28 September 2025

रागासा चक्रीवादळ



🔹 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ (Typhoon)

🔹 वेग ताशी – 270 ते 295 किलोमीटर पर्यंत होता

🔹 ‘सुपर टायफून’ म्हणून ओळखले जाते

🔹 मुख्य प्रभावित क्षेत्र – फिलिपिन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीन

🔹 पॅसिफिक महासागरात तयार झाले

🔹 'Ragasa' हे नाव फिलिपिन्सने दिले आहे

🔹 Ragasa अर्थ – “अचानक वेगवान हालचाल”


🔰 नुकतीच आलेली काही चक्रीवादळे


🔹 शक्ती (मे 2025) – बंगालचा उपसागर, भारताचा पूर्व किनारा (नाव – श्रीलंका)


🔹 अल्फ्रेड (मार्च 2025) – ऑस्ट्रेलियाचा दक्षिण-पूर्व किनारा (नाव – ऑस्ट्रेलिया)


🔹 जुड (मार्च 2025) – मादागास्कर आणि मोझांबिक (नाव – मॉरिशस)


🔹 डिक्लेडी (जानेवारी 2025) – दक्षिण-पश्चिम हिंदी महासागर


🔹 चिदो (डिसेंबर 2024) – मोझांबिक (नाव – मॉरिशस)

संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) – यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025



🔹 पुरस्काराचे स्वरूप

➤ ३० वर्षांखालील तरुणांना उत्कृष्ट पर्यावरणीय नवकल्पनांसाठी दिला जाणारा UNEP चा प्रतिष्ठित पुरस्कार.


🔹 २०२५ चे विजेते

🔹 जिनाली मोदी (भारत) ✅✅

🔹 जोसेफ न्गुथिरा (केनिया)

🔹 नोएमी फ्लोरिया (अमेरिका)


🔹 भारताची जिनाली मोदी – विशेष सन्मान

➤ मुंबईतील उद्योजिका आणि Banofi Leather च्या संस्थापक.

➤ केळी पिकाच्या कचऱ्यापासून (Banana Crop Waste) शाश्वत (Sustainable) व पर्यावरणपूरक लेदर पर्याय तयार केला.


🔹 नाविन्यपूर्ण उपाय (Innovation)

🔹 पारंपरिक लेदरच्या तुलनेत ९५% कमी पाणी वापर.

🔹 ९०% पेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन घट.

🔹 विषारी रसायनांचा वापर टाळला, ज्यामुळे फास्ट फॅशन उद्योगाचा पर्यावरणीय परिणाम कमी.


🔹 इतर महत्त्वाचे मुद्दे

🔹 प्रत्येक विजेत्याला $20,000 बीज भांडवल (Seed Funding) दिले जाते.

🔹 Mentorship उपलब्ध होते.

🔹 त्यांच्या कल्पनांना जागतिक स्तरावर व्यासपीठ दिले जाते.

आर. वेंकटरमणी - भारताचे अटॉर्नी जनरल (महान्यायवादी) दुसऱ्यांदा नियुक्त



1.कार्यकाळ

🔹 30 सप्टेंबर 2025 रोजी पहिला कार्यकाळ संपला

🔹 1 ऑक्टोबर 2025 पासून नवीन 2 वर्षांचा कार्यकाळ सुरू


2.संवैधानिक अधिष्ठान

🔹 संविधानाच्या कलम 76(1) अंतर्गत नियुक्ती


3.वैयक्तिक माहिती

🔹 वय – 75 वर्षे

🔹 माजी वरिष्ठ अधिवक्ता


4.पदभार स्वीकार

🔹 1 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यभार स्वीकारला

🔹 के.के. वेणुगोपाल यांच्यानंतर नियुक्ती


5.भूमिका व कार्य

🔹 भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार

🔹 सर्वोच्च न्यायालयात सरकारसाठी युक्तिवाद करणे

🔹 सरकारला कायदेशीर मुद्द्यांवर सल्ला देणे


6.स्थिती

🔹 केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत

🔹 संसदेत बोलू शकतात; पण मतदान करू शकत नाहीत


7.पदाचे स्वरूप

🔹 हे पद संवैधानिक आहे

🔹 नियुक्तीचा कार्यकाळ निश्चित नाही; राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार पदावर राहतात ✅

किनार्यालगतचे सागरी भागातील बेटे व सामुद्रधुनी


🏝️ प्रमुख बेटे


🔹 गंगा नदीच्या मुखाशी – न्यू मरे, सागर, गंगासागर


🔹 नर्मदा नदीच्या मुखाशी – आलिया बेट


🔹 भारत–श्रीलंका दरम्यान – पंबन बेट


🔹 चिलका सरोवरादरम्यान – निक्शोपित बेट


🔹 चिलका सरोवराच्या मुखाशी – पैरकुद बेट


🔹 सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर – कच्छ, बेला, खाडी बेटे


🔹 पुलिकत सरोवराच्या मुखाशी – श्रीहरीकोटा बेट


🔹 महानदी व ब्राह्मणी नदीच्या मुखाशी – शॉर्ट व व्हिलर बेट


🌊 सामुद्रधुनी व विशेष भौगोलिक रचना


🔹 दक्षिण अंदमान व लिट्ल अंदमान दरम्यान – डंकन पास


🔹 कोको बेटे (म्यानमार) व उत्तर अंदमान दरम्यान – कोको स्ट्रेट


🔹 तमिळनाडू व श्रीलंका दरम्यान – पाल्क स्ट्रेट


🔹 भारत व श्रीलंका दरम्यान – अडम ब्रीज