06 April 2022

सराव प्रश्न

[प्र.१] 'नेटिव्ह इंप्रूव्मेंट सोसायटी'ची स्थापना कोणी केली?
अ] बाबा पदमनजी
ब] ना. म. जोशी
क] बाळशास्त्री जांभेकर
ड] गोपाळ हरी देशमुख

उत्तर
क] बाळशास्त्री जांभेकर
-------------------
[प्र.२] 'लक्ष्मीज्ञान' हा ग्रंथ कोणी लिहिला?
अ] गोपाळ कृष्ण गोखले
ब] आचार्य अत्रे
क] गोपाळ हरी देशमुख
ड] साने गुरुजी

उत्तर
क] गोपाळ हरी देशमुख
-------------------
[प्र.३] १९२१ च्या राष्ट्रीय सभेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष चित्तरंजन दास हे तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या ऐवजी ______________ यांनी प्रभारी अध्यक्षपद भूषवीले.
अ] मौलाना महमद अली
ब] हाकीम अजमल खान
क] बॅ. हसन इमाम
ड] मदन मोहन मालवीय

उत्तर
ब] हाकीम अजमल खान
{हाकीम अजमल खान हे चित्तरंजन दास यांचे जवळचे मित्र होते. १९२२ च्या गया अधिवेशनाचे अध्यक्षपद चित्तरंजन दास यानी भूषवीले.}
-------------------
[प्र.४] 'देशप्रेमाने ओथम्बलेला हिमालायासारखा उत्तुंग महापुरुष' असे वासुदेव बळवंत फडके यांचे वर्णन कोणत्या वृत्तपत्राने केले?
अ] केसरी
ब] मराठा
क] अमृतबझार पत्रिका
ड] तरुण मराठा

उत्तर
क] अमृतबझार पत्रिका
{१८७९ साली फडकेंच्या आटकेनंतर हा लेख छापून आला होता.}
-------------------
[प्र.५] २३ मार्च १९१८ रोजी मुंबई येथे भरविण्यात आलेल्या 'अस्पृश्यता निवारक परिषदेचे' अध्यक्ष कोण होते?
अ] शाहू महाराज
ब] वि. रा. शिंदे
क] सयाजीराव गायकवाड
ड] बाबासाहेब आंबेडकर

उत्तर
क] सयाजीराव गायकवाड
{अस्पृश्यता निवारणाची पहिली परिषद.}
-------------------
[प्र.६] १९४१ साली ___________ यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 'संयुक्त महाराष्ट्र सभा' स्थापन झाली.
अ] रामराव देशमुख
ब] टी. जे. केदार
क] शंकरराव देव
ड] स. का. पाटील

उत्तर
अ] रामराव देशमुख
रामराव देशमुख-१९४१-संयुक्त महाराष्ट्र सभा
टी. जे. केदार-१९४२-महाराष्ट्र एकीकरण परिषद
शंकरराव देव-१९४६-संयुक्त महाराष्ट्र समिती[बेळगाव]
-------------------
[प्र.७] १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यात ____ प्रमुख विभाग व ______ जिल्हे होते.
अ] ४ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
क] ५ प्रमुख विभाग व २४ जिल्हे
ड] ५ प्रमुख विभाग व २६ जिल्हे

उत्तर
ब] ४ प्रमुख विभाग व २६ जिल्हे
{विभाग- मुंबई , पुणे , नागपूर, औरंगाबाद}
{जिल्हे २६ होते. नंतर ९ जिल्ह्यांचे विभाजन होऊन आता ३५ जिल्हे आहेत.}
-------------------
[प्र.८] ११ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे झालेल्या घटना समितीच्या बैठकीत _ _ _ _ _ _ यांची संविधान समितीचे कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून निवड झाली.
अ] पंडित नेहरू
ब] वल्लभभाई पटेल
क] जे. बी. क्रपलनी
ड] एच. सी. मुखर्जी

उत्तर
ड] एच. सी. मुखर्जी
{त्याआधी फ्रँक अँथोनी हे हंगामी उपाध्यक्ष होते}
-------------------
[प्र.९] घटना समितीच्या झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते?
अ] पंडित नेहरू
ब] जे. बी. क्रपलनी
क] वल्लभभाई पटेल
ड] डॉ. राजेन्द्रप्रसाद

उत्तर
ब] जे. बी. क्रपलनी
-------------------
[प्र.१०] ९२वी घटना दुरुस्ती कोणत्या परिशिष्टाशी संबधित आहे?
अ] सातव्या
ब] आठव्या
क] नवव्या
ड] दहाव्या

उत्तर
ब] आठव्या
{९२वी घटना दुरुस्ती(२००३)- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी या चार भाषांचा आठव्या परिशिष्टामध्ये समावेश करण्यात आला.}

मराठवाडा मुक्ती संग्राम

मराठवाडा हा महाराष्ट्रातील वर्तमान प्रशासकिय विभाग असून तो सर्वात मोठा आहे.
मराठवाड्याचे क्षेत्रफळ हे 64590 चौ. किमी असून यामध्ये
1)औरंगाबाद
2)नांदेड
3)परभणी
4)बीड
5)जालना
6)लातूर
7)उस्मानाबाद व
8) हींगोली
हे 8 जिल्हे, 78 तालूके व 63 बाजारपेठेची शहरं आहेत
लोकसंख्या ही जवळपास 2 कोटी आहे. साक्षरता 76% तर लोकसंख्या घनता ही 352 एवढी आहे. लिंग गूणोत्तर 932 एवढे आहे.
दक्षिणगंगा गोदावरी ही मराठवाड्याच्या 5 जिल्ह्यातून वाहते. जायकवाडी हा सर्वात मोठा महाराष्ट्रातील सिंचनप्रकल्प मराठवाड्यात असून मोठा ऐतिहासिक व धार्मिक वारसा हा मराठवाड्यास लाभलेला आहे.
यामध्ये वेरूळ,अजिंठा जगप्रसिद्ध लेणी, देवगिरी, कंधार किल्ले, हेमाडपंथी मंदिरे, मकबरा, 52 दरवाजे, पानचक्की, 3 जोतिर्लिंग मंदिरे, संतांची भूमी पैठण,तूळजाभवानी मंदिर इत्यादी अप्रतिम संस्कृतीचे दर्शन घडवतात.

पूर्वी मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानात विलीन होता.
हैदराबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान  निजाम-उल मुल्क आसफजाह यांचे राज्य होते . त्यांच्या निजामांच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता.

हैदराबाद संस्थानची त्यावेळची लोकसंख्या 1 कोटी 60 लाख होती. यात तेलंगणा, मराठवाडा आणि कर्नाटकचा कांही भाग येत होता. मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर खूप अत्याचार सुरु केले. दुसज्या बाजूला मुक्ती संग्राम वेगात सुरु झालेला होता. यांच नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रविनारायण रेड्डी, बाबासाहेब परांजपे या आणि इतर अनेक नेत्यांकडे होते.

मराठवाडयाच्या गावागावात हा संग्राम लढला गेला. यात जीवाची पर्वा न करता अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. मराठवाडयात निजामांच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून प्रसिध्द झालेल्या बदनापूर तालुक्यातील धोपटश्र्वर गावच्या दगडाबाई शेळके, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्गजी जाधव, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्हयातील  जनार्दन होर्टीकर गुरुजी तसेच परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपज्यात स्वातंत्र्य संग्राम उत्स्फूर्तपणे लढला गेला.

या मुक्ती संग्रामात श्रीधर वर्तक, शंकरराव जाधव, जालन्याचे जनार्दन मामा, गोविंदराव पानसरे, जयंतराव पाटील आदींसारख्यांनी आपल्या जीवाची तमा न बाळगता काम केले. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांनी केलेल्या संग्रामाचं मोल हे खूप मोठे आहे.

निजाम शरण येत नाही आणि नागरिकांवर अत्याचार वाढले आहेत हे पाहून 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलीस ऍक्शन सुरु झाले. ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्यमूळे ते भारताचे तत्कालीन ग्रहमंत्री होते खूप धाडसी परंतू योग्य अशा निर्णयामूळ॓ जनतेस न्याय मिळाला.
मुख्य फौजा सोलापूरकडून घुसल्या. पहाटे 4 वाजता ऑपरेशन सुरु झाल्यावर 2 तासात नळदुर्ग व सायंकाळपर्यंत तुळजापूर, परभणी ते मणिगढ, कनेरगाव, चाळीसगावकडून आलेल्या तुकडीने कन्नड, दौलताबाद  काबिज केले.
15 सप्टेंबर रोजी औरंगाबाद सर करुन फौजा पुढे निघाल्या. तेंव्हा निजामी सैन्य माघार घ्यायला लागले होते.

हैदराबादचे सेनाप्रमुख जन अल इद्गीस यांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणांगती स्वीकारली आणि खुद्द निजाम शरण आला. हैदराबाद मुक्ती संग्राम यशस्वी झाला. हैदराबाद संस्थानात तिरंगा फडकला. हैदराबाद संस्थानातील अन्यायी राजवटीविरुध्दचा लढा मराठवाड्यातील जनतेनं यशस्वी केला.
मराठवाडा मुक्तिसंग्रामाला यश प्राप्त होऊन येत्या 17 सप्टेंबर रोजी तब्बल 68वर्षे पूर्ण होत आहेत. 68 वर्षांपूर्वी 17सप्टेंबर 1948 रोजी ‘हैदराबाद पोलीस ऍक्शन’ झाली व हैदराबाद संस्थान देशाचे अविभाज्य अंग झाले. इतकी वर्षे होऊनही मराठवाड्याच्या जनतेच्या मनात अजूनपर्यंत त्याच्या स्मृती जिवंत आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्रामामुळे स्वातंत्र्याला खर्‍या अर्थाने पूर्णत्व प्राप्त झाले आहे. अन्यथा हैदराबादचा निजाम ‘स्वतंत्र राष्ट्रा’चे स्वप्न बघत होता.
या संग्रामाच्या उज्ज्वल  पर्वाच्या आठवणींना उजाळा देताना मुक्तीनंतर महाराष्ट्रात विलीन होणार्‍या मराठवाड्याचा कितपत विकास झाला याचाही गांभीर्याने विचार होण्याची आवश्यकता आहे.
    आज एवढ्या वर्षांनंतरही मराठवाडा मागास व विकासापासून वंचितच राहिला आहे हे एक न नाकारता येणारे सत्य आहे. ही विकासाची दरी संपवून मराठवाडा उर्वरित महाराष्ट्राच्या बरोबरीने यायला हवा होता, पण तसे झाले नाही. महाराष्ट्रात विलीन होऊनसुद्धा त्याच्या पदरी उपेक्षाच पडली. गेल्या अनेक वर्षांत मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र यांच्यामधील अंतर वाढत गेले. हे अंतर कमी व्हायला हवे. पश्‍चिम महाराष्ट्रात दरडोई उत्पन्न ६४५ रु. आहे, तर मराठवाड्यात ते फक्त दरडोई ३७५रु. आहे. मराठवाड्याचा खरा विकास कधी होणार ? हा माञ एक पडलेला प्रश्न आहे.

१ मे १९६० पासून मराठवाडा हा नवीन प्रशासकिय विभाग म्हणून ओळखला जाउ लागला.

मध्ययुगीन भारत (थोडक्यात)

गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.

त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.

१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.

आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते.

या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या.

प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले.

प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,

त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.

या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.

भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.

या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.

आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती.

अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.

चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.

राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.

या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.

या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.
-----------------------------

महत्त्वाची माहिती

१६३०: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा फाल्गुन कृष्ण तृतीयेला शिवनेरी गडावर जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०) #History

१८७८: थॉमस एडिसन यांनी फोनोग्राफचे पेटंट घेतले.

१८८४: यू. एस. ए. च्या दक्षिण भागाला ६० चक्रीवादळांनी तडाखा दिला.

१९४२: पर्ल हार्बरच्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रुझव्हेल्ट यांनी जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना बंदिवासात ठेवण्याच्या आदेशावर सह्या केल्या.

२००३: तंबाखू उत्पादनांच्या जाहिरातींवर संपूर्णपणे बंदी घालण्याच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली. #Bill #Polity

१४७३: सूर्यकेन्द्री विश्वाच्या संकल्पनेचा सिद्धांत मांडणारा पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ निकोलस कोपर्निकस यांचा जन्म. (मृत्यू: २४ मे १५४३)

१६३०: हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा फाल्गुन कृष्ण तृतीयेला शिवनेरी गडावर जन्म. (मृत्यू: ३ एप्रिल १६८०) #History

१८५९: स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज स्वांते अर्‍हेनिअस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९२७)

१८९९: गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री बळवंतराय मेहता यांचा जन्म.

१९०६: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून १९७३)

१९१९: मराठी नवकथेचे जनक अरविंद गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९९२)

१९२२: पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १९९५)

१९६२: झेकोस्लोव्हाकियाची टेनिस खेळाडू हॅना मंडलिकोव्हा यांचा

१८१८: पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे निधन.

१९१५: थोर समाजसेवक, काँग्रेसचे अध्यक्ष, संसदपटू, भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) संस्थापक नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे निधन. (जन्म: ९ मे १८६६) #History

१९५६: प्रजा समाजवादी पक्षाचे नेते, लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आचार्य नरेन्द्र देव यांचे निधन.

१९५६: ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत केशव लक्ष्मण दफ्तरी यांचे निधन. (जन्म: २२ नोव्हेंबर १८८०)

१९७८: गायक व संगीतकार पंकज मलिक यांचे निधन. (जन्म: १० मे१९०५)

१९९७: संगीतकार राम कदम यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९१८)

१९९७: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचे निधन. (जन्म: २२ ऑगस्ट १९०४)

२००३: पौराणिक हिन्दी व मराठी चित्रपट अभिनेते अनंत मराठे यांचे निधन.

अर्थसंकल्प- अर्थ व उद्दिष्ट्ये


प्रा. बॅस्टेबल यांच्या मते, “अर्थसंकल्प हे विशिष्ट काळातील उत्पन्न व खर्चाची किंवा वित्तीय समायोजनाची माहिती देणारे पञक असून ते मान्यतेसाठी संविधानाकडे किंवा संसदेकडे सादर केले जाते.”

अर्थसंकल्पाबाबत आपणास असे म्हणता येईल की,

हे सरकारच्या उत्पन्न व खर्चाचे माहितीपञक असते.

हे एका वर्षासाठी असते.

अर्थसंकल्पाला सार्वजनिक मान्यता मिळावी लागते.

उत्पन्न कसे मिळवले जाणार आहे व खर्च कसा केला जाणार आहे याची माहिती अर्थसंकल्पात असते.

चालू वर्षाचे अपेक्षित उत्पन्न व खर्च याप्रमाणेच गतवर्षाचे उत्पन्न खर्च याची माहिती अर्थसंकल्पात असते.


अर्थसंकल्पाची उद्दिष्ट्ये

अर्थसंकल्पाच्या सादरीकरणामागे पुढील उद्दिष्ट्ये असतात.

उत्पन्न व खर्चाचे नियोजन करणे.

कालबद्ध उद्दिष्ट्ये सादर करणे. एका वर्षात कोणती आर्थिक उद्दिष्ट्ये साध्य केली जाणार आहेत याची माहिती देणे.

सुनिश्चित उद्दिष्टांसाठी निधीची किती प्रमाणात आवश्यकता आहे हे स्पष्ट करणे.

निधी संकलन व खर्च यात कार्यक्षमता आणणे.

मागील खर्चाच्या आधारे चालू वर्षाच्या खर्चाचा अंदाज करणे.

उत्पन्न व खर्चाच्या विश्लेषणाचे साधन म्हणून कार्य करणे. उत्पन्न व खर्च यात कोणते बदल होत आहेत ते पाहणे.

लोकांच्या प्रति असणारे आर्थिक इत्तरदायित्व स्पष्ट करणे.

Oscar's Award 2022

🔹ठिकाण :- डॉल्बी थिएटर, लॉस एंजेलीस  (94 वी आवृत्ती)

🔸सोहळ्याचे सादरीकरण : अॅकडमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्टस् अँड सायेन्सस्
.
🔹सर्वोत्कृष्ट अभिनेता :  विल स्मिथ (king reachard)

🔸सर्वोत्तम अभिनेत्री : जेसीका शास्टेन (The Eyes of tammy Faye movie)

🔹सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : जेन कॅम्पियन (The power of Dog)

🔸सर्वोत्कृष्ट गायक :  बिली एलीश
(नो टाइम टु डाय)

🔹सर्वोत्कृष्ट माहितीपट :-‘द समर ऑफ सोल’

🔸सर्वोत्कृष्ट लाइव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट फिल्म : द लाँग गुडबाय

महत्त्वाची माहिती

◾️ विद्यापीठ  - मुंबई विद्यापीठ

◾️ शहर   -  मुंबई

◾️स्थापना - 18 जुलै 1857

◾️  विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◾️शहर - नागपूर

◾️स्थापना  - 4 ऑगस्ट 1923

◾️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◾️शहर - गडचिरोली

◾️ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

◾️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◾️शहर - मुंबई

◾️स्थापना  - 1916

◾️  विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◾️ शहर - पुणे

◾️स्थापना - 1949

◾️  विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◾️ शहर - औरंगाबाद

◾️स्थापना - 23 ऑगस्ट 1958

◾️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ  कोल्हापूर

◾️ शहर - कोल्हापूर

◾️ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

◾️  विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◾️शहर - अमरावती

◾️स्थापना - 1 मे 1983

◾️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◾️शहर  - नाशिक

◾️स्थापना - जुलै 1989

◾️  विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◾️ शहर - जळगाव

◾️स्थापना - 15 ऑगस्ट 1989

◾️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◾️शहर - नांदेड

◾️स्थापना - 17 सप्टेंबर 1994

◾️  विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◾️शहर - सोलापूर

◾️ स्थापना - 1 ऑगस्ट 2004

वाचा :- महत्त्वाचे प्रश्न उत्तरे आणि वाचा :- महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

' सरदार सरोवर ' हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- नर्मदा
-------------------------------------------------------
' आग्रा ' हे शहर कोणत्या नदी काठावर आहे ?

उत्तर -- यमुना
-----------------------------------------------------
' शिवाजी सागर ' जलाशय कोणत्या जलाशयास म्हणतात ?

उत्तर -- कोयना
------------------------------------------------------
' संजय गांधी ' राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

उत्तर -- बोरिवली ( मुंबई )
-----------------------------------------------------
महाराष्ट्रातील सर्वांत मोठा कागद कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- चंद्रपुर
------------------------------------------------------
महाराष्ट्र राज्याच्या सागरी किना-याची लांबी किती आहे ?

उत्तर -- ७२० कि. मी.
------------------------------------------------------

शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- पुणे
-------------------------------------------------------
' भंडारदरा ' धरण कोणत्या नदीवर आहे ?

उत्तर -- प्रवरा
------------------------------------------------------
पालघर जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र कोणते आहे ?

उत्तर -- सातपाटी
-------------------------------------------------------
' बिहू ' हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

उत्तर -- आसाम
-----------------------------------------------------
अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर -- धुळे
---------------------------------------------------
महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते ?

उत्तर -- साल्हेर.

♻️ महत्त्वाचे आहे नक्की वाचा

🔸१) पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर ....
- १४,९६,००,००० कि. मी.

🔹२) प्रकाशाचा प्रतिसेकंद वेग ....
- २,९९,७९२ कि. मी.

🔸३) सूर्यकुलातील सर्वांत लहान, परंतु वेगवान ग्रह
- बुध

🔹४) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठा असलेला .... हा ग्रह सूर्यकुलातील सर्वांत मोठा ग्रह आहे.
- गुरु

🔸५) पृथ्वीपेक्षा जवळजवळ अकरा पट मोठ्या असलेल्यागुरुचे वस्तुमान पृथ्वीच्या .... इतके आहे.
- ३१८ पट



♻️ वाचा :- महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

✅1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी

✅3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर

✅4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ

✅5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग

✅6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण

✅7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी

✅8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी

✅9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी

✅10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी

✅11) पार घाट - सातारा - रत्नागिरी

✅12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी

✅13) पसरणीचा घाट - सातारा - वाई

✅14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग

✅15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई

✅16) बोरघाट - पुणे - कुलाबा

✅17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल

✅18) कुसुर घाट - पुणे - पनवेल

✅19) वरंधा घाट - पुणे - महाड

✅20) रूपत्या घाट - पुणे - महाड

✅21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड

✅22) कसारा घाट - नाशिक - ठाणे

✅23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

✅24) थळ घाट - नाशिक - ठाणे

✅25) माळशेज घाट - ठाणे- पुणे 

✅26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

वाचा :- मराठी व्याकरण समानार्थी शब्द

★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★

◆ चक्रपाणी - विष्णु, रमापती, नारायण केशव, कृष्ण, वासुदेव, शेषशायी
 
◆ चतुर - धूर्त, हुशार, चाणाक्ष
 
◆ चाल - चढाई, रीत, हला, चालण्याची रीत
 
◆ छाया - सावली, प्रतिबिंब, छटा, शैली
 
◆ छाप - ठसा, छापा, अचानक हल्ला
 
◆ छळ - लुबाडनुक, गांजवणूक, ठकवणे, जाच
 
◆ छिद्र - छेद, दोष, भोक, कपट
 
◆ छडा - तपास, शोध, माग
 
◆ जतावणी - सूचना, इशारा, ताकीद
 
◆ जन्म - उत्पति, जनन, आयुष्य
 
◆ जप - ध्यास, ध्यान, देवाचेनाव मंत्राची पुन्हा पुन्हा आवृति
 
◆ जबडा - तोंड, दाढ
 
◆ जुलूम - जबरदस्ती, जबरी, बळजोरी, अन्याय
 
◆ जरब - दहशत, दरारा, धास्ती, वचक
 
◆ जल - जीवन, तोय, उदक, पाणी, नीर
 
◆ झाड - वृक्ष, पादप, दुम, तरु
 
◆ झुंज - टक्कर, संघर्ष, लढा
 
◆ झुणका - बेसन, पिठले, अळण
 
◆ झटका - झोक, डौल, शरीराचा तोल, कल  

◆ चढण - चढ, चढाव, चढाई
 
◆ चातुर्य - हुशारी, कुशलता, चतुराई
 
◆ चवड - ढीग, रास, चळत
 
◆ चव - रुचि, शशांक, सोम, सुधाकर, इंदु, रंजनीकांत, कुमुदनाथ
 
◆ चंद्रिका - कौमुदी, चांदणे, ज्योत्स्ना