Monday 29 June 2020

भारताचा चीनवर डिजिटल स्ट्राइक… TikTok सह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी


◆ पूर्व लडाखमध्ये झालेल्या रक्तरंजित लष्करी संघर्षानंतर सीमेवर तणाव असून, देशातून चीनला उत्तर देण्याचा सूर उमटत आहे. केंद्र सरकारनं सीमेवरील तणाव निवळण्यासाठी लष्करी चर्चा सुरू केली आहे.

◆ तर दुसरीकडे चिनी अ‍ॅपमधून भारतीयांची माहिती दुसऱ्यांना देशांना पाठवली जात असून, त्यावर बंदी घालण्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी सरकारला दिला होता.

◆ त्या पार्श्वभूमीवर भारताने चीनवर थेट डिजिलट स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ मोदी सरकारनं सोमवारी टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

◆ काही दिवसांपूर्वीच भारतीय गुप्तचर यंत्रणांनी ५२ धोकादायक चिनी अ‍ॅप्ससंदर्भात इशारा दिला होता.

◆ भारत सरकारने या अ‍ॅप्सवर बंदी घालावी किंवा देशातील नागरिकांना ही ५२ चिनी अ‍ॅप्स वापरुन नये असा इशारा यंत्रणांनी दिला होता.

◆ ही ५२ अ‍ॅप्स सुरक्षित नसून, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीयांची माहिती दुसऱ्या देशांमध्ये पाठवली जात आहे असंही यंत्रणांनी म्हटलं होतं.

◆ सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर, एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर यासारख्या अ‍ॅप्सचा समावेश होता.

◆ सीमेवरील तणाव व केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी चिनी अ‍ॅपविषयी दिल्यानंतर केंद्रानं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ भारताचं सार्वभौमत्व व एकात्मता, देशाची सुरक्षा आणि देशातील जनतेचं हित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयानं माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९अ च्या अधिकाराचा वापर करत निर्माण झालेल्या असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.

★ परदेशातील यंत्रणांनीही व्यक्त केला होता धोका

◆ पाश्चिमात्य देशांमधील सुरक्षा यंत्रणांनाही अनेकदा चिनी कंपनीच्या मालकीच्या अ‍ॅप्सच्या वापरासंदर्भातील धोका आणि उघडपणे बोलून दाखवलेला आहे. एखाद्या देशासोबत वाद निर्माण झाल्यास या अ‍ॅप्सच्या माध्यमातून विरोधी देशाची संवाद यंत्रणा निकामी केली जाऊ शकते, असाही एक इशारा या अ‍ॅप्सबद्दल देण्यात आला होता.

महत्त्वाच्या दऱ्या :

काश्मीर दरी- पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रूंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.

कांग्रा दरी- हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

कुलू दरी- रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.

काठमांडू दरी –  नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेस काठमांडू दरी आहे.
शिवालिक रांगा / बाह्य हिमालय – हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग ही शिवालिक रांग आहे. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात. हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला. येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच डून (Doon) असे म्हणतात उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू-काश्मीर), शिवालिक रांगाच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.

हिमालयाचे प्रादेशिक वर्गीकरण

बुरार्ड यांच्या मते हिमालयाचे वर्गीकरण खालील प्रकारे करण्यात आले आहे – १. पंजाब हिमालय २. कुमाऊँ हिमालय ३. नेपाळ हिमालय ४. आसाम हिमालय.
पंजाब हिमालय- सिंधू आणि सतलज नदी दरम्यान पंजाब हिमालयाचा भाग असून याची लांबी ५६० किमी इतकी आहे.

कुमाँऊ हिमालय – सतलज नदी आणि काली नदी यांच्या दरम्यान कुमाँऊ हिमालयाचा भाग असून याची लांबी ३२० किमी इतकी आहे.

नेपाळ हिमालय – काली नदी आणि तिस्ता नदी यांदरम्यान नेपाळ हिमालयाचा भाग असून याची लांबी ८०० किमी इतकी आहे.
आसाम हिमालय – तिस्ता नदी आणि दिहांग नदी यांच्यादरम्यान आसाम हिमालयाचा भाग असून यांची लांबी ७२० किमी इतकी आहे.

पूर्वाचल – पूर्वेकडे दिहांग घळई ओलांडल्यानंतर हिमालय पर्वतरांगा दक्षिणेकडे वक्राकार गतीने वळलेल्या दिसतात. उत्तर दक्षिणेकडे जाताना यांमुळे टेकडय़ांची एक मालिकाच तयार झाली आहे. यामध्ये पुढील उपविभागांचा समावेश होतो – पूर्व-नेफा, नागा रांगा, मणिपूर टेकडय़ा, उत्तर केचर टेकडय़ा, मिझो टेकडय़ा, त्रिपुरा टेकडय़ा.

पूर्व-नेफा: यांमध्ये मिश्मी टेकडय़ा आणि पतकोई रांगा यांचा समावेश होतो.
मिश्मी टेकडय़ा: मिश्मी टेकडय़ांमध्ये पूर्वाचलमधील सर्वात उंच रांगांचा समावेश होतो. येथील अनेक शिखरांची उंची ४५०० मी. पेक्षा अधिक आहे.

नागा रांगा: नागालँड आणि म्यानमार यांदरम्यान, नागा रांगा या जलविभाजक म्हणून कार्य करतात. नागा रांगांच्या पश्चिमेला कोहिमा टेकडय़ा आहेत.

मणिपूर टेकडय़ा: भारत आणि म्यानमारच्या सरहद्दीला लागून मणिपूर टेकडय़ा आहेत. मणिपूर टेकडय़ांमध्ये लोकटॅक  सरोवर आहे. लोकटॅक सरोवरात अभिकेंद्री नदीप्रणाली (Centripetal Drainage) आढळून येते.

सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली.

🔰अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसिजेस कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन म्हणजे सीडीसी या संस्थेने करोनाची आणखी तीन नवीन लक्षणे जाहीर केली आहेत.

🔰त्यामुळे आता एकूण लक्षणांची संख्या बारा झाली आहे. नव्या लक्षणात नाक गळणे, अतिसार, मळमळ यांचा समावेश आहे.

🔰या आधीच्या लक्षणात ताप, अंगाला थंडी वाजून येणे, कफ, श्वास घेण्यात अडचणी, थकवा, स्नायू किंवा अंगदुखी, डोकेदुखी, वास व चव संवेदना जाणे,घसा खवखवणे यांचा समावेश  होता.

🔰2-14 दिवसांत करोनाची लक्षणे दिसतात. त्यात सार्स सीओव्ही 2 विषाणू कारण असतो.

🔰सुरुवातीला श्वासात अडचणी, ताप व कफ ही तीन लक्षणे देण्यात आली होती नंतर त्यात थंडी वाजणे, स्नायुदुखी, डोकेदुखी, घसा धरणे या लक्षणांची भर पडली.
आता करोना रुग्णांची संख्या 1कोटीच्या दिशेने असून 4,99,000 बळी गेले आहेत.

भारताला शस्त्रास्त्र विकू नका, चीनची रशियाला विनंती


🧬पूर्व लडाखसह चीनला लागून असलेल्या ३,४८८ किलोमीटरच्या सीमारेषेवर सध्या मोठया प्रमाणावर तणाव आहे. चीनने पुन्हा आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सध्याचा रशिया दौरा त्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. राजनाथ सिंह यांच्या रशिया दौऱ्यात फायटर विमानांसाठी लागणाऱ्या सुट्टया भागांचा तात्काळ पुरवठा करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

🧬पीपल्स डेलीने रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये असे मत व्यक्त केले आहे. “तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या संवेदनशील काळात रशियाने भारताला शस्त्रास्त्रे देऊ नये. आशियातील हे दोन्ही शक्तीशाली देश रशियाचे जवळचे रणनितीक भागीदार आहेत” असे पीपल्स डेली या वर्तमानपत्राने फेसबुकवरील ‘सोसायटी फॉर ओरियंटल स्टडीज ऑफ रशिया’ या ग्रुपवर लिहिले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

🧬पीपल्स डेली हे चिनी सरकारचे मुखपत्र आहे. रशियाकडून आवश्यक युद्धसाहित्याची खरेदी करुन आपली लष्करी क्षमता अधिक बळकट करण्याचा भारताचा प्रयत्न सुरु असताना चिनी सरकारच्या मुखपत्रातून ही मागणी करण्यात आली आहे. इमर्जन्सीमध्ये खरेदी करण्यासाठी केंद्राने ५०० कोटींचा निधी मंजूर केला आहे.

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

〰〰〰〰📕🔷📕〰〰〰〰
प्रश्न :-१- हिवाळी(शीतकालीन) आॕलिम्पिक स्पर्धांची सुरवात कोणत्या वर्षापासून  झाली ?

१) १८९६
२) १९४८
३) १९२८
४) १९२४✅
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-२- आॕलिम्पिक म्युजियम कोठे आहे ?

१) चीन
२) स्वित्झर्लंड✅
३) रशिया
४) यूरोप
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-३- 'बनाना किक'हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?

१) टेबल टेनिस
२) व्हाॕकी
३) फुटबाॕल✅
४) कबड्डी
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-४- 'ग्राउंड स्ट्रोक' हा शब्द कोणत्या खेळा संबंधित आहे ?

१) टेबल टेनिस✅
२) व्हाॕकी
३) डाॕज बाॕल
४) बेसबाॕल
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-५- 'अमेरिका कप'हा  कोणत्या खेळा संबंधितआहे ?

१) टेबल टेनिस
२) व्हाॕली बाॕल
३) बास्केट बाॕल✅
४) बेसबाॕल
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-६- 'चायना कप' हा  कोणत्या खेळा संबंधितआहे ?

१) जिम्नास्टिक✅
२) पोलो
३) गोल्फ
४) शतरंज
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-७- गोळा फेक मैदानामध्ये फेक प्रदेशाचा वर्तुळातील कोण किती अंश असतो ?

१) ३५.६५°
२) ४०°
३) ३४.९२°✅
४) ४५°
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-८- सवाई मानसिंह स्टेडियम कोठे आहे ?

१) जयपूर✅
२) कोलकत्ता
३) मुंबई
४) विशाखापट्टन
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-९- अष्टांग योग चे प्रथम अंग कोणते आहे ?

१) आसन
२) प्राणायाम
३) नियम
४) यम✅
〰️〰️〰️〰️📕🔹📕〰〰️️〰️〰️
प्रश्न :-१०- 'अंजली भागवत'ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

१) टेनिस
२) जिम्नास्टिक
३) रायफल शुटिंग✅
४) अॕथेलॕटिक्स

➖➖➖➖📗🔷📗➖➖➖➖

जाणून घ्या विषाणू व होणारे आजार

💁‍♂️ *आजार व विषाणू*

● *गोवर (मिझल)* : गोवर विषाणू

● *इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)* : Influenza virus (A,B,C)

● *कावीळ* : Antaro virus (A,B,C,D,E,G)

● *पोलिओ* : पोलिओ विषाणू

● *जापनीज मेंदूज्वर* : Arbo-virus

● *रेबिज* : लासा व्हायरस

● *डेंग्यू* : Arbo-virus

● *चिकुनगुन्या* : Arbo-virus

● *अतिसार* : Rata virus

● *एड्स* : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)

● *देवी* : Variola Virus

● *कांजण्या* : Varicella zoaster

● *सर्दी* : सर्दीचे विषाणू

● *गालफुगी* : Paramixo virus

● *जर्मन गोवर* : Toza virus

पोलीस भरती प्रश्नसंच

मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

१.उत्तराखंड 🏆
२.जम्मू काश्मीर
३.सिक्किम
४.उत्तर प्रदेश

२.भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?

१.बेट
२.त्रिभुजप्रदेश
३.द्वीपकल्प 🏆
४.मैदानी प्रदेश

3. केदारनाथ कोणत्या राज्यात आहे?

१. उत्तर प्रदेश
२. हिमाचल प्रदेश
३. उत्तराखंड 🏆
४. जम्मू-काश्मीर

४. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

१. ०२ वर्ष
२. ०४ वर्ष
३. ०५ वर्ष
४. ०६ वर्ष🏆

५) भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली ?

१. पुणे
२. हैदराबाद
३. चेन्नई
४. मुंबई🏆

६) मार्च 2019 मध्ये खालील पैकी कोणत्या माझी आरबीआय गव्हर्नर ला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?

१.  मनमोहनसिंग
२.  रघुराम राजन🏆
३.  विमल जलान
४.  उर्जित पटेल

७) चांद्रयान-१ हे भारताचे पहिले मिशन टु मुन...... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले?

१. जानेवारी - २००७
२. ऑक्टोबर- २००८🏆
३. सप्टेंबर-  २०११
४. ऑक्टोबर -२०१२

८) ऑक्टोबर 2018 मध्ये वर रुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले ?

१. अरबी समुद्र 🏆
२. बंगालचा उपसागर
३. पॅसिफिक महासागर
४.  हिंदी महासागर

९) लोरियस स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2019 पुरस्कार कोणी जिंकला?

१. नोवाक जोकोविक🏆
२.  रॉजर फेडरर
३. राफेल नदाल
४.टायगर वूड्स

१०) मुलभूत कर्तव्य संदर्भात तरतुदी भारतीय घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे?

१. भाग -२
२. भाग -३
३. भाग -४
४. भाग -४अ🏆

११) 'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?

१. स्वामी दयानंद सरस्वती🏆
२. स्वामी विवेकानंद
३. राजाराम मोहन राय 
४. स्वामी परमहंस

१२) आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
१. क्षय
२.  डायरिया
३. ॲनिमिया🏆
४. बेरीबेरी

१३) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?

१.  लॉर्ड मिंटो
२. लॉर्ड कर्झन🏆
३. लॉर्ड रिपन
४. लॉर्ड डलहौसी

१४) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?

१. महात्मा फुले
२. सावित्रीबाई फुले
३. लोकमान्य टिळक
४.वि.रा. शिंदे 🏆

१५)दिल्ली ही भारताची राजधानी केव्हापासून झाली?

👍 12 डिसेंबर 1911

Latest post

चालू घडामोडी :- 13 मे 2024

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ कुवेतचे नवे अमीर शे...