Showing posts with label Geography. Show all posts
Showing posts with label Geography. Show all posts

23 November 2025

महाराष्ट्र पठार / दख्खन पठार

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️निर्मिती

➤ भ्रंशमूलक (faulted) व भेगीय ज्वालामुखी उद्रेकामुळे तयार झाले.

➤ दख्खनच्या 29 वेळा ज्वालामुखी उद्रेकातून निर्माण झाले.

➤ दख्खनच्या लाव्हारसाने महाराष्ट्र पठाराचा सुमारे 90% भाग व्यापला, म्हणून महाराष्ट्र पठाराला दख्खन पठार असेही म्हणतात.


🔹️कालखंड

➤ क्रेटेशियस (70–135 मिलियन वर्षापूर्वी)


🔹️आकारमान व उंची

➤ लांबी: पश्चिम–पूर्व 750 किमी, उत्तर–दक्षिण 700 किमी

➤ उंची: सुमारे 450 मी., पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना उंची कमी होते

➤ पठाराचा उतार: पश्चिमेकडून पूर्वेकडे; पूर्वविदर्भात उतार उत्तर–दक्षिण दिशेने


🔹️खडक व मृदा

➤ खडक: बेसाल्ट, अग्नीजन्य

➤ मृदा: रेगुर / रेगुड (काळी कापसाची मृदा)


🔹️पठाराची जाडी

➤ पश्चिमेस जास्त (सुमारे 2 किमी), पूर्वेस कमी


🔹️भौगोलिक सीमा

➤ उत्तर: सह्याद्री पर्वत

➤ दक्षिण: कर्नाटक व तेलंगणा

➤ पश्चिम: सह्याद्री पर्वत

➤ पूर्व: सातपुडा पर्वताच्या दिशेने उतार


🔹️भौगोलिक वैशिष्ट्ये

➤ विविध नद्यांच्या खोऱ्यांनी बनलेले (river valley plateau)

➤ पठार पश्चिमेकडून पूर्वेकडे उतरत असून, नद्यांचे खोरे पठाराची रचना घडवतात

सातपुडा पर्वत

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹️निर्मिती

➤ सातपुडा पर्वताचा काही भाग वल्लीकरण व उर्ध्वगामी भु-हालचालीमुळे निर्माण झाला आहे.

➤ पर्वत गटपर्वत / ठोकळ्याचा प्रकाराचा आहे.


🔹️कालखंड

➤ पॅलिझोईक कल्प (कॅब्रीयन शक)


🔹️भौगोलिक वैशिष्ट्ये

➤ लांबी: 900 किमी (सरासरी 800 किमी), पूर्व-पश्चिम दिशेला पसरलेला

➤ रुंदी: 150–160 किमी

➤ उंची: सुमारे 1000 मी. (समुद्रसपाटीपासून)

➤ आकार: त्रिकोणाकृती


🔹️मुख्य भाग

➤ नंदुरबार जिल्ह्यातील भाग: अस्तंभा व तोरणमाळ डोंगर

➤ अमरावती जिल्ह्यातील भाग: गाविलगड डोंगर


🔹️भौगोलिक प्रक्रिया व परिणाम

➤ झीज / क्षरणामुळे बिहड (Bad land Topography) तयार झाले आहे.

➤ नद्या, झरे, ओढे आणि छोटे नदी प्रवाह पर्वताच्या पायथ्याला शिलापाद / पिडमॉट निर्माण करतात.

➤ पर्वतावरून तापी नदीचे पात्र दिसते.

21 November 2025

42वी घटनादुरुस्ती 1976

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.


18 November 2025

१००० भूगोल प्रश्न

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


 1) ............... या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते.

   1) सातारा    2) कोल्हापूर    3) कराड      4) महाबळेश्वर

उत्तर :- 3


2) महाराष्ट्रात सर्वात मोठी नदी प्रणाली ................ आहे.

   1) भीमा    2) गोदावरी    3) कृष्णा      4) वैनगंगा

उत्तर :- 2


3) योग्य जोडया लावा. 

  धरण      जलाशयाचे नाव

         अ) कोयना      i) शहाजी सागर

         ब) भाटघर      ii) शिवसागर

         क) माणिकडोह    iii) ऑथर सरोवर

         ड) भंडारदरा    iv) येसाजीकंक

    अ  ब  क  ड

           1) i  iv  ii  iii

           2) i  iii  ii  iv

           3) iv  iii  ii  i

           4) ii  iv  i  iii

उत्तर :- 4


4) महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही ?

   1) वशिष्ठी    2) तापी      3) भीमा      4) उल्हास

उत्तर :- 3


5) खालील कोणत्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी नदीने विशिष्टपणे अर्धवर्तुळाकार आकार घेतल्याने नदीचे तसे नाव पडले आहे ?

   1) देहू      2) आळंदी    3) पंढरपूर    4) नाशिक

उत्तर :- 3


1) खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व  पीके ही ‘दिवस तटस्थ पीके (डे न्युट्ल क्रॉप)’ आहेत

   अ) मका, भात, वाटाणा    ब) गहू, रताळी, भात

   क) वाटाण, कपाशी, गहू    ड) टोमॅटो, वाटाणा, कपाशी

   1) अ व ड    2) ब आणि क    3) कव अ    4) ड फक्त

उत्तर :- 4


2) खालीलपैकी कोणत्या घटकाचा वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण, वाढ व उत्पन्न यासाठी उपयोगी ठरणा-या वित्तंचक निर्मितीवर 

     होतो ?

   1) वा-याचा वेग    2) पालाश    

   3) सूर्यप्रकाश    4) पाण्याचे रेणू

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणते जैविकखत नाही ?

   1) जीवाणू खत    2) शैवाल खत    

   3) हरीत शेणखत    4) वरील सर्व

उत्तर :- 3


4) खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरुपात विरघळणा-या खताच्या गटात मोडत नाही ?

   1) आइबीडीयु     2) सीडीयु    

   3) एमडीयु    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


5) बियांमधील तेलांचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण आणि फळांचा रंग वृध्दिगत करणारे पोषण द्रव्य .................

   1) लोह    2) चुना      3) पालाश    4) स्फुरद

उत्तर :- 3


1) तंबाखू बियाण्याच्या उगवणीकरिता सर्वात अनुकूल तापमान ................... होय.

   1) 20ºC    2) 28ºC      3) 32ºC      4) 25ºC

उत्तर :- 2


2) शाश्वत शेतीची मुख्य उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :

   अ) पर्यावरण संतुलन राखणे.    ब) सामाजिक – आर्थिक समता साध्य करणे.

   क) आर्थिक लाभ मिळवणे.

   1) अ व क बरोबर  2) ब व क बरोबर    3) अ व ब बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4


3) सपासप कापणे व जाळणे हे शेतीचे वैशिष्टय खालीलपैकी कोणत्या हवामान विभागात आढळते ?

   1) विषुववृत्तीय पर्जन्य अरण्यांचा प्रदेश    2) भूमध्य हवामानाचा प्रदेश

   3) मोसमी हवामानाचा प्रदेश      4) सूचिपर्णी वृक्षांच्या अरण्यांचा प्रदेश

उत्तर :- 1


4) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................... असते.

   1) 470 W/m²    2) 770 W/m²    3) 1170 W/m²    4) 1370 W/m²

उत्तर :- 4


5) एखाद्या अक्षवृत्तावर एखाद्या ठिकाणी पोहोचणारी सौरशक्ती वर्षात निरनिराळी असते कारण :

   1) ऋतूपरत्वे सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन बदलतो.

   2) दिवासाची लांबी बदलते.

   3) सूर्यापासूनचे अंतर बदलते.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


1) खालीलपैकी कोणते पिके अत्यंत आम्लधर्मीय मृदेस सहनशील आहेत.

   1) एरंड, भात, ओट    2) गहू, भात, वांगी

   3) मका, भात, टोमॅटो    4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 1


2) योग्य जोडया लावा.

  वारे      स्थान

         अ) गरजनारे चाळीस    i) 50º द. अक्षवृत्त

         ब) शूर पश्चिमी वारे    ii) 5º उ. ते 5º द. अक्षवृत्त

         क) उन्मत साठ    iii) 40º द. अक्षवृत्त

         ड) निर्वात पट्टा    iv) 60º द. अक्षवृत्त 

    अ  ब  क  ड

           1)  i  iii  iv  ii

           2)  iii  i  iv  ii

           3)  iv  iii  ii  i

           4)  i  ii  iii  iv

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते एक विधान उंची परत्वे सरासरी तापमानातील होणारी घट बरोबर दर्शविते ?

   1) 1º सें.दर 160 मी. ला    2) 1º सें. दर 170 मी. ला

   3) 1º सें. दर 100 मी. ला    4) 1º सें. दर 260 मी. ला

उत्तर :- 1


4) योग्य जोडया लावा.

  वातावरणाचे थर      उंची

         अ) तापांबर        i) 500 ते 1050 किमी

         ब) स्थितांबर      ii) 16 ते 50 किमी

         क) आयनांबर      iii) 0 ते 16 किमी

         ड) बाह्यांबर        iv) 80 ते 500 किमी

    अ  ब  क  ड

           1)  iii  ii  i  iv

           2)  ii  iv  i  iii

           3)  iii  ii  iv  i

           4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 3


5) जेव्हा हवामान अंदाजाची उपयुक्तता 3 ते 10 दिवस असते, तो ..................

   1) कमी कालावधीचा हवामान अंदाज    

   2) मध्यम कालावधीचा हवामान अंदाज

   3) जास्त कालावधीचा हवामान अंदाज    

   4) वरील सर्व

उत्तर :- 2


1) खालीलपैकी कोणत्या स्थानिक वा-यांना ‘डॉक्टर वारे’ या नावानेही संबोधिले जाते ?

   1) खारे व मतलई वारे    2) मान्सूनपूर्व वारे

   3) पर्वतीय/ डोंगरी वारे    4) दरी वारे

उत्तर :- 1


2) पृथ्वी सभोवतालचे वातावरण उबदार राहते कारण –

   1) उबदार हवा ग्रीन हाऊस परिणामामुळे बाहेर जात नाही.    2) भूपृष्ठापासून होणारे उष्णतेचे उत्सर्जन.

   3) जैविक इंधन उष्णता बाहेर सोडतात.        4) वनस्पती कार्बनडायऑक्साईडचे शोषण करतात.

उत्तर :- 2


3) सापेक्ष आर्द्रता जेव्हा कमी असते तेव्हा ............................

   1) शुष्क व द्रव तापमानमापक समान तापमान दर्शवितात.

   2) शुष्क आणि द्रव तापमानमापकातील तापमानात जास्त फरक असतो.

   3) जास्त तापमान असेल.

   4) कमी तापमान असेल.

उत्तर :- 2


4) हिवाळयातील ढगाळ रात्री या निरभ्र आकाश ...................... रात्रीच्या तुलनेत जास्त उबदार असतात. कारण :

   1) ढग उष्णतेचे उत्सर्जन पृथ्वीकडे करतात.

   2) ढग शीत लहरी ज्या आकाशातून येतात, त्या सामावून घेऊन पृथ्वीकडे पाठवतात.

   3) ढग पृथ्वीकडून होणा-या उष्णतेचे उत्सर्जन रोखतात.

   4) ढग हे अति उंचीवर असल्याने सूर्याच्या उष्णतेचे शोषण करून उष्णता पृथ्वीकडे पाठवतात.

उत्तर :- 3


5) समुद्र सपाटीपासून वातावरणाची लांबी किती आहे ?

   1) 60,000 ते 80,000 कि.मी    2) 16,000 ते 29,000  कि.मी

   3) 35,000 ते 65,000 कि.मी    4) 10,000 ते 30,000 कि.मी

उत्तर :- 2


1) भूपृष्ठावरील काही पदार्थ, साधारणत: खडक आणि खनिज पदार्थ ................. मुळे प्रतिदिप्तीत होतात किंवा सदृश्य प्रकाशमान 

     होतात.

   1) अवरक्त प्रारण    2) औष्णिक प्रारण    

   3) सूक्ष्मतरंग प्रारण    4) जंबुपार प्रारण

उत्तर :- 4


2) मध्य कटिबंधातील आवर्ताचा व्यास :

   1) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासाइतका असतो.

   2) कधी उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षाही कमी तर कधी जास्त असतो.

   3) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा जास्त असतो.

   4) उष्ण कटिबंधातील आवर्ताच्या व्यासापेक्षा कमी असतो.

उत्तर :- 3


3) विषुववृत्तीय मैदानात नेहमी येणारा अनुभव

   1) दैनिक तापमान कक्षेत मोठा फरक    2) गडगडाटासह जोरदार पाऊस

   3) वेगवान वारे          4) थंड रात्री

उत्तर :- 2


4) रॉकीजमधील अतिशुष्क व उष्ण वारा म्हणजे :

   1) फॉन    2) लू      3) चिनूक      4) मिस्ट्रल

उत्तर :- 3


5) खालीलपैकी कोणत्या महिन्यात विषुववृत्तीय कमी दाबाचा पट्टा 5 अंशांनी उत्तरेकडे सरकतो ?

   1) जून      2) सप्टेंबर    3) डिसेंबर    4) मार्च

उत्तर :- 1


1) भूपृष्ठाकडे येणा-या सौर ऊर्जेपैकी किती टक्के ऊर्जा ढगांमुळे परावर्तीत होते ?

   1) 27%    2) 34%      3) 51%      4) 17%

उत्तर :- 1


2) अटलांटिक व पॅसिफिक महासागरांप्रमाणे हिंदी महासागरातील सागरी प्रवाहचक्र नियमितपणे व अखंड गतीने कार्यरत राहात 

     नाही, कारण :

   1) 25 अंश उत्तर अक्षवृत्तापलीकडे भुभाग भूखंडाने व्यापलेला आहे.

   2) प्रचलित वा-यांचा समुद्रप्रवाहाच्या दिशेवर परिणाम होतो.

   3) हिंदी महासागरावर ऋतुमानानुसार मोसमी वा-यांची दिशा बदलते.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


3) खालील विधाने पहा :

   अ) फिलीपाइन्सच्या किना-यावरील वादळांना टायफून्स म्हणतात.

   ब) व्हिक्टर, कतरीना ही हरीकेन-चक्री वादळाची नावे आहेत.

   क) युएसएच्या फ्लॉरिडा किना-याजवळ निर्माण होणा-या वादळांना टोरनॅडो म्हणतात.

   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.

   3) विधाने ब आणि क बरोबर आहेत.  4) विधाने अ, ब आणि क बरोबर आहेत.

उत्तर :- 4


4) .............. च्या परिणामने इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सजर्नाचे विखरणे वातावरण करत असते.

   1) उत्सर्जनाचा वेग    2) त्याची वारंवारिता

   3) त्याची तीव्रता    4) वरील सर्व

उत्तर :- 4


5) महाराष्ट्र राज्य हे एकूण 9 कृषि हवामान विभागांमध्ये .................. च्या आधारावर विभागलेले आहे.

   1) पर्जन्य, तापमान, मृदा प्रकार व वनस्पती      2) पर्जन्य, तापमान व वनस्पती

  3) पर्जन्य, मृदा प्रकार व वनस्पती        4) पर्जन्य, तापमान व मृदा प्रकार 

उत्तर :- 3


1) ‘जेटस्ट्रीम’ चे गुणधर्म खाली दिलेले आहेत. त्यातील योग्य विधानांचा पर्याय निवडा :

   अ) हे दोन्ही गोलार्धातील वेगवान पश्चिमी वा-यांच्या दरम्यान आढळतात.

   ब) हे विषुववृत्ताच्या तसेच ध्रुवांजवळील भागात आढळतात.

   क) हे वातावरणाच्या खालच्या थरात आढळतात.

   ड) यांचा भूपृष्ठावरील पर्जन्यावर प्रभाव पडत नाही.

   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) ब आणि ड

उत्तर :- 1


2) एल् निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किना-यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?

   1) ॲटलांटिक    2) पॅसिफिक    3) इंडियन    4) आर्कटिक

उत्तर :- 2


3) भारतीय हवामान खात्याने मान्सून वा-याचे आगमन व निर्गमन यांचा अभ्यास करून चार ऋतू मानलेले आहेत, या ऋतूच्या 

     सोबत कालावधी दिला आहे, यापैकी अचूक पर्याय ‍निवडा.

   अ) नैऋत्य मान्सून काळ  -  जून ते ऑक्टोबर     ब) मान्सून उत्तर काळ  -  ऑक्टोबर ते डिसेंबर

   क) ईशान्य मान्सून काळ  -  जानेवारी ते फेब्रुवारी   ड) मान्सून पूर्व काळ  -  मार्च ते मे

   1) फक्त अ विधान बरोबर आहे.      2) ब आणि क विधाने बरोबर आहेत.

   3) अ, ब आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


4) भारतीय हवामान वर्गीकरणामध्ये कोपेन या शास्त्राने ‘Amw’ हे अद्यक्षर कशासाठी वापरले आहे ?

   1) निमशुष्क स्टेपी हवामान    2) मोसमी हवामान अल्पकालीन शुष्क हिवाळी

   3) मान्सून शुष्क हिवाळी      4) ध्रुवीय शुष्क हिवाळी

उत्तर :- 2


5) खालीलपैकी कोणत्या घटकावर हवेचे बाष्प धारण करण्याची क्षमता अवलंबून असते ?

   1) हवेचा दाब    2) तापमान    3) वा-याची दिशा    4) सूर्यप्रकाश

उत्तर :- 2


1) गरजणारे चाळीस हे ..................... वारे आहेत ?

   1) ईशान्य – व्यापारी    2) आग्नेय – व्यापारी    

   3) नैऋत्य – प्रतिव्यापारी    4) वायव्य – प्रतिव्यापारी

उत्तर :- 4


2) दिवसातील सर्वाधिक तापमान .............................. या वेळेत असते.

   1) सकाळी 11.00 ते दुपारी 12.00      2) दुपारी 12.00 ते दुपारी 1.00

   3) दुपारी 1.00 ते 2.00        4) दुपारी 2.00 ते 3.00

उत्तर :- 4


3) महाराष्ट्रामध्ये गडगडाटी वादळे ही मान्सूनपूर्व काळात आणि नैऋत्य मान्सूनच्या सुरुवातीच्या काळात ...................... या 

     महिन्यांत जास्त येतात.

   1) एप्रिल आणि जुलै    2) एप्रिल आणि मे    

   3) मे आणि जून      4) जून आणि जुलै

उत्तर :- 3


4) खालील पर्यायातून ज्याचा भारतीय मान्सून निर्मितीशी संबंध नाही असा पर्याय निवडा.

   1) हिमालय पर्वत व तिबेटचे पठार यांचे स्थान व विस्तार

   2) व्दीपकल्पीय भारतातील वनांचे प्रमाण

   3) जेट स्ट्रीम वा-यांचे उच्च वातावरणातील चालीय संचलन

   4) हिन्दी महासागर व आशिया खंडांतर्गत भागाचा तापण्याचा व थंड होण्याच्या क्रियेतील तफावत

उत्तर :- 2


5) ज्यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा .............................. टक्के अधिक असतो ते वर्ष पर्जन्याधिक्याचे समजण्यात येते ?

   1) 120    2) 100      

   3) 150    4) 125

उत्तर :- 1


1) खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मान्सून प्रकारचा पाऊस पडत नाही ?

   1) पश्चिम पाकिस्तान    2) फीलीपाईन्स    3) दक्षिण व्हिएतनाम    4) मध्य केनिया

उत्तर :- 4


2) भारताव्यतिरिक्त पुढील प्रदेशामध्ये मोसमी वारे वाहतात :

   अ) आफ्रिकेतील गियानाचा किनारा, उत्तर ऑस्ट्रेलियाचा किनारा

   ब) ब्रह्मदेश, थायलंड, लाओस, कंबोडीया व व्हिएतनाम 

   क) चीन, दक्षिण जपान      ड) संयुक्त संस्थानाचा मेक्सिकोच्या आखातालगतचा भाग

   1) अ, ब, क बरोबर    2) ब, क, ड बरोबर    3) अ, क, ड बरोबर    4) सर्व बरोबर

उत्तर :- 4


3) तापमानाचे उभे वितरण हे ............................ या घटकावर अवलंबून आहे.

   1) अक्षवृत्ते      2) उंची      3) समुद्र सानिध्य      4) सागरी प्रवाह

उत्तर :- 2 


4) जोडया लावा.

   अ) विषुववृत्तीय कमी भाराचा पट्टा    i) या भागातील हवा पृष्ठभागाचे घर्षण व पृथ्वीच्या परिवलनामुळे वर ढकलली जाते.

   ब) मध्य कटिबंधीय जास्त थराचा पट्टा  ii) वर्षभर तापमान 0ºC पेक्षा कमी असते.

   क) उप-ध्रुवीय कमी भाराचा पट्टा    iii) या भागामध्ये वर्षभर सूर्याची किरणे प्रामुख्याने लंबरूप पडतात.

   ड) ध्रुवीय जास्त भाराचा पट्टा    iv) थंड हवा 25º आणि 35º अक्षवृत्तांच्या दरम्यान खाली उतरते.

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iv  iii

         2)  iv  ii  iv  iii

         3)  iii  iv  i  ii

         4)  ii  iii  iv  i

उत्तर :- 3


5) खालील विधाने पहा.

   अ) जेट वायुच्या प्रभावामुळे हिवाळयात काश्मिर व हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमालयात बर्फ पडतो.

   ब) हिवाळयात तामिळनाडूमध्ये ईशान्स मान्सून वा-यामुळे पाऊस पडतो.

   क) बंगालमध्ये उन्हाळयात उष्ण हवेचे प्रवाह वाहतात त्यांना कालबैसाखी म्हणतात.

   1) फक्त विधान अ बरोबर आहे.    2) फक्त विधान ब बरोबर आहे.

   3) फक्त विधान क बरोबर आहे.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


1) योग्य जोडया लावा :

  वायू      वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष

         अ) नायट्रोजन (N2)    i) 0.007ppm

         ब) हेलियम (He)    ii)0.5ppm

        क) ओझोन (O3)    iii) 780,840.0ppm

         ड) हायड्रोजन (H2)    iv) 5.2ppm

    अ  ब  क  ड

           1)  ii  i  iii  iv

           2)  iv  iii  ii  i

           3)  i  ii  iv  iii

           4)  iii  iv  i  ii

उत्तर :- 4


2) खालील विधानांचा विचार करा.

   अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठाभागावरील तापमानात वाढ होते.

   ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ आणि ब दोन्हीही नाहीत

उत्तर :- 3


3) स्क्वेल / चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे, परंतु कधी – कधी ............... 

     प्रसंगी येते. 

   1) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.

   2) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात.

   3) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.

   4) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात.

उत्तर :- 2


4) नॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना .................. साली नवी दिल्लीत झाली.

   1) 1985    2) 1988      3) 1992      4) 1994  

उत्तर :- 2


5) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?

   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान

   2) जमीन आणि माती संवर्धन

   3) पिकांचे नियोजन

   4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे

उत्तर :- 1  


1) खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा :

   अ) तपांबर    ब) आयनांबर    क) स्थितांबर    ड) बाह्यांबर

   1) ड, क, ब, अ    2) अ, क, ब, ड    3) अ, ब, क, ड    4) क, ब, अ, ड

उत्तर :- 2


2) सर्वसाधरणपणे उत्सर्जीत सूर्यकिरणांपैकी ................. टक्के सूर्यकिरण पिकाच्या पृष्ठभागावरती शोषले जातात.

   1) 75      2) 79      3) 85      4) 73

उत्तर :- 1


3) जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबविला

      जात आहे ?

   1) नागपूर-अमरावती-अकोला    2) धुळे-जळगाव-नंदूरबार

   3) सांगली-सातारा-कोल्हापूर    4) पुणे-अहमदनगर-औरंगाबाद

उत्तर :- 4


4) पावसाच्या थेंबामुळे जमिनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो ?

   1) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमिनीची घडण बिघडणे.

   2) पाणी साठयास सुरुवात होणे.

   3) जमिनीतील ओलावा कमी करणे.

   4) जोरात वाहणा-या पाण्यामुळे जमिनीच्या कणांची वाहतुक होते.

उत्तर :- 1


5) पाण्याची वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू 

     करण्यात आले ?

   1) बारामती    2) खेड      3) पुरंदर      4) मावळ

उत्तर :- 3


1) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?

   1) जमीन एका हंगामात पडीक ठेवावी.    2) ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.

   3) एका आड एक सरी भिजवावी.      4) वरीलपैकी एकही नाही.

उत्तर :- 2


2) भारत सरकारने पाणी वापराबाबत काही निर्देश ठरवून दिले आहेत ? महाराष्ट्रासाठी कोणती जोडी चुकीची आहे ?

   1) महापालिका क्षेत्र – 135 लिटर दर डोई दर दिवशी

   2) ‘अ’ गटातील नगरपालिका – 170 लिटर दर डोई दर दिवशी

   3) ‘ब’ गटातील नगरपालिका – 100 लिटर दर डोई दर दिवशी

   4) ग्रामीण विभाग – 40 लिटर दर डोई दर दिवशी

उत्तर :- 2


3) पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरून काढतात ?

   1) डारसीज् सिध्दांत    2) हेनरीज् सिध्दांत

   3) ॲव्होगाड्रोज सिध्दांत     4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 2


4) पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधी संरक्षक पाणी देण्यासाठी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी 

     केली जाते त्यास ...................... म्हणतात.  

   1) पावसावरची शेती    2) अपधाव शेती

   3) कोरडवाहू शेती    4) वरील सर्व

उत्तर :- 2


5) अ) समतल बांध पध्दत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते.

    ब) ढाळीचे बांध पध्दत जास्त पावसाच्या प्रदेशात जास्त झालेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते.

         वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे  ?

   1) अ बरोबर आणि ब चूक आहे.      2) दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत.

   3) अ चूक आणि ब बरोबर आहे.      4) दोन्ही अ आणि ब चूक आहे.

उत्तर :- 2


1) जर जमिनीवरून वाहून जाणा-या पाण्याच्या प्रवाहाचा वेग दुप्पट झाल्यास जमिनीची धुप करण्याची शक्ती मूळ वेगाच्या किती 

     पटीने वाढेल ?

   1) एकपट    2) दुप्पट      3) चारपट    4) आठपट

उत्तर :- 3


2) कोणत्या पट्टा पीक पध्दतीमध्ये कडधान्य अथवा गवत यांचे पट्टे शेतामध्ये कायम स्वरुपी ठेवले जातात ?

   1) समतल पट्टा    2) वारा प्रतिबंधक पट्टा  3) वरील दोन्ही    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


3) पृथ्वी वरील पाण्याबाबत काय बरोबर नाही ?

   अ) समुद्रात पृथ्वीवरचे 2/3 पाणी आहे परंतु हे पाणी माणसाला उपयुक्त नाही.

   ब) ताजे पाणी (मीठ नसलेले) केवळ 2.7 टक्के आहे.

   क) केवळ 1 टक्के ताजे पाणी मानवास उपयुक्त आहे.

   ड) सुमारे 70 टक्के ताजे पाणी हिमनद्या व बर्फाच्या स्वरुपात अंटार्टिका, ग्रीनलँड व पर्वतरांगात आहे. त्याच्या ठिकाणामुळे ते 

         दुरापास्त आहे.

   1) ब आणि क    2) क आणि ड    3) ब आणि ड    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 4


4) कोरडवाहू शेतीमध्ये पीक उत्पादन वाढीसाठी खतांची कार्यक्षमता यामुळे वाढविता येईल :

   अ) माती परीक्षण व मातीची प्रतिक्रिया नुसार खतांचा वापर.

   ब) जमिनीमध्ये बियाण्याच्या 5 से.मी. बाजूला किंवा खाली खत देणे.

   क) पेरणीच्यावेळी स्फुरद आणि पालाश खत वापरणे आणि नत्र खतांचा दोन हप्त्यात विभागून वापर करणे.

   1) अ, ब    2) ब, क      3) अ, क      4) अ, ब, क

उत्तर :- 4

5) तुषार सिंचनाच्या समानता गुणांकावर खालील घटक परिणाम करतात  ?

   अ) तुषार तोटयामधील अंतर    ब) पीक भूमिती

   क) संच चालवण्याच्या कालावधी    ड) वा-याची स्थिती

   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) अ आणि ड    4) क आणि ड

उत्तर :- 3



1) साठवून ठेवलेल्या पाण्यातील शेवळांची वाढ थांबविण्यासाठी कोणत्या पदार्थाचा मोठया प्रमाणात वापर करण्यात येतो ?

   1) कॉपर सल्फेट      2) शिसे      3) कोबाल्ट    4) कॅडमियम

उत्तर :- 1


2) खालील परिस्थितीत तुषार सिंचन पध्दत चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही ?

   1) वा-याचा जास्त वेग    2) जास्त रोपांची घनता  3) कमी रोपांची घनता  4) उताराची जमीन

उत्तर :- 1


3) प्रवाही जलसिंचनात शेवाळ जे नत्र स्थिरीकरणामुळे स्विकारले जाते, तेच ठिबक सिंचन प्रणालीत मुळीत पसंत केले जात नाही 

     कारण – 

   1) ठिबक सिंचन प्रणाली वापरल्यामुळे शेवाळ नत्र स्थिरीकरण करू शकत नाही.

   2) ठिबक सिंचनाच्या पाईपमध्ये शेवाळ वाढू शकत नाही.

   3) ठिबक तोटया बंद पडू शकतात.

   4) यापैकी काहीही नाही.

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरी दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना :

   अ) महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत सुरू केलेली आहे.

   ब) अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबांना वैयक्तिक घरगुती नळ जोड व स्वच्छता गृहासाठी ही सुरू केलेली योजना आहे.

   क) या योजनेंतर्गत 75 टक्के अनुदान राज्यसरकार देते तर उर्वरित 25 टक्के रक्कम संबंधित लाभधारक अथवा नागरी स्थानिक 

         संस्थेने खर्च करावी लागते.

   वरीलपैकी कोणती / ते विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    2) फक्त अ आणि ब    3) फक्त ब आणि क    4) अ, ब आणि क

उत्तर :- 2


5) समपातळी (कंटूर) बांधाची शिफारस ................... असणा-या भागासाठी आणि ज्या जमिनीमध्ये पाणी झिरपते व 6 टक्के पर्यंत 

     उतार असतो अशा शेत जमिनीत करतात.  

   1) 600 मि.मी. पेक्षा कमी पर्जन्यमान    2) 600 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान

   3) 1000 मि.मी. पेक्षा अधिक पर्जन्यमान    4) 700 मि.मी. पेक्षा जास्त पर्जन्यमान

उत्तर :- 1


1) ठिबक सिंचन प्रणालीमध्ये वाळूच्या गाळणीची गरज खालील घटक सिंचनाच्या पाण्यातून काढण्यासाठी होते ?

   अ) शेवाळ    ब) पाण्यात विरघळलेले क्षार    

   क) काडी-कचरा    ड) अतिसुक्ष्म मृदा कण

   1) अ आणि ब    2) अ आणि क    3) ब आणि क    4) क आणि ड

उत्तर :- 2


2) गैबीयनच्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत ?

   अ) ते हाताळण्यासाठी लवचिक आहेत.    ब) त्यांचे बांधकाम कमी खर्चाचे असते.

   क) अपधावासाठी ते अपाय असतात.    ड) ते सहज फुटू शकतात.

   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) अ आणि ड

उत्तर :- 1


3) ............................ जमिनीसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे.

   1) खार    2) उथळ व उताराच्या  

   3) आम्लधर्मी    4) अल्कधर्मी

उत्तर :- 2


4) ....................... सांडवा पाणी आडवून पाणी साठवण्यासाठी उपयोगात आणता येत नाही.

   1) आघात    2) आघात प्रवेश    3) घसरणी    4) आपत्कालीन

उत्तर :- 3


5) एप्रिल 2002 मध्ये स्विकारलेल्या राष्ट्रीय जल नितीची ही उद्दिष्टये आहेत :

   अ) जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे.    ब) एकात्मिक जल संसाधनांचा विकास.

   क) उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे.      ड) भूजल व्यवस्थापन.

   1) अ आणि ब फक्त बरोबर आहेत      2) क आणि ड फक्त बरोबर आहेत

   3) अ, ब आणि ड फक्त बरोबर आहेत    4) वरील सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 3 


1) ................... पिकांसाठी ठिबक सिंचन पध्दत अतिशय उपयुक्त आहे.

   1) अधिक पाण्यामध्ये होणा-या    2) क्षारांना बळी न पडणा-या

   3) कमी उत्पन्न देणा-या      4) फळ

उत्तर :- 4


2) डोंगराळ आणि चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या रचनेमध्ये अतिरिक्त पावसाच्या पाण्याच्या संकलन करण्यासाठी कोणत्या 

     प्रकारचा तलाव वापरतात ?

   1) बंधा-याने बांधलेला    2) खोदलेला    

   3) पृष्ठीय      4) वरील सर्व

उत्तर :- 1


3) केंद्रीय जल आयोग हा ......................संबंधी कार्यरत आहे.

   1) भूजल      2) पाण्याची गुणवत्ता    

   3) पृष्ठभागावरील पाणी    4) पाणी पुरवठा व स्वच्छता

उत्तर :- 3


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) धन आयन – विनिमय क्षमता मोन्टरमोरेलोनाइट क्ले खनिजामध्ये जास्त असते.

   ब) पिकातील पानांपासून होणारे बाष्पोणपर्णात्सर्जन बासालीन रोखते.

   1) केवळ अ    2) केवळ ब    

   3) दोन्ही    4) एकही नाही

उत्तर :- 1


5) समान सूर्य किरणोत्सर्गामध्ये, सिंचनाखाली घेतलेल्या पिकाचे उत्पन्न हे समान पाणी पावसामार्फत मिळालेल्या त्याच पिकाच्या 

     उत्पन्ना ............................... असते ?

   1) पेक्षा अधिक    2) एवढे    

   3) पेक्षा कमी    4) पेक्षा अनिश्चित

उत्तर :- 3 


1) पिकाची पाण्याची गरज काढताना सर्वाधिक पीक गुणांक कोणत्या वाढीच्या अवस्थेत असतो ?

   1) प्रजोत्पादन अवस्था    2) रोप अवस्था

   3) जोमदार शाखीय अवस्था  4) पक्वता अवस्था

उत्तर :- 1


2) पाण्याची धूप रोखण्याकरिता कृषीविद्या विषयक कोणकोणत्या उपाय योजना आहेत ?

   अ) पिकाची निवड व जमिनीची मशागत      ब) पट्टा पेर आणि जमिनीवरचे अच्छदान

   क) समतल बांधबंधीस्‍ती आणि वनस्पतीजन्य अडथळे    ड) वरीलपैकी कोणतेही नाही

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त    

   3) अ आणि क फक्त    4) ड फक्त

उत्तर :- 1


3) ज्या प्रक्रियेमध्ये पावसाचे पाणी तळे, जलाशयामध्ये गोळा करून साठविले जाते आणि ते पिकांना जेव्हा पाहिजे तेव्हा पुरवणी 

     सिंचन म्हणून दिले जाते त्यास .......................... असे म्हणतात.

   1) पाऊस संचयन    2) पाणी संचयन    

   3) संरक्षित सिंचन    4) सिंचन

उत्तर :- 2


4) दोन भिन्न अवस्थांमधील आकर्षणास .......................... असे म्हणतात.

   1) अधेझ्न (Adhesion)      2) कोहीझन (Cohesion)    

   3) प्रतिसारण (Repulsion)    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


5) कमी दर्जाचे / प्रतिचे पाणी सिंचनाच्या ................... या पध्दतीमध्ये वापरले जाऊ शकते.

   1) तुषार सिंचन      2) ठिबक सिंचन    

   3) सरी – वरंबा पध्दत    4) मोकाट पध्दत

उत्तर :- 2


1) भारतामधील बहुतेक सिंचन (कमांड) क्षेत्रामध्ये सिंचनाने ......................... वाढली आहे.

   1) पाणथळ जमिनी    2) भूमिगत उच्चतम पाणी पातळी

   3) क्षारयुक्त जमीन    4) वरील सर्व

उत्तर :- 4


2) झाडांना मॅग्नेशियमचा पुरवठा केल्यास ....................... पुरविणा-या खतांची कार्यक्षमता वाढते.

   1) नत्र      2) स्फुदर      

   3) पालाश    4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 2


3) काही वनस्पतीमध्ये पानांच्या कडा किंवा टोक यामधून काही प्रमाणात थेंबांच्या स्वरूपात पाण्याचा –हास होतो. या प्रक्रियेला 

     ................... म्हणतात.

   1) ॲबसॉर्पशन (शोषण)      2) ॲडसॉपर्शन

   3) ऑसमॉसीस (परासरण)    4) गटेशन

उत्तर :- 4


4) वनस्पतीमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याचा क्षमता ........................ मुळे येते.

   अ) पाणी ग्रहण करणे    ब) पाण्याचे नुकसान कमी करणे

   क) जलसंचय      ड) वरीलपैकी कोणतेही नाही

   1) अ व ब फक्त    2) ब व क फक्त    3) अ, ब व क    4) ड फक्त

उत्तर :- 3


5) पाण्याच्या प्रवाहासोबत कितपत पाणी हे जमिनीत समप्रमाणात विभागले जाते ते .......................... दर्शविते.

   1) पाणी देण्याची कार्यक्षमता    2) पाणी वाटप कार्यक्षमता

   3) पाणी वाहन कार्यक्षमता      4) पाणी साठवण कार्यक्षमता

उत्तर :- 2


1) पृष्ठीय सिंचन पध्दतीची (प्रवाह पध्दती) क्षमता कशी सुधारता येऊ शकते ?

   अ) पाटाचे अस्तरीकरण करून    ब) जमिनीचे योग्य सपाटीकरण करून

   क) मोकाट पध्दतीने पाणी देऊन

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त

   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?

   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक

   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार

उत्तर :- 1


3) शाश्वत शेतीच्या उद्दीष्ट पूर्तीसाठी कोणत्या शेती पध्दतीचा सहभाग महत्त्वाचा असतो ?

   1) सेंद्रिय शेती        2) कोरडवाहू शेती

   3) पावसावर आधारित शेती    4) चारा – गवत शेती

उत्तर :- 1


4) पडणा-या पावसाच्या संवर्धनासाठी खोल जमिनीत खालीलपैकी कोणती पध्दत अतिशय महत्त्वाची आहे ?

   1) जमिनीच्या वरच्या थरात बदल करणे    2) जमिनीच्या वरच्या थरात विशिष्ट आंतररचना करणे (कॉनफिगरेशन)

   3) खोल नांगरट करणे        4) जमिनीशी उभे आच्छादन करणे

उत्तर :- 2


5) अ) वालुकामय मातीमध्ये चिकन माती पेक्षा जास्त रिकाम्या जागा असतात.

    ब) चिकणमाती वालुकामय मातीपेक्षा जास्त पाणी समावून घेऊ शकते.

   वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे ?

   1) अ आणि ब पैकी एकही बरोबर नाही    2) अ बरोबर पण ब चूक आहे

   3) अ चूक पण ब बरोबर आहे      4) दोन्ही अ आणि ब बरोबर आहे

उत्तर :- 3


1) कोणत्या प्रकारच्या मशागतीचा हेतू जमिनींची धूप थांबविण्यासाठी व पिकांची चांगली वाढ होऊन अधिक उत्पादनसाठी आहे ?

   1) धानांच्या ताटांचे बुडरवे, आच्छादन व मशागत    2) शुन्य मशागत

   3) कमीत कमी मशागत          4) प्राथमिक मशागत

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमाच्या प्रस्थापनाला / विकासाला भारत सरकारच्या कृषि मंत्रालयाने हातभार लावला ?

   1) अवर्षण प्रणव क्षेत्र कार्यक्रम (डी.पी.ए.पी.)      

   2) वाळवंट विकास कार्यक्रम (डी.पी.पी.)

   3) कोरड वाहु प्रदेशासाठी राष्ट्रीय पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (एन.डब्लु.डी.पी.आर.ए.)

   4) बहुव्याप्ती असलेला पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम (काऊडेप)

उत्तर :- 3


3) भारतात मिट्टी बचाओ (माती वाचवा) चळवळीला कुठे सुरवात झाली ?

   1) नागपूर, महाराष्ट्र    2) म्हैसूर, कर्नाटक    

   3) दारभंगा, बिहार    4) होशंगाबाद, मध्यप्रदेश

उत्तर :- 4


4) पिकांना स्फुदराची जास्तीत जास्त उपलब्धता होण्यासाठी जमिनीचा सामू या दरम्यान असतात.

   1) 4.5 – 6    2) 6 – 7    

   3) 7.5 – 8.5    4) 7.0 – 8.5

उत्तर :- 2


5) कमी पावसाच्या प्रदेशातील बागायती जमिनी कशामुळे क्षारयुक्त व चोपण (अल्कली युक्त) होतात ?

   1) कमी प्रमाणात अन्नद्रव्याचा निचरा    2) पीक अवशेषांचा अती वापर

   3) असंतुलीत खतांचा वापर      4) पाण्याच्या बाष्पीभवनामुळे पृष्ठभागातील थरांमध्ये क्षारांची वाढ

उत्तर :- 4


1) पिकांच्या योग्य वाढीसाठी पोयटा (लोम) मातीत, हवा : पाणी : घन पदार्थ........................ प्रमाणात असावेत:

   1) 20:30:50    2) 30:30:40    3) 25:30:45    4) 25:25:50

उत्तर :- 4


2) मध्यवर्ती वाळवंट विभाग संशोधन केंद्र जोधपरू हे कोणत्या संशोधनाशी संबंधित आहे ?

   1) जमीन धुपीचे परिणाम      

   2) पाण्याने होणा-या धुपीचे परिणाम

   3) वा-याने होणा-या धुपीचे परिणाम    

   4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 3


3) डोंगराळ प्रदेशात जमिनीची धूप थांबविण्यासाठी बेंच टेरेंसींग सर्वसाधारणपणे या उतारापर्यंत करण्यात येते ........................

   1) 16% ते 33%    2) 3% ते 5%      

   3) >10%      4) 40% ते 45%

उत्तर :- 1


4) जमिनीचा पोत म्हणजे

   1) मातीच्या खनिजांची रचना    2) मातीच्या कणांची रचना

   3) सेंद्रीय पदार्थाची रचना      4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 4


5) आम्लधर्मीय जमिनी ................... यांच्या निच-यामुळे तयार होतात ?

   1) पालाश, सोडियम, तांबे, चुना    

   2) मॉलिबडेनम, चुना, मॅग्नेशियम, सोडियम

   3) चुना, मॅग्नेशियम, पालाश, हाइड्रोजन  

   4) चुना, सोडियम, मॅग्नेशियम, पालाश

उत्तर :- 4


1) धूपे बरोबर खालीलपैकी कोणते मुख्य अन्नद्रव्य जास्त प्रमाणात निघून जाते ?

   1) नत्र      2) पालाश    

   3) स्फुरद    4) लोह    

उत्तर :- 3


2) साधारणत: जमिनीची सच्छिद्रता किती असते ?

   1) 20 ते 30%    2) 30 ते 35%    

   3) 30 ते 60%    4) 60 ते 70%

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणते पीक मृदा व पाणी संधारण साधण्यासाठी उपयुक्त आहे ?

   1) मका    2) ज्वारी      

   3) बाजरी    4) चवळी

उत्तर :- 4


4) जमिनीची धूप थांबविण्यासाठी पहिली पायरी म्हणजे.................. थांबविणे.

   1) पाण्याचा प्रवाह    2) वा-याचा वेग

   3) मातीचे विभक्तीकरण    4) झाडांची वाढ

उत्तर :- 3


5) कमी ते मध्यम पावसाच्या भागामध्ये समपातळीत बांध असलेल्या काळया जमिनीवर कोणत्या प्रकारच्या टेरेसिंगचा वापर 

     करतात?

   1) झिंग टेरेसिंग      2) बेंच टेरेसिंग

   3) ग्रेडेड टेरेसिंग      4) वरील सर्व

उत्तर :- 1 


1) ठाळीचे बांध कोणत्या ठिकाणी घेतले जातात ?

   अ) जमीन पाण्याच्या धुपेला कमी ग्रहणशील आहे तेथे    ब) मातीची पारगम्यता कमी आहे तेथे

   क) दलदलीच्या जमिनीत           ड) जास्त उताराच्या जमिनीत

उत्तर :- 3


2) मृदेची सच्छिद्रता (Porosity) जर 50% आहे तर छिद्र गुणोत्तर (void ratio) ......................... इतके असेल.

   1) 0.5      2) 1.0      3) 2.0      4) 5.0

उत्तर :- 2


3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) जमिनीची वा-यामुळे होणारी धुप जमिनीची पारगम्यता बदलून गंभीर स्वरुपाची हानी घडवून आणते.

   ब) हिस्टोसोल्स यांनी नैसर्गिक / जैविक मृदा म्हणतात.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 2


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) लॅटरीटिक मृदा मोसमी हवामानाच्या प्रदेशात आढळते.

   ब) लॅटरीटिक मृदा लोह, ॲल्युमिनियम, पोटॅश व चुनखडीयुक्त आहेत.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 1


5) जमिनीचा उतार ................ टक्केपेक्षा जास्त असतो तेव्हा कंटूर चर तांत्रिकदृष्टया किंवा आर्थिकदृष्टया फायदेशीर ठरत नाहीत.

   1) 10      2) 15      3) 20      4) 25

उत्तर  :- 3


1) चांगल्या पोयटयाच्या मातीत पोयटयाचे प्रमाण साधारण ....................... टक्के असते.

   1) 10-20    2) 20-30    

   3) 30-50    4) 60-75

उत्तर :- 3


2) अपपर्णन हा खालीलपैकी कोणत्या विदारणाचा प्रकार आहे ?

   1) रासायनिक    2) कायिक/भौतिक    

   3) जैविक    4) भस्मीकरण

उत्तर :- 2


3) जास्तीत जास्त जीवाणूंची संख्या जमिनीच्या (मातीच्या) ‘अ’ थरामध्ये का असते ?

   1) मातीची ‘अ’ थरामध्ये जास्त अन्नद्रव्ये असतात.    2) मातीची ‘अ’ थरामध्ये सुपीकता अधिक असते.

   3) मातीची ‘अ’ थरामध्ये जलसंपृक्त असतो.      4) मातीची ‘अ’ थरामध्ये भरपूर सेंद्रीय पदार्थ असतात.

उत्तर :- 4


4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे  ?

   अ) विम्लधर्मीय आणि क्षारयुक्त विम्‍लधर्मीय जमिनी पुन:प्रापण करण्यासाठी (सुधारण्यासाठी) सल्फर वापरतात.

   ब) क्षारयुक्त जमिनीमध्ये विनिमयात्मक सोडियमची टक्केवारी 15 पेक्षा अधिक असते.

   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 1


5) ‍विधाने वाचून खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

   अ) रेगूर मृदा ही मुख्यत्वे नद्यांच्या खो-यात, पठारी प्रदेशात सापडते.

   ब) जास्त पावसाच्या प्रदेशात तांबडी व जांभी मृदा तर किनारी प्रदेशात करडया रंगाची मृदा आढळते.

   1) विधान अ बरोबर    2) विधान ब बरोबर

   3) दोन्ही विधाने बरोबर    4) दोन्ही विधाने चूक

उत्तर :- 3  


1) माती (मृदा) तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये पदार्थ पाण्याबरोबर वाहत जाऊन जमा होतात ते म्हणजे

   अ) कोलूव्हियम    ब) लॅक्यूस्ट्राइन    क) ॲल्यूव्हीयम    ड) टिल

   1) अ      2) अ व ब    3) क      4) ड

उत्तर :- 3


2) वरून वाहणा-या पाण्यामुळे उताराच्या जमिनीमधून समप्रमाणात पातळ थरामध्ये माती निघून जाणे याला .................... असे 

     म्हणतात.

   1) ओघळपाडी धूप  2) घळई धूप    3) सालकाढी धूप    4) शिंतोडे धूप

उत्तर :- 3


3) दरवर्षी आपल्या देशात अंदाजे किती मातीची धूप होते ?

   1) 12 अब्ज टन    2) 100 अब्ज टन    3) 329 अब्ज टन    4) 120 अब्ज टन

उत्तर :- 1


4) मातीचा .................... गुणधर्म कमी करण्यासाठी ऊसाची मळी मातीमध्ये मिसळली जाते.

   1) क्षार      2) विम्ल      3) अम्ल      4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


5) जमिनीमध्ये असणारे पर्याप्त सेंद्रीय पदार्थ किंवा ह्युमस हे जमिनीची ......................... वाढवितात.

   अ) जमिनीची पाणी धारण करण्याची क्षमता

   ब) अंतर्गलन (जमिनीत पाणी प्रवेश करण्याचा वेग/ दर)

   क) सच्छिद्रता

   1) अ आणि ब फक्त    2) ब आणि क फक्त

   3) अ आणि क फक्त    4) अ, ब आणि क

उत्तर :- 4


1) वालुकामय मातीमध्ये असणारी एकूण रंध्र पोकळी (छिद्रांनी व्यापलेली जागा) ही .........................

   1) चिकणमातीपेक्षा जास्त असते      2) चिकणमातीपेक्षा कमी असते

   3) चिकणमाती इतकीच असते      4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


2) व्हर्टीसोलला .......................... असे म्हणतात.

   1) ॲल्यूव्हीएम      2) चेस्टनट    3) रेगूर      4) लॅटोसॉल्स

उत्तर :- 3


3) युनायटेड स्टेटस्‍ डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर यांच्याप्रमाणे मातीमधील मध्यम वाळू कणांचा व्यास ...................... मी.मी. होय.

   1) 0.5 ते 0.25      2) 0.05 ते 0.002    3) 2.00 ते 1.00    4) 1.00 ते 0.50

उत्तर :- 1

4) खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?

   अ) सतलज गंगा खो-यांमध्ये सुपीक गाळाची मृदा आढळते.

   ब) दख्खनच्या पठारावर खोल, मध्यम व उथळ थराची सुपीक काळी मृदा आढळते.

   क) पश्चिम किनारपट्टीला आर्द्र हवामानात जांभी मृदा आढळते.

   ड) व्दीपकल्पीय पठारावर लोहाचा अंश असणारी लाल, तांबूस व पिवळसर मृदा आढळते.

   1) अ आणि ब विधाने बरोबर आहेत.    2) क विधान बरोबर आहे.

   3) अ आणि क विधाने बरोबर आहेत.    4) वरील सर्व विधाने बरोबर आहेत.

उत्तर :- 4


5) खाली नमूद केल्यापैकी कोणती मृदा धुपेची कारणे संपूर्णत: मानव निर्मिती आहेत ?

   अ) भूप्रदेशाचा सर्वसाधारण उतार      ब) मृदेचे स्वरूप

   क) जंगलतोड          ड) गवताळ कुरणांचा वाजवी पेक्षा जास्त वापर

   इ) भटकी शेती

   1) वरील सर्व    2) ब, क आणि ड    3) अ, क आणि ड    4) क, ड आणि इ

उत्तर :- 4


1) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस

   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा ड्रायव्हिंग – तारकर्ली

उत्तर :- 3


2) महाराष्ट्र सरकारने 2006 साली पर्यटन धोरण विकसित केले. खालीलपैकी कोणते विधान या पर्यटन धोरणाचा भाग नाही ?

   अ) करमणूक करामधून सुट        ब) किनारी नियंत्रण कायद्यातून सूट

   क) पाणी आणि विजेचे दर औद्योगिक गटानुसार    ड) मालमत्ता करातून आणि अकृषि करातून सूट

   इ) अविकसित प्रदेशातून सूट

    योग्य पर्याय निवडा:

   1) अ, क आणि इ    2) ब आणि क    3) ब आणि ड    4) फक्त ब

उत्तर :- 4


3) राजीव गांधी खेळ अभियानाबाबत पुढील विधानांपैकी कोणते योग्य नाही ?

   अ) ती एक केंद्रीय पुरस्कृत योजना आहे.    ब) ती 2014 मध्ये सुरू करण्यात आली.

   क) तिने पंचायत युवा क्रिडा आणि खेळ अभियानाची जागा घेतली.

   ड) ‘युवकात खेळ आयुष्याचा एक मार्ग’ यास प्रोत्साहन देण्यास, खेळांच्या सुविधा सहज उपलब्ध करून देणे व खेळांच्या स्पर्धा 

         भरविणे या बाबी सम्मीलित आहेत.

   इ) सर्वकष क्रीडा केंद्रे या योजनेत बांधली जातील.  फ) स्त्रीयांना स्वत:चे संरक्षण प्रशिक्षण यात सम्मीलित आहे.

   ग) विशेष वर्गासाठी खेळही आयोजित केले जातात असे की उत्तर – पूर्व क्षेत्र खेळ.

   1) इ      2) फ      3) ग      4) वरील तिन्हीपैकी एकही नाही

उत्तर :- 4


4) पुढील दोनपैकी कोणते विधान योग्य आहे ?

   अ) नेलोरी, बेलरी, गुरेजी, केशरी या भारतातील मेंढीच्या जाती आहेत.

   ब) भारतीय लोकर ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या तुलनेत कमी प्रतीची समजली जाते व तिला जाडीभरडी कार्पेट लोकर 

         म्हणतात.

   1) केवळ अ      2) केवळ ब      3) दोन्ही      4) एकही नाही

उत्तर :- 2


5) मलेरिया हा भारत तसेच महाराष्ट्रामध्ये प्रसार पावलेला रोग आहे. मलेरिया बाबत कोणते विधान असत्य आहे ?

   अ) मुंबई ही मलेरियाची राज्यातील राजधानी आहे.

   ब) गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील दुस-या क्रमांकाचा मलेरिया ग्रस्त जिल्हा आहे.

   क) महाराष्ट्र हे देशात आठव्या क्रमांकाचे मलेरियाग्रस्त राज्य आहे.

   ड) ओरिसा हे भारतातील सर्वाधिक मलेरियाग्रस्त राज्य आहे.

   1) फक्त अ      2) अ, ब आणि ड      3) अ, ब आणि क    4) फक्त क

उत्तर :- 4


1) महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा – वेरूळ लेणी आहेत ?

   1) पुणे      2) अहमदनगर    

   3) औरंगाबाद    4) लातूर

उत्तर :- 3


2) महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे.

   1) 6      2) 4      

   3) 7      4) 9

उत्तर :- 1


3) पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये ......................... चे स्थान आहे.

   1) महाड    2) वाई      

   3) महाबळेश्वर    4) नाशिक

उत्तर :- 2


4) खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते ?

   1) लोणावळा    2) चिखलदरा    

   3) महाबळेश्वर    4) माथेरान

उत्तर :- 2


5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?

   1) सांगली    2) सातारा    

   3) रायगड    4) रत्नागिरी

उत्तर :- 3


1) जोडया जुळवा.

   अ) सिंधुदुर्ग    1) पेट्रोलियन/ खनिज तेल

   ब) मुंबई    2) औषधी खनिजयुक्त पाणी

   क) गडचिरोली    3) मँगनीज

   ड) ठाणे    4) चुनखडी

   1) अ-4, ब-2, क-1, ड-3      2) अ-3, ब-1, क-4, ड-2

   3) अ-3, ब-2, क-4, ड-1      4) अ-2, ब-1, क-3, ड-4

उत्तर :- 2


2) लोह व ॲल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?

   1) काळी मृदा    2) गाळाची मृदा    3) जांभी मृदा    4) पिवळसर मृदा

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणती जोडी कृषी विद्यापीठ व गाव यांच्या करिता बरोबर आहे ?

   1) मराठवाडा कृषी विद्यापीठ – राहुरी

   2) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ – अकोला

   3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी विद्यापीठ – परभणी

   4) महात्मा फुले कृषी विद्यापीठ – दापोली

उत्तर :- 2


4) मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर .......................... हे आहे.

   1) कांडला    2) मार्मागोवा    3) हल्दीया    4) न्हावा-शेवा

उत्तर :- 4


5) पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित शहर 

     कोणते ?      

   1) मुंबई    2) ठाणे      3) चंद्रपूर      4) नागपूर

उत्तर :- 3


1) महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने ........................... जिल्ह्यात आढळतात.

   1) सोलापूर    2) अहमदनगर    

   3) जालना    4) अमरावती

उत्तर :- 2


2) माथेरान हे ........................ वस्तीचे उदाहरण आहे.

   1) रेषीय    2) जुळी      

   3) गोलाकार    4) डोंगरमाथा

उत्तर :- 4


3) एखाद्या देशातील व्यक्ती अथवा व्यक्तीसमूह जेव्हा त्याच देशात एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी स्थलांतर करते तेव्हा त्यास 

     .................... स्थलांतर म्हणतात.

   1) सक्तीचे    2) अंतर्गत    

   3) आंतरराष्ट्रीय    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2


4) नरनाला किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

   1) अकोला    2) बुलढाणा    

   3) वाशिम    4) हिंगोली

उत्तर :- 1


5) क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगातील ........................... क्रमाकांवर देश आहे.

   1) तीन    2) पाच      

   3) सात    4) नऊ

उत्तर :- 3


1) खालीलपैकी कोणते विधान विंध्य प्रणालीला लागू पडत नाही  ?

   1) विंध्य प्रणाली अग्निजन्य खडकांनी बनलेली आहे.

   2) तीची खोली 4000 मीटरपेक्षा जास्त आहे.

   3) या प्रणालीने गंगेचे मैदान व दख्खनचे पठार वेगळे होतात.

   4) ही प्रणाली तांबडया वाळुकाश्मासाठी प्रसिद्ध आहे.

उत्तर :- 1


2) श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल ?

   1) समभूज त्रिकोण    2) काटकोन त्रिकोण    

  3) सरळ रेषा      4) वरीलपैकी कोणतीही  नाही

उत्तर :- 2


3) खालील विधाने भारतातील हिवाळयातील स्थिती वर्णन करतात.

   अ) उत्तर भारतात कमी तापमान असते.    ब) उत्तर भारतात उच्च दाब असलेला विभाग असतो.

   क) हवेचा दाब उत्तरेकडे कमी होत जातो.    ड) वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ, ब, क    2) अ, क, ड    3) अ, ब, ड    4) फक्त क

उत्तर :- 3


4) ......................... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

   1) जोग    2) नायगारा    3) कपिलधारा    4) शिवसमुद्र

उत्तर :- 1


5) गुजरात राज्यातील गिर अभयारण्य हे .......................... साठी राखून ठेवण्यात आलेले आहे.

   1) वाघ      2) हत्ती      3) सिंह      4) गेंडा

उत्तर :- 3 


1) जम्मू व काश्मिर या राज्यामधील सलाल जलविद्युत प्रकल्प ....................... या नदीवर आहे.

   1) रावी    2) बियास    3) चिनाब    4) व्यास

उत्तर :- 3


2) जमशेदपूर हे औद्योगिक शहर .......................... या नदीवर वसले आहे.

   1) महानदी    2) सोन      3) सुवर्णरेखा    4) गंगा

उत्तर :- 3


3) .................... हा भारतातील पहिला लोहमार्ग आहे.

   1) दिल्ली ते आग्रा    2) मुंबई ते ठाणे

   3) हावडा ते खडकपूर    4) चेन्नई ते रेनीगुंठा

उत्तर :- 2


4) भारतात चहा उत्पादनात ...................... राज्याचा प्रथम क्रमांक आहे.

   1) आसाम    2) बिहार      3) महाराष्ट्र    4) ओरिसा

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत  ?

   1) ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे.

   2) अशा विहीरी नैसर्गिक तेल पुरवतात.

   3) या विहीरी नैसर्गिक वायू पुरवतात.

   4) वरील कोणतेही नाही.

उत्तर :- 4


1) 2001 च्या जणगणनेनुसार महाराष्ट्रातले साक्षरता प्रमाण .....................% आहे.

   1) 76.88%    2) 88.76%    3) 71.42%    4) 42.71%

उत्तर :- 1


2) प्रकाशामध्ये (दृश्य)........................ असतात.

   1) लघु लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी

   2) दीर्घ लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी

   3) लघु लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी

   4) दीर्घ लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी

उत्तर :- 1


3) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?

   1) सिआल    2) सायमा    3) निफे      4) शिलावरण

उत्तर :- 3


4) खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे ?

   1) बॅक्टेरिया      2) निमॅटोडस्‍    

   3) ॲक्टीनोमायसेटस्‍    4) फंगी

उत्तर :- 2


5) पृथ्वी व सूर्य यांच्यातील सरासरी अंतरावरील सूर्याचे पृथ्वीवरील प्रचरण सुमारे .................. असते.

   1) 470 W/m²      2) 770 W/m²      

   3) 1170 W/m²      4) 1370 W/m²

उत्तर :- 4


1) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन आणि पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?

   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान    2) जमीन आणि माती संवर्धन

   3) पिकांचे नियोजन        4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे

उत्तर :- 1


2) खालीलपैकी कोणत्या राज्यात एरंडरीचे उत्पादन अधिक होते ?

   1) गुजरात आणि आंध्रप्रदेश    2) महाराष्ट्र आणि कर्नाटक

   3) तामिळनाडू आणि ओरीसा    4) राजस्थान आणि बिहार

उत्तर :- 1


3) खाली काही निसर्ग पर्यटन प्रकार आणि त्यांची स्थाने यांच्या जोडया दिल्या आहेत त्यातील अयोग्य जोडी ओळखा.

   1) नदी परिक्रमा – कोलाड    2) आदिवासी निवास – कडूस

   3) भू – भौतिक पर्यटन – सावंतवाडी  4) स्क्युबा डायव्हिंग – तारकर्ली

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

   1) सह्याद्री    2) सातपुडा    

   3) मेळघाट    4) सातमाळा

उत्तर :- 2


5) 1 जुलै 1998 रोजी ..................... या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.

   1) उस्मानाबाद    2) धुळे      

   3) परभणी    4) भंडारा

उत्तर :- 2


1) कोकणचे हवामान ..................... आहे.

   1) कोरडे    2) विषम      

   3) सम      4) थंड

उत्तर :- 3


2) .................. ही वर्धा नदीची उपनदी आहे.

   1) पेनगंगा    2) भीमा      

   3) येरळा    4) पंचगंगा

उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात ................ या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे.

   1) सिंधुदुर्ग    2) गडचिरोली    

   3) औरंगाबाद    4) सोलापूर

उत्तर :- 2


4) पश्चिम महाराष्ट्रातील .................. जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात.

   1) नाशिक    2) पुणे      

   3) कोल्हापूर    4) सोलापूर

उत्तर :- 3


5) महाराष्ट्राच्या पठारावर .................. मृदा आढळते.

   1) क्षारयुक्त    2) वाळुकामय    

   3) काळी    4) जांभी

उत्तर :- 3


भारतातील सर्वात जास्त लांबीचे राष्ट्रीय महामार्ग 

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



1. राष्ट्रीय महामार्ग (NH) 44

- पर्वीचे नाव NH 07
- लांबी 3745 km
- राज्ये: जम्मू आणि काश्मीर (श्रीनगर), पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू (कन्याकुमारी)

2. राष्ट्रीय महामार्ग (NH) 27

- लांबी 3507 km
- राज्ये: गुजरात (पोरबंदर), राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम (सिल्लचर)

3. राष्ट्रीय महामार्ग (NH) 48

- पर्वीचे नाव NH 04 आणि NH 08
- लांबी 2807 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू (चेन्नई)

4. राष्ट्रीय महामार्ग (NH) 52

- लांबी 2317 km
- राज्ये: पंजाब (सनग्रुर), हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक (अनकोला)

5. राष्ट्रीय महामार्ग (NH) 30

- पूर्वीचे नाव NH 221
- लांबी 2040 km
- राज्ये: उत्तराखंड (सितारगंज), उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, तेलंगाणा (इब्राहिमपट्टनम)

6. राष्ट्रीय महामार्ग (NH) 06

- लांबी 1873 km
- राज्ये: मेघालय (जोराबत), आसाम, मिझोराम (सिलिंग)

7. राष्ट्रीय महामार्ग (NH) 53

- लांबी 1781 km
- राज्ये: गुजरात (हझिरा) महाराष्ट्र, छत्तीसगढ, ओडिसा (पॅराद्विप बंदर)

8. राष्ट्रीय महामार्ग (NH) 16

- पूर्वीचे नाव NH 05
- लांबी 1711 km
- राज्ये: पश्चिम बंगाल (कोलकाता), ओडिसा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू (चेन्नई)

9. राष्ट्रीय महामार्ग (NH) 66

- पूर्वीचे नाव NH 17
- लांबी 1622 km
- राज्ये: महाराष्ट्र (पनवेल), गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू (कन्याकुमारी)

10. राष्ट्रीय महामार्ग (NH) 19

- पूर्वीचे नाव NH 02
- लांबी 1435 km
- राज्ये: दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल (कोलकाता)
 

महाराष्ट्रातील खडक प्रणाली

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


अ. आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.

ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.


ब. धारवाड खडक :

या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.

पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.

पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.


क. कडप्पा श्रेणींचा खडक :

महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.

कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.


ड. विंध्ययन खडक :

विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.

हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.


इ.गोंडवना खडक :

अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.

खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.

कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.

त्याला ‘गोंडवना खडक‘ असे म्हणतात.

चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

महाराष्ट्रातील वनक्षेत्र माहिती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


​​ सर्वाधिक वनक्षेत्र असलेले जिल्हे

▪️ गडचिरोली
▪️रत्नागिरी
▪️चंद्रपूर
▪️अमरावती
▪️ठाणे सर्वात

 कमी वनक्षेत्र असलेले जिल्हे 

▪️मुंबई
▪️लातूर
▪️जालना
▪️परभणी
▪️उस्मानाबाद

 सर्वाधिक वनांचे प्रमाण असलेले जिल्हे

▪️गडचिरोली      - 68.81%
▪️सिंधुदुर्ग          -54.31%
▪️रत्नागिरी        -51.33%
▪️रायगड           -41.10%
▪️गोंदिया -         - 37.04%

 सर्वात कमी वनांचे प्रमाण असलेले जिल्हे

▪️लातूर            - 0.18%
▪️सोलापूर        - 0.33%
▪️जालना         - 0.47%
▪️परभणी        - 0.65%
▪️उस्मानाबाद   - 0.66%

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्रे

- तेलबिया संशोधन केंद्र जळगाव
- गवत संशोधन केंद्र पालघर
- गहु संशोधन केंद्र महाबळेश्वर (सातारा)
- ऊस संशोधन केंद्र पाडेगाव (सातारा)
- काजू संशोधन केंद्र वेंगुला (सिंधुदुर्ग )
- केळी संशोधन केंद्र यावल (जळगाव)
- नारळ संशोधन केंद्र भाट्ये (रत्नागिरी)
- हळद संशोधन केंद्र डिग्रज (सांगली)
- सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन (रायगड)
- राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र केगाव (सोलापूर)
- राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र राजगुरूनगर (पुणे)
- मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

14 November 2025

सिंधू नदी प्रणाली : प्रमुख नद्या व प्रकल्प

अधिक माहितीसाठी नक्की पहा :  www.yashacharajmarg.com


1) झेलम नदी

➤ उगम — काश्मीर, पीरपंजाल रांगा, शेषनाग तलावाजवळ

➤ प्राचीन नाव — वितस्ता

➤ काश्मीरमध्ये झेलम नदी वुलर सरोवरातून वाहते

➤ पाकिस्तानमध्ये जाऊन चिनाब नदीला मिळते


▪️किशनगंगा जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ झेलमची उपनदी किशनगंगा नदीवर (J&K)

➤ क्षमता — 330 MW

➤ प्रकल्पावर पाकिस्तानचा आक्षेप


2) चिनाब नदी

➤ उगम — बारा लाचा ला, चंद्र + भागा जलप्रवाह

➤ लांबी — 1180 किमी

➤ पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर झेलम व रावी नदी मिळतात

➤ पुढे पंचनद येथे सिंधूला मिळते

➤ प्राचीन नाव — असिकनी


▪️बागलिहार जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ चिनाब नदीवर — जम्मू व काश्मीर

➤ क्षमता — 900 MW


3) रावी नदी

➤ उगम — हिमाचल प्रदेश, कुलू जिल्हा, रोहतांग खिंडीजवळ

➤ लांबी — 725 किमी

➤ प्राचीन नाव — पारुष्णी

➤ पाकिस्तानातील रापूर येथे चिनाब नदीला मिळते


4) बियास नदी

➤ उगम — रोहतांग खिंडीच्या दक्षिणेला बियास कुंड

➤ लांबी — 460 किमी

➤ प्राचीन नाव — विपाशा

➤ पंजाबमधील हरिके येथे सतलज नदीला मिळते


5) सतलज नदी

➤ उगम — राकस सरोवर, तिबेट (चीन)

➤ लांबी — एकूण 1450 किमी • भारतातील 1050 किमी

➤ प्राचीन नाव — सतद्रू / सुतुद्री / शतुद्री

➤ तिबेटमध्ये लंगकेन झांगो नावाने ओळख

➤ ताशी गंगमार्गे हिमाचल → पंजाब प्रवेश

➤ पाकिस्तानातील मिथानकोट येथे सिंधू नदीला मिळते


▪️भाक्रा-नांगल बहुउद्देशीय प्रकल्प ⚡️

➤ सतलज नदीवर — पंजाब

➤ जलाशयाचे नाव — गोविंदसागर

31 October 2025

भूगर्भीय हालचाली व वलीकरण (Geological Movements and Folding)



१) पर्वत निर्माणकारी हालचाली (Orogenic Movements)

✅️ भूपृष्ठावर कार्य करणाऱ्या पर्वत निर्माणकारी हालचाली दोन प्रमुख प्रकारच्या असतात :

➤ संकोचीय हालचाल (Compressional movement) – या हालचालींमध्ये भूपृष्ठावर दाब निर्माण होतो, त्यामुळे खडकांचे थर एकमेकांकडे सरकतात व दुमडले जातात.

➤ तणावक हालचाल (Tensional movement) – या हालचालींमध्ये भूपृष्ठावर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांचे थर एकमेकांपासून दूर जातात व भेगा पडतात.


२) संकोचीय हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या प्रमुख संरचना:

✅️ ➤ सवलन (Warping) – पृथ्वीच्या पृष्ठभागावर मृदू व संथ दाबामुळे वर-खाली वाकणे होते.

✅️ ➤ वलीकरण (Folding) – संकोचामुळे खडकांच्या थरांना वळ्या पडतात व पर्वतरचना निर्माण होते.


३) वलीकरण (Folding):

✅️ भूपृष्ठावरील संकोचीय हालचालींमुळे मृदू आणि अवसादी खडकांच्या थरांना वळ्या पडतात, त्याला वलीकरण असे म्हणतात.

✅️ या प्रक्रियेत खडकांच्या थरांना दाब पडल्याने ते तुटत नाहीत तर वाकतात.

✅️ वलीकरणामुळे अंतर्वल (Anticline) व बहिर्वल (Syncline) अशा संरचना तयार होतात.


४) वळ्यांचे प्रकार (Types of Folds):

1️⃣ साधारण / सम्मित वळण (Symmetrical Fold):

➤ दोन्ही भुजा समान उताराच्या असतात.

➤ वळणाच्या मध्यावर अक्ष रेषा उभी राहते.


2️⃣ असाधारण / असममित वळण (Asymmetrical Fold):

➤ वळ्याच्या दोन्ही भुजांचे उतार असमान असतात.

➤ एका बाजूचा उतार दुसऱ्यापेक्षा जास्त तीव्र असतो.


3️⃣ एकनत वळण (Monoclinal Fold):

➤ एक भुजा मंद उताराची तर दुसरी जवळपास लंबवत असते.

➤ साधारणतः एका दिशेने वाकलेला थर दिसतो.


4️⃣ सम्मयत वळण (Isoclinal Fold):

➤ दोन्ही भुजा एकाच दिशेने झुकलेल्या असतात व जवळपास समांतर होतात.

➤ खूप दाबाखाली हे वळण तयार होते.


5️⃣ परिवलित वळण (Recumbent Fold):

➤ वळ्याच्या भुजा इतक्या वाकतात की एक भुजा दुसऱ्यावर उलटते.

➤ वळ्याचे शीर्ष जवळपास समांतर दिसते.


6️⃣ पंख आकार वळण (Fan-shaped Fold):

➤ वळ्याच्या दोन्ही भुजांची उंची वाढत जाऊन वळण पंखासारखे दिसते.

➤ मध्यभाग खाली व बाजू उंच असतात.


7️⃣ विखंडीत वळण (Nappes Fold):

➤ खूप ताण पडल्याने वळणाची एक भुजा तुटते व दुसऱ्या भुजेवर सरकते.

➤ ही तुटलेली भुजा कधी दुसऱ्या खंडावर जाऊन स्थिरावते.

➤ अशा वळ्यांमुळे भूगर्भीय विस्थापन (displacement) मोठ्या प्रमाणात होते.


५) वलीकरणाचे भूगर्भीय महत्त्व:

✅️ ➤ पर्वतरचना निर्माण करण्यास कारणीभूत (उदा. हिमालय).

✅️ ➤ खनिजांचे, धातूंचे व जलस्रोतांचे स्थान निश्चित करण्यात मदत होते.

✅️ ➤ पृथ्वीच्या अंतर्गत बलांची दिशा व तीव्रता यांचे संकेत मिळतात.

✅️ ➤ भू-रचना विज्ञानात वलीकरण अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.

नदी प्रवाहाचे प्रकार (Types of River Drainage / Flow)

१) अनुवर्ती प्रवाह (Consequent Stream)

➤ हा प्रवाह प्रदेशाच्या नैसर्गिक उतारानुसार वाहतो.

➤ पर्वतरांग, पठार किंवा भूभागाच्या उताराची दिशा ज्या दिशेने असेल, त्या दिशेनेच हा प्रवाह वाहतो.

➤ या प्रवाहाला ‘आनुषंगिक प्रवाह’ असेही म्हणतात.

➤ उदा. गंगा, गोदावरी, नर्मदा यांच्या काही उपनद्या.


२) परावर्ती प्रवाह (Subsequent Stream)

➤ हा प्रवाह मुख्य प्रवाहानंतर तयार होतो.

➤ तो मुख्य प्रवाहाला समांतर वाहतो आणि दऱ्यांमधून प्रवाहित होतो.

➤ भूपृष्ठाच्या मृदू थरांमध्ये क्षरण झाल्यामुळे अशा प्रवाहांची निर्मिती होते.

➤ उदा. यमुना (गंगेची उपनदी).


३) प्रत्यनुवर्ती प्रवाह (Obsequent Stream)

➤ हा प्रवाह मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहतो.

➤ परंतु शेवटी तो मुख्य प्रवाहात मिळतो.

➤ भूगर्भीय उन्नतीनंतर किंवा उतार बदलल्याने असे प्रवाह निर्माण होतात.

➤ उदा. काही हिमालयीन उपनद्या ज्या उलट दिशेने वाहतात.


४) गुंफित प्रवाह (Braided Stream)

➤ प्रवाहात मोठ्या प्रमाणात गाळ, वाळू व गोटे असल्यास नदीचा प्रवाह विभागला जातो.

➤ अनेक लहान प्रवाह एकमेकांत गुंफल्यासारखे वाहतात.

➤ प्रवाहात बेटांसारखे गाळाचे भाग तयार होतात.

➤ उदा. ब्रह्मपुत्रा नदीचा काही भाग.


५) अननुवर्ती प्रवाह (Insequent Stream)

➤ या प्रवाहाचा दिशा, वाहण्याचा क्रम प्रदेशाच्या उताराशी किंवा भूपृष्ठाच्या रचनेशी जुळत नाही.

➤ भूभागातील स्थानिक क्षरण किंवा खडकांच्या वेगवेगळ्या प्रतिकारक्षमतेमुळे हा प्रवाह तयार होतो.

➤ हे प्रवाह अव्यवस्थित स्वरूपाचे असतात.

सिंधू नदी प्रणाली : प्रमुख नद्या व प्रकल्प



1) झेलम नदी

➤ उगम — काश्मीर, पीरपंजाल रांगा, शेषनाग तलावाजवळ

➤ प्राचीन नाव — वितस्ता

➤ काश्मीरमध्ये झेलम नदी वुलर सरोवरातून वाहते

➤ पाकिस्तानमध्ये जाऊन चिनाब नदीला मिळते


▪️किशनगंगा जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ झेलमची उपनदी किशनगंगा नदीवर (J&K)

➤ क्षमता — 330 MW

➤ प्रकल्पावर पाकिस्तानचा आक्षेप


2) चिनाब नदी

➤ उगम — बारा लाचा ला, चंद्र + भागा जलप्रवाह

➤ लांबी — 1180 किमी

➤ पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर झेलम व रावी नदी मिळतात

➤ पुढे पंचनद येथे सिंधूला मिळते

➤ प्राचीन नाव — असिकनी


▪️बागलिहार जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ चिनाब नदीवर — जम्मू व काश्मीर

➤ क्षमता — 900 MW


3) रावी नदी

➤ उगम — हिमाचल प्रदेश, कुलू जिल्हा, रोहतांग खिंडीजवळ

➤ लांबी — 725 किमी

➤ प्राचीन नाव — पारुष्णी

➤ पाकिस्तानातील रापूर येथे चिनाब नदीला मिळते


4) बियास नदी

➤ उगम — रोहतांग खिंडीच्या दक्षिणेला बियास कुंड

➤ लांबी — 460 किमी

➤ प्राचीन नाव — विपाशा

➤ पंजाबमधील हरिके येथे सतलज नदीला मिळते


5) सतलज नदी

➤ उगम — राकस सरोवर, तिबेट (चीन)

➤ लांबी — एकूण 1450 किमी • भारतातील 1050 किमी

➤ प्राचीन नाव — सतद्रू / सुतुद्री / शतुद्री

➤ तिबेटमध्ये लंगकेन झांगो नावाने ओळख

➤ ताशी गंगमार्गे हिमाचल → पंजाब प्रवेश

➤ पाकिस्तानातील मिथानकोट येथे सिंधू नदीला मिळते


▪️भाक्रा-नांगल बहुउद्देशीय प्रकल्प ⚡️

➤ सतलज नदीवर — पंजाब

➤ जलाशयाचे नाव — गोविंदसागर

भू-आकार (भूरूपे) निर्मिती प्रक्रिया



1) नदीद्वारे निर्माण होणारे भू-आकार

➤ नदीच्या क्षरण कार्यात पाणी चार प्रकारे कार्य करते –

➤ द्रविक क्रिया

➤ अपघर्षण

➤ संधर्षण क्रिया

➤ भक्षणक्रिया


▪️ क्षरण व निक्षेपणामुळे निर्माण होणारे भू-आकार –

➤ धावत्या तयार होणारे प्रवाहवैशिष्ट्य

➤ जलप्रपात / धबधबा

➤ अव्खात दरी

➤ घळई

➤ निदरी

➤ जलविभाजक

➤ नागमोड

➤ नालाकृती सरोवरे

➤ पूरमैदाने

➤ नदी तटमंच

➤ पूरतट

➤ त्रिभुज प्रदेश / डेल्टा


▪️ नदी खोर्‍यांचे प्रकार –

➤ विहंगपद प्रकार

➤ क्षीणोकार प्रकार

➤ धनुष्याकार प्रकार

➤ मैदानप्राय प्रकार


2) हिमनद्या (Glaciers) ❄️


▪️हिमनदीचे खणण कार्य (Erosional Landforms)

➤ हिमेरेषा

➤ हिमगव्हर

➤ श्रृंगे (Aretes)

➤ ‘U’ आकाराची दरी

➤ हिमानी सरोवरे

➤ हिमविदर

➤ लांबट्या/टांगत्या दऱ्या

➤ फियॉर्ड


▪️हिमनदीचे संचयन कार्य (Depositional Landforms)

➤ हिमोढ

➤ हिमानी गाळ

➤ हिमजलौढ निक्षेप

➤ तळ हिमोढ

➤ पार्श्व हिमोढ

➤ मध्य हिमोढ

➤ अंत्य हिमोढ

➤ हिमोढगिरी

➤ एस्कर

➤ कॅम्पस

➤ हिमाजलाढे मैदाने (Outwash plains)


3) वार्‍यामुळे निर्माण होणारे भू-आकार 🌬️


▪️वाऱ्याचे खणण कार्य (Erosional Work)

➤ अपवहन

➤ अपघर्षण

➤ संधर्षण


▪️ क्षरणामुळे तयार होणारे भूविशेष –

➤ भूछत्र खडक

➤ इन्सेलबर्ग

➤ यारदांग

➤ भूस्तंभ

➤ द्वीपगिरि


▪️वाऱ्याचे निक्षेपण कार्य

➤ वालुकागिरी (Dunes)

➤ लोएस क्षेत्र


4) कार्स्ट प्रदेशातील भूरूपे (Karst Landforms)

➤ चुनखडी प्रदेशातील क्षरण व विदलनामुळे निर्माण

▪️सामान्यतः येणारी कार्स्ट भूरूपे —

➤ चुनखडी गुहा

➤ स्टॅलेक्टाइट

➤ स्टॅलेग्माइट

➤ कार्स्ट दरी

➤ सिंकहोल

➤ उवाला

➤ ड्राय व्हॅली


5) सागरी लाटा / किनारी प्रक्रियेमुळे निर्माण होणारे भू-आकार 🌊

➤ सागरकिनारा — किनाररेषा — सागरतट


▪️सागरतटाचे प्रकार

➤ अग्रतट

➤ पश्चतट


▪️क्षरणामुळे तयार होणारे भूरूपकार

➤ विरखंडित सागररेषा

➤ कडा / चबुतरे (Cliffs)

➤ सागरकाठाची गुहा (Sea Caves)

➤ नैसर्गिक चिमणी (Blow Hole)

➤ प्रवेशद्वार (Archway)

➤ नैसर्गिक कमानी (Sea Arch)

➤ सागरी स्तंभ (Stacks)


▪️निक्षेपणामुळे तयार होणारे भू-आकार

➤ अपतट दांडा / वाळूचा दांडा (Spit)

➤ लगून

➤ पुळण (Beach)

➤ स्पीट

➤ हुक

➤ लूप

➤ टोमबोलो

29 October 2025

ज्वालामुखींचे प्रकार (Types of Volcano Eruptions)


1️⃣ हवाईयन (Hawaiian) प्रकार

➤ शांतपणे उफाळणारा ज्वालामुखी — उध्वंसक नसतो.

➤ भेगीय (Fissure) स्वरूपाचा उद्रेक, लाव्हा कमी उंचीचा शंकू तयार करतो.

➤ लाव्हा आम्लारी (Acidic) स्वरूपाचा असतो.

➤ प्रवाही लाव्हामुळे विस्तीर्ण लाव्हा पठारे तयार होतात.

➤ उदाहरण : मौना लोआ (Mauna Loa), मौना केआ (Mauna Kea) — हवाई बेटे.


2️⃣ स्ट्रॉम्बोलीयन (Strombolian) प्रकार

➤ सतत लहान-लहान उद्रेक होत राहतात, त्यामुळे विध्वंस क्षमता कमी असते.

➤ लाव्हा शंकू मध्यम उंचीचा असतो.

➤ लाव्हा आम्लीय (Acidic) स्वरूपाचा असतो.

➤ उद्रेक वेगाने पण सातत्याने होतात — मध्यम तीव्रतेचे स्फोट.

➤ उदाहरण : स्ट्रॉम्बोली ज्वालामुखी (इटली).


3️⃣ वल्कॅनियन (Vulcanian) प्रकार

➤ काही काळ शांततेनंतर अचानक होणारा तीव्र उद्रेक.

➤ त्यामुळे विध्वंसक शक्ती जास्त असते.

➤ उंच लाव्हा शंकू तयार होतो.

➤ गडगडाटी (Noisy) उद्रेक — दाबाखालील लाव्हा भूगर्भातून बाहेर पडतो.

➤ मोठ्या प्रमाणात राख, धूर आणि वायू उत्सर्जन.

➤ उदाहरण : व्हल्कानो बेट (इटली).


4️⃣ पेलियन (Pelean) प्रकार

➤ सर्वाधिक विध्वंसक ज्वालामुखी प्रकार.

➤ अत्यंत आम्लीय (Highly Acidic) लाव्हा असतो.

➤ उंच आणि तीव्र लाव्हा शंकू तयार होतो.

➤ मोठ्या प्रमाणात उष्णता व ऊर्जा उत्सर्जित होते.

➤ राखेचे ढग व गरम वायू प्रवाह (Pyroclastic flows) दूरवर जातात.

➤ उदाहरण : माँट पेली (Mount Pelée), मार्टिनिक (West Indies).

लाव्हामुळे तयार होणारी भूरूपे (Landforms Formed by Lava)


1️⃣ भूअंतर्गत लाव्हा भूरूपे (Intrusive Volcanic Landforms)

✅️ ➤ लाव्हा जमिनीच्या आत थंड झाल्यावर तयार होणारी भूरूपे.

✅️ ➤ यामध्ये खालील रचना आढळतात –

  🔸 बॅथोलिथ (Batholith)

   ➤ पृथ्वीच्या गर्भात मोठ्या खोलीवर थंड झालेला प्रचंड लाव्हाचा थर.

   ➤ हे खडक पर्वताच्या पाया भागात आढळतात.

  🔸 डाईक (Dyke)

   ➤ लाव्हा भेगेतून वर येऊन थंड होतो व उभे स्तंभ तयार करतो.

   ➤ हे उभ्या भेगांमध्ये घुसलेले घनरूप खडकाचे थर असतात.

  🔸 सिल (Sill)

   ➤ लाव्हा आडव्या थरांमध्ये प्रवेश करून थंड झाल्यास तयार होणारे सपाट खडकाचे थर.

  🔸 लॅकॅालिथ (Laccolith)

   ➤ लाव्हा वरच्या थरांना उचलून त्याखाली थंड होऊन तयार झालेली गुमटाकार रचना.

   ➤ यामुळे वरचा प्रदेश थोडा उंच दिसतो.

  🔸 स्टॉक (Stock)

   ➤ बॅथोलिथपेक्षा आकाराने लहान, पण खोलवर तयार होणारी घनरचना.


2️⃣ बाह्य लाव्हा भूरूपे (Extrusive Volcanic Landforms)

✅️ ➤ लाव्हा जमिनीवर बाहेर पडून थंड झाल्यावर तयार होणारी भूरूपे.

✅️ ➤ यामध्ये खालील प्रकार येतात –

  🔸 कॅल्डेरा (Caldera)

   ➤ ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर त्याच्या मुखाचा भाग कोसळल्याने तयार झालेला मोठा खोल खड्डा.

  🔸 लाव्हा शंकू (Lava Cone)

   ➤ लाव्हा व राखेच्या थरांच्या साचण्याने तयार झालेली शंकूच्या आकाराची रचना.

  🔸 बेसॉल्ट मैदान (Basalt Plain)

   ➤ सतत लाव्हा वाहून आल्याने व थंड झाल्याने तयार झालेली सपाट काळ्या दगडांची मैदानं.

  🔸 पठार (Plateau)

   ➤ लाव्हाच्या अनेक थरांच्या थंड होण्याने तयार झालेली उंच व सपाट भूप्रदेशाची रचना.

   ➤ उदाहरण: दख्खन पठार (Deccan Plateau) — भारतातील सर्वात प्रसिद्ध लाव्हा पठार.

रिओ परिषद


🌍 रिओ परिषद व पर्यावरणाशी संबंधित करार

🔹️जागतिक स्तरावर कायद्याच्या शासन विकासासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक आराखडा ठरला.

महिला सक्षमीकरण, स्थानिक शासन व बिगर सरकारी संघटनांना यावर भर देतो.

पर्यावरण बचाव, वनसंवर्धन

क) कायदे आणि करार

रिओ परिषदेने यांच्याशी संबंधित ३ कायदेशीर व बंधनकारक करार मांडण्यात आले :


1️⃣ जैविक विविधता अभिसंधी (Convention on Biological Diversity)

➤ सदस्य : १९६

➤ अंमलात : २९ डिसेंबर १९९३

➤ उद्दिष्टे :

▪ जैविक विविधता घटकांचा शाश्वत वापर करणे

▪ उत्कोनीय सोतांचा लाभ न्यायपूर्ण देणे


2️⃣ संयुक्त राष्ट्र पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट (UNFCCC – United Nations Framework Convention on Climate Change)

➤ सदस्य : १९७

➤ अंमलात : २१ मार्च १९९४

➤ उद्दिष्ट :

▪ वातावरणातील हरितगृह वायूंचे (GHG) प्रमाण पर्यावरणाला घातक ठरेल एवढ्या स्तरापेक्षा कमी ठेवणे


3️⃣ संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंध अभिसंधी (UNCCD – United Nations Convention to Combat Desertification)

➤ सदस्य : १९७

➤ अंमलात : २६ डिसेंबर १९९६

➤ उद्दिष्टे :

▪ वाळवंटीकरण रोखणे

▪ दुष्काळग्रस्तांसाठी लागवडीस प्रोत्साहन देणे

▪ दुर्भिक्षकाळासाठी लागवडीस सहाय्य करणे


🔹️स्पष्टीकरण

➤ १९७२ ची UNEP आणि ब्रुटलँड आयोगाच्या शिफारशीने प्रेरित होऊन १९९२ ला ब्राझीलमधील रिओ डी जानेरो या शहरात पहिली वसुंधरा परिषद भरली. तिलाच रिओ परिषद म्हणतात.

➤ या परिषदेचे शीर्षक होते :


🔹️संयुक्त राष्ट्राची पर्यावरण व विकास परिषद (UNCED – United Nations Conference on Environment & Development)

➤ या परिषदेने ३ आराखडे बनविले :

अ) रिओ घोषणापत्र

▪ विविध देशांच्या आणि समाजाच्या सहकार्याने नवीन आणि समान न्याय देणारी जागतिक भागीदारी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली.

ब) अजेंडा २१

▪ जून १९९२ ला हा करार संमत झाला.

▪ शाश्वत विकासासाठी आंतरव्यवस्थांना स्थानिक, राष्ट्रीय व प्रादेशिक सहकार्यात कृती आराखडा बनविणे.

27 October 2025

विषय - भुगोल

✒️विषुववृत्तामुळे पृथ्वीचे *उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध* असे दोन भाग पडतात..


✒️पथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला *अक्षवृत्त* म्हणतात..

एकूण 181 अक्षवृत्त आहेत..


✒️आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास *रेखावृत्त* म्हणतात..

ती एकूण 360 आहेत..


✒️शन्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय..


✒️पथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात..


✒️पथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यास परिभ्रमण म्हणतात..


✒️पथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते..


✒️नकाशाचे चार प्रकार आहेत..-


१. उद्देशात्मक नकाशा

२. आधारभूत नकाशा

३. क्षेञघनी नकाशा

४. समघनी नकाशा..


✒️नकाशात हिरवा रंग *वनक्षेत्रासाठी* वापरतात..


✒️भारताची प्रमाणवेळ ही 82.30 पूर्व रेखावृत्तावरून ठरते..

हे रेखावृत्त *मिर्झापूर (उ. प्र.)* वरून ठरते..


✒️तपांबर- पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात..

याचा विस्तार 13 किमी आहे.. वादळे, ढग, पाऊस इ.ची निर्मिती होते..


✒️ वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबरात आढळते..


✒️सदेशवहनासाठी *आयनांबर* या थराचा उपयोग होतो..


✒️ *इंदिरा पॉंईट* हे भारताचे सर्वात शेवटचे टोक आहे..


✒️कषेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात *7 वा क्रमांक* आहे..


✒️ मख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास *7517 किमी* लांबीचा सागर किनारा लाभला आहे..


-✒️ भारताच्या वायव्येस पाकिस्तान व आफगाणिस्तान, उत्तरेस- चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेस- म्यानमार व बांग्लादेश आहेत..


✒️कषेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे..

त्यानंतर मध्यप्रदेश व तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो..


✒️गोवा या राज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे..


✒️भारताच्या तिन्ही बाजूस पाणी असल्याने त्यास *द्वीपकल्प* म्हणतात..


✒️*कांचनगंगा* हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर तर, k2(गॉडवीन ऑस्टीन 8611 मी. ) हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे..


✒️दक्षिण भारतीय पठारास *दख्खनचे पठार* असे म्हणतात..


✒️अदमान समूहातील *बॅरन बेटावर* भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे..

वातावरणाचे थर


 वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.


 वातावरणाचे मुख्य थर 


📌 तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.


📌 तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.


📌 सथितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.


📌 सथितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.


📌 मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.


📌 मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.


📌 दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.


📌 आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.


📌 बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.

मान्सूनचे स्वरूप



अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

क) मान्सूनचा खंड

ड) मान्सूनचे निर्गमन


▪️अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल


या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇


▪️ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण


1) आर्द काल व शुष्क काल

- सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.

- अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .

- आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो  


2) पाऊसाचे  वितरण

- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .

- नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .

-  पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . 

- पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

 

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध

- बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .

- आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ; याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.

- पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.


क) मान्सूनचा खंड

- नैऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात.


🔹पाऊस न पडण्याची अनेक कारणे पुढीलप्रमाणे ....


- पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो . 

- उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.

- भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.

 - पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे पाऊस पडत नाही . 

- तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .


ड) मान्सूनचे निर्गमन

- वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते .

- मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

_____________________________________

भूकंप लहरी :



» ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी भूकवचात मोठय़ा प्रमाणात हालचाली होतात व मोठय़ा प्रमाणात कंप निर्माण होतात. यांनाच ‘भूकंप लहरी’ असे म्हणतात.


■ नाभी (Focus) : 

» भूकंप झाल्यावर भूकवचातील ज्या स्थानापासून उगम पावून सर्वदूर पसरतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा नाभी म्हणतात.


■ अधीकेंद्र (Epicentre) : 

» नाभीच्या अगदी वर क्षितिजाजवळच्या लंब रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो िबदू मिळतो, त्याला ‘अधीकेंद्र’ असे म्हणतात. भूकंपकेंद्रापासून निघणाऱ्या भूकंप लहरींचा सर्वात अधिक प्रभाव अधीकेंद्राच्या निकट दिसून येतो. अधिकेंद्रापासून जसजसे अंतर वाढत जाते, तसेतसे भूकंपाची तीव्रता कमी कमी होत जाते.


■ भूकंप अधिलेख (Seismogram) :-  

» भूकंप लहरींचा अभ्यास भूकंप अभिलेखांवरून करता येतो. भूकंप लहरींचे तीन प्रकार पडतात-  प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी.


भूकंप लहरींचे प्रकार :- 

■ प्राथमिक लहरी (P waves) : 

» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो. 

» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात. 

» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे असतात. 

» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.


■ दुय्यम लहरी (S waves) : 

» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून येते. 

» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत. 

» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.


■ भूपृष्ठ लहरी (L waves) : 

» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात. 

» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात. 

» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही. 

» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात. 

» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.

_____________________

■ रिश्टर स्केल (Richter Scale) : 

» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.


■ भूकंपाचे जागतिक वितरण 

■पॅसिफिक महासागराचा पट्टा : 

» जगातील ६५% भूकंप प्रदेश पॅसिफिक महासागराच्या सभोवतालच्या पट्टय़ात आढळतो. 

» याला प्रशांत महासागरातील पट्टा किंवा अग्निकंकण (Rings of Fire) असे म्हणतात. 

» यात इंडोनेशिया, फिलिपाइन्स, जपानची बेटे, कामचटका द्वीपकल्प व पूर्व सबेरियातील काही भाग येतो. 

» भूकंपाचा हा पट्टा उत्तर अमेरिकेत आल्प्सपासून रॉकीज पर्वत दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वताला अनुसरून पुढे अंटाक्र्टिका खंडापर्यंत गेलेला आहे. 

» या भागातच असलेल्या जपानच्या हांशू बेटांवर जगातील सर्वात जास्त विद्धंसक भूकंप होतात.


■ मध्य अटलांटिक पट्टा  : 

» या पट्टय़ात अटलांटिक महासागरातील मध्य अटलांटिक रिझ आणि रिझजवळील काही बेटांचा समावेश होतो. 

» येथे सर्वसाधारणपणे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालेली आहे.


■ भूमध्य सागरीय पट्टा : 

» या पट्टय़ाचा विस्तार अटलांटिक महासागरातील जलमग्न पर्वतरांगेपासून होऊन भूमध्य समुद्राभोवती पसरलेला आहे.