14 August 2025

वेदोक्त प्रकरण


1899 साली हे प्रकरण कोल्हापूरामध्ये घडले. कार्तिक महिन्यात शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. यावेळेस त्यांच्या परिवारातले काही सदस्य बंधू बापूसाहेब महाराज, मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्यावेळेस मंत्र म्हणणारे नारायण भटजी असत.


एकेदिवशी महाराजांचे स्नेही आणि प्रकांड पंडित राजारामशास्त्री भागवतही होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.


त्यांनी हे महाराजांच्या लक्षात आणून दिलं. महाराजांनी भटजींना विचारताच त्यांनी शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात असं उत्तर दिलं.


हे उत्तर शाहू महाराजांसाठी एक मोठ्या विचारमंथनाचं कारण ठरलं. त्या वाक्यानं ते अंतर्मूख तर झालेच त्याहून पुढील मोठ्या सामाजिक चळवळीसाठी सिद्ध झाले.


क्षत्रियकुलावतंस हिंदुपदपातशहा असं बिरुद लावणाऱ्या राजालाही दर्जा मिळत नसेल तर बाकी लोकांवर काय अन्याय होत असेल याची त्यांना जाणीव झाली.


वेदोक्ताचं असं प्रकरण उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळीही असा वाद निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी काशीहून गागाभट्टांना बोलावून राज्याभिषेक करवून घेतला होता.


साताऱ्याचे महाराज प्रतापसिंह यांच्या कार्यकाळातही वेदोक्ताधिकाराचा तंटा निर्माण झाल्यावर त्यांनी पंडितांची एक निर्णयसभा बोलावली आणि त्यामध्ये मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध होऊन त्यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य केला गेला.


1896 साली बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांच्याकडील धार्मिक विधी महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिल्यावर सयाजीरावांनी राजस्थानी आणि गुजराती ब्राह्मणांकरवी ते करवून घेतले होते.


या वेदोक्त प्रकरणाचे पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात न पडते तरच नवल. यातून एकप्रकारचा संघर्षच निर्माण झाले. महाराष्ट्रातील तत्कालीन वर्तमानपत्रांतून, सभा-भाषणांतून त्याची दोन्ही बाजूंनी चर्चा होऊ लागली.


ऑक्टोबर 1901 मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरीमध्ये वेदोक्ताचे खूळ या नावाचे दोन अग्रलेख लिहिले. त्यातून त्यांनी वेदोक्तातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती थोडक्यात अशी होती, “या युगात ब्राह्मण व शूद्र असे दोनच वर्ण राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्यावर मोहिती होऊन तत्कालीन कर्त्या पुरुषांनी खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करुन गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला; पण त्यावेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही.”


नवा राजवाडा, कोल्हापूर

छत्रपतींच्या भोसले घराण्याशिवाय इतर घराण्यांना वेदोक्ताचा अधिकार नाकारणं हे शाहू महाराजांना अस्वस्थ करणारं होतं. आधी फक्त आपल्यापुरते राजवाड्यासाठी वेदोक्ताचा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी समस्त मराठ्यांना हा अधिकार मिळावा असा आग्रह धरला आणि तसेही प्रयत्नही केले.


पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातीतींल मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले.


ज्या ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्यास नकार दिला त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.


संस्थानचे राजोपाध्यांचे राजसेवेसाठी दिलेले 30 हजारांचे इनाम जप्त करण्यात आले. करवीरच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे 50 हजार रुपयांचे उत्पन्न सरकारजमा करण्यात आले. इतरही शेकडो ब्राह्मणांची उत्पन्नं आणि इनाम सरकारजमा करण्यात आले.


हे प्रकरण कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलपर्यंतही गेले. वेदोक्ताचा अधिकार कोणाला द्यायचा यावर चर्चा, टीका घडत राहिली. 1905 साली डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर सभेतील ठरावात महाराजांचे क्षत्रियत्व आणि त्यांना वेदाधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण निवळले.

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स



1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स 

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय 

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज 

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई 

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे

75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी 

● मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे

: पार्श्वभूमी
• मराठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रचून शिवाजी राजे १६७४ मध्ये पहिले छत्रपती बनले. छत्रपती शिवाजी राज्यांच्या मृत्यूनंतर कनिष्ठ पुत्र राजारामांना गादीवर बसविण्याचा कट उधळून देऊन या संभाजी राजे (१६८०-१६८९) मराठी राज्याचे दुसरे छत्रपती
बनले.

• संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी येसूबाईंनी विश्वासू सरदारांशी चर्चा करून व मराठे शाहीवरचे संकट बाळाजीने ओळखून राजाराम राज्यांना नजर कैदेतून मुक्त करून त्यांना गादीवर बसविले. ‘राजा सलामत तर राज्य सलामत’ या हेतूने
मराठ्यांनी १६८९ मध्ये सुरक्षेसाठी राजारामांना कर्नाटकातील जिंजीस पोहोचविले. मुघलांनी राणी येसूबाई व बाल शाहू यांना कैद केली. १६९७ मध्ये राजाराम महाराष्ट्रात परतल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा २ मार्च, १७०० रोजी वयाच्या केवळ ३० व्या वर्षी मृत्यू झाला.

• राजारामाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाईंनी आपला साडेतीन-चार वर्षाचा मुलगा शिवाजी यास गादीवर बसवून स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व आपल्या हाती घेतले.

 छ.शाहू राजे यांची सुटका व राज्यारोहण

• औरंगजेबच्या मृत्यूनंतर बहादूरशाहने शाहू राजांना मुक्त केले. बाजीरावाने ताराबाईंनी शाहूंच्या हाती मराठेशाहीची सत्ता देण्यास नकार दिला. ताराबाईंचा सेनापती धनाजी जाधव यांनी ऐनवेळी शाहूंची बाजू घेतली. या गृहयुद्धातून झालेल्या खेडच्या युद्धात
(१२ ऑक्टोबर, १७०७) ताराबाईंचा पराभव झाला. शाहू राजांनी सातारचा किल्ला सर करून १२ जानेवारी, १७०८ मध्ये राज्याभिषेक करून राज्यारोहण केले. ते मराठ्यांचे चौथे छत्रपती बनले. ताराबाईंनी कोल्हापूरला मराठ्यांची दुसरी गादी
निर्माण केली. या दोघांमधील यादवी १७३१ च्या वारणेच्या तहापर्यंत चालू राहिली.

● पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२)

 कारणे व महत्त्वाच्या घटना

• बॉम्बे सरकारला महाराष्ट्रात क्लाईव्हने बंगालमध्ये स्थापन केलेल्या दुहेरी शासनव्यवस्थेची स्थापन करण्याची इच्छा होती. पेशवेपदासाठीच्या सत्ता संघर्षाने त्यांना संधी प्राप्त झाली.

• माधवरावांच्या मृत्यूनंतरचा सत्ता संघर्ष: पेशवेपदाची इच्छा असलेल्या रघुनाथरावांनी (माधवरावांचा काका) पेशवा नारायणराव (माधवरावांचा भाऊ) याचा खून घडवून आणला व स्वत:स पेशवा घोषित केले. तेव्हा मराठा दरबारातील नाना फडणीस, महादजी शिंदे, सखाराम बापू वगैरे बारा व्यक्तींनी राघोबाच्या विरोधात बारभाईंचे राजकारण केले. त्यांनी राघोबाला पदच्युत केले व नारायणरावांच्या नुकत्याच झालेल्या मुलाला सवाई माधवराव असे नाव देऊन त्याला पेशवा बनविले व त्याच्या वतीने हे बाराजण राज्यकारभार पाहू लागले.

•राघोबाने गेलेले पेशवेपद मिळविण्यासाठी बॉम्बे प्रेसिडन्सीशी ‘सुरतचा तह’ (१६ मार्च, १७७५) रोजी केला. त्यामुळे युद्धास सुरूवात झाली.

• मात्र सुरतचा तह कलकत्त्याच्या गव्हर्नर-जनरलला पसंद पडला नाही. त्याने बॉम्बे सरकारला मराठ्यांची नवीन तह करायला सांगितले. दीर्घ चर्चेनंतर बॉम्बे सरकारने पुणे दरबारातील शासक गटाशी मार्च १७७६ मध्ये ‘पुरंदरचा तह’ केला. या तहामुळे युद्ध तात्पुरते थांबले. या तहाद्वारे राघोबाला मराठ्यांच्या स्वाधीन
करायचे ठरले व त्याने केलेले पूर्वीचे तह रद्द करण्यात आले.

• मात्र हा तह मुंबईच्या इंग्रजांना नुकसानकारक वाटला. तसेच कंपनीच्या संचालकांनाही तो पसंत पडला नाही. अमेरिकन वसाहती गमावल्याने आता इंग्रजांनी पुन्हा राघोबाची बाजू घेऊन मराठ्यांशी युद्ध सुरू केले. पण पुण्याकडे राघोबाला घेऊन येणाऱ्या इंग्रजांचा महादजी शिंदेंनी तळेगाव येथे पराभव
करून त्यांना ‘तळेगावचा तह’ (१७७९) मान्य करावयास लावला.

• हा तह इंग्रजांनी अमान्य केल्यावर त्यांचा निर्णायक पराभव करण्यासाठी नाना फडणीसाने पेशवे, नागपूरकर भोसले, हैदर अली व निझाम यांचा ‘चतुःसंघ’ इंग्रजांविरूद्ध उभा केला. मात्र धुर्त इंग्रजांनी निझाम व भोसल्यांना फितविले. तसेच गोद्दार्ड
याच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याहून मोठे सैन्य मराठ्यांविरूद्ध पाठविले.

• दोन वर्षे युद्ध असेच चालू राहिले. इंग्रजांनी महादजींकरवी शांततेचा प्रस्ताव मांडला. हैदर न विचारता मराठ्यांनी ‘साल्बाईचा तह’ करून ७-८ वर्षे चाललेले युद्ध संपुष्टात आणले.

● साल्बाईचा तह, १७ मे, १७८२

• साल्बाई या ग्वाल्हेरपासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी महादजी शिंदे (पेशव्यांच्या वतीने) व इंग्रज यांमध्ये हा तह १७ मे, १७८२ रोजी करण्यात आला व पहिले इंग्रजमराठा युद्ध थांबले. या तहाच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्याः

– १)साष्टी, भडोच, मुंबई इंग्रजांकडेच राहतील, तर पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेली ठाणी मराठ्यांना परत केली जातील.
– २)इंग्रजांनी राघोबाची बाजू घेऊ नये.
– ३)इंग्रजांना त्याच्या व्यापारी सवलती पुन्हा प्राप्त होतील.
– ४)दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या दोस्त राज्यांवर हल्ला करायचा नाही.तसेच पेशव्यांनी इतर युरोपीयन शक्तींना मदत करायची नाही.

● महत्व

• हा तह इंग्रजांसाठी खूप महत्वाचा ठरला. खरे तर, तो इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या इतिहासात एक महत्वाचे वळण (turning point) ठरला. या तहामुळे इंग्रजांची मराठ्यांशी २० वर्षे शांतता प्रस्थापित झाल्याने या काळात त्यांनी आपली शक्ती
वाढविली व मराठ्यांव्यतिरिक्त इतर शबूंचा एक-एक करून पराभव केला. नाना फडणीसाला हा तह हैदरच्या मान्यतेशिवाय करायचा नव्हता. त्यामुळे महादजी व नाना यांच्या फूट पडली, तसेच मराठे व हैदर यांचे संबंधही बिघडले.

● दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५)

● कारणे

• १)लॉर्ड वेलस्लीचे मराठ्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे आक्रमक धोरण. त्याला मराठ्यांवर तैनाती फौजेचा तह लादायचा होता.

• २)सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर १७९५ मध्ये राघोबाचा अकार्यक्षम व कर्तव्यशून्य असा मुलगा दुसरा बाजीराव यास पेशवेपद मिळाले. १८०० मध्ये नाना फडणीसाचा मृत्यू झाला व ‘मराठेशाहीतील सारे शहाणपण संपले’. १८ व्या शतकाच्याअखेर पर्यंत अनेक हुशार, मुत्सद्दी व अनुभवी मराठी राजकारण्यांचा मृत्यू झाला होता.

• ३)मराठा सरदारांमधील दुफळी: दौलतराव शिंदे व यशवंतराव होळकर यांच्यातील यादवी. बाजीरावाची होळकरांविरूद्ध शिंद्यांना मदत, यशवंतराव होळकरांनी केलेला पेशवे व शिंदे यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव. या पराभवामुळे बाजीरावाने
संरक्षणासाठी इंग्रजांकडे धाव घेतली व १३ डिसेंबर, १८०२ रोजी ‘वसईचा तह करून इंग्रजांची तैनाती फौज पदरी ठेवण्याचे मान्य करून इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारले.

• ४)वसईच्या तहामुळे इंग्रजांना पेशव्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्राप्त झाला. मात्र इतर मराठा सरदारांनी तहास मान्यता देण्यास नकार दर्शविल्याने दुसऱ्या युद्धास तोंड फुटले.

● महत्त्वाच्या घटना

• १८०३ मध्ये ऑर्थर वेलस्लीने शिंदे-भोसले यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव केला व त्यांच्या तैनाती फौजेचे पुढील तह केले:

१) १७ डिसेंबर, १८०३ रोजी रघुजी भोसले यांच्या बरोबर ‘देवगावचा तह’ केला. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यास भोसल्यांच्या दरबारात रेसिडेन्ट म्हणून नेमण्यात आले.

२) ३० डिसेंबर, १८०३ रोजी दौलतराव शिंदे यांच्या बरोबर ‘सुर्जी अर्जनगावचा तह’ केला. जॉन माल्कम यास शिंद्यांच्या दरबारात रेसिडन्ट म्हणून नेमण्यात आले.

• होळकरांविरूद्ध मात्र इंग्रजांना यश मिळू शकले नाही. शेवटी २४ डिसेंबर, १८०५ रोजी यशवंतराव होळकरांबरोबर इंग्रजांनी ‘राजपूरघाटचा तह’ हा शांततेचा तह केला.

• अशाप्रकारे दुसऱ्या इंग्रज- -मराठा युद्धात भोसले, शिंदे, होळकर यांच्यासारख्या मातब्बर सरदारांना इंग्रजांनी पराभूत केले. भारतात कंपनीची सत्ता सर्वश्रेष्ठ शक्ती (Paramount Power) बनली.

● तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८१७-१८१८)

• कारणे

• आपण एकटे पडलो आहोत याची जाणीव दुसऱ्या बाजीरावाला झाली. त्याने इंग्रजांच्या जोखडातून सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपले स्वातंत्र्य नष्ट झाल्याने मराठा सरदारांमध्यही असंतोष होता.

• गायकवाडांच्या गंगाधरशास्त्रींच्या खूनात बाजीरावाचा व त्याचा सल्लागार त्र्यंबकजी डेंगळे यांचा हात असल्याचा आरोप करून इंग्रजांनी बाजीरावावर जून १८१७ मध्ये ‘पुणे तह’ हा एक
कडक तह लादला, जो वसईच्या तहाला पूरक म्हणून
लादण्यात आला. या तहाने बाजीराव निव्वळ एक संस्थानिक बनला.

• लॉर्ड हेस्टिंगने पिंडाऱ्यांचा बंदोबस्त करण्यापूर्वी त्यासाठी शिंद्यांची मदत घेण्यासाठी दौलतराव शिंदेबरोबर नोव्हेंबर, १८१७ मध्ये ‘ग्वाल्हेरचा तह’ केला. तसेच दुसऱ्या मल्हारराव होळकरांबरोबरच जानेवारी, १८१८ मध्ये ‘मंदासोरचा तह’ केला.

• पुणे तहाच्या विरूद्ध बाजीरावाने बापू गोखलेच्या साहाय्याने लढण्याचे ठरविले. ५ नोव्हेंबर, १८१८ रोजी निर्णायक असे तिसरे युद्ध खडकी येथे सुरू झाले. युद्धात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीरावाने शरणागती पत्करली. त्याच्या बरोबर इतर मराठा सरदार घराणीही इंग्रजांच्या अंकित आले.

• इंग्रजांनी बाजीरावास पेन्शन देऊन त्यास कानपूरजवळ बिठूर येथे रवाना केले. पेशव्यांचा सर्व प्रदेश ताब्यात घेतला.

TCS पॅटर्न अत्यंत महत्वाचे


✨ 'ब्रह्म समाज' ची स्थापना केव्हा झाली - इ.स. 1828.


✨ 'ब्रह्म समाज' ची स्थापना कोणी आणि कुठे केली - कलकत्ता येथे, राजा राममोहन रॉय


✨ आधुनिक भारतातील हिंदू धर्मात सुधारणा करण्याची पहिली चळवळ कोणती होती - ब्राह्मो समाज


✨ सती प्रथेला आणि इतर सुधारणांना विरोध करणारी ब्राह्मसमाजाची विरोधी संघटना कोणती- धर्मसभा


✨ धर्मसभेचे संस्थापक कोण होते - राधाकांता देव


✨ सती प्रथा कधी संपली - इ.स. 1829.


✨ सती प्रथेच्या शेवटी कोणाचा प्रयत्न सर्वात जास्त होता - राजा राममोहन रॉय


✨  'आर्य समाजाची ' स्थापना केव्हा झाली - इ.स. 1875, मुंबई


✨ आर्य समाजाची स्थापना कोणी केली - स्वामी दयानंद सरस्वती


✨ आर्य समाज कशाच्या विरोधात आहे - धार्मिक विधी आणि मूर्तीपूजा


✨ 19 व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला मानले जाते - राजा राममोहन रॉय


✨ राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कुठे झाला- राधानगर, जिल्हा वर्धमान


✨ स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते- मूळशंकर


✨ राजा राममोहन रॉय इंग्लंडला गेल्यानंतर ब्राह्मसमाजाची सूत्रे कोणी हाती घेतली - रामचंद विद्वागीश


✨ ज्यांच्या प्रयत्नाने ब्राह्मोसमाजाची मुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रासमध्ये पसरली - केशवचंद्र सेन


✨ 1815 मध्ये कलकत्ता येथे 'आत्मीय सभा'   स्थापन करणारे - राजा राममोहन रॉय


✨ राजा राममोहन रॉय आणि डेव्हिड हेअर हे हकीस संस्थेशी संबंधित होते- हिंदू कॉलेज


✨ थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कोठे झाली - 1875 एडी, न्यूयॉर्कमध्ये


✨ भारतामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कोठे झाली - 1882, अड्यार, मद्रास येथे


✨ 'सत्यर्थ प्रकाश' कोणी रचला - दयानंद सरस्वती


✨ 'वेद की बहुत' चा नारा कोणी दिला - दयानंद सरस्वती


✨ जेव्हा 'रामकृष्ण मिशन' ची स्थापना झाली - इ.स. 1896-97, बैलूर (कलकत्ता)


✨ 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना कोणी केली - स्वामी विवेकानंद


✨ अलीगड चळवळ कोणी सुरू केली - सर सय्यद अहमद खान


✨ अलीगड मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली- सर सय्यद अहमद खान


✨ 'यंग बंगाल' चळवळीचा नेता कोण होता - हेन्री व्हिव्हियन डेरोजिओ


✨ सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते - ज्योतिबा फुले


✨ भारताबाहेर कोणत्या धर्मसुधारकाचा मृत्यू झाला - राजा राममोहन रॉय


✨ वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र कोठे होते- पाटणा


✨ जेव्हा भारतात गुलामगिरी बेकायदेशीर घोषित करण्यात आली - 1843 


✨ भारतातील इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था कोणाकडून होती - विल्यम बेंटिक यांनी


✨ 'संपूर्ण सत्य वेदांमध्ये सामावलेले आहे' हे विधान कोणाचे - स्वामी दयानंद सरस्वती


✨ 'महाराष्ट्राचा सॉक्रेटिस' कोणाला म्हणतात - महादेव गोविंद रानडे


✨ विश्व धर्म परिषदेत विवेकानंद कुठे प्रसिद्ध झाले - शिकागो


⚫️ 'संवाद कौमुदी'चे संपादक कोण होते - राजा राममोहन रॉय


⚫️ 'तत्व रंजिनी सभा', 'तत्व बोधिनी सभा'   आणि 'तत्वबोधीन पत्रिका' यांचा संबंध - देवेंद्र नाथ टागोर


⚫️ 'प्रार्थना सोसायटी'ची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली - केशवचंद्र सेन


⚫️ महिलांसाठी 'वामा बोधिनी' हे मासिक कोणी काढले - केशवचंद्र सेन


⚫️ शारदामणी कोण होती - रामकृष्ण परमहंस यांची पत्नी


⚫️ 'कुका आंदोलन' कोणी सुरू केले - गुरु राम सिंह


⚫️ 1956 मध्ये कोणता धार्मिक कायदा संमत झाला - धार्मिक अपात्रता कायदा


⚫️ महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकाला 'लोकहितवादी' म्हणतात - गोपाळ हरी देशमुख


⚫️ ब्राह्मसमाज कोणत्या तत्त्वावर आधारित आहे - एकेश्वरवाद


⚫️ 'देव समाज' कोणी स्थापन केला - शिवनारायण अग्निहोत्री


⚫️ 'राधास्वामी सत्संग' चे संस्थापक कोण आहेत - शिवदयाल साहेब


⚫️ फॅव्हियन चळवळीचे समर्थक कोण होते - अॅनी बेझंट


⚫️ 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात सुरू झालेली चळवळ कोणती होती - अहरार


⚫️ गोपाळ कृष्ण गोखले यांनी 'भारत समाज सेवक' ची स्थापना केव्हा व कोणी केली - इ.स. 1905


⚫️शीख गुरुद्वारा कायदा केव्हा पास झाला - 1925 


⚫️ रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय होते - गदाधर चट्टोपाध्याय


⚫️डॉ. अॅनी बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा केव्हा बनल्या - 1917 


⚫️शिकागो जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद कधी सहभागी झाले - 1893 


⚫️ 'प्रिसेप्टस ऑफ जीझस' कोणी रचला - राजा राममोहन रॉय


⚫️राजा राममोहन रॉय यांचे कोणते पर्शियन पुस्तक होते, जे 1809 मध्ये प्रकाशित झाले होते - तुहफतुह-उल-मुवाहिदीन


⚫️वेदांत महाविद्यालयाची स्थापना कोणी केली - राजा राममोहन रॉय


⚫️ राजा राममोहन रॉय यांना 'युग दूत' कोणी म्हटले - सुभाषचंद्र बोस


रक्तपट्टीका



🔻आकार द्विबहिर्वक्र व रंगहीन

🔻सस्तन प्राण्यातच आढळतात

🔻कद्रक नसते व अतिशय लहान

🔻5 ते 10 दिवस जगतात

👉अस्थीमज्जा मध्ये तयार होतात

👉रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात

👁‍🗨यांना Thrombocytes म्हणतात

👁‍🗨डग्यू मलेरिया मध्ये यांचे प्रमाण कमी होते


🔰लाल रक्त पेशी🔰

🔘गोलाकार व द्विअंतरावर्क असतात

🔘कद्रक नाही

🔘आकाराने खूप लहान

🔘हिमोग्लोबीन मुळे लाल रंग

🔘सत्री मध्ये प्रमाण कमी

🔘127 दिवस जगतात

🔘पलिहा मध्ये मरतात

👉गर्भात यकृत मध्ये तयार होतात

👉परौढ माणसात अस्थी मज्जा मध्ये तयार होतात

👉यांना Erythrocytes म्हणतात



🔴पांढऱ्या पेशी🔴

👁‍🗨आकाराने मोठ्या,अमिबासदृश

👁‍🗨कद्रक असते व रंगहीन

👁‍🗨3 ते 4 दिवस जगतात

👁‍🗨अस्थीमज्जा व प्लिहा मध्ये तयार

👁‍🗨5000 ते 11000 प्रति घनमिमी असतात

👉आजारामध्ये यांची संख्या वाढते

👉यांना Leucocytes म्हणतात

भास्करराव विठोजीराव जाधव

◾️भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे

◾️ रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते

◾️मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते

◾️महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले. 

◾️पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. 

◾️दुर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले. 

◾️१८९५ ते १९२१ या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, १९०१ च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली

◾️बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते

◾️शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल १४ वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली

◾️करवीरची जनता त्यांचा 'कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार' असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.

◾️त्यांना प्रति शाहू महाराज असेही म्हटले जाते


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील महत्वाच्या बाबी✍

1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

Combine STI/PSI/ASO Pre Practice Questions

 प्र1): रियासतकार सरदेसाई यांच्या मते १८५७ चा उठाव  म्हणजे…………….होय.

A) शिपायांची गर्दी 

B) भारतीय जनतेतील असंतोषाचा स्फोट 

C) स्वातंत्र्य युद्ध 

D) गो–यांविरुद्ध काळ्यांनी व्यक्त केलेला असंतोष.


B✅🎁🍨🔥⚔️


 प्र2: नानासाहेब पेशवे यांचा सेनापती …… याने १८५७ च्या उठावात कामगिरी बजावली.

A)  रावसाहेब पटवर्धन

B) बापू गोखले 

C) गंगाधर फडणीस 

D)  तात्या टोपे


D ✅🎁🍨🔥⚔️



 प्र3): इ .स. १८५७ च्या उठावात ज्यांनी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले होते , अशा नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येत नाही.?

A) बहादूरशहा 

B) नानासाहेब 

C) बापू गोखले 

D) कुंवर सिंह


 C ✅🎁🌹🔥⚔️


 प्र4: १८५७ च्या उठावात अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले . अशा संस्थानांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानाचा समावेश करता येणार नाही ?

A) हैद्राबाद 

B) ग्वाल्ह्रेर 

C) बडोदा 

D) जगदीशपूर


D ✅🎁🌹🔥⚔️


 प्र5):जबलपूर  प्रदेशातील गोंड राजा…………… याने १८५७ च्या उठावात भाग घेउन क्रांतिकारकांना साथ दिली.

A) मान सिंह 

B) विक्रम सिंह 

C) शंकर सिंह 

D) लॉरेन्स


C ✅🎁🔥🌹⚔️


 प्रश्न6): क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली त्या वेळी दिल्ली चा कमिशनर  कोण होता ?

A) सायमन फ्रेझर 

B) निकोलसन 

C) हडसन 

D) लॉरेन्स


A ✅🎁🌹〽️⚔️


प्र 7) : ३० जू न १८५७ रोजी  क्रांतिकारकारकांनी……………. यांना पेशवा म्हणून घोषित केले.

A)  तिसरा बाजीराव

B) तात्या टोपे 

C) चिमासाहेब 

D)  नानासाहेब


D ✅🎁🌹Ⓜ️⚔️


 प्र8): …………… हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक उठवले होते.

A) जळता निखारा 

B) बंदूक 

C) लालकमळ 

D) गुलाब


 C ✅🎁🌺🌺Ⓜ️


 प्र 9): १८५७ च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती ?

A) ११ मे १८५७ 

B) ३० जून १८५७ 

C) २९ मार्च १८५७ 

D) ३१ मे १८५७


D ✅🎁🌺🌹Ⓜ️



प्र 10 ): १८५७ च्या उठावात अभूतपूर्व संग्रामा नंतर इंग्रजांना पुन्हा दिल्ली काबीज करुन देणारा आधिकारी कोण होता ?

A) सर हेन्री बर्नाड 

B) जनरल नील 

C) जनरल स्मिथ 

D) निकोलसन


D ✅🎁〽️Ⓜ️⚔️


 प्र 11): खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

A) बहादूरशहा इंग्रजांशी लढता लढता मरण पावला 

B) इंग्रजांनी बहादूरशहास पकडून क्रुरपणे ठार केले. 

C) बहादूरशहा रंगुन येथे मृत्यु पावला . 

D) बहादूरशहा नेपाळ येथे मृत्यु पावला


 C ✅🎁🔥⚔️Ⓜ️


 प्र 12): १८५७ च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल इंग्रज सरकारने ……………. याला १८ एप्रिल १८५९ रोजी शिप्री येथे जाहीररित्या फाशी दिली .

A) नानासाहेब 

B) तात्या टोपे 

C) बहादूरशहा 

D) कुवंर सिंह


B ✅🎁🌹🔥〽️


 प्र13): १८५७ चा उठाव हिंदी शिपायांनी केवळ स्वार्थी हेतूने प्रेरीत होऊन केला होता , असे मत व्यक्त करणारा इतिहासकार कोण ?

A) रियासतकार सरदेसाई 

B) अशोक मेहता 

C) सर जॉन सिली 

D) वि. दा . सावरकर


C ✅Ⓜ️🎁🔥⚔️


प्र14: खालीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसी  याने खालसा केलेले नाही.

A) सातारा 

B) नागपूर 

C) ग्वाल्हेर 

D) म्हैसूर


 C ✅🎁🔥🌹Ⓜ️


 प्र 15 ): खालीलपैकी कानपूर येथील हत्याकांडाला जबाबदार असण–या व्यक्ती कोण ?

A) कुँवर सिंह 

B) तात्या टोपे 

C) अझीमउल्ला 

D) नानासाहेबांचे सैन्य


D ✅🎁🌹🔥〽️


 प्र 16): १८५७ च्या उठावाचे राजस्थानमधील मुख्य ठिकाण कोणते  ?

A) कोटा 

B) नसीराबाद 

C) जैसलमेर 

D) अजमेर


A ✅🎁🌹Ⓜ️🔥



 प्र 17): खालीलपैकी कोणत्या वर्गाने क्रांतिकारकांना सहाय्य केले नाही ?

A) संस्थानिक 

B) जमीनदार 

C) शेतकरी व कामगार D) नवमध्यम वर्ग


D ✅🎁🌹Ⓜ️🔥


 प्र 18): ओरिसा ते छोटा नागपूरच्या प्रदेशात १८५७ च्या उठावात कोणी मुख्यत्वे भाग घेतला होता ?

A) आदिवासी जमाती 

B) जमीनदार 

C) जुने संस्थानिक 

D) वरील सर्व


D ✅🎁🔥Ⓜ️〽️


 प्र 19) :१८५७  च्या उठावाचे आसाममध्ये नेतृत्व कोणी केले  होते ?

A) दिवान मणिराम दत्त B) कंदावेश्वर सिंह 

C) पुरंदर सिंह 

D) पिलारि बरुआ


A ✅🎁🔥〽️Ⓜ️


 प्र20) :१८५७ च्या उठावादरम्यान सम्राट बहादूरशहा चा सर्वात विश्वासू सल्लगार  कोण ?

A)अजिमुल्ला खान

B) झवान बख्त 

C) झीनत महल 

D) बख्त खान



[प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर✅

२] २८०-३१५ nm

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर✅

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच ✅

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर✅

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर✅

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स ✅

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ ✅

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे ✅

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

४] मुकुंदराव पाटील


उत्तर

१] म.गो.रानडे ✅

---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

१] फक्त अ✅

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 [प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर

२] २८०-३१५ nm 

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच 

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स 

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ 

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे 

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

उत्तर

१] म.गो.रानडे 

४] मुकुंदराव पाटील


---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

१] फक्त अ