महाराष्ट्राच्या माजी निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचं करोनाची लागण झाल्याने निधन झालं आहे. करोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान प्रकृती बिघडल्याने पहाटे चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती मिळत आहे. निवृत्त सनदी अधिकारी आणि महाराष्ट्राच्या पहिल्या स्त्री निवडणूक आयुक्त म्हणून नीला सत्यनारायण यांची ओळख होती. नीला सत्यनारायण १९७२ आयएएस बॅचच्या सनदी अधिकारी होत्या.
नीला सत्यनारायण यांची लोकप्रिय सनदी अधिकारी म्हणून त्यांची ओळख तर होतीच. पण आपल्या रुक्ष आणि अतिशय धकाधकीच्या कामात व्यग्र असतानाही त्यांनी आपली संवेदनशीलता जोपासली होती. लेखनातून त्या नेहमी व्यक्त होत राहिल्या. कवयित्री म्हणून त्या अधिक परिचित असल्या, तरी त्यांचे स्तंभलेखनही अनेकांना आवडत होतं. नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून पुस्तकं लिहिली. याशिवाय १५० हून अधिक कविता लिहिल्या. त्यांच्या काही पुस्तकांवर चित्रपटदेखील तयार करण्यात आले.
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
▼
No comments:
Post a Comment