपोस्ट

-----------------------------------------------------------------------------

39) भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यतः ......... वापरले जाते.

तुरटी

सोडीअम क्लोराइड

क्लोरीन

पोटॉंशिअम परम्याग्नेट 


C. क्लोरीन

-----------------------------------------------------------------------------

40) खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात?

कार्डिओग्राफ

स्टेथोस्कोप

थर्मामीटर

अल्टीमीटर 


B. स्टेथोस्कोप

-----------------------------------------------------------------------------

41) ...........या किरणांना वस्तुमान नसते.

अल्फा

'क्ष'

ग्यामा

बीटा 


C. ग्यामा


42) खालीलपैकी कोणता जीवनसत्त्व जखमा लवकर भरून काढण्यास उपयुक्त ठरते?

'ड' जीवनसत्त्व

'इ' जीवनसत्त्व

'के' जीवनसत्त्व

'ब' जीवनसत्त्व 

C. 'के' जीवनसत्त्व

-----------------------------------------------------------------------------

43) कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप........

दगडी कोळसा

कोक

चारकोल

हिरा 


D. हिरा

-----------------------------------------------------------------------------

44) हिवतापावरील प्रभावी ऑंषध........

पेनेसिलीन

प्रायमाक्वीन

सल्फोन

टेरामायसीन 


B. प्रायमाक्वीन

-----------------------------------------------------------------------------

45) जड पाण्यामध्ये खालीलपैकी कोणता पदार्थ असतो?

कल्शिअम

सोडीअम

कार्बन

क्लोरीन 


A. कल्शिअम

-----------------------------------------------------------------------------

46) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?

४० टक्के

४ टक्के

१३ टक्के

३१ टक्के 


B. ४ टक्के

-----------------------------------------------------------------------------

47) खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता ?

हायड्रोजन

हेलिअम

ऑक्सिजन

कार्बन-डाय-ओक्साइड 


A. हायड्रोजन

-----------------------------------------------------------------------------

48) पुढीलपैकी कोणती जीवनसत्त्वे मानवी शरीरात तयार होतात ? १)'ब-६' जीवनसत्त्व २)'ड' जीवनसत्त्व ३)'इ' जीवनसत्त्व ४)'के' जीवनसत्त्व

१ व २

२ व ३

२ व ४

१ व ४ 


C. २ व ४

-----------------------------------------------------------------------------

49) दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्ये महत्त्वाचे ठरते ?

सोडियम

आयोडीन

लोह

फ्लोरीन


D. फ्लोरीन


-----------------------------------------------------------------------------


50) लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

देवी

मधुमेह

पोलिओ

डांग्या खोकला 


B. मधुमेह

महत्वाचे प्रश्नसंच

 1.१९५७ साली रोकेटच्या साह्याने उपग्रह पाठविण्याचा पहिला यशस्वी विक्रम कोणत्या देशाने केला?

A) रशिया  🌹🌹

B) अमेरिका 

C) भारत

D) कॅनडा




2. गोलीय आरशासमोर तुम्ही कितीही अंतरावर उभे राहिलात तरी प्रतिमा सुलटी दिसते ,म्हणून तो आरसा .................... असला पाहिजे .

A) सपाट  

B) अंतर्वक्र 

C) बहिर्वक्र

D) सपाट किंवा बहिर्वक्र🌹🌹



3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर......

A) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 

B) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .

C) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .

D) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.🌹🌹



4. हाडांतील कॅल्सियम फॉस्फेटचे प्रमाण किती असते?

A) ५० टक्के 

B) ६० टक्के🌹🌹

C) ४० टक्के

D) ८० टक्के




5. विद्यूत शक्ती ------- मध्ये मोजतात?

A) वॉल्ट 

B) केल्वीन

C) वॅट🌹🌸

D) कॅलरी




6. कोणत्या मुलद्रव्यास लसणासारखा वास आहे?

A) पिवळा फॉस्फरस 🌹🌸

B) तांबडा फॉस्फरस

C) सल्फर डाय ऑक्साईड

D) नायट्रोजन ऑक्साईड




7. कोणत्या मुलद्रव्यास लसणासारखा वास आहे?

A) पिवळा फॉस्फरस 🌹🌸

B) तांबडा फॉस्फरस

C) सल्फर डाय ऑक्साईड

D) नायट्रोजन ऑक्साईड




8. विद्यूत शक्ती ------- मध्ये मोजतात?

A) वॉल्ट 

B) केल्वीन

C) वॅट🌹🌸

D) कॅलरी




9. तुमच्या शरीराची स्थितिज ऊर्जा कमीत कमी असते , जेव्हा तुम्ही ........................ 

A) खुर्चीवर बसलेले असता 

B) जमिनीवर बसलेले असता

C) जमिनीवर झोपलेले असता 🌹

D) जमिनीवर उभे असता




10.पित्तरस ----------- मध्ये तयार होते.

A) यकृत 🌹🌸

B) जठर

C) पोट

D) डोके




11.मनुष्यप्राण्यात गुणसुत्राच्या किती जोड्या असतात?

A) २२ 

B) २३🌹🌸

C) ४६

D)४४




 12.भारतात तरुण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनातर्फे चार नवीन योजना जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये कोणती योजना नाही?

A) टीचर असोसिएटशीप फॉर रिसर्च एक्सेलंस (TARE)

B) ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्टरल फेलोशिप

C) भाभा फंडामेंटल रिसर्च 🌹

D) ऑग्युमेंटिंग रायटिंग स्किल्स फॉर आर्टिकुलेटिंग रीसर्च (AWSAR)




"मध्यरात्रीचा देश कोणता?."

*नार्वे*

राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय

अलाहाबाद बैंक - कोलकाता

• बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे

• केनरा बैंक - बैंगलोर

• सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• कॉरपोरेशन बैंक - मंगलौर

• देना बैंक - मुंबई

• इंडियन बैंक - चेन्नई

• इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई

• ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली

• पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली

• पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली

• सिंडिकेट बैंक - मणिपाल

• यूको बैंक - कोलकाता

• यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई

• यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता

• विजया बैंक - बैंगलोर

• आंध्रा बैंक - हैदराबाद

• बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

सपेशल पोलीस भरती

 1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?

1) ३६९ 

 2) ५४७

 3) ६३९ ✅✅✅

 4) ९१२


2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

 1) सोडियम क्लोरेट ✅✅✅

 2) मायका

 3) मोरचुद

 4) कॉपर टिन


3]  जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर

 1)  त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 

2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .

 3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .

 4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅


4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅

 2) दोन

 3) चार

 4) सहा


5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ 

 2) ब ✅✅✅

 3) ड

 4) ई


6]  खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल 

 2) रेल्वे

 3) जहाज

 4) वरिल सर्व ✅✅✅


7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२

 3) २३०.५२

 4) २.३५२ ✅✅✅


8]  त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅

 2) अंतर

 3) चाल

 4) विस्थापन 


9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल 

 2) रबर

 3) रबर

 4) सूची✅✅✅



10]   हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅

 2) नायट्रोजन

 3) कार्बनडाय ऑक्साईड

 4) हेलियम


1] प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागरला जोडणारा कालवा_____

A- स्वेज

B- पनामा

C- किल

D- यापैकी नाही


ANS--B


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇


2] _हे जानेवारी २०१६ मध्ये भारताचे ४४ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती.

A- जे. एस. खेहर

B- टी. एस. ठाकूर

C- जी. रोहिणी

D- एस. बी देव


ANS--A


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇


3] राजा राममोहन राय यांना _यांनी 'युग दूत' म्हटले होते.

A- गोपाल कृष्ण गोखले

B- भगत सिंह

C- दादाभाई नौरोजी

D- सुभाष चंद्र बोस


ANS--D


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇


4] क्रांतिकारीने लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला _या इंग्रज अधिकारीची हत्या करून घेतले.

A- डायर

B- वायली

C- सांडर्स

D- वॉटसन


ANS--C


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇



5] स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती _ राज्यातील होते.

A- उत्तर प्रदेश

B- दिल्ली

C- गुजरात

D- बिहार


ANS--D


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇



6] भारतातील अग्निशमन सेवेचा बँड अँबॅसेडर म्हणून___यांची निवड झालेली आहे.

A- पी.एस. रहंगदले

B- रणदीप हुडा

C- प्रियंका चोप्रा

D- अभिताभ बच्चन


ANS--B


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇


7] भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना ----- येथे झाली.

मुंबई

कोलकाता

मद्रास

पुणे


ans - D


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇



8] समान नागरी कायदा संबंधित कलम _

A- कलम ४२

B- कलम ४३

C- कलम ४४

D- कलम ४८


ANS--C


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇



9] २५१० किमी इतका मोठा प्रवास करणारी भारतातील नदी _आहे.

A- यमुना

B- गंगा

C- सतलज

D- कावेरी


ANS--B


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇



10] महाराष्ट्रात सुपारीचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?

१] रायगड

२] रत्नागिरी

३] सिंधुदुर्ग

४] ठाणे


Ans B


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇



11] _या देशाला प्राचीनकाळी 'मेसोपोटामिया' नावाने ओळखले जात.

A- इराण

B- इराक

C- अफगानिस्तान

D- कंबोडिया


ANS--B


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇



12] 'रॉक गार्डन' साठी_____शहर प्रसिद्ध आहे.

A- नवी दिल्ली

B- श्रीनगर

C- चंदीगढ़

D- बेंगळुरू


ANS--C


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇



13] पूर्ण पृथ्वीवर जवळपास इतका भाग पाण्याने व्यापला आहे.

A- ५१%

B- ६१%

C- ७१%

D- ८१%


ANS--C


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇



14] जागतिक कुपोषणच्या बाबतीत भारताचा(२०१६) जगात____वा क्रमांक लागतो.

A- ९१

B- ९४

C- ९७

D- ९९


ANS--C


࿇══━━━━✥◈✥━━━━══ ࿇




15] खालीलपैकी ‘शिंगी’ हे शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

A.  रायगड

B.  पुणे

C.  नाशिक

D.  अमरावती


ANS :- रायगड

गतीचे प्रकार



🌻एकरेषीय एकसमान गती (Linear Uniform Motion)

ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीत समान अंतर कापत असेल तर त्यास “एकसमान गती ” म्हणतात. म्हणजेच एकसमान गती मध्ये चाल समान राहते.

उदा. एक वस्तू जर १० मिनिटात ३ किमी अंतर कापते, तर ती पुढच्या १० मिनिटात पण ३ किमी अंतर पार पडते.


🌹एकरेषीय नैकसमान गती (Linear Non-uniform Motion)

ज्या गतीमध्ये वस्तू समान कालावधीत असमान अंतर कापत असेल तर त्यास “अकसमान गती ” म्हणतात. म्हणजेच एकसमान गती मध्ये चाल समान (constant) राहते.

उदा. एक दुचाकी जर १० मिनिटात ३ किमी अंतर कापते, तर ती पुढच्या १० मिनिटात ती ३ पेक्षा कमी अथवा जास्त अंतर पार पडते.


🌹एकसमान वर्तुळाकार गती (Uniform circular Motion)

जर वस्तू वर्तुळाकार मार्गावर एकसमान गतीमध्ये असेल तर तिला एकसमान वर्तुळाकार गती म्हणतात.

या गतीत चाल समान राहते परंतु वेग बदलत जातो.

कारण एक परिक्रमणा पूर्ण झाल्यानंतर विस्थापन हे शून्य असते. म्हणजेच चाल जरी समान असली तरी वेग मात्र शून्य होतो.

चाल = अंतर/काळ = परीघ/काळ

ही वस्तू फिरताना नेहमीच केंद्राकडे आकर्षित होऊन फिरत असते, त्या आकर्षण बलास Centripetal Force असे म्हणतात.