▼

०२ मार्च २०२२

डॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड

 (इ.स. १८२४ - मे ३१, इ.स. १८७४)

हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते. 

▫️  लाडांचा जन्म १८२२ साली तत्कालीन पोर्तुगीज गोव्यात मांजरे गावी, एका सामान्य सारस्वत कुटुंबात झाला. लाडांचे वडील मातीच्या मूर्ती घडवणारे मूर्तिकार होते.

▫️  बालपणी लहानग्या रामकृष्णाची बुद्धिबळातील चमक पाहून एका इंग्रज गृहस्थांनी रामकृष्णाच्या वडिलांना त्याला इंग्रजी शाळेत पाठवण्यासाठी राजी केले. इंग्रजी शाळेत शिकण्यासाठी लाड मुंबईतल्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले. शालेय अभ्यासातही चमक दाखवत त्यांनी अनेक शिष्यवृत्त्या मिळवल्या. या काळातच लाडांचे वडील वारले.

▫️ वडिलांपश्चात त्यांनी आपल्या आईची व धाकटा भाऊ नारायण यांची जबाबदारी वाहिली. नारायण दाजी लाड देखील शिकून पुढे डॉक्टर बनले.

▫️  शालेय शिक्षणानंतर लाडांना एल्फिन्स्टन विद्यालयातच शिकवण्याची नोकरी मिळाली. या काळात त्यांनी प्राचीन संस्कृत वाङ्मय अभ्यासले व संस्कृत साहित्यिकांच्या जीवनकाळाबद्दल, कालनिश्चितीबद्दल, तसेच गुप्तकालीन इतिहासाबद्दल त्यांनी मोलाचे संशोधन केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील ग्रॅंट मेडिकल कॉलेजात प्रवेश घेतला.

▫️ १८५० साली वैद्यकीचा अभ्यासक्रम पुरा करणाऱ्या पदवीधरांच्या पहिल्या तुकडीत ते होते.

▫️ १८५१ साली त्यांनी मुंबईत डॉक्टरकी आरंभली. वैद्यकीय पेशास अनुसरत त्यांनी वैद्यकीतही संशोधन केले.

▫️ महारोगावरील औषधाचा त्यांनी लावलेला शोध, हे त्यांचे वैद्यकशास्त्रातील मोठे योगदान आहे.

▫️   त्यांच्या कामामुळे मुंबईतील एतद्देशीय व इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका इत्यादी परदेशांतील वैज्ञानिक सोसायट्यांनी त्यांना मानद सभासदत्व बहाल केले. सामाजिक सुधारणेच्या कार्यक्रमांतही त्यांचा सक्रिय सहभाग होता.

▫️ विधवा पुनर्विवाह, स्त्रीशिक्षणव अंधश्रद्धा निर्मूलन यांविषयीच्या उपक्रमांना त्यांनी पाठबळ पुरवले. मुंबईतील प्रशासकीय, राजकीय सुधारणांमध्येही त्यांनी स्वारस्याने भाग घेतला. 

▫️ १८६९ व १८७१ सालीं अशा दोन वेळा ते मुंबईच्या नगरपालपदासाठी निवडले गेले.

▫️ मे ३१, १८७४ रोजी लाड यांचे निधन झाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा