18 September 2025

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती


०१) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे ?

- गुरुमुखी.


०२) 'जुळे ग्रह' असे कोणत्या दोन ग्रहांना म्हटले जाते ?

- पृथ्वी आणि शुक्र.


०३) द्रव अवस्थेत असणारा एकमेव धातू कोणता ?

- पारा.


०४) 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवरायांनी कोणाबद्दल काढले आहेत ?

- तानाजी मालुसरे.


०५) पहिला सजीव कुठे निर्माण झाला ?

- पाण्यात.


०१) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?

- कर्नाळा.

 

०२) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात ?

- कोयना.


०३) पत्रकार दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?

- ६ जानेवारी. 

 

०४) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?

- शुक्र.


०५) मंगळ या ग्रहाला ..... असेही संबोधतात?

- लाल ग्रह.


०१) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ?

- फातिमा बिबी.

     

०२)भारतातील  पहिल्या महिला अंध आय.ए.एस.अधिकारी कोण आहेत ?

- प्रांजल पाटील.


०३) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरांमध्ये सुरू झाली ?

- कोलकाता.


०४) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्यांची संख्या असते ?

- २४.


०५) जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत मधून किती टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव आहे ?

- पाच टक्के.


०१) 'व्हॉट्सॲपची' निर्मिती केव्हा झाली ?

- २००९.


०२) कोणाचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो ?

- स्वामी विवेकानंद.


०३) 'बुलंद दरवाजा' कोठे आहे ?

 - फत्तेपूर शिक्री.(उत्तर प्रदेश)


०४) ICU चा लॉंगफॉर्म काय आहे ?

- Intensive Care Unit.


०५) 'मेरी कोम' ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

- बॉक्सिंग. 


०१) भारतातील पहिला बोलपट कोणता ?

- आलम आरा.


 ०२) ऑलिंपिकमध्ये प्रथम सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण ?

- अभिनव बिंद्रा.(नेमबाजी)


०३) 'भारतरत्न' या पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली ?

- १९५४.


 ०४) 'KYC' चा लॉंगफॉर्म काय आहे ?

- Know Your Customer.


०५) 'आंबोली' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

- सिंधुदुर्ग.


०१) कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा - गोरेपणा ठरतो ?

- मेलॅनिन.


०२) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?

- शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार.


०३) मीठ साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात ?

- जलसंजीवनी.


०४) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

- तिसरा.


०५) 'भारतरत्न' पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?

- महर्षी धोंडो केशव कर्वे.


💐 विटामिन बी चे अविष्कारक कोण आहेत ?

🎈मॅकुलन.


💐 शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

🎈मिलींद बोकील.


💐 सोमनाथ जोतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे ?

🎈गुजरात.


💐 मंडो नृत्‍य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

🎈गोवा.


💐 छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?

🎈मुंबई.


०१) भारत देश कोणत्या खंडात आहे ?

 - आशिया.


०२) राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक कोणता आहे ?

- ११२.


०३) 'नौटंकी' हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ?

- उत्तर प्रदेश.


०४) पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

- तामिळनाडू.


०५) महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो ?

- नैऋत्य मोसमी वारे.


०१) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणी मोजतात ?

- मिर्झापूर.


०२) सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात ?

- प्रतल.


०३) शरीरातील सर्वात मोठे हाड कोठे असते ?

- मांडीत. 


०४) कोणत्या वायूमुळे मुख्यतः ओझोन थराचा ऱ्हास होतो ?

- क्लोरो-फ्लोरो कार्बन.(CFC)


०५) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

- यमुना. 


०१) भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती ?

- हडप्पा. 


०२) 'भरतनाट्यम' हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे ?

- तामिळनाडू.


०३) कांगारू हा प्राणी कोणत्या खंडात आढळतो ?

- ऑस्ट्रेलिया. 


०४) अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

- शरयू. 


०५) सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखास काय म्हणतात ?

- सरन्यायाधीश.


०१) वातावरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे ?

- २१ टक्के.


०२) मानवी चेहर्‍यात हाडांची संख्या किती ?

- १४.


०३)  कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो ?

- मलेरिया.


०४) मानवी शरीरात किती मणके असतात ?

- ३३.


०५) वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे ?

- पॅरिस.


०१) भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला ?

 - C-DAC.


०२) भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली ?

- १९५६.


०३) १९९८ साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्फोटाच्या चाचण्या घेतल्या ?

- पोखरण.


०४) न्यूटनचा दुसरा नियम कशाचे मापन देतो ?

- संवेग.


०५) मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?

- हवामानशास्त्र.


०१) तेलबियांचा राजा असे कोणत्या पिकास म्हणतात ?

- भुईमूग.


०२) 'रुपया'  हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ?

- शेरशहा सुरी.


०३) 'तृतीय रत्न' हे नाटक कोणी लिहिले ?

- महात्मा फुले.


०४) आपल्या देशात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

- संसदेला.


०५) तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो ?

- गहू.


०१) बहिणाबाई चौधरी यांच्या कोणत्या बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत ?

- अहिराणी. 


०२) आपले राष्ट्रीय स्मारक कोणते आहे ?

- इंडिया गेट.


०३) भारताचे  राष्ट्रीय ब्रीदवाक्य कोणते ?

- सत्यमेव जयते. 


०४)  चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू असतो ?

- नायट्रोजन. 


०५) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?

- नाईल.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

मानवी शरीर


1: हाडांची संख्या: 206

2: स्नायूंची संख्या: 639

3: मूत्रपिंडांची संख्या: 2

4: दुधाच्या दातांची संख्या: 20

5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)

6: हार्ट चेंबर क्रमांक: 4

7: मोठी धमनी: महाधमनी

8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी

9: रक्त पीएच: 7.4

10:पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33

11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7

12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6

13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14

14: कवटीतील हाडांची संख्या: 22

15: छातीत हाडांची संख्या: 25

16: हात मध्ये हाडांची संख्या: 6

17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72

18: हृदयातील पंपांची संख्या: 2

19: सर्वात मोठा अवयव: त्वचा

20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत

21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय

22: सर्वात लहान सेल: शुक्राणू

23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान

24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड

25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी

26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी

27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो

28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा

29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)

30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर

:१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस

32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस

33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)

34: मानवी पायात हाडांची संख्या: 33

35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8

36: हातात हाडांची संख्या: 27

37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड

38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा

40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर

:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)

41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)

42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306

43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5

44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ

45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी

46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट

47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट

48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया

49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा

50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त

51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल

52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

20 महत्त्वाचे CSAT सराव प्रश्न उत्तरे

1. सन 1996 हे लिपवर्ष आहे. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार येईल?

 शुक्रवार

 मंगळवार

 गुरुवार

 बुधवार

उत्तर : बुधवार



 2. राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर विमला ही राधाची कोण?

 मावस बहीण

 पुतणी

 भाची

 आत्या

उत्तर :भाची



 3. K हा J चा भाऊ आहे. M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण?

 K

 J

 N

 S

उत्तर :K



 4. आर्या याच जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्यावर्षी गांधी जयंतीचा वार शनिवार होता. तर आर्याचा आठव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल?

 गुरुवार

 बुधवार

 सोमवार

 रविवार

उत्तर :गुरुवार



 5. खालील मालिकेत 8 नंतर 18 ही संख्या किती वेळा आली आहे?

 818881881811818181881888111818181181881

 9 वेळा

 10 वेळा

 11 वेळा

 8 वेळा

उत्तर :10 वेळा



 6. खालील गटामध्ये जोड अक्षरे शब्द किती आहेत?

 ग्रह, कृपा, कृषी, तंत्र, गृह, क्रम, कृती, क्षमा.

 पाच

 सात

 आठ

 वरील सर्व

उत्तर :पाच



 7. खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?

 लाकूड

 हात

 बैठक

 पॉलिश

उत्तर :बैठक



 8. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती?

 आंबा

 गुळ

 बटाटा

 गवत

उत्तर :आंबा



 9. इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25, 19 आणि 5 ही अक्षरे जुळवून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?

 E

 W

 S

 R

उत्तर :S



 10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 7497:5255:111:?

 312

 121

 393

 101

उत्तर :393



 11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 6:38::7:?

 51

 52

 50

 48

उत्तर :51



 12. सतीशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?

 10

 15

 25

 30

उत्तर :15



 13. 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?

 PICEP

 CEPRJ

 PIRCE

 PRICE

उत्तर :PRICE



 14. विसंगत शब्द शोधा.

 जव (सातू)

 कापूस

 तांदूळ

 गहू

उत्तर :कापूस



 15. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?

 2 तास

 अडीच तास

 1 तास

 दिड तास

उत्तर :दिड तास



 16. जर WINTER=2391420518 तर COTTON=?

 31520201514

 31515202014

 32520152014

 31420151520

उत्तर :31520201514



 17. सायंकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडून जाईल?

 तीन वेळा

 दोन वेळा

 चार वेळा

 पाच वेळा

उत्तर : दोन वेळा



 18. पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?

 1

 25

 5

 15

उत्तर :5


 19. एक वस्तु रु. 750 ला खरेदी केली व रु. 840 ला विकली तर शेकडा नफा किती झाला?

 12

 15

 18

 20

उत्तर :12



 20. घड्याळात 13 वाजून 35 मिनिटे झाली आहेत, तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?

 9 वाजून 25 मिनिटे

 10 वाजून 35 मिनिटे

 11 वाजून 20 मिनिटे

 यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :



1. ग्रहाचे नाव - बूध


सूर्यापासुन चे अंतर - 5.79  

 परिवलन काळ - 59

 परिभ्रमन काळ - 88 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.


2. ग्रहाचे नाव - शुक्र


सूर्यापासुन चे अंतर - 10.82  

 परिवलन काळ - 243 दिवस

 परिभ्रमन काळ - 224.7 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


3. ग्रहाचे नाव - पृथ्वी


सूर्यापासुन चे अंतर - 14.96  

 परिवलन काळ - 23.56 तास

 परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.


4. ग्रहाचे नाव - मंगळ


सूर्यापासुन चे अंतर - 22.9  

 परिवलन काळ - 24.37 तास

 परिभ्रमन काळ - 687

 इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.


5. ग्रहाचे नाव - गुरु


सूर्यापासुन चे अंतर - 77.86

 परिवलन काळ - 9.50 तास

 परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.


6. ग्रहाचे नाव - शनि


सूर्यापासुन चे अंतर - 142.6

 परिवलन काळ - 10.14 तास

 परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.


7. ग्रहाचे नाव - युरेनस  


सूर्यापासुन चे अंतर - 268.8

 परिवलन काळ - 16.10 तास

 परिभ्रमन काळ - 84 वर्षे

 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  


सूर्यापासुन चे अंतर - 449.8

 परिवलन काळ - 16 तास

 परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे

 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

चला जाणून घेऊ - भूगोल : पर्वतांचे प्रकार

💠 सभोवतीच्या प्रदेशापासून सापेक्षतः बराच उंचावलेला आणि माथ्याशी थोडीशीच जागा असलेला भूभाग म्हणजे 'पर्वत' होय. जाणून घेऊयात पर्वतांचे प्रकार

▪ वलित पर्वत : वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पर्वतांना वलीत पर्वत असे म्हणतात 

▪ विभंग-गट पर्वत : विभंगक्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेल्या पर्वतांना विभंग-गट पर्वत असे म्हणतात.

▪ घुमटी पर्वत : भूकवचाच्या हालचालीमुळे जमिनीला विभंग न होता वरच्या बाजूने बाक येऊन किंवा स्तरित खडकांच्या थरात खालून शिलारस (मॅग्मा) घुसून ते थर घुमटाच्या आकाराच्या स्वरूपात उंचावले जातात.

▪ ज्वालामुखी पर्वत : पृथ्वीच्या कवचात काही किमी. खोलीवर तयार झालेल्या शिलारसाला भूपृष्ठाच्या चिरा-भेगांतून वाट मिळाली की, तो भूपृष्ठावर येतो. यातून तयार होणाऱ्या पर्वताला ज्वालामुखी पर्वत म्हणतात.

▪ अवशिष्ट पर्वत : कोणत्याही उंचावलेल्या पठारी प्रदेशाचे कालांतराने क्षरण होऊन डोंगराळ प्रदेशात रूपांतर होते, त्याला अवशिष्ट पर्वत म्हणतात.

भूगोल महत्त्वाची माहीती

♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके

♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

♦️कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

♦️महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)

🔶नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700

🔶लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208

🔶पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229

ग्रहाचे वर्गीकरण


√ लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या संदर्भाने ग्रहांचे दोन वर्ग केले आहे.


१) अंतर्ग्रह

२) बहिर्ग्रह


√ १) अंतर्ग्रह : 


◆ सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा, याच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात. 


◆ बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. त्यांचे आकारमान लहान आहे. त्यांचे कवच खडकांचे बनले आहे.


◆ बुध व शुक्र या दोन्ही ग्रहांचे कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत येत असल्याने त्यांना कक्षान्तर्गत ग्रह असेही म्हणतात.


√ २) बहिर्ग्रह : 


◆लघुग्रहांच्या पट्ट्यापलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. यांत गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून यांचा समावेश होतो. सर्व ग्रहांना खडक व धूलिकणांची बनलेली कडी आहेत. या ग्रहांचे आकारमान मोठे आहे व त्यांचे बाह्यावरण वायुरूप आहे.


 ●●ग्रहांची वैशिष्ट्ये●●


१) बुध : 


√ सूर्याला सर्वात जवळचा ग्रह.

√ आकारमानाने सर्वात लहान ग्रह. 

√ सर्वात हलका व सर्वात उष्ण ग्रह.

√ सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह.

√ सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यास ८८ दिवस लागतात. 

√बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही.


२) शुक्र (Venus) : 


√ सर्वात तेजस्वी ग्रह.

√ कृष्ण पक्षात रात्री त्यापासून प्रकाश मिळतो.

√ पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.

√ शुक्र हा जवळ-जवळ सर्व बाबतीत पृथ्वीसारखाच आहे म्हणून याला पृथ्वीची बहिण म्हणतात.

√ सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतांना स्वत:भोवती सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात. 

√ अपवाद शुक्र आणि यूरेनस मात्र स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात.

√ चंद्राप्रमाणे शुक्राच्यादेखील कला दिसतात.

√ शुक्रावरील वातावरण पिवळसर ढगांनी व्यापलेला असल्याने त्याला “ढगांच्या आड लपलेला शुक्र' असेही म्हणतात.

√ शुक्र ग्रहावर दिवस आणि रात्रीचे तापमान सारखेच असते.

√ शुक्राला उपग्रह नाही.

√ पहाटे हा ग्रह पूर्व क्षितिजावर व संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर दिसला.


३) पृथ्वी : 


√ जीवसृष्टी अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह. 

√ सर्वाधिक घनतेचा ग्रह(५.५) gm/cm' 

√ चंद्र हा एकमेव उपग्रह.

√ जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह. 

√ पृथ्वीची विभागणी सुमारे ७१% पाणी व २९% भूभाग अशी करण्यात येते. 

√ पृथ्वीचा उत्तर गोलार्ध हा भूगोलार्ध म्हणून तर दक्षिण गोलार्ध हा जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो.


◆ पृथ्वीची माहिती


√ पृथ्वीचा आकार - जिऑईड (पृथ्वी धूवाकडील बाजूला चपटी व विषुववृत्तालगत फुगीर)

√ पृथ्वीची उत्पत्ती - सुमारे ४५० कोटी वर्षापूर्वी

√ पृथ्वीचे क्षेत्रफळ - ५ अब्ज चौ.कि.मी.

√ पृथ्वीचा विषुववृत्तीय परिघ - ३९,८४३ कि.मी.

√ ध्रुवीय परिघ - ३९,७४६ कि.मी.

√ विषुववृत्तीय व्यास - १२,७५४ कि.मी.

√ ध्रुवीय व्यास - १२,७१० कि.मी.

√ पृथ्वीची घनता - ५.५ gm/em' |

√ सूर्यापासून अंतर - अंदाजे १५ कोटी कि.मी.

√ पृथ्वीचा परिघ सर्वप्रथम एऍटोस्थेनिस या इजिप्तच्या संशोधकाने शोधला.

√ पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणातून मुक्त होण्यासाठी आवश्यक वेग (escape velocity) ११.२ किमी/सेकंद.

√ पृथ्वीचा परिवलन काल - २३ तास ५६ मिनिटे ४ सेकंद. 

√ परिभ्रमण (सूर्यभोवती फिरणे) - ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिट ५४ सेकंद


४) मंगळ (Mars) : 


√ लाल ग्रह असेही म्हणतात. 

√ कारण Feo चे प्रमाण जास्त.

√ शुक्राप्रमाणे मंगळ हादेखिल पृथ्वीला जवळचा ग्रह

√ मानव वस्ती शक्य असलेला ग्रह

√ त्यामुळे जगातील प्रमुख देश आज मंगळावर संशोधन करण्यात गुंतलेले आहे. (pathfinder, curosity यान)

√ उपग्रहांची संख्या : दोन (Phobos, Deimos)

√ Nix oympia हे सर्वात उंच शिखर (ऐवरेस्ट पेक्षा ३ पट उंच)


५) गुरू (Jupiter) : 


√ सर्वात मोठा व जड ग्रह. 

√ गुरूच्या पृष्ठभागावर पांढरट पट्टे आढळतात. 

√ गुरू हा पृथ्वीच्या तुलनेत १३०० पटीने मोठा आहे.

√ अलीकडे गुरूच्या भोवती शनीप्रमाणे कडी आढळून आली आहे.

√ उपग्रहांची संख्या - ६३ (Lo, Europe, casillo, Ganymeda)

√ गुरूला स्वत:भोवती एक फेरी घालण्यास (परिवलन) १ तास ५० मिनिटे लागतात. 

√ तर सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास १२ वर्षे लागतात. 

√ सर्व ग्रहांपैकी सर्वात छोटा दिवस गुरू चा आहे.


६) शनि (Saturn) :-


√ दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह. 

√ निळा रंग ही शनिची महत्वाची खूण आहे.

√ सर्वात कमी घनतेचा ग्रह (०.६८) gm/cm'.

√ या ग्रहाभोवती तीन कडी आहेत. कडी आपल्याला दुर्बिणीतून दिसू शकतात.

√शनि - ३१ उपग्रह (Titan, Rhea, Tethys). 

√ Titan हा सूर्यमालेतील एकमेव उपग्रह आहे ज्याला स्वत:चे वातावरण आहे.


७) युरेनस : (प्रजापती)


√ रंग हिरवट निळा आहे.

√ युरेनस स्वत:भवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

√ त्यामुळे युरेनस वर सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळतो.

√ उपग्रह : २७ (Ariel, Miranda, Titanica, oberon)

√ यूरेनस या ग्रहाला प्रजापती हे भारतीय नाव जनार्दन बाळाजी मोडक यांनी दिले.


८) नेपच्यून (वरूण):


√ सूर्याला आणि पृथ्वीला सर्वात लांबचा ग्रह.

√ निळ्या रंगाचा ग्रह. 

√ या ग्रहाच्या भवती मिथेन वायु जास्त असावे.

√ उपग्रह - १४ (Titron, merid)

√ या ग्रहाभोवती पाच कडी आहेत. 

√ हा सर्वात शित ग्रह आहे.


◆ बटूग्रह


√ नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान आकार 

√ उदा.: प्लुटो, पॅसिडॉन.

√ महत्त्वाचे : ऑगस्ट २००६ मध्ये प्लूटो (कुबेर) हा ग्रह' म्हणून असलेली मान्यता काढून घेण्यात आली. 

√ कारण : प्लुटो वर्तुळाकार कक्षेऐवजी लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करित व प्लुटो नेपच्यूनची कक्षा ओलांडत असे.

√ अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ क्लॉईड टॉम्बथ याने १९३० मध्ये प्लूटो या ग्रहाचा शोध लावला होता.

भूगोल महाराष्ट्रातील डोंगर रांगा

📚 सपर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर आणि त्यांचा जिल्हा यांविषयी माहिती घेऊयात.


👉 डोंगराचे नाव : जिल्हा


▪️ सातमाळा : नाशिक

▪️ वणी : नाशिक

▪️ निर्मल : नांदेड

▪️ चिकोडी : कोल्हापूर

▪️ पन्हाळा : कोल्हापूर

▪️ चांदूरगड : चंद्रपूर

▪️ मांधरादेव : सातारा

▪️ महादेव : सातारा

▪️ मालिकार्जुन : सांगली

▪️ अजिंठा: औरंगाबाद

▪️ कळसूबाई : अहमदनगर

▪️ भामरागड : गडचिरोली

▪️ गाविलगड : बुलढाणा, अकोला

▪️ बालाघाट : बीड

▪️ तोरणमाळ : नंदुरबार

नुकतेच सुरू झालेले चॅटबॉट/ॲप्स आणि त्यांची उद्दिष्टे


🔹 ‘सचेत’ अ‍ॅप
➤ लोकांना नैसर्गिक आपत्तींपासून सावध ठेवण्यासाठी

🔹 AI चॅटबॉट ‘सारथी’ (हरियाणा)
➤ शासकीय धोरणे सहजतेने लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी

🔹 e-SEHAT अ‍ॅप (जम्मु-कश्मीर)
➤ राज्यातील लोकांसाठी आरोग्य सेवा सुलभ व अधिक प्रभावी करण्यासाठी

🔹 RISE अ‍ॅप (उत्तरप्रदेश)
➤ मुलांच्या नियमित लसीकरणाला सुधारण्यासाठी

🔹 SwaRail अ‍ॅप (भारतीय रेल्वे)
➤ तिकीट बुकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी

🔹 RBIDATA पोर्टल (भारतीय रिझर्व बँक)
➤ आर्थिक आणि वित्तीय डेटा पर्यंत पोहोच उपलब्ध करून देण्यासाठी

🔹 ‘मित्र’ पोर्टल (SEBI)
➤ गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड व इतर गुंतवणुकीचे ट्रॅकिंग करण्यासाठी

🔹 सन्मान संजीवनी अ‍ॅप (हरियाणा)
➤ महिला व किशोरी सन्मान योजनेतील सुविधा ट्रॅक करण्यासाठी

🔹 भारतपोल पोर्टल (CBI)
➤ फरारी गुन्हेगारांना पकडण्यासाठी