22 October 2025

राज्य पुनर्रचना संदर्भातील आयोग व समित्या



1️⃣ एस. के. धार आयोग (S.K. Dhar Commission)

🔸️ स्थापना: 1948

🔸️ अहवाल: 1948

🔸️ अध्यक्ष: एस. के. धार

🔸️ स्थापनेचे माध्यम: संविधान सभेचे अध्यक्ष

🔸️ शिफारस:

 ✔️ राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा

 ✔️ भाषा व संस्कृतीवर आधारित पुनर्रचना नाकारली

 ✔️ मात्र आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करता येईल असे मत व्यक्त


2️⃣ जे. व्ही. पी. समिती (J.V.P. Committee)

🔸️ स्थापना: 1948

🔸️ अहवाल: 1949

🔸️ सदस्य: जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या

🔸️ स्थापनेचे माध्यम: काँग्रेस पक्ष

🔸️ शिफारस:

 ✔️ भाषिक तत्त्वास विरोध केला

 ✔️ भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीबाबत अनुकूलता दाखवली नाही


3️⃣ राज्य पुनर्रचना आयोग (State Reorganization Commission / Fazal Ali Commission)

🔸️ स्थापना: 1953

🔸️ अहवाल: 1955

🔸️ अध्यक्ष व सदस्य:

 ✔️ फाजल अली (अध्यक्ष)

 ✔️ के. एम. पण्णीकर

 ✔️ हृदयनाथ कुंझरू


🔸️ स्थापनेचे माध्यम: केंद्र सरकार

🔸️ शिफारस:

 ✔️ भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेस समर्थन

 ✔️ ‘एक राज्य - एक भाषा’ या तत्त्वाचा अस्वीकार

 ✔️ राज्य निर्मिती करताना प्रशासकीय कार्यक्षमता व सामाजिक एकोपा यालाही महत्त्व देण्याचे सुचवले

आंतरराज्यीय परिषद (कलम 263) PYQ POINTS



♦️स्थापना व रचना

🔹️ कलम 263 नुसार, राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रपती आंतरराज्य परिषद नियुक्त करू शकतात.

🔹️ आंतर-राज्य परिषद 28 मे, 1990 रोजी स्थापन झाली.

🔹️ परिषदेची पुनर्रचना 11 नोव्हेंबर, 1999 रोजी करण्यात आली.


♦️अध्यक्ष व सदस्य

🔹️ पंतप्रधान हे आंतर-राज्य परिषदेचे अध्यक्ष असतात.

🔹️ सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे परिषदेचे सदस्य असतात.


♦️बैठका व कार्यपद्धती

🔹️ आंतर-राज्य परिषदेच्या बैठका पडद्याआड (गुप्तरित्या) घेतल्या जातात.

🔹️ परिषदेत विचारार्थ येणारे मुद्दे सहमतिने सोडवले जातात.


♦️कार्यक्षेत्र

🔹️ राज्या-राज्यांतील तंटे – उद्भवलेल्या तंट्यांबाबत चौकशी करणे व सल्ला देणे.

🔹️ समाईक हितसंबंधांचे विषय –

    • राज्यांपैकी सर्व, काही किंवा संघराज्य व एक/अधिक राज्ये यांच्या सामाईक हिताशी संबंधित विषयांवर अन्वेषण व चर्चा करणे.

🔹️ धोरण समन्वय व शिफारशी –

    • अशा कोणत्याही विषयावर शिफारशी करणे.

    • विशेषतः धोरणे व कारवाई यांचा अधिक चांगला समन्वय साधण्यासाठी शिफारशी करणे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वे

 💎 नवीन मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles of State Policy – DPSP) घटनादुरुस्त्यांद्वारे जोडलेली


🔹 1976 – 42 वी घटनादुरुस्ती

1.मुलांच्या निरोगी विकासाच्या संधी सुरक्षित करणे (अनुच्छेद 39)


2.समान न्यायाचा प्रचार करणे व गरिबांना मोफत कायदेशीर मदत देणे (अनुच्छेद 39A)


3.उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुरक्षित करणे (अनुच्छेद 43A)


4.पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, तसेच जंगले व वन्यजीवांचे रक्षण करणे (अनुच्छेद 48A)


🔹 1978 – 44 वी घटनादुरुस्ती

➤ राज्याने उत्पन्न, स्थिती, सुविधा व संधी यांतील असमानता कमी करणे आवश्यक (अनुच्छेद 38)


🔹 2002 – 86 वी घटनादुरुस्ती

➤ अनुच्छेद 45 मध्ये बदल: सहा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांचे संगोपन व शिक्षण राज्याने करणे.

➤ कलम 21A अंतर्गत प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार घोषित.


🔹 2011 – 97 वी घटनादुरुस्ती

➤ सहकारी संस्थांशी संबंधित नवीन तत्त्व (अनुच्छेद 43B) —

✅️ ➤ सहकारी संस्थांची निर्मिती प्रोत्साहित करणे

✅️ ➤ त्यांचे स्वायत्त कामकाज व लोकशाही नियंत्रण सुनिश्चित करणे

✅️ ➤ व्यावसायिक व्यवस्थापनाला चालना देणे

अखिल भारतीय किसान सभा



🔹️स्थापना व मुख्य माहिती

➤ स्थापना: 11 एप्रिल 1936

➤ ठिकाण: लखनौ

➤ संस्थापक सचिव: प्रा. एन. जी. रंगा

➤ अध्यक्ष: स्वामी सहजानंद सरस्वती

➤ पहिले अधिवेशन: लखनौ

➤ मुखपत्र: इंदुलाल याज्ञिक यांच्या नेतृत्वाखाली


🔹️सदस्य आणि प्रमुख नेते

➤ सोहनसिंग जोशी

➤ इंदुलाल याज्ञिक

➤ जयप्रकाश नारायण

➤ मोहनलाल गौतम

➤ कमल सरकार

➤ सुनील प्रामाणिक नंबूरीपाद

➤ करीनंद शर्मा

➤ यमुना करजी

➤ यदुदुंन (जादुनंदन) शर्मा

➤ राहुल सांकृत्यायन

➤ पी. सुंदरैय्या

➤ राम मनोहर लोहिया

➤ आचार्य नरेंद्र देव

➤ बंकिम मुखर्जी

➤ मुझफ्फर अहमद

➤ ए. के. गोपालन

➤ बिनय कृष्ण चौधरी

➤ हरिकिशन सिंग सुरजीत

➤ एस. रामचंद्रन पिल्ले

➤ आमरा राम


🔹️महत्त्वाचे कार्य आणि कार्यपद्धती

➤ सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला

➤ 11 एप्रिल 1936 रोजी काँग्रेसची पहिली अध्यक्ष म्हणून स्वामी सहजानंद सरस्वती यांची निवड


🔹️पूर्वसंधी आणि प्रदेशीय स्थापना

➤ 1928: 'आंध्र किसान संघ – संस्थापक: एन. जी. रंगा

➤ ओरिसा: 'उत्कल प्रांतीय किसान सभा' – संस्थापक: मालती चौधरी

बारडोली सत्याग्रह (1928-29)



🔹️मूलभूत माहिती

➤ वर्ष: 1928-29

➤ ठिकाण: बारडोली

➤ नेतृत्व: सरदार वल्लभभाई पटेल


🔹️कारणे आणि सुरूवात

➤ 1926 मध्ये स्थानिक सरकारने 30% कर वाढीची घोषणा केली

➤ शेतकऱ्यांनी या वाढीचा विरोध केला

➤ सरकारने बारडोली चौकशी आयोग नेमला, ज्याने कर वाढ चुकीची असल्याचे सांगितले


🔹️पटेलांचे नेतृत्व आणि कार्यपद्धती

➤ पटेलांनी महिलांचा सहभाग वाढवला

➤ महिलांना "सरदार" पदवी दिली

➤ लढा देण्यासाठी 13 छावण्या उभारल्या

➤ आंदोलनात सामाजिक बहिष्काराचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकला

➤ सत्याग्रह पत्रिका सुरू केली


🔹️समर्थन आणि राष्ट्रीय प्रतिसाद

➤ लालजी नारंजी आणि के एम मुन्शी यांनी समर्थनार्थ विधान परिषदेचा राजीनामा दिला

➤ मुंबई रेल्वेने संप पुकारला

➤ 2 ऑगस्ट 1928: गांधीजी बारडोलीत दाखल, पटेलांना अटक होऊ नये म्हणून


🔹️चौकशी आयोगाचे निर्णय आणि यश

➤ चौकशी आयोग स्थापन: ब्लुमफिल्ड व मक्सवेल

➤ आयोगाने कर वाढ चुकीची असल्याचे सांगितले

➤ कर वाढ 30% ऐवजी 6.3% करण्यात आली

➤ सत्याग्रह यशस्वी ठरला ✅

मुळशी सत्याग्रह



🔹️स्थान व कालावधी

➤ ठिकाण: पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसर

➤ कालावधी: 1920 – 1921


🔹️नेतृत्व

➤ या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले.


🔹️कारण

➤ टाटा वीज कंपनीने वीज निर्मितीसाठी धरण बांधण्याची योजना आखली होती.

➤ या योजनेमुळे सुमारे 54 गावे धरणाखाली जाणार होती.

➤ शेतकऱ्यांची जमीन बुडणार असल्याने त्यांनी विरोध सुरू केला.


🔹️घटना व पार्श्वभूमी

➤ शेतकऱ्यांनी जमिनींच्या अन्यायकारक संपादनाविरोधात आंदोलन केले.

➤ सेनापती बापट यांनी या संघर्षाचे नेतृत्व करत जनजागृती केली.

➤ हे आंदोलन औपनिवेशिक शासन व भांडवलदारांच्या संयोगाविरोधातील ग्रामीण असंतोषाचे प्रतीक ठरले.


🔹️परिणाम व व्यापक प्रभाव

➤ मुळशी सत्याग्रहामुळे जमिनींचे हक्क, विकास प्रकल्पांतील पुनर्वसन, आणि शेतकऱ्यांच्या हितांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चिले गेले.

➤ पुढील काळात (1926-27) बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब व आंध्र प्रदेशात किसान सभा व इतर शेतकरी संघटना स्थापन होण्यास प्रोत्साहन मिळाले.

भारतातील क्रांतिकारी चळवळी: महत्त्वाचे टप्पे (१८७९ – १९१९)



1.🚩 बंगालमधील क्रांतिकारी चळवळ

➤ प्रारंभ (१९०२)

  ➡️ छोट्या क्रांतिकारी गटांची स्थापना — मिदनापूर व कलकत्ता येथील अनुशीलन समिती (प्रमथनाथ मित्र, पुलिन बिहारी दास, बारिंद्रकुमार घोष).

➤ प्रचाराची साधने

  ➡️ १९०६ पासून युगांतर हे क्रांतिकारी साप्ताहिक सुरू झाले.

  ➡️ १९०५–०६ पर्यंत संध्या व युगांतर यांसारख्या वृत्तपत्रांनी क्रांतिकारी दहशतवादाचा पुरस्कार केला.

➤ महत्त्वाच्या घटना

  ➡️ १९०७ — पूर्व बंगालच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नरवर हल्ल्याचा प्रयत्न.

  ➡️ १९०८ — प्रफुल्ल चाकी व खुदीराम बोस यांनी मुझफ्फरपूरचे मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. खुदीराम बोस यांना फाशी, प्रफुल्ल चाकी यांनी आत्महत्या केली.

  ➡️ १९०८ — अलिपूर बॉम्ब कट प्रकरण : अरविंद घोष, बारिंद्र घोष व इतरांवर खटला.

  ➡️ १९०८ — बऱ्हा डकैती : ढाका अनुशीलनने सरकारी खजिना लुटण्याचा प्रयत्न.

  ➡️ १९१२ — दिल्ली कट : रासबिहारी बोस व सचिन सन्याल यांनी व्हाईसरॉय हार्डिंग यांच्या मिरवणुकीवर बॉम्ब फेकला.

  ➡️ पहिले महायुद्ध (१९१४–१९१८) : जतीन दास व युगांतर गट जर्मन कटात सामील — जर्मनीच्या मदतीने सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न (अयशस्वी).


2.🦁 महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ

➤ आद्य क्रांतिकारक

  ➡️ १८७९ — वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी शेतकरी व गरीब लोकांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. (भारताचा आद्य सशस्त्र क्रांतिकारी उठाव).

➤ जनजागृती

  ➡️ १८९० चे दशक — लोकमान्य टिळक यांनी शिवाजी व गणपती उत्सवांद्वारे तरुणांमध्ये जहाल विचार व देशभक्ती निर्माण केली.

  ➡️ केसरी व मराठा या नियतकालिकांद्वारे ब्रिटिशविरोधी विचारांचा प्रसार.

➤ चाफेकर बंधू

  ➡️ १८९७ — प्लेग कमिशनर रँड व ले. आयर्स्ट यांची पुण्यात चाफेकर बंधूंनी (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) हत्या केली. (भारताच्या राजकीय हत्येचे पहिले मोठे क्रांतिकारी कृत्य).

➤ सावरकर आणि अभिनव भारत

  ➡️ १८९९ — विनायक व गणेश सावरकर यांनी मित्र मेळा या गुप्त संस्थेची स्थापना.

  ➡️ १९०४ — मित्र मेळा → अभिनव भारत संघटनेत रूपांतर.

  ➡️ १९०९ — नाशिक कट खटला : अनंत कान्हेरे यांनी जिल्हाधिकारी जॅक्सन यांची हत्या केली.


3.⚔️ पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ

➤ नेतृत्व आणि प्रचार

  ➡️ लाला लजपत राय, सरदार अजित सिंग, आगा हैदर सय्यद हैदर रझा, भाई परमानंद, लालाचंद ‘फलक’, सुफी अंबाप्रसाद इ. नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध चळवळ चालवली.

  ➡️ सरदार अजित सिंग यांनी भारत माता सोसायटी ची स्थापना केली.

  ➡️ लाला लजपत राय यांचे पंजाबी व अजित सिंग यांचे भारत माता वृत्तपत्रे क्रांतिकारक विचारांचे प्रसारक.

➤ महत्त्वाची घटना

  ➡️ गदर चळवळ (१९१३) : लाला हरदयाल यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थापना केली. उद्देश — ब्रिटिश राजवट उलथविण्यासाठी जगभरातील भारतीयांना एकत्र आणणे.

  ➡️ पहिल्या महायुद्धादरम्यान पंजाबातील क्रांतिकारकांचा क्रांतीचा प्रयत्न.

  ➡️ रासबिहारी बोस यांनी उत्तर भारतातील अनेक क्रांतिकारी कारवायांत पडद्यामागून नेतृत्व केले.

नागरी (Urban) क्षेत्र – 2011 जनगणना आधारित माहिती


1️⃣ नागरी क्षेत्राची व्याख्या (Census Definition)

➤ जनगणनेनुसार दोन प्रकारची शहरे नागरी क्षेत्रात समाविष्ट केली जातात:

 अ) वैधानिक शहरे (Statutory Towns)

  ⮞ जिथे महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे अस्तित्वात आहेत.

  ⮞ किंवा जी शहरे शहर क्षेत्र समितीने सूचीकृत केली आहेत.

 ब) जनगणना शहरे (Census Towns)

  ⮞ लोकसंख्या किमान 5000 असणे आवश्यक.

  ⮞ पुरुषांपैकी किमान 75% कामगार गैरकृषी व्यवसायात असावेत.

  ⮞ लोकसंख्या घनता (density) प्रती चौ.कि.मी. 400 पेक्षा जास्त असावी.


2️⃣ भारताची नागरी लोकसंख्या (2011)

➤ नागरी लोकसंख्या = 37,71,06,125

➤ भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 31.14% ही नागरी आहे.


3️⃣ वर्ग-1 शहरे (Class I Towns)

➤ परिभाषा : ज्या शहरी भागाची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे.

 ◉ 2001 मध्ये – वर्ग-1 शहरे = 394

 ◉ 2011 मध्ये – वर्ग-1 शहरे = 468


4️⃣ दशलक्षी शहरे (Million Plus Cities)

➤ परिभाषा : लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त

 ◉ 2001 मध्ये – अशी शहरे = 35

 ◉ 2011 मध्ये – अशी शहरे = 53 (468 वर्ग-1 शहरांपैकी)


📝 टीप: दशलक्षी शहरे म्हणजे मेगा सिटीज नव्हेत. मेगा सिटीज = 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या (उदा. मुंबई, दिल्ली, कोलकाता).

स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्वाचे टप्पे (1929–1932)



🔹 लाहोर काँग्रेस अधिवेशन (डिसेंबर 1929)

  ➤ काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य हे आपले ध्येय म्हणून स्वीकारले.

  ➤ सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

  ➤ 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय.


🔹 दांडी मार्च (12 मार्च–6 एप्रिल 1930)

  ➤ गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहाचा प्रसार तमिळनाडू, मलबार, आंध्र, आसाम, बंगालपर्यंत.


🔹 अतिरिक्त विरोध मार्गांसह चळवळीचा प्रसार

  ➤ वायव्य सरहद्द प्रांतात खुदाई खिदमतगार सक्रिय.

  ➤ शोलापूरमध्ये विणकर कामगार सक्रिय.

  ➤ धारसाना येथे मिठाचा सत्याग्रह.

  ➤ बिहारमध्ये चौकीदारी कर नाही मोहीम.

  ➤ बंगालमध्ये चौकीदारी विरोधी आणि युनियन-बोर्ड विरोधी कर मोहीम.

  ➤ गुजरातमध्ये कर नाही मोहीम.

  ➤ महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांतात वनांचे कायदेभंग.

  ➤ आसाममध्ये 'कनिंघम परिपत्रका' विरोधात आंदोलन.

  ➤ उत्तर प्रदेशात शेतसारा नाही मोहीम.

  ➤ महिला, विद्यार्थी, मुस्लिम गट, व्यापारी, लहान व्यापारी, आदिवासी, कामगार आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.


🔹 गांधी–आयर्विन करार (मार्च 1931)

  ➤ काँग्रेसने दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहण्यास आणि सविनय कायदेभंग मागे घेण्यास सहमती दर्शविली.


🔹 कराची काँग्रेस अधिवेशन (मार्च 1931)

  ➤ गांधी–आयर्विन दिल्ली कराराला मान्यता दिली.

  ➤ आर्थिक कार्यक्रम आणि मूलभूत अधिकारांवर ठराव मंजूर.


🔹 गोलमेज परिषद (The Round Table Conference)

  ➤ ब्रिटनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेत अल्पसंख्याकांसाठी सुरक्षिततेसाठी मतभेद झाले.

  ➤ डिसेंबर 1931–एप्रिल 1934: सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा.


🔹 जातीय निवाडा (Communal Award, 1932) आणि पुणे करार (Poona Pact)

  ➤ दलित वर्गाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.

  ➤ राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोका असल्याची राष्ट्रवाद्यांची भावना.

  ➤ गांधींनी आमरण उपोषण सुरू केले → पुणे करार.

  ➤ पुणे करारामुळे दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ रद्द; जागा वाढवून आरक्षित ठेवण्यात आल्या.


🔹 पुणे कराराचा दलित वर्गावरील परिणाम

  ➤ संयुक्त मतदारसंघ व दलित वर्गावरील परिणाम.

  ➤ गांधी व आंबेडकर यांच्या विचारांतील फरक व साम्य.

समुद्रतळ प्रसार सिद्धांत (Sea Floor Spreading Theory) : हेरी हेस🔸️



समुद्रतळाच्या अभ्यासातून पुढील काही बाबी उघडकीस आल्या :

🔹 समुद्रतळाच्या मध्यभागी Mid Oceanic Ridge जवळ सतत ज्वालामुखिचा उद्रेक होत असतो. त्यामुळे त्या भागात खूप मोठ्या प्रमाणात लाव्हा बाहेर फेकला जातो.


🔹 या मध्य महासागरी कटकाचे (Mid Oceanic Ridge) च्या दोन्ही बाजूस समान अंतरावर असलेल्या खडकांचे वय, रासायनिक घटक व चुंबकीय गुणधर्म सारखे असते. या भागापासून जसे जसे दूर जावे तसतसे खडकांचे वय वाढत जाते.


🔹 समुद्रतळावरील खडक हे खंडाच्या खडकांपेक्षा खूप कमी वयाचे आहेत.


🔹 समुद्रतळावर जमा झालेल्या गाळाची जाडी फार कमी आहे. शास्त्रज्ञांना असे अपेक्षित होते की जर समुद्र खंडाएवढे वयाचे असतील तर गाळाचे वय सुद्धा सारखेच असावे. परंतु कोणत्याच ठिकाणी समुद्रतळातील गाळाचे वय 200 दशलक्ष वर्षांपेक्षा अधिक नाही.


🔹 खोल गर्ता (Deep Trenches) मध्ये भूकंप नाभी (Earthquake focus) हे खोल असतात. तर मध्यसागरी कटकात (Mid Oceanic Ridge) भूकंपनाभी उथळ (Shallow) आहे.


👉 या पुराव्यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञ हेरी हेस यांनी 1961 मध्ये समुद्रतळ प्रसार (Sea Floor Spreading) सिद्धांत मांडले. त्यांनी सांगितले की Mid Oceanic Ridge जवळ सातत्याने ज्वालामुखी उद्रेक होऊन नवीन लाव्हारस बाहेर पडतो व समुद्रतळ तुटून एकमेकापासून दूर जाऊ लागतात. त्यामुळे समुद्रतळाचा प्रसार होतो.


परंतु यामुळे एका समुद्राचा आकार वाढून दुसऱ्या समुद्राचा आकार कमी होत नाही, तर जो समुद्रतळ ज्वालामुखिमुळे दूर ढकलला जातो, तो भाग समुद्री गर्ते मध्ये बुडून नाहीसा होतो.

मानवी भूगोलासंबंधी महत्त्वाचे ग्रंथ व लेखक



① बर्नहार्डस वारेनियस (जर्मन)

➤ ग्रंथ: जिओग्राफिया जनरलीस


② चार्ल्स डार्विन (इंग्रजी)

➤ ग्रंथ: ओरिजिन ऑफ स्पेसीस (1859)

➤ सिद्धांत: थिअरी ऑफ इव्होल्यूशन


③ हेन्री थॉमस बकल (इंग्रजी इतिहासकार)

➤ ग्रंथ: हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन इन इंग्लंड


④ कार्ल रिटर

➤ ग्रंथ: युरोपा (1863)


⑤ 'अर्डकुंड' (Erdkunde)

➤ लेखक: कार्ल रिटर

➤ अर्थ: भूगोल

➤ वैशिष्ट्य: २०,००० पानांचा व १९ खंडांचा ग्रंथ

➤ प्रकाशन: 1817 मध्ये लिहिण्यात आला


⑥ कॉसमॉस (Kosmos)

➤ लेखक: अलेक्झांडर हम्बोल्ट

➤ पद: बर्लिन विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक

➤ वैशिष्ट्य: लेक्चर्सचा संग्रह

➤ मान्यता: 'भूगोलाचा पहिला संदर्भग्रंथ'


⑦ ॲन्थ्रोपोजिओग्राफी (Anthropogeographie)

➤ लेखक: फ्रेडरिक रॅट्झेल

➤ वैशिष्ट्य: मानव भूगोलविषयक मूलभूत ग्रंथ


⑧ जिओग्राफिया ह्युमेना (Géographie Humaine)

➤ लेखक: जीन ब्रुन्स (Jean Brunhes)

➤ वैशिष्ट्य: फ्रेंच भाषेतील मानवी भूगोलावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ

महत्वाचे कंप (Sound & Vibration – Key Points) 🎵


🔹️ ध्वनीची निर्मिती वस्तूच्या कंपनामुळे होते. प्रत्येक ध्वनीचे मूळ कुठल्या तरी कंप पावणाऱ्या वस्तूमध्ये असते.


🔹️ ध्वनीचे प्रसारण अनुतरंगाच्या रूपात (Longitudinal Waves) होते.


🔹️ ध्वनीच्या प्रसारणासाठी स्थायू, द्रव किंवा वायू माध्यमाची आवश्यकता असते.


🔹️ ध्वनीचा वेग स्थायू माध्यमात द्रव व वायू माध्यमापेक्षा जास्त असतो.


🔹️ जर १/१० सेकंदाच्या आत दोन ध्वनी आपल्या कानावर पडले, तर त्यांचे स्वतंत्र ज्ञान होत नाही.


🔹️ ध्वनीच्या हवेतील वेगावर तापमान, आर्द्रता व वारा परिणाम करतात.


🔹️ हवेचे तापमान १°C ने वाढविल्यास, ध्वनीचा वेग ०.६ m/s ने वाढतो.


🔹️ दमट हवेत ध्वनीचा वेग कोरड्या हवेपेक्षा जास्त असतो.


🔹️ ध्वनीचा परिणामी वेग = ध्वनीचा वेग + वाऱ्याच्या वेगाची सदिश बेरीज.


🔹️ चंद्रावर माध्यम नसल्यामुळे ध्वनी ऐकू येत नाही.


🔹️ ध्वनीचा वेग प्रकाशापेक्षा कमी असल्यामुळे वीज चमकल्यानंतर ढगांचा गडगडाट थोड्या वेळाने ऐकू येतो.


🔹️ प्रत्यक्ष ध्वनी ऐकल्यानंतर १/१० सेकंदाने प्रतिध्वनी आला, तरच तो स्वतंत्रपणे ऐकला जातो.


🔹️ प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तक पृष्ठभागाचे अंतर ≥ 17 m असले पाहिजे.


🔹️ वटवाघूळ अंधारात उडण्यासाठी प्रतिध्वनी तत्वाचा उपयोग करते.


🔹️ SONAR (Sound Navigation and Ranging) तत्त्वाने पाण्याची खोली मोजता येते.


🔹️ ध्वनीचा द्रव माध्यमातील वेग > वायू माध्यमातील वेग.


🔹️ निर्वातात ध्वनीचे प्रसारण होत नाही.


🔹️ ०°C तापमानास, हवेतील ध्वनीचा वेग ३३२ m/s असतो.


🔹️ ध्वनीचे परावर्तन प्रकाशाप्रमाणे होते, पण त्यासाठी विस्तृत परावर्तक पृष्ठभाग आवश्यक असतो.


🔹️ ध्वनी एखाद्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन पुन्हा ऐकू येतो.

महत्वाचे समाजसुधारक व राष्ट्रीय चळवळीशी संबंधित प्रश्नोत्तरं

१) आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक — महात्मा ज्योतिराव फुले


२) इ.स. १९०२ मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गासाठी ५०% आरक्षणाचा निर्णय घेणारे संस्थानिक — राजर्षी शाहू महाराज (कोल्हापूर)


३) जे. एस. मिल व स्पेन्सर यांच्या विचारांनी प्रभावित समाजसुधारक — गोपाळ गणेश आगरकर


४) पुणे व नगर जिल्ह्यातील इ.स. 1875 मधील ‘दख्खन उठाव’ कोणाच्या विरोधात होता — सावकारांच्या विरोधात


५) असहकार ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला — नागपूर अधिवेशन, इ.स. १९२०


६) ‘चले जाव’ ठराव कोणत्या दिवशी पारित झाला — ८ ऑगस्ट १९४२


७) गांधीजींचे आत्मचरित्र ‘माझे सत्याचे प्रयोग’ मूळतः कोणत्या भाषेत लिहिले आहे — गुजराती


८) ‘दीनबंधू’ वृत्तपत्र व बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केली — नारायण मेघाजी लोखंडे


९) ‘हिंदू लेडी’ या नावाने लेखन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ती — डॉ. रखमाबाई राऊत


१०) सत्यशोधक समाजाची स्थापना — इ.स. १८७३, महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Multidimensional Poverty Index - MPI)

 

विकसन संस्था

➤ MPI हा ऑक्सफर्ड पोवर्टी अँड ह्यूमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) या संस्थेने विकसित केला.


प्रकाशन व मोजमाप

➤ 2010 पासून UNDP (United Nations Development Programme) ने OPHI च्या सहकार्याने MPI मोजणे व प्रकाशित करणे सुरू केले.


MPI मोजण्यामागील उद्देश

➤ दारिद्र्य केवळ उत्पन्नावर मोजले जाऊ नये, तर जीवनातील विविध मूलभूत पैलूंचा विचार केला जावा.

➤ शिक्षण, आरोग्य व जीवनमान या तीन प्रमुख परिमाणांवर आधारित मापन.


मुख्य परिमाणे (Dimensions)

✅️ शिक्षण (Education)

➤ कुटुंबातील प्रौढ शिक्षणाचा स्तर

➤ मुलांचे शालेय उपस्थितीचे प्रमाण

✅️ आरोग्य (Health)

➤ बालमृत्यू दर

➤ पोषण स्थिती

✅️ जीवनमान (Living Standards)

➤ स्वच्छ स्वयंपाक इंधनाची उपलब्धता

➤ स्वच्छ पाणी व स्वच्छतागृह

➤ वीजपुरवठा

➤ घरातील रहिवासी स्थिती

➤ मालमत्तेची उपलब्धता


मोजण्याची पद्धत

➤ एखाद्या व्यक्ती/कुटुंबाला बहुआयामी गरीब मानले जाते, जर ते किमान 33% निर्देशकांमध्ये वंचित असतील.

महाधिवक्ता (कलम १६५) 🧑‍⚖️( ALL PYQ POINTS)

🔹️ राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात.

🔹️ राज्यपालांनी नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर कर्तव्ये ते पार पाडतात.

🔹️ संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने दिलेले कार्य ते पार पाडतात.

🔹️ राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देतात.

🔹️ राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेतात.

🔹️ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीसाठी आवश्यक ती अर्हता त्यांच्याकडे असते.

🔹️ उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांप्रमाणे त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

🔹️ ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात.

🔹️ राज्याच्या महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ ते आपल्या पदाचा राजीनामा संबंधित राज्याच्या राज्यपालांकडे सादर करतात.

🔹️ त्यांना विधिमंडळ सदस्यांप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण मिळते.

🔹️ ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात.

🔹️ कार्यालयाबाबत राज्यघटनेत कोणतेही स्पष्ट तरतूद नाही.

🔹️ ते राज्याचे प्रथम कायदा अधिकारी (First Law Officer) असतात.

🔹️ ते राज्य शासनाचे सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार असतात.

🔹️ जर दुसरा पक्ष राज्य नसेल तर त्यांना खाजगी वकिली करण्याचा अधिकार असतो.


🔸️ नियुक्ती व पात्रता 📝

🔹️ नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती त्यांच्याकडे असणे बंधनकारक आहे.

🔹️ त्यांनी न्यायिक पदावर किमान १० वर्षे काम केलेले असावे.

🔹️ उच्च न्यायालयात किमान १० वर्षे वकिली केलेली असावी.


🔸️ संविधानातील संबंधित अनुच्छेद 📜

🔹️ अनुच्छेद १६५ ➤ राज्याच्या महाधिवक्त्यांचे अधिकार, विशेषाधिकार व कायदेशीर संरक्षण यासंदर्भात आहे.

🔹️ अनुच्छेद १७७ ➤ राज्य विधिमंडळाची सभागृहे व समित्या यामधील महाधिवक्त्यांच्या अधिकारांशी संबंधित आहे.

प्रश्न इतिहास - सिंधू संस्कृती

 १) 1921 साली सिंधू संस्कृतीचे पहिले स्थळ ‘हडप्पा’ कोणी शोधले, ज्यामुळे या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव दिले गेले?

➡️ दयाराम साहनी


 २) मोहेन्जोदारो हे सिंधू संस्कृतीचे आणखी एक महत्त्वाचे स्थळ आहे. ‘मोहेन्जोदारो’ या शब्दाचा अर्थ काय?

➡️ मृतांचे टेकाड (Mound of the dead)


 ३) मोहेन्जोदारो येथे उत्खननाचे कार्य 1922 साली राखलदास बॅनर्जी यांच्या देखरेखीखाली सुरू झाले. हे ठिकाण सध्या कुठे आहे?

➡️ लरकाना जिल्हा, सिंध प्रांत, पाकिस्तान


 ४) 1924 साली भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यांनी अधिकृतपणे सिंधू संस्कृती (कांस्ययुगीन संस्कृती) शोधल्याची घोषणा केली. त्या वेळी महासंचालक कोण होते?

➡️ सर जॉन मार्शल


 ५) हडप्पा संस्कृतीच्या कोणत्या स्थळी जे. एफ. मॅके यांनी 1927 ते 1931 या काळात आणि जी. ए. एफ. डेल्स यांनी 1963 साली उत्खननाचे कार्य केले?

➡️ मोहेन्जोदारो


 ६) आतापर्यंत सिंधू संस्कृतीची सुमारे 1500 स्थळे सापडली आहेत. यापैकी फक्त सातच स्थळे शहरे मानली गेली आहेत. ती सात शहरे कोणती?

➡️ हडप्पा, मोहेन्जोदारो, चन्हूदरो, लोथल, कालीबंगन, सुत्कागेंडोर आणि सुरकोटडा


 ७) मोहेन्जोदारोला “मृतांचे टेकाड” म्हटले जाते. राजस्थानातील कोणते स्थळाचा अर्थ “काळ्या बांगड्या” असा आहे?

➡️ कालीबंगन


 ८) सिंधू संस्कृतीच्या विस्तारामुळे हडप्पा आणि मोहेन्जोदारोला “विशाल साम्राज्याची जुळे राजधानी” असे कोणी संबोधले आहे?

➡️ स्टुअर्ट पिगॉट


 ९) मोहेन्जोदारोचे लोक कोणत्या वंशाशी संबंधित मानले जातात?

➡️ भूमध्यसागरीय वंश (Mediterranean race)


 १०) पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील मॉन्टगोमेरी जिल्ह्यातील हडप्पा हे कोणत्या नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे?

➡️ रावी नदी


 ११) 1826 साली चार्ल्स मेसन यांनी हडप्पा टेकडीविषयी प्रथम माहिती दिली. तिच्या पूर्वेकडील टेकडीला “City Mound” म्हणतात. पश्चिमेकडील टेकडीला काय म्हणतात?

➡️ किल्ला टेकाड (Fort Mound)


 १२) हडप्पामध्ये सर्वसाधारण वस्तीच्या दक्षिणेकडे ‘Cemetery R-37’ नावाचा स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत सापडलेला शवपेटी कोणत्या लाकडाची होती?

➡️ देवदार (Cedar)


 १३) हडप्पामध्ये धान्यागार किल्ल्याबाहेर सापडले आहे, तर मोहेन्जोदारोमध्ये ते किल्ल्याच्या आत आहे. कोणत्या स्थळावर दोन रांगांमध्ये सहा अशा 12 कक्षांचे धान्यागार सापडले?

➡️ हडप्पा


 १४) सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता?

➡️ शेती


 १५) सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या पिकाच्या उत्पादनात निपुण होते?

➡️ कापूस


 १६) सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या प्रकारची लिपी वापरत होते?

➡️ चित्रलिपी (Pictograph)


 १७) सिंधू लिपीचे वाचन (deciphering) करण्याचा प्रयत्न कोणी केला?

➡️ डॉ. अस्को पर्पोला, एस. आर. राव, आय. महादेवन इत्यादी


 १८) हडप्पा संस्कृतीत कोणत्या प्रकारचे शासन होते?

➡️ धार्मिक शासन (Theocracy government)


 १९) हडप्पा संस्कृतीतील साधने आणि शस्त्रे मुख्यतः कोणत्या धातूंनी बनवलेली होती?

➡️ तांबे, कथील (टिन) आणि कांस्य (ब्रॉन्झ)