02 May 2020

प्रश्न मंजुषा

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद 🚔
४) नरेंद्र मोदी

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)🚔
२) CH4
३) NO2
४) CO2

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८🚔
३) २०१३
४) २०१८

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा 🚔
३) २ वेळा
४) ५ वेळा

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर🚔
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  🚔

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028🚔
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  🚔
४) कलकत्ता

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका 🚔
४) दक्षिण आफ्रिका

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  🚔
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा 🚔
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे 🚔
४) स्मिता कोल्हे

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५०  🚔
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो 🚔
४) शरद पवार

१६) बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ?

१) अश्वघोष 🚔
२) नागार्जुन
३) वलुनिय
४) नागसेन

१६) स्वातंत्र्य आधी भारतात कोणत्या राज्यात विधानपरिषद अस्तित्वात होती ?
माफ करा या प्रश्नाचे उत्तर

उत्तर:-आसाम

_________

महाराष्ट्र दिन विशेष: जाणून घेऊया आपला महाराष्ट्र


◾️ महाराष्ट्र हे आकारामानानुसार देशातील तीसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ लोकसंख्येच्या👩‍👩‍👧‍👦 बाबतीत देशातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.

◾️ २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वात श्रीमंत राज्य आहे.💰💰

◾️ देशातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. १६ एप्रिल १८५३🚂🚃 रोजी पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाण्यादरम्यान धावली.

◾️ महाराष्ट्रातील नवी मुंबई हे जगातील सर्वात मोठं नियोजित शहर 🏬🏢आहे

◾️ महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रस्ते🛤🛣 असणारे राज्य आहे.

◾️ ऐतिहासिक संदर्भांमधून इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून महाराष्ट्राबद्दल माहिती मिळते.

◾️ महाराष्ट्राची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर आहे.

◾️ महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे २०१४ साली अस्तित्वात आलेला पालघर हा सर्वात नवीन जिल्हा.

◾️ एकूण राष्ट्रीय औद्योगिक 🏭 उत्पन्नापैकी १३ टक्के उत्पन्न एकट्या महाराष्ट्रातून होते.

◾️ माहाराष्ट्रातील ३३,५०० चौ.कि.मी. जमीन सिंचनाखाली🌾 आहे.

◾️ भारतातील सर्वात मोठा व आशियातील सर्वात जुना शेअर 💰बाजार मुंबईत आहे.

◾️ कोळसानिर्मित 🧱व अणुनिर्मित🛢 वीज या क्षेत्रात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक लागतो.

◾️ महाराष्ट्राला ७२० किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे.

◾️ राज्याचा सर्व भाग मान्सून प्रकारच्या हवामानाच्या पट्ट्यात मोडतो.☀️🌧🌪

◾️ मुंबई-पुणे द्रुतगतीमार्ग हा भारतातील सर्वात पहिला टोलमार्ग आहे.

◾️ औरंगाबाद शहर हे प्रवेशद्वारांचे शहर ⛩ ओळखले जाते. या शहराभोवती एकूण ५२ प्रवेशद्वार बांधण्यात आले होते

◾️ युनिस्कोने जागतिक वारसा हक्क म्हणून जाहीर केलेल्या जागांपैकी चार जागा महाराष्ट्रात आहेत.
📌 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस,
📌 अजंठा लेणी,
📌 वेरुळ लेणी आणि
📌 एलिफंटा लेण्यांच्या यामध्ये समावेश आहे.

◾️ शेखरु म्हणजेच Indian giant squirrel 🐿 या प्राण्याला महाराष्ट्राने राज्य प्राण्याचा दर्जा दिला आहे.

◾️  हिरव्या कबुतराला म्हणजेच Green Imperial Pigeon 🕊 राज्य पक्षाचा दर्जा देण्यात आला आहे.

◾️ महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये सहा राष्ट्रीय अभयारण्ये आहेत.🐅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तिसरा लॉकडाउन : आणखी दोन आठवडे टाळेबंदी, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

📌देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे.

📌 ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण होणार होता. त्यापूर्वीच पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याची घोषणा सरकारनं केली आहे.

📌या काळात विमान आणि रेल्वे वाहतूक सुरू करण्यात येणार नसल्याचेही केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे.

📌दरम्यान, हा लॉकडाउन लागू करताना सरकारनं ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सशर्त काही  सवलती देण्यात येतील.

📌 परंतु रेड झोनमध्ये कोणत्याही भागांना  कोणतीही सवलत देण्यात येणार नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.

📌 रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन्ससाठी नव्या गृहमत्रालयानं काही नव्या गाईडलाइन्सही जारी केल्या आहेत.

📌ग्रीन झोन्समध्ये करोनाचा एकही रुग्ण नाही किंवा २१ दिवसांमध्ये करोनाचा एक नवा रुग्ण सापडला नाही, अशा भागांचा समावेश करण्यात आला आहे.

📌तसंच ज्या जिल्ह्यांचा समावेश रेड किंवा ग्रीन झोनमध्ये नसेल ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये सामिल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान; निवडणूक कार्यक्रम जाहीर


त्यानुसार येत्या २१ मे रोजी विधान परिषदेची निवडणूक होणार आहे.

राज्यात विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त असून या जागांसाठी २१ मे रोजी मतदान होत आहे.

*निवडणुकीसाठी*

✅ ४ मे 🔜 पासून नामांकन प्रक्रिया सुरू होणार असून ११ मेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारता येणार आहे.

✅ १२ मे 🔜 रोजी अर्जांची छाननी होणार आहे.

✅ १४ मे 🔜 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

✅ २१ मे 🔜 रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होईल.

✅ 21 मे 🔜 त्याच दिवशी मतमोजणी होणार असून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.

✅ २७ मेच्या आत विधिमंडळाच्या दोन्ही पैकी एका सभागृहाचं सदस्य होणं मुख्यमंत्री यांना बंधनकारक असल्यामुळे पेच निर्माण झाला होता.

विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या नसत्या तर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं असतं.