09 December 2025

रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2025

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



2025 मध्ये :

1.मालदीवच्या शाहिना अली 

2.फिलीपिन्सच्या फ्लेवियानो अँटोनियो एल. विलानुएवा आहेत.

3. एज्युकेट गर्ल्स (भारत )


एज्युकेट गर्ल्स 


हा पुरस्कार मिळवणारी महिलांची पहिली भारतीय संस्था ठरली.


या संस्थेची स्थापना 2007 मध्ये राजस्थान या ठिकाणी करण्यात आली तिचे संस्थापक सफिना हुसेन हे आहेत.


या संस्थेने 15 ते 29 वयोगटातील तरुणींना शिक्षण पूर्ण करण्याची संधी देणारा प्रगती नावाचा मुक्त शिक्षण उपक्रम सुरू केला आहे.


सफिना हुसेन 


1997 ते 2004 पर्यंत त्या सन फ्रान्सिस मधील चाइल्ड फॅमिली हेल्थ इंटरनॅशनल च्या कार्यकारी संचालक होत्या


2001 ते 2002 पर्यंत त्या इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एक्सचेंजच्या बोर्डवर होत्या.


2005 मध्ये इंडिया स्टडी अब्रॉड सेंटर सुरू केले 2005 मध्ये त्या भारतात परतल्या आणि खेड्यांमध्ये राहणाऱ्या शालेय मुलींच्या शिक्षणासाठी काम करू लागले.


2007 मध्ये त्यांनी  एज्युकेशन गर्ल्स नावाची एक एनजीओ स्थापन केली.


2017 ते 2023 पर्यंत त्या चिल्ड्रेन इन्व्हेस्टमेंट फंड फाउंडेशन च्या स्वतंत्र सल्लागार होत्या.


2020 मध्ये ती लॉरियल पॅरिसच्या सल्लागार मंडळात सामील झाले.


2018 मध्ये त्या इंडिया लीडर्स फॉर सोशल सेक्टर च्या सल्लागार परिषदेची  सदस्य बनली.


2023 मध्ये त्या इंडियन स्कूल ऑफ डेव्हलपमेंट मॅनेजमेंट च्या सल्लागार परिषदेची सदस्य बनली.


७ नोव्हेंबर 2025 रोजी सफिनाच्या एनजीओने एज्युकेट गर्ल्स ला रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला.



रॅमन मॅगसेसे पुरस्कार 


या पुरस्काराची स्थापना रॉकफेलर ब्रदर्स फंड न्यूयॉर्क व फिलिपाईन्स सरकार मिळून 1957 मध्ये स्थापन केले.


याला आशियाचा नोबेल म्हणून ओळखले जाते.


पहिले भारतीय विजेते आचार्य विनोबा भावे.


दरवर्षी 31 ऑगस्ट रोजी रॅमन मॅगसे यांच्या जयंती निमित्त मनिला येथे हा पुरस्कार प्रदान केला जातो.


हा पुरस्कार फिलिपिन्सचे तिसरे राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो.

आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 बानू मुश्ताक यांना त्यांच्या Heart Lamp या लघुकथा संग्रहाला मिळाला आहे तर अनुवादक पुरस्कार दीपा बस्ती यांना मिळाला आहे.


आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेत्या दुसऱ्या भारतीय ठरल्यात यापूर्वी गीतांजली श्री यांना टॉम ऑफ सॅड- 2022 यासाठी मिळाला.


कन्नड भाषेतील पुस्तकाला पहिल्यांदाच बुकर पुरस्कार मिळाला.


हा पुरस्कार जिंकणारा पहिला लघुकथा संग्रह आहे.


दीपा भास्ती हा पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय अनुवादक ठरल्या आहेत.


बानू मुश्ताक 


त्यांचा जन्म 3 एप्रिल 1948 रोजी हसन,कर्नाटक या ठिकाणी झाला.


बंगळूर मध्ये ऑल इंडिया रेडिओ मध्ये काम केले.


त्यांना कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.


2024 मध्ये त्यांना पेन ट्रान्सलेशन पुरस्कारही मिळाला आहे.


त्यांच्या करीनागारगाळू या कथेवर आधारित प्रसिद्ध कन्नड चित्रपट हसीना तयार झाला आहे.


लंकेश पत्रिके या वृत्तपत्रात पत्रकार म्हणून काम केले होते.


आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 


या पुरस्काराची स्थापना 2004 ला झाली असून सुरुवात 2005 मध्ये झाली.


2016 पासून दरवर्षी दिला जातो त्यापूर्वी दर दोन वर्षांनी दिला जायचा.


2023: जॉर्जी गोस्पोडिनोव्ह (बल्गेरिया )- Time Shelter.


2024: जेनी एरपेनबेक (जर्मनी )- Kairos

भाक्रा धरण

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


सुमारे २२६ मीटर उंच आणि ५१८ मीटर लांबीचे, भाक्रा धरण हे टिहरी धरणानंतर भारतातील दुसरे सर्वात उंच धरण आहे.


 हे जगातील सर्वात उंच सरळ गुरुत्वाकर्षण धरण देखील आहे.


भाक्रा धरण सतलज नदीवर बांधले गेले आहे आणि ते हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर नांगल शहराजवळ आहे.


हे सिंचनासाठी तसेच जलविद्युत वापरासाठी आहे.


भाक्रा राईट बँक पॉवर हाऊसची स्थापित क्षमता ७८५ मेगावॅट (५x१५७ मेगावॅट) आहे आणि भाक्रा लेफ्ट बँक पॉवर हाऊसची स्थापित क्षमता ५९४ मेगावॅट (३x१२६ मेगावॅट + २x१०८ मेगावॅट) आहे.



धरणाचे बांधकाम १९६३ मध्ये पूर्ण झाले.


भाक्रा धरणाचे संचालन आणि देखभाल भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळ (BBMB) द्वारे केली जाते.


भाक्रा धरण हे सरळ गुरुत्वाकर्षणासह काँक्रीट धरण आहे ज्यामध्ये चार स्पिलवे रेडियल गेट्स आहेत आणि त्यांची डिझाइन केलेली स्पिलवे क्षमता ८२१२ क्युमेक आहे.


धरणाच्या गोविंद सागर जलाशयाची एकूण साठवण क्षमता ९६२१ दशलक्ष घनमीटर (एमसीएम) आणि प्रभावी साठवण क्षमता ७१९२ दशलक्ष घनमीटर आहे.

71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


🔹त्याची घोषणा 1 ऑगस्ट 2025 रोजी केली असून याचे वितरण 23 सप्टेंबर 2025 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली या ठिकाणाहून करण्यात आले.


🔹भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ मार्फत दिले जाते.


◽️पुरस्कार विजेत्यांची यादी:


🔹२०२३ च्या ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा 23 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली.


🔹पुरस्कारांसाठी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट श्रेणीत ३३२ प्रवेशिका, नॉन-फीचर चित्रपटांमध्ये ११५, २७ पुस्तके आणि १६ समीक्षकांचे अर्ज आले.


🔹७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 12th fail  सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


🔹'फ्लॉवरिंग मॅन' ला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला तर 'गॉड व्हल्चर अँड ह्युमन' ला सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार मिळाला. दोन्ही चित्रपटांना त्यांचा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.


🔹शाहरुख खान (जवान) आणि विक्रांत मेस्सी (12th fail) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. शारुख खानचा हा त्याच्या कारकिर्दीतील पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे.


🔹राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे मधील तिच्या दमदार अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. हा तिचा पहिलाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहे.


🔹ज्येष्ठ अभिनेते विजयराघवन आणि मुथुपेटाई सोमू भास्कर यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला.



🔹सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट: 12 th Fail


🔹सर्वोत्तम दिग्दर्शन: सुदीप्तो सेन - द केरळ स्टोरी


🔹सर्वोत्कृष्ट अभिनेता: शाहरुख खान ( जवान ), विक्रांत मॅसी ( १२ वी नापास )


🔹सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी - श्रीमती चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे.


🔹सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: विजयराघवन ( पुक्कलम ), मुथुपेट्टाई भास्कर ( पार्किंग )


🔹सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: उर्वशी ( उलोझुक्कू ), जानकी बोडीवाला ( वश )


🔹सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट :श्यामची आई.


🔹सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट : नाळ 2



🔹दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट: आत्मपॅम्फ्लेट.


पद्मश्री

 पद्मश्री 113 व्यक्तींना देण्यात आले असून त्यातील महत्त्वाचे महाराष्ट्राचे व्यक्तिमत्व कोण कोण आहेत त्यावर प्रश्न येऊ शकतो ते पाहूया :


1. अच्युत रामचंद्र पालव- कला 

2.श्रीमती अरुंधती भट्टाचार्य- व्यापार व उद्योग 

3.अशोक लक्ष्मण सराफ- कला 

4. श्रीमती अश्विनी भिडे देशपांडे -कला 

5. चैत्रम देवचंद्र पवार -सामाजिक कार्य

6.श्रीमती जसपिंदर नरुला- कला

7.मारुती भुजंगराव चितमपल्ली- साहित्य व शिक्षण 

8.राणेद्र भानू मुजुमदार -कला  

9.श्री सुभाष खेतुलाल शर्मा- शेती  

10.वासुदेव कामत- कला 

11.विलास डांगरे -औषध .



इतर पद्मश्री विजेते :

हरविंदर सिंग पद्मश्री प्राप्त पहिला पॅरा तिरंदास ठरले.

क्रीडा क्षेत्रातील काही व्यक्तिमत्व 

सत्यपाल सिंह- पॅराॲथिक्स प्रशिक्षक

आर. अश्विन - क्रिकेट 

आय.एम. विजयन -फुटबॉल.


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

09 डिसेंबर 2025 चालू घडामोडी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

१. ११ वा इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिव्हल (IISF) २०२५ खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? – हरियाणा


२. खालीलपैकी कोणाला पहिला FIFA शांतता पुरस्कार मिळाला आहे? – डोनाल्ड ट्रम्प


३. ९६ व्या वर्षी निधन झालेले फ्रँक गेहरी कोण होते? – आर्किटेक्ट


४. भारतीय सैन्याने त्यांची वार्षिक आयडिया आणि इनोव्हेशन स्पर्धा आणि सेमिनार, इन्नो-योधा २०२५ कोणत्या शहरात आयोजित केले होते? – नवी दिल्ली


५. खालीलपैकी कोणत्या महान भारतीयाची ६९ वी पुण्यतिथी ६ डिसेंबर २०२५ रोजी साजरी करण्यात आली? – डॉ. बी.आर. आंबेडकर


६. नीती आयोग आणि आयबीएमने कोणत्या वर्षापर्यंत भारताला टॉप ३ क्वांटम इकॉनॉमी बनवण्यासाठी रोडमॅप जारी केला आहे? – २०४७


७. ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री भारत दर्शन योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? – बिहार


८. भारत आणि कोणत्या देशाने राजस्थानमध्ये हरिमौ शक्ती लष्करी सराव आयोजित केला होता? – मलेशिया


९. भारताने कोणत्या देशासोबत RELOS लॉजिस्टिक्स सपोर्ट करारावर स्वाक्षरी केली आहे? – रशिया


१०. शेतीमध्ये सौरऊर्जेच्या वापरात कोणते राज्य अव्वल स्थानावर आहे? – महाराष्ट्र


११. जेरुसलेम मास्टर्स २०२५ चे विजेतेपद कोणी जिंकले? – अर्जुन एरिगाईसी

पदे व राजीनामा कोणाकडे देतात



अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे

◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे 

◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे

◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे


◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे

◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे

◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे

◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे


◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे

◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे

◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे

◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे


◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे

◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे

◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे

◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे


◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे

◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे

◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे


◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे

◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे

◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे

◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश


◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे

◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्ष