Thursday 6 October 2022

हवेतील वायूंचे काही उपयोग

नायट्रोजन - सजीवांना आवश्यक प्रथिने मिळवण्यास मदत करतो. अमोनिया निर्मितीमध्ये तसेच खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी उपयोगी असतो.

ऑक्सिजन - ज्वलनासाठी उपयोगी व  सजीवांना श्वसनासाठी आहे.

कार्बन डायॉक्साइड - वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात. अग्निशामक नळकांड्यां मध्ये वापरतात.

अरगॉन - विजेच्या बल्बमध्ये वापर करतात.

हेलिअम - कमी तापमान मिळवण्यासाठी तसेच विनापंख्याच्या इंजिनावर चालणाऱ्या विमानांमध्ये वापरण्यात येतो.

निऑन - जाहिरातींसाठीच्या, रस्त्यांवरच्या दिव्यांत वापर केला जातो.

क्रिप्टॉन - फ्लूरोसेन्ट पाईपमध्ये वापर होतो. झेनॉन - फ्लॅश फोटोग्राफीमध्ये उपयोग होतो.

नेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी विषयी माहिती.

भारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.

भारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आवश्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी.

भारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल.

अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.

सिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.

जगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)

इंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.

आता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.

गव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी.

गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.
प्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल.

गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा.

प्रांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.

गव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.

प्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.

प्रार्थना समाजाची तत्त्वे

१) परमेश्वर एक आहे. तो सर्व विश्वाचा निर्माता आहे. तो चिरंतन, अनाकलनीय व निराकार आहे. तो सर्वशक्तिमान, दयाळू व पवित्र आहे.

२) सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गाने गेल्यानेच तो प्रसन्न होतो.

३)परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही. मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

४) मूर्तिपूजा परमेश्वराला मान्य नाही.

५) परमेश्वर अवतार घेत नाही. तसेच परमेश्वराने कोणतेही धर्मग्रंथ लिहिले नाहीत.

६) सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत, म्हणून सर्वांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे.

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर

जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर फिनलँडनं पटकावला पहिला क्रमांक, तर भारत.

संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी जगातील सर्वात आनंदी देशांची यादी (World Happiness Report) जाहीर केली जाते. वैयक्तिक पातळीवर असणारं समाधान, चांगलं राहणीमान, जीडीपी, आयुर्मान अशा निरनिराळ्या घटकांच्या आधारे ही यादी तयार केली जाते. जगभरातल्या एकूण १५० देशांचं या घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात येतं. यंदाच्या वर्षी अर्थात २०२२ ची यादी तयार करताना एकूण १४६ देशांचं मूल्यमापन करण्यात आलं आहे. या यादीमध्ये सध्या युद्ध सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेनचा देखील समावेश असून ते अनुक्रमे ८० आणि ९८व्या स्थानावर आहेत.

सलग पाचव्या वर्षी फिनलँड अव्वल - या यादीमध्ये सलग पाचव्या वर्षी फिनलँडला जगातला सर्वात आनंदी देश होण्याचा मान मिळाला आहे. फिनलँडच्या पाठोपाठ डेन्मार्क, आईसलँड, स्वित्झर्लंड, नेदरलँड, लग्झेंबर्ग, स्विडन, नॉर्वे, इस्त्रायल आणि न्यूझीलंड या ९ देशांचा क्रम लागतो. पहिल्या १० मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत फक्त एक बदल झाला असून ऑस्ट्रिया या यादीतून बाहेर गेला आहे. इतर देशांचा फक्त क्रम बदलला असून ते पहिल्या दहामध्ये कायम आहेत.

अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या स्थानी - दरम्यान, या यादीमध्ये अफगाणिस्तान सर्वात शेवटच्या म्हणजेच १४६व्या स्थानी आहे. अफगाणिस्तानपाठोपाठ लेबेनॉन आणि झिम्बाब्वे हे देश सर्वात कमी आनंदी ठरले आहेत.

यादीमध्ये भारत कुठे - जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीमध्ये भारताचं स्थान मात्र बरचसं मागे आहे. १४६ देशांच्या यादीमध्ये भारत थेट १३६व्या क्रमांकावर म्हणजे शेवटून ११व्या क्रमांकावर आहे.

ठिकाण – विशेष नाव


     

काश्मीर – भारताचे नंदनवन.
कॅनडा – बर्फाची भूमी.
कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
कॅनडा – लिलींचा देश.
कोची – अरबी समुद्राची राणी.
कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
जपान – उगवत्या सुर्याचा देश.
जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
जयपूर – गुलाबी शहर.
जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली.
झांझिबार – लवंगांचे बेट.
तिबेट – जगाचे छप्पर.
त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट.
थायलंड – पांढ-या हत्तींचा देश.
दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू.
नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश.
न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर.
पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश.
पामीरचे पठार – जगाचे आढे.
पॅलेस्टाईन – पवित्रभूमी.
प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार.
फिनलंड – हजार सरोवरांचा देश.
बंगळूर – भारताचे उद्यान.
बहरिन – मोत्यांचे बेट.
बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग.
बेलग्रेड – श्वेत शहर.
बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र.
मुंबई – भारताचे प्रवेशद्वार.
मुंबई – सात टेकड्यांचे शहर.
म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी.
रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड.
शिकागो – उद्यानांचे शहर.
श्रीलंका – पाचूंचे बेट.
स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण काश्मीर – भारताचे नंदनवन.
कॅनडा – बर्फाची भूमी.
कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश.
कॅनडा – लिलींचा देश.
कोची – अरबी समुद्राची राणी.
कोलकाता – राजवाड्यांचे शहर.
क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार.
जपान – उगवत्या सुर्याचा देश.
जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड.
जयपूर – गुलाबी शहर.

प्रमुख व्यक्तीची प्रचलीत नावे

१) शांतीदूत -- पंडित नेहरू
२) मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री
३) कैद-ए-आजम -- बॅ. जीना
४) शहीद-ए-आलम --  भगतसिंग
५) लोकनायक -- बापूजी अणे
६) भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू
७) गान कोकिळा -- लता मंगेशकर
८) हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद
९) आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम
१०) गरिबांचे कैवारी -- के. कामराज
११) प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी
१२) देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद
१३) भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल
१४) बा -- कस्तुरबा गांधी
१५) पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग
१६) विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी
१७) विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर
१८) समर सौदामिनी -- अरुणा आसफअली
१९) भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२०) हार्मिट ऑफ सिमला -- ए. ओ. ह्यू
२१) म्हातारपाखडीचा -- मॅझिनी जोसेफ बॅप्टीस्टा
२२) राजर्षी -- पुरुषोत्तमदास टंडन
२३) महानामा -- मदनमोहन मालवीय
२४) वंगबंधू -- शेख मुजीबर रहमान
२५) विजी -- विजयनगरचे महाराज
२६) राष्ट्रभक्तांधील राजपुत्र -- डॉ. घनश्यामदास बिर्ला
२७) पख्तुन -- खान खान अब्दुल गफ्फार खान
२८) लोकमान्यकार  -- कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर

महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल


महाराष्ट्र आर्थिक पाहणी अहवाल : २०२१-२२ मध्ये अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित.

आज विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला. या अहवालानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे.

करोना महामारीमुळे मागील दोन वर्षांपासून राज्याच्या विकासाची गती मंदावलेली आहे. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी होताच उद्योग, सेवा, कृषी क्षेत्राने कात टाकली असून या क्षेत्रांना पुन्हा एकदा उभारी मिळत आहे.

२०२१-२२ च्या आर्थिक पाहणी अहवालात या सर्वच क्षेत्रांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा नोंदवण्यात आलीय. कृषी क्षेत्रासोबतच पशुसंवर्धन, वने व लाकूड तोडणी, मत्स्यव्यवसाय व मत्स्यशेती यांच्यातदेखील वाढ होण्याचे अपेक्षित असल्याचे आर्थिक पाहणी अहवालात सांगण्यात आले आहे.

हे माहीत आहे का :-  नवी मुंबई १८ वर्षांवरील नागरिकांच १००% लसीकरण करणारं प्रथम शहर

१८ वर्षांवरच्या सर्व नागरिकांना कोविड लशींच्या दोन्ही मात्रा देणारं,  नवी मुंबई हे राज्यातलं पहिलं शहर ठरलं आहे.

शासनानं महानगरपालिकेला दिलेलं १८ वर्षावरच्या ११ लाख ७ हजार नागरिकांच्या लसीकरणाचं उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेनं पार केलं असून, आतापर्यंत ११ लाख ७ हजार ४५४ नागरिकांना कोविड लशींच्या दोन्ही मात्रा दिल्या आहेत.

कोविड लशींच्या पहिल्या मात्रेचं १०० टक्के लसीकरण पूर्ण करणारीही नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका होती. तोच वेग कायम राखत नवी मुंबई महानगरपालिकेनं दुसऱ्या मात्रेचं लसीकरणही पूर्ण केलंय.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


आयोडीनअभावी कोणता रोग होतो ?
गलगंड.

वांती व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?
काॅलरा.

बी.सी.जी.ची लस कोणत्या रोगावरील प्रतिबंधक उपाय म्हणून टोचली जाते ?
क्षय.

शरीरातील कशाचे प्रमाण कमी झाल्यास पंडुरोग होतो ?
लोहितपेशी व हिमोग्लोबिन.

गंडमाळ ( गाॅयटर ) रोगात कोणत्या ग्रंथीना सूज येते ?
थायराॅईड.

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

डिझेल इंजिनचा शोध १८९३ मध्ये कोणी लावला ?
रूडाॅल्फ डिझेल.

ईव्हीएम मशीन कशावर चालते ?
सिंगल अल्काईन बॅटरी.

निवडणुकीत बोटाला लावण्यात येणारया शाईमध्ये कोणता घटक असतो ?
सिल्व्हर नायट्रेट.

कोणताही दाता एकाच वेळी किती रक्तदान करू शकतो ?
४५० मिली.

मानवी डोळा कोणत्या भिंगासारखे कार्य करतो ?
बहिर्वक्र भिंग.

वाचा :- महत्त्वाच्या चालुघडमोडी

नटराजन चंद्रशेखरन
एअर इंडियाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
ते सध्या टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष आहेत.
२००९-१७ दरम्यान ते टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते.
२०१२-१३ दरम्यान ते नॅसकॉमचे अध्यक्ष होते.
एअर इंडिया : -
स्थापना - १९३२
राष्ट्रीयीकरण - १९५३
संस्थापक - जहांगीर रतनजी दादाभॉय (जेआरडी) टाटा
मुख्यालय - नवी दिल्ली
शुभंकर - महाराजा

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे
मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे
उपमुख्यमंत्री - अजित पवार
गृहमंत्री - दिलीप वळसे पाटील
गृहराज्यमंत्री - सतेज पाटील
वित्तमंत्री - अजित पवार
महसूलमंत्री - बाळासाहेब थोरात
पर्यटनमंत्री - आदित्य ठाकरे
उद्योगमंत्री - सुभाष देसाई
शिक्षणमंत्री - वर्षा गायकवाड
आरोग्यमंत्री - राजेश टोपे
जलसंपदामंत्री - जयंत पाटील
ऊर्जामंत्री - नितीन राऊत
कृषिमंत्री - दादाजी भुसे
परिवहनमंत्री - अनिल परब
सहकारमंत्री - बाळासाहेब पाटील
क्रीडामंत्री - सुनिल केदार
सामाजिक न्यायमंत्री - धनंजय मुंडे

महाराष्ट्रातील इतर महत्त्वाची पदे

विधानसभा सभापती - सध्या रिक्त आहे
विधानसभा उपसभापती - नरहरी झिरवळ
विधानसभा विरोधी पक्षनेता - देवेंद्र फडणवीस
विधानपरिषद सभापती - रामराजे निंबाळकर
विधानपरिषद उपसभापती - नीलम गोऱ्हे
विधानपरिषद विरोधी पक्षनेता - प्रवीण दरेकर

महाराष्ट्रातील महत्त्वाचे उच्चपदस्थ व्यक्ती

मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे
राज्यपाल - भगतसिंह कोष्यारी
मुख्य सरन्यायाधीश - दिपांकर दत्ता
निवणुक आयुक्त - यू.पी.एस.मदान
लोकायुक्त - व्ही. एम. कानडे
एमपीएससी अध्यक्ष -  के.आर. निंबाळकर
महाधिवक्ता - आशुतोष कुंभकोणी
राज्य मानवी हक्क आयोग अध्यक्ष - के.के. तातेड
राज्य महिला आयोग अध्यक्ष - रुपाली चाकणकर
मुख्य सचिव - देवाशिष चक्रवर्ती
गृह सचिव - अमिताभ राजन
पोलीस महासंचालक - रजनीश सेठ

गांधीजींना संबोधनाऱ्या व्यक्ती


(1) महात्मा ➜ श्रद्धानंद स्वामी व रवींद्रनाथ टागोर.

(2) राष्ट्रपिता ➜ नेताजी सुभाषचंद्र बोस

(3) बापू ➜ संत राऊत

(4) भारतीय राजनीतीचा बच्चा ➜ अॅनी बेझंट

(5) मलंग बाबा  ➜ खान अब्दुल गफार खान

(6) विल ड्युरांट  ➜ अर्धनग्न विणकर

(7) विस्टंट चर्चिल  ➜ देशद्रोही फकीर

(8) फ्रॅंक मोरेश ➜ अर्धनंगे फकीर

(9) इमानदार परंतु बोल्शेव्हिक ➜ लॉर्ड विलिंग्टन

तेलंगणा सरकारने गरिबांसाठी ‘आसरा’ पेन्शन सुरू केली आहे.

तेलंगणा सरकारने राज्याच्या कल्याणकारी उपायांचा आणि सामाजिक सुरक्षा नेट धोरणाचा एक भाग म्हणून ‘आसारा’ पेन्शन सुरू केली आहे. ‘आसरा’ पेन्शनचे उद्दिष्ट सर्व गरिबांचे जीवन सुरक्षित करणे आहे.

राज्यातील वृद्ध वर्ग, विधवा, शारीरिकदृष्ट्या अपंग आणि विडी कामगारांना पेन्शन सुविधा मिळण्यासाठी ही कल्याणकारी योजना आहे. आसिफ नगर मंडळाच्या कार्यक्षेत्रात 10,000 नवीन आसरा पेन्शन मंजूर करण्यात आली आहे.

"आसरा पेन्शनशी संबंधी महत्वाचे मुद्दे" :-

आसरा पेन्शन योजना 8 नोव्हेंबर 2014 रोजी तेलंगणा सरकारने सुरू केली होती.

या योजनेत वृद्ध, खिडक्या, हत्तीरोग किंवा एड्स ग्रस्त रुग्ण, शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्ती, विडी कामगार आणि एकल महिलांना पेन्शन दिली जाते.

राज्य सरकारने वृद्ध, विधवा, एड्स रुग्ण, हातमाग कामगार आणि ताडी टपरीधारकांना दिलेली पेन्शन दरमहा 200 रुपयांवरून 2,016 रुपये करण्यात आली आहे.

दिव्यांगांसाठी निवृत्ती वेतन 500 रुपयांवरून 3,016 रुपये प्रति महिना करण्यात आले आहे.

अविवाहित महिला, विडी कामगार आणि फायलीरियल रूग्णांसाठी दरमहा 2,016 रुपये पेन्शन असेल.

चालू घडामोडी


इच्छुक लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी YUVA 2.0 कार्यक्रम पंतप्रधानांनी सादर केला

YUVA 2.0 कार्यक्रम: युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान योजना, ज्याला YUVA 2.0 (तरुण, आगामी आणि बहुमुखी लेखक) म्हणून ओळखले जाते, ही योजना शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने 2 ऑक्टोबर रोजी सुरू केली.

भारत आणि भारतीयांना प्रोत्साहन देण्यासाठी परदेशातील साहित्य, हा तरुण आणि महत्त्वाकांक्षी लेखकांसाठी (30 वर्षांखालील) लेखक मार्गदर्शन कार्यक्रम आहे.

राष्ट्रीय खेळ 2022 : अंडर 20 वर्ल्ड चॅम्पियन अंतीम पंघलने कुस्तीत सुवर्ण जिंकले

20 वर्षांखालील जागतिक चॅम्पियन असलेल्या अंतीम पंघलने महिलांच्या 53kg कुस्तीमध्ये सुवर्णपदक जिंकल्यामुळे राष्ट्रीय खेळ 2022 मध्ये प्रभावी पदार्पण केले .

महिला कुस्तीमध्ये U20 विश्वविजेता बनणारी पहिली भारतीय बनून ऑगस्टमध्ये इतिहास रचणाऱ्या हरियाणाच्या अंतीम पंघलने अंतिम फेरीत मध्य प्रदेशच्या प्रियांशी प्रजापतीचा पराभव केला.

उषा मंगेशकर आणि पं. हरिप्रसाद चौरसिया यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाला.

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी गायन व वादन या क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांस गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

रविंद्र नाट्यमंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन 2020 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशया पुरस्कार सोहळयाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘स्वर-लता’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेकर यांना तर सन 2021 चा पुरस्कार ज्येष्ठ बासरीवादक पं.हरीप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आले होते.

उषा मंगेशकर यांनी केवळ हिंदी आणि मराठीच नाही तर वेगवेगळ्या प्रांतांतल्या वेगवेगळ्या भाषांमधून गाणी गायिली आहेत.

पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीनं संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली आहे. त्यांच्या बासरीचे सूर ही केवळ त्यांचीच नाही तर सगळ्या हिंदुस्तानची ओळख आहे.

हिमालय

 

ही आशिया खंडात पसरलेली, जगातील सर्वांत उंच पर्वतरांग आहे. संस्कृत भाषेत हिमालय म्हणजे बर्फ (हिम) जेथे वास करते ते स्थान.

हिमालय पर्वतरांगा भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून वेगळे करते. जगातील सर्वच ८,००० मीटर पेक्षा जास्त उंची असलेली सर्वोच्च शिखरे या पर्वतरांगेत आहेत. 

माउंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर असून त्याची उंची ८,८४८ मीटर इतकी आहे. त्याखालोखाल के२ व कांचनगंगाचा क्रमांक लागतो. ह्या पर्वतरांगेची लांबी २,४०० कि.मी. पेक्षाही जास्त आहे.

भारत, पाकिस्तान, नेपाळ, चीन,भूतान या देशांमधून जाते.

हा पर्वत भारतीय उपखंडाच्या हवामानावर नियंत्रण राखतो. हिमालयाच्या प्रभावाने भारतीय उपखंडावर मोसमी पाऊस पडतो तर त्याच्या उंचीमुळे उत्तरेकडील अतिथंड वारे रोखले जाऊन भारतीय उपखंड सर्वकाळ उष्ण/उबदार राहण्यास मदत होते.

हिमालयात अनेक नद्या उगम पावतात ह्या नद्या भारत, पाकिस्तान,बांगलादेश व चीनमधील जवळपास १५० कोटीहून अधिक लोकसंख्या म्हणजे ३०-३५ टक्के मानवांच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहे. 

गंगा,ब्रह्मपुत्रा,सिंधू या हिमालयातील महत्त्वाच्या नद्या आहेत.

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना

गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?
- चंपारण्य

गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?
- अहमदाबाद गिरणी लढा

गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?
- खेडा सत्याग्रह

गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?
- असहकार चळवळ

गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?
- 1906 रोजी नाताळ येथे

गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?
- यंग इंडिया

गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?
- साबरमती

गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?
- 1924 चे बेळगाव अधिवेशन

गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?
- सविनय कायदेभंग चळवळ

गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?
- अवंतिकाबाई

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२)  १८२२ कुळ कायदा
३)  १८२९ सतीबंदी कायदा
४)  १८३५ वृत्तपत्र कायदा
५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६)   १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७)   १८५८ राणीचा जाहीरनामा
८)   १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९)   १८६० इंडियन पिनल कोड
१०)  १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११)  १८७० आर्थिक विकेंद्रीकरण

कायदा

१२)   १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३)   १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४)   १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५)   १८८७ कुळ कायदा
१६)   १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७)   १८९९ भारतीय चलन कायदा
१८)   १९०१ पंजाब लँड एलिनेशन

कायदा

१९)   १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०)   १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१)   १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२)   १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा

कायदा

२३)   १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४)   १९१९ रौलेक्ट कायदा
२५)   १९३५ भारत सरकार कायदा
२६)    १९४४ राजाजी योजना
२७)    १९४५ वेव्हेल योजना
२८)   १९४५ त्रिमंत्री योजना
२९)   १९४७ माउंटबॅटन योजना
३०)   १९४७ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स


1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय
2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर
3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन
4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे
5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर
6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती
7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज
8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई
9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले
10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज
11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस
12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन
13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले
14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर
16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे
17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज
18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील
19)श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख
20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर
21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर
22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग
23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय
25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे
26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे
27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी

Latest post

चालू घडामोडी :- 13 मे 2024

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ कुवेतचे नवे अमीर शे...