28 October 2025

चालू घडामोडी :- 27 ऑक्टोबर 2025



◆ अरुणांक प्रकल्प सीमा रस्ते संघटना (BRO) या संस्थेचा उपक्रम आहे.

◆ भारताने 2025 मध्ये पाकिस्तानच्या पश्चिम सीमेवर त्रिसेवा युद्धाभ्यास 'त्रिशूल' सुरू केला आहे. [या युद्धाभ्यासात लष्कर, नौदल आणि 
हवाई दल सहभागी आहेत.]

◆ भारतीय तटरक्षक दलाने (ICG) ICGS अजित आणि ICGS अपराजित या अत्याधुनिक फास्ट पेट्रोल व्हेसल्स 24 ऑक्टोबर 2025 रोजी गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये (GSL) जलावतरण करण्यात आल्या आहेत.

◆ भारतीय स्टेट बँकेला (SBI) न्यूयॉर्कस्थित ग्लोबल फायनान्स कडून 'World's Best Consumer Bank 2025' आणि 'Best Bank in India 2025' हे दोन पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

◆ संयुक्त राष्ट्र (UN) निरस्त्रीकरण सप्ताह दरवर्षी 24 ते 30 ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो.

◆ 2025 मध्ये, तिमोर-लेस्टे (पूर्व तिमोर) या देशाला औपचारिकरित्या दक्षिणपूर्व आशियाई राष्ट्रांच्या संघटनेत (ASEAN) अकरावा सदस्य म्हणून सामील करून घेण्यात आले आहे.

◆ स्वस्त आणि मध्यम उत्पन्न गटासाठीच्या घरांसाठी (SWAMIH) इन्व्हेस्टमेंट फंडला वित्त मंत्रालय ने प्रायोजित केले आहे.

◆ अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन (ANRF) ने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) आणि गेट्स फाउंडेशन यांच्या सहकार्याने MAHA MedTech Mission सुरू केले आहे.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 वर्षाला "आसियान-भारत सागरी सहकार्य वर्ष" म्हणून जाहीर केले.

◆ भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025, 30 ऑक्टोबर 2025 पासून नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणार आहे.

◆ संयुक्त राष्ट्र (UN) दरवर्षी 24 ते 31 ऑक्टोबर दरम्यान जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता (MIL) सप्ताह साजरा करतो.

◆ जागतिक मीडिया आणि माहिती साक्षरता (MIL) सप्ताहाची 2025 ची थीम "Minds Over AI - MIL in Digital Spaces" आहे.

◆ बंगालच्या उपसागरात तयार झालेले मोंथा चक्रीवादळाला "मोंथा" हे नाव थायलंडने सुचवले होते.