Wednesday, 1 January 2025

चालू घडामोडी :- 1 जानेवारी 2025

1) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ठरले आहेत.

2) ADR संस्थेच्या अहवालानुसार देशात ममता बॅनर्जी या मुख्यमंत्र्याकडे सर्वात कमी मालमत्ता आहे.

3) स्पेस डॉकिंग एक्सप्रिमेंट (स्पेडेक्स) या अवकाशात दोन उपग्रहांना जोडणाऱ्या देशाच्या पहिल्या मोहिमेचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. (रॉकेट: PSLV C60]

4) ISRO या संस्थेने स्पेडेक्स मोहीमेचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे.

5) Space Docking Experiment Mission Launch करणारा भारत चौथा देश ठरला आहे.

6) चीन ने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली असून तिचे नामकरण CR450 असे करण्यात आले आहे. ताशी वेग 450/Kmh]

7) अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने AICTE 2025 हे वर्षे कृत्रिम बुद्धिमत्ता वर्ष म्हणून जाहीर केले आहे.

8) सौर पंप योजनेत महाराष्ट्र राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

9) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन झाले असून ते अमेरिकेचे 39वे राष्ट्राध्यक्ष होते. [भारतातील हरियाणा राज्यातील एका गावाचे नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे.]

10) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांना 2002 या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. [100 व्या वर्षी निधन & राष्ट्राध्यक्ष (1977-81)]

11) STUMPED नावाने सय्यद किरमानी या भारतीय क्रिकेट खेळाडूने आपले आत्मचरित्राचे प्रकाशन केले आहे.

12) गुजरात राज्याने भाषासंबंधी अडचणी दूर करण्यासाठी SWAR प्लॅटफॉर्म लाँच केले आहे.

13) 53वी सिनियर राष्ट्रीय पुरूष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 चे विजेतेपद केरळ ने पटकावले आहे.

14) पुण्यात स्थापित केलेल्या भारतातील पहिल्या मेड-इन-इंडिया सर्जिकल रोबोटचे नाव "SSI मंत्र" आहे.

15) हिंदू मंदिरातील पुजारी आणि गुरुद्वाराच्या पुजाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केलेल्या योजनेचे नाव "पुजारी ग्रंथी सन्मान योजना" आहे. Vidyarthipoint

16) AAP प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलेल्या 'पुजारी ग्रंथी सन्मान योजने'चे उद्दिष्ट हिंदू मंदिरातील पुजारी आणि दिल्लीतील गुरुद्वारा ग्रंथींना 18,000 रुपयांची मासिक मदत देण्याचे आहे.

17) कवच 4.0 ही भारतीय रेल्वेच्या रिसर्च डिझाइन अँड स्टैंडर्डस ऑर्गनायझेशन (RDSO) द्वारे विकसित केलेली प्रगत स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली आहे.

18) 24 डिसेंबर 2024 ते 2 जानेवारी 2025 या कालावधीत पोखरा, नेपाळ येथे पहिला आंतरराष्ट्रीय बलून महोत्सव आयोजित केला जात आहे. (हा कार्यक्रम सुंदर पाल्मे प्रदेशात होत आहे.]

19) "SAAR Initiative" हे "स्मार्ट सिटी मिशन (SCM)" शी संबंधित आहे.

Latest post

चालू घडामोडी :- 16 जानेवारी 2025

◆ वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) ची वार्षिक बैठक दावोस(स्वित्झर्लंड) येथे होणार आहे. ◆ मुंबईच्या नौदल डॉकयार्ड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच...