31 October 2025

भारताचे उपराष्ट्रपती (Vice President of India)



🔹 संविधानातील कलमे :

 • कलम 63 ते 71 — उपराष्ट्रपतींच्या पदासंबंधी आहेत.


🔹 उपराष्ट्रपतींची निवड (Election):

 1. निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने होते.

 2. संसदेचे दोन्ही सभागृह (लोकसभा आणि राज्यसभा) यांच्या सदस्यांद्वारे निवड केली जाते.

 3. गुप्त मतदानाने (Secret Ballot) व एकांतरणीय हस्तांतरणीय मत (Single Transferable Vote) पद्धतीने निवड होते.


🔹 पदाचा कार्यकाळ:

 • 5 वर्षांचा असतो.

 • पुन्हा निवड होऊ शकते.


🔹 अर्हता (Qualifications):

 1. भारताचा नागरिक असावा.

 2. किमान वय 35 वर्षे असावे.

 3. राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी पात्र असावे.

 4. कोणत्याही नफ्याच्या पदावर नसावा.


🔹 पदाचे अधिकार व कर्तव्ये:

 1. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती (Ex-officio Chairman of Rajya Sabha) असतात.

 2. राष्ट्रपती अनुपस्थित असल्यास किंवा मृत्यू झाल्यास कार्यवाह राष्ट्रपती म्हणून काम पाहतात.

 3. राज्यसभेतील शिस्त, कार्यवाही आणि चर्चेचे नियंत्रण ठेवतात.


🔹 पद रिक्त होण्याची कारणे:

 1. राजीनामा (राष्ट्रपतींकडे दिला जातो)

 2. कार्यकाळ पूर्ण होणे

 3. मृत्यू

 4. अपात्र ठरविणे (संसद ठरवते)

सविनय कायदेभंग चळवळ (1930-1934)



1️⃣ पार्श्वभूमी व आरंभ

➤ 1929 च्या लाहोर अधिवेशनात ‘संपूर्ण स्वराज्य’ हे राष्ट्रध्येय ठरविण्यात आले.

➤ याच अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठराव मंजूर करण्यात आला.

➤ सविनय कायदेभंग चळवळीसाठी ‘मीठ’ या वस्तूची निवड करण्यात आली.


2️⃣ दांडी यात्रा (12 मार्च ते 6 एप्रिल 1930)

➤ एकूण अंतर : 385 कि.मी. (240 मैल) – साबरमती ते दांडी.

➤ गांधीजींसोबत 78 सहकारी सहभागी झाले.

➤ 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी दांडी किनाऱ्यावर मिठाचा सत्याग्रह केला.

➤ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना “नेपोलियन अल्बावरून पॅरिसकडे गेला” या घटनेशी केली.


3️⃣ महिलांचा सहभाग 👩‍🦰

➤ सरोजिनी नायडू

➤ कमलादेवी चट्टोपाध्याय

➤ कमला नेहरू

➤ हेमप्रभा दास

➤ सुचेता कृपलानी

➤ कस्तूरबा गांधी

➤ हंसाबाई मेहता

➤ अवंतीबाई गोखले


4️⃣ सविनय कायदेभंगाचे स्वरूप व प्रमुख केंद्रे

➤ पेशावर सत्याग्रह : नेतृत्व – अब्दुल गफार खान.

➤ सोलापूर सत्याग्रह : लष्करी कायदा अस्तित्वात असताना गिरणी कामगारांनी सत्याग्रह केला.

  मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली.

➤ धारासना सत्याग्रह (गुजरात) : नेतृत्व – सरोजिनी नायडू, मीराबेन.

➤ बॉम्बे चौपाटीवर : कमलादेवी चट्टोपाध्याय व अवंतिकाबाई गोखले यांनी मिठाचा सत्याग्रह केला.

➤ महाराष्ट्रात : वडाळा, मालवण, शिरोडा, दहीहंडा इ. ठिकाणी मिठाचा सत्याग्रह.

➤ कर्नाटकात : ‘सनिकट्टा’ येथे मिठाचा सत्याग्रह.

➤ ज्या ठिकाणी समुद्र किनारा नव्हता, तेथे इतर अन्यायकारक कायद्यांचा भंग करण्यात आला.


5️⃣ इतर स्थानिक चळवळी

➤ महाराष्ट्रातील पुसद येथे बापूजी अणे यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह झाला.

➤ सातारा जिल्ह्यातील बिळाशी येथे राजुताई कदम यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह.

➤ गुजरातमध्ये : खेडा, बाडोली, जंबुसार, भरुच येथे साराबंदी चळवळ राबविण्यात आली.


6️⃣ जनसहभाग व प्रतीकात्मक उपक्रम

➤ प्रभातफेरी, मुलांची वानरसेना या आंदोलनात सक्रिय होती.

➤ देशभरात ब्रिटिश कायद्यांविरुद्ध असहकार, बंद, सभा, निदर्शने झाली.

संसदेचे कामकाज करण्याची साधने (Devices of Parliamentary Proceedings)



1️⃣ प्रश्न काळ (Question Hour)

✅️ अर्थ: प्रत्येक संसदीय बैठकीचा पहिला तास म्हणजे प्रश्नकाळ असतो.

➤ या काळात सदस्य शासनाच्या धोरणांबद्दल, निर्णयांबद्दल आणि प्रशासनाच्या कामकाजाबद्दल प्रश्न विचारतात.

➤ संबंधित मंत्री हे प्रश्नांचे उत्तर देतात.


2️⃣ प्रश्नांचे प्रकार (Types of Questions)

अ) तारांकित प्रश्न (Starred Question)

✅️ उत्तर: तोंडी दिले जाते.

➤ सदस्य उपप्रश्न (Supplementary Questions) विचारू शकतात.

➤ अध्यक्ष/सभापती हे प्रश्न अतारांकित प्रश्नांमध्ये रूपांतरित करू शकतात.

➤ एका दिवशी एका सदस्याला एका प्रश्नाचे उत्तर मिळू शकते.

➤ एका दिवशी जास्तीत जास्त 20 प्रश्न घेतले जातात.

➤ पेपरचा रंग: हिरवा (Green Paper)


ब) अतारांकित प्रश्न (Unstarred Question)

✅️ उत्तर: लेखी स्वरूपात दिले जाते.

➤ सदस्यांना उपप्रश्न विचारता येत नाहीत.

➤ या प्रश्नांमध्ये सामान्यतः आकडेवारी किंवा विस्तृत माहिती मागवली जाते.

➤ एका दिवशी एका सदस्याचे 4 किंवा 5 प्रश्न घेतले जातात.

➤ एका दिवशी एकूण 230 प्रश्न घेतले जातात.

➤ पेपरचा रंग: पांढरा (White Paper)


क) अल्प सूचना प्रश्न (Short Notice Question)

✅️ अर्थ: जेव्हा 10 दिवसांपेक्षा कमी कालावधीत उत्तर आवश्यक असते, तेव्हा हा प्रश्न विचारला जातो.

➤ अध्यक्ष/सभापती आणि संबंधित मंत्र्यांची परवानगी आवश्यक असते.

➤ या प्रश्नाचे उत्तर तोंडी दिले जाते.

➤ मंत्र्यांविरुद्ध खासगी सदस्यांनाही प्रश्न विचारता येतात (खाजगी विधेयक असल्यास).

➤ पेपरचा रंग: फिकट गुलाबी (Light Pink Paper)


ड) खाजगी सदस्यांना विचारले जाणारे प्रश्न (Question by Private Member)

✅️ अर्थ: हे प्रश्न सरकारी मंत्र्यांऐवजी इतर खासगी सदस्यांना विचारले जातात.

➤ पेपरचा रंग: पिवळा (Yellow Paper)


📘 महत्त्व:

➤ प्रश्नकाळ हा संसदेतील लोकशाही उत्तरदायित्वाचा सर्वात प्रभावी साधन मानला जातो.

➤ तो शासनाचे कामकाज पारदर्शक ठेवतो आणि मंत्र्यांना जबाबदार बनवतो.

महत्त्वाचे जागतिक निर्देशांक – 2025 (Exam Point of View)

 


1️⃣ मानव विकास निर्देशांक (HDI - 2025)

▪️ Theme: A matter of choice: People & possibilities in the age of AI

➤ भारताचा क्रमांक: 130 वा

➤ पहिले 4 देश: आइसलँड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, डेन्मार्क


2️⃣ जागतिक असमानता निर्देशांक (GII - 2025) (Global Inequality Index)

▪️ भारताचा क्रमांक: 102 वा


3️⃣ जागतिक भूक निर्देशांक (Global Hunger Index - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 102 वा


4️⃣ जागतिक नवोन्मेष निर्देशांक (Global Innovation Index - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 38 वा (139 देशांत)


5️⃣ जागतिक आनंद अहवाल (World Happiness Report - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 118 वा


6️⃣ जागतिक शांतता निर्देशांक (Global Peace Index - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 115 वा


7️⃣ भ्रष्टाचार धारणा निर्देशांक (Corruption Perception Index - 2024)

▪️ भारताचा क्रमांक: 96 वा


8️⃣ शाश्वत विकास अहवाल (Sustainable Development Report - 2025)

▪️ संस्था: SDSN (Sustainable Development Solutions Network)

▪️ भारताचा क्रमांक: 99 वा

➤ पहिले 3 देश: फिनलंड, स्वीडन, डेन्मार्क


9️⃣ जागतिक लिंगभेद निर्देशांक (Global Gender Gap Report - 2025)

▪️ भारताचा क्रमांक: 131 वा

भूगर्भीय हालचाली व वलीकरण (Geological Movements and Folding)



१) पर्वत निर्माणकारी हालचाली (Orogenic Movements)

✅️ भूपृष्ठावर कार्य करणाऱ्या पर्वत निर्माणकारी हालचाली दोन प्रमुख प्रकारच्या असतात :

➤ संकोचीय हालचाल (Compressional movement) – या हालचालींमध्ये भूपृष्ठावर दाब निर्माण होतो, त्यामुळे खडकांचे थर एकमेकांकडे सरकतात व दुमडले जातात.

➤ तणावक हालचाल (Tensional movement) – या हालचालींमध्ये भूपृष्ठावर ताण निर्माण होतो, त्यामुळे खडकांचे थर एकमेकांपासून दूर जातात व भेगा पडतात.


२) संकोचीय हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या प्रमुख संरचना:

✅️ ➤ सवलन (Warping) – पृथ्वीच्या पृष्ठभागावर मृदू व संथ दाबामुळे वर-खाली वाकणे होते.

✅️ ➤ वलीकरण (Folding) – संकोचामुळे खडकांच्या थरांना वळ्या पडतात व पर्वतरचना निर्माण होते.


३) वलीकरण (Folding):

✅️ भूपृष्ठावरील संकोचीय हालचालींमुळे मृदू आणि अवसादी खडकांच्या थरांना वळ्या पडतात, त्याला वलीकरण असे म्हणतात.

✅️ या प्रक्रियेत खडकांच्या थरांना दाब पडल्याने ते तुटत नाहीत तर वाकतात.

✅️ वलीकरणामुळे अंतर्वल (Anticline) व बहिर्वल (Syncline) अशा संरचना तयार होतात.


४) वळ्यांचे प्रकार (Types of Folds):

1️⃣ साधारण / सम्मित वळण (Symmetrical Fold):

➤ दोन्ही भुजा समान उताराच्या असतात.

➤ वळणाच्या मध्यावर अक्ष रेषा उभी राहते.


2️⃣ असाधारण / असममित वळण (Asymmetrical Fold):

➤ वळ्याच्या दोन्ही भुजांचे उतार असमान असतात.

➤ एका बाजूचा उतार दुसऱ्यापेक्षा जास्त तीव्र असतो.


3️⃣ एकनत वळण (Monoclinal Fold):

➤ एक भुजा मंद उताराची तर दुसरी जवळपास लंबवत असते.

➤ साधारणतः एका दिशेने वाकलेला थर दिसतो.


4️⃣ सम्मयत वळण (Isoclinal Fold):

➤ दोन्ही भुजा एकाच दिशेने झुकलेल्या असतात व जवळपास समांतर होतात.

➤ खूप दाबाखाली हे वळण तयार होते.


5️⃣ परिवलित वळण (Recumbent Fold):

➤ वळ्याच्या भुजा इतक्या वाकतात की एक भुजा दुसऱ्यावर उलटते.

➤ वळ्याचे शीर्ष जवळपास समांतर दिसते.


6️⃣ पंख आकार वळण (Fan-shaped Fold):

➤ वळ्याच्या दोन्ही भुजांची उंची वाढत जाऊन वळण पंखासारखे दिसते.

➤ मध्यभाग खाली व बाजू उंच असतात.


7️⃣ विखंडीत वळण (Nappes Fold):

➤ खूप ताण पडल्याने वळणाची एक भुजा तुटते व दुसऱ्या भुजेवर सरकते.

➤ ही तुटलेली भुजा कधी दुसऱ्या खंडावर जाऊन स्थिरावते.

➤ अशा वळ्यांमुळे भूगर्भीय विस्थापन (displacement) मोठ्या प्रमाणात होते.


५) वलीकरणाचे भूगर्भीय महत्त्व:

✅️ ➤ पर्वतरचना निर्माण करण्यास कारणीभूत (उदा. हिमालय).

✅️ ➤ खनिजांचे, धातूंचे व जलस्रोतांचे स्थान निश्चित करण्यात मदत होते.

✅️ ➤ पृथ्वीच्या अंतर्गत बलांची दिशा व तीव्रता यांचे संकेत मिळतात.

✅️ ➤ भू-रचना विज्ञानात वलीकरण अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो.

नदी प्रवाहाचे प्रकार (Types of River Drainage / Flow)

१) अनुवर्ती प्रवाह (Consequent Stream)

➤ हा प्रवाह प्रदेशाच्या नैसर्गिक उतारानुसार वाहतो.

➤ पर्वतरांग, पठार किंवा भूभागाच्या उताराची दिशा ज्या दिशेने असेल, त्या दिशेनेच हा प्रवाह वाहतो.

➤ या प्रवाहाला ‘आनुषंगिक प्रवाह’ असेही म्हणतात.

➤ उदा. गंगा, गोदावरी, नर्मदा यांच्या काही उपनद्या.


२) परावर्ती प्रवाह (Subsequent Stream)

➤ हा प्रवाह मुख्य प्रवाहानंतर तयार होतो.

➤ तो मुख्य प्रवाहाला समांतर वाहतो आणि दऱ्यांमधून प्रवाहित होतो.

➤ भूपृष्ठाच्या मृदू थरांमध्ये क्षरण झाल्यामुळे अशा प्रवाहांची निर्मिती होते.

➤ उदा. यमुना (गंगेची उपनदी).


३) प्रत्यनुवर्ती प्रवाह (Obsequent Stream)

➤ हा प्रवाह मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहतो.

➤ परंतु शेवटी तो मुख्य प्रवाहात मिळतो.

➤ भूगर्भीय उन्नतीनंतर किंवा उतार बदलल्याने असे प्रवाह निर्माण होतात.

➤ उदा. काही हिमालयीन उपनद्या ज्या उलट दिशेने वाहतात.


४) गुंफित प्रवाह (Braided Stream)

➤ प्रवाहात मोठ्या प्रमाणात गाळ, वाळू व गोटे असल्यास नदीचा प्रवाह विभागला जातो.

➤ अनेक लहान प्रवाह एकमेकांत गुंफल्यासारखे वाहतात.

➤ प्रवाहात बेटांसारखे गाळाचे भाग तयार होतात.

➤ उदा. ब्रह्मपुत्रा नदीचा काही भाग.


५) अननुवर्ती प्रवाह (Insequent Stream)

➤ या प्रवाहाचा दिशा, वाहण्याचा क्रम प्रदेशाच्या उताराशी किंवा भूपृष्ठाच्या रचनेशी जुळत नाही.

➤ भूभागातील स्थानिक क्षरण किंवा खडकांच्या वेगवेगळ्या प्रतिकारक्षमतेमुळे हा प्रवाह तयार होतो.

➤ हे प्रवाह अव्यवस्थित स्वरूपाचे असतात.

पंतप्रधानांचे कार्यालय (Prime Minister’s Office – PMO)



१) स्थापना :

➤ 1977 साली पंतप्रधानांचे कार्यालय (PMO) स्थापन झाले.

➤ सुरुवातीला याला Prime Minister’s Secretariat असे म्हणत असत; मोरारजी देसाई यांच्या काळात (1977) याचे नामकरण Prime Minister’s Office (PMO) असे करण्यात आले.


२) रचना आणि कार्यप्रणाली :

➤ हे कार्यालय म्हणजे भारताच्या पंतप्रधानांचे तात्काळ कर्मचारी वर्ग आणि सहाय्यक यंत्रणा आहे.

➤ यात विविध स्तरांवरील अधिकारी, सल्लागार, सचिव आणि सहाय्यक कर्मचारी यांचा समावेश असतो.

➤ PMO चे प्रशासकीय प्रमुख – पंतप्रधानांचे प्रधान सचिव (Principal Secretary to PM) असतात.

➤ सध्या या पदावर प्रमोद कुमार मिश्रा कार्यरत आहेत.


३) PMO अंतर्गत येणाऱ्या प्रमुख संस्था :

➤ Department of Atomic Energy (परमाणु ऊर्जा विभाग)

➤ Department of Space (अंतराळ विभाग)

➤ Performance Management Division (कामगिरी व्यवस्थापन विभाग)

➤ National Security Council (राष्ट्रीय सुरक्षा परिषद)


४) PMO ची मुख्य कार्यक्षेत्रे :

➤ पंतप्रधानांच्या वैयक्तिक लक्षाची आवश्यकता असलेल्या धोरणात्मक व प्रशासकीय बाबींचे व्यवस्थापन.

➤ केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांशी समन्वय राखणे.

➤ राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण, व केंद्र-राज्य संबंधातील महत्त्वाच्या विषयांवर पंतप्रधानांना सल्ला देणे.


५) PMO द्वारे हाताळल्या जाणाऱ्या प्रमुख बाबी :

1️⃣ संरक्षणविषयक महत्त्वाचे मुद्दे.

2️⃣ नागरी आणि संरक्षण क्षेत्रातील त्या बाबी, ज्या राष्ट्रपतींच्या मंजुरीशिवाय अमलात आणता येत नाहीत.

3️⃣ सर्व महत्त्वाचे धोरणात्मक (policy-related) निर्णय.

4️⃣ परदेशातील भारतीय मिशन प्रमुखांच्या नियुक्त्या आणि भारतामध्ये कार्यरत विदेशी मिशन प्रमुखांसाठी मंजुरी प्रस्ताव.

5️⃣ कॅबिनेट सचिवालयाशी संबंधित सर्व निर्णय, तसेच राज्य प्रशासकीय व केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, UPSC, निवडणूक आयोग, वैधानिक व संवैधानिक समित्या यांच्या सदस्यांच्या नियुक्त्या.

6️⃣ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) आणि इतर नागरी सेवांच्या धोरणात्मक व प्रशासकीय सुधारणा विषयक निर्णय.

7️⃣ राज्यांसाठी पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या विशेष आर्थिक पॅकेजचे निरीक्षण, तसेच त्यासंबंधित नियतकालिक अहवाल सादर करणे.


६) PMO चे महत्त्व :

➤ हे कार्यालय भारत सरकारचे प्रशासकीय व धोरणात्मक केंद्रबिंदू आहे.

➤ पंतप्रधानांना निर्णय घेण्यासाठी आवश्यक तांत्रिक, प्रशासकीय व राजनैतिक सहाय्य पुरवते.

➤ राष्ट्रीय धोरणनिर्मिती, अंमलबजावणी आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधित्वात PMO चे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

राजा राममोहन रॉय व ब्राम्हो समाज – भारतीय प्रबोधन युगाचे जनक



➊ मूलभूत माहिती व पार्श्वभूमी

➤ संपूर्ण नाव : राजा राममोहन रॉय

➤ जन्म : १७७२, राधानगर, हुगळी जिल्हा (पश्चिम बंगाल)

➤ वडील : रमाकांत रॉय | आई : तारिणीदेवी

➤ आजोबा : कृष्णचंद्र बंदोपाध्याय (बंगाल नबाबांच्या दरबारात अधिकारी)

➤ 'रॉय' ही पदवी नबाब दरबाराकडून सन्मान म्हणून देण्यात आली


➋ शिक्षण व भाषाशिक्षण

➤ १७८९ मध्ये अरबी व पर्शियन भाषा शिकण्यासाठी पाटणा येथे पाठवले

➤ नंतर बनारस येथे संस्कृत आणि हिंदू धर्मशास्त्रांचे शिक्षण

➤ १८०३ नंतर इंग्रजी शिकण्यास सुरुवात केली

➤ फारसी, बंगाली, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, पर्शियन, हिब्रू या भाषांवर प्रभुत्व


➌ सामाजिक व धार्मिक सुधारणा कार्य

➤ १८०५ साली ईस्ट इंडिया कंपनीमध्ये नोकरी

➤ १८१५ मध्ये नोकरी सोडून ‘आत्मिया सभा’ ची स्थापना – वैचारिक चर्चेचे व्यासपीठ

➤ १८२८ मध्ये ‘ब्राम्हो समाज’ ची स्थापना – एकेश्वरवादावर आधारित समाज

➤ सती प्रथेविरुद्ध प्रयत्न –

  ➤ १८२९ मध्ये सतीप्रथा रद्द करण्यात यश

➤ विधवा पुनर्विवाहासाठी ब्रिटिश सरकारकडे सातत्याने प्रयत्न

➤ स्त्रीशिक्षण व स्त्री हक्कांचा पुरस्कार

➤ धार्मिक सहिष्णुता आणि सर्व धर्मांचा अभ्यास


➍ पत्रकारिता व साहित्य योगदान

➤ तुहफत-उल-मुव्वहिदीन (१८०३) – फारसीत एकेश्वरवादाचा पुरस्कार

➤ वेदांत ग्रंथ (१८१५) – शंकराचार्यांच्या भाष्यांचे बंगालीत भाषांतर

➤ उपनिषदांचे भाषांतर – ईश, केण, मुंडक, मांडूक्य

➤ संवाद कौमुदी (१८२१) – बंगाली साप्ताहिक

➤ मिरात-उल-अखबार (१८२२–१८३२) – फारसी साप्ताहिक

➤ इतर विषयांवरही पुस्तके : इतिहास, भूगोल, बंगाली व्याकरण


➎ शिक्षणासाठी योगदान

➤ १८२७ – डफ्यू हिअर यांच्यासह श्रीरामपूर विद्यालय स्थापन

➤ आधुनिक, वैज्ञानिक व स्त्री शिक्षणावर भर

➤ आत्मीय सभेत विविध विषयांवर चर्चासत्रे – द्वारकानाथ ठाकूर, प्रसन्नकुमार टांगरे, आनंदप्रसाद इत्यादींचा सहभाग


➏ इंग्लंडप्रवास व मृत्यू

➤ इंग्लंडमध्ये दिल्लीच्या बादशाहाचे दूत म्हणून गेले – ‘राजा’ किताब प्राप्त

➤ ब्रिटनच्या स्टेपलटन येथे १८३३ साली मृत्यू

➤ रवींद्रनाथ ठाकूर यांचे आजोबा द्वारकानाथ ठाकूर यांनी कलकत्त्यात समाधी बांधली


➐ ऐतिहासिक महत्त्व व गौरव

➤ भारताच्या सामाजिक सुधारणांचा पाया घालणारे व्यक्तिमत्त्व

➤ ‘भारतीय रेनेसॉन्स’ चे पितामह

➤ आधुनिक भारतातील सर्वांत पहिला जागरूक समाजसुधारक

➤ हिंदू धर्माचे आत्मपरीक्षण घडवून आणणारा क्रांतिकारक

काकोरी ट्रेन ॲक्शन (1925)



1.📍 ऐतिहासिक पार्श्वभूमी➤ उत्तर प्रदेश सरकारने या घटनेच्या नावात बदल करून "काकोरी ट्रेन लूट"ऐवजी "काकोरी ट्रेन ॲक्शन" असे केले आहे.

➤ ➤ यामागे उद्देश क्रांतिकारकांचे राष्ट्रवादी योगदान अधोरेखित करणे हा आहे.


2.📍 घटना व दिनांक

➤ 9 ऑगस्ट 1925 रोजी लखनऊजवळ काकोरी गावाजवळ उत्तर रेल्वे मार्गावर दरोडा टाकण्यात आला.

➤ ➤ या दरोड्याचा उद्देश सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा वापर सशस्त्र क्रांतीसाठी करणे होता.


3.📍 सहभागी क्रांतिकारक

➤ राम प्रसाद बिस्मिल

➤ अशफाकुल्ला खान

➤ राजेंद्र लाहिरी

➤ ठाकूर रोशन सिंह

➤ ➤ या चौघांना 19 डिसेंबर 1927 रोजी फाशी देण्यात आली.


4.📍 दरोड्याचे नियोजन - हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA)

➤ HRA ची स्थापना राम प्रसाद बिस्मिल यांनी 1924 मध्ये केली.

➤ ➤ चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले. त्यामुळे हिंसक क्रांतीकडे तरुण वळले.

➤ पक्षाचे इतर प्रमुख सदस्य:

➤ ➤ सचिंद्रनाथ सन्याल

➤ ➤ जोगेशचंद्र चॅटर्जी (अनुशीलन समितीचे सदस्य)


5.📍 पक्षाचे विचारसरणी व उद्दिष्टे

➤ लाला हर दयाल यांच्या प्रेरणेतून पक्षाचा घटनात्मक मसुदा अलाहाबाद येथे तयार झाला.

➤ सचिंद्रनाथ सन्याल यांनी 'क्रांतिकारी' नावाचा जाहीरनामा लिहिला.

➤ ➤ उद्दिष्ट: ब्रिटीश सत्तेची उलथापालथ करून "फेडरल रिपब्लिक ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया" स्थापणे.

➤ ➤ सार्वत्रिक मताधिकाराची जोरदार मागणी करण्यात आली होती.


6.📍 पुढील सहभागी क्रांतिकारक व विस्तार

➤ 1924-25 मध्ये अनेक तरुण क्रांतिकारक पक्षात सामील झाले:

➤ ➤ भगतसिंग

➤ ➤ सुखदेव

➤ ➤ चंद्रशेखर आझाद

➤ पक्षाचे नाव पुढे "हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)" असे ठेवण्यात आले.


7.📍 ऐतिहासिक महत्त्व व स्मरण

➤ काकोरी ॲक्शन ही घटना भारतीय क्रांतिकारी इतिहासातील मैलाचा दगड ठरली.

➤ ➤ ती एक सुसंघटित आणि धाडसी योजना होती, ज्यात क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिले.

➤ या घटनेला आता 100 वर्ष होत चालली आहेत – त्यामुळे इतिहासातील या धाडसपूर्ण क्रांतीस पुन्हा उजाळा देणे गरजेचे आहे.


8.📍 शिकवण व प्रेरणा

➤ देशासाठी बलिदान, साहस, संघटन आणि विचारसरणी यांचे उत्तम उदाहरण.

➤ ➤ या क्रांतिकारकांनी जात, धर्म वा भाषा न पाहता एकत्र येऊन देशासाठी प्राण अर्पण केले.

➤ आधुनिक भारतात या क्रांतीचा आदर्श सामाजिक सलोखा, स्वाभिमान व जबाबदारीसाठी प्रेरणा ठरतो.

महत्त्वाच्या घटना सुधारणा



प्रश्न: पहिली संविधान सुधारणा कधी झाली?  

उत्तर: 1951 मध्ये


प्रश्न: 42 व्या सुधारणेस काय म्हणतात?  

उत्तर: लघु संविधान


प्रश्न: 44वी सुधारणा कोणत्या वर्षी झाला?  

उत्तर: 1978 मध्ये


प्रश्न: 73 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: पंचायत राज व्यवस्थेशी


प्रश्न: 74 वी सुधारणा कोणाला लागू करते?  

उत्तर: नगर निकाय व्यवस्था


प्रश्न: 86 वी सुधारणा कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे?  

उत्तर: 6-14 वर्षांच्या मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराशी


प्रश्न: 61 व्या सुधारणे मध्ये किमान मतदान वय काय केले?  

उत्तर: 18 वर्षे


प्रश्न: 52 वी सुधारणा कोणत्या विषयाशी संबंधित आहे?  

उत्तर: पक्षबदल कायदा


प्रश्न: 101 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: GST लागू करणे


प्रश्न: 97 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: सहकारी समित्यांशी


प्रश्न: 93 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: खासगी संस्थांमध्ये आरक्षणाशी


प्रश्न: 104 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?  

उत्तर: एंग्लो इंडियन आरक्षण समाप्त करणे


प्रश्न: 36 व्या सुधारणे मध्ये कोणते राज्य समाविष्ट आहे?  

उत्तर: सिक्कीम


प्रश्न: 17 वी सुधारणा कोणत्या यादीशी संबंधित आहे?  

उत्तर: 9वी अनुसूची


प्रश्न: 69 वी सुधारणा कोणाशी संबंधित आहे?

उत्तर: दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र घोषित करणे


सिंधू नदी प्रणाली : प्रमुख नद्या व प्रकल्प



1) झेलम नदी

➤ उगम — काश्मीर, पीरपंजाल रांगा, शेषनाग तलावाजवळ

➤ प्राचीन नाव — वितस्ता

➤ काश्मीरमध्ये झेलम नदी वुलर सरोवरातून वाहते

➤ पाकिस्तानमध्ये जाऊन चिनाब नदीला मिळते


▪️किशनगंगा जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ झेलमची उपनदी किशनगंगा नदीवर (J&K)

➤ क्षमता — 330 MW

➤ प्रकल्पावर पाकिस्तानचा आक्षेप


2) चिनाब नदी

➤ उगम — बारा लाचा ला, चंद्र + भागा जलप्रवाह

➤ लांबी — 1180 किमी

➤ पाकिस्तानात प्रवेश केल्यानंतर झेलम व रावी नदी मिळतात

➤ पुढे पंचनद येथे सिंधूला मिळते

➤ प्राचीन नाव — असिकनी


▪️बागलिहार जलविद्युत प्रकल्प ⚡️

➤ चिनाब नदीवर — जम्मू व काश्मीर

➤ क्षमता — 900 MW


3) रावी नदी

➤ उगम — हिमाचल प्रदेश, कुलू जिल्हा, रोहतांग खिंडीजवळ

➤ लांबी — 725 किमी

➤ प्राचीन नाव — पारुष्णी

➤ पाकिस्तानातील रापूर येथे चिनाब नदीला मिळते


4) बियास नदी

➤ उगम — रोहतांग खिंडीच्या दक्षिणेला बियास कुंड

➤ लांबी — 460 किमी

➤ प्राचीन नाव — विपाशा

➤ पंजाबमधील हरिके येथे सतलज नदीला मिळते


5) सतलज नदी

➤ उगम — राकस सरोवर, तिबेट (चीन)

➤ लांबी — एकूण 1450 किमी • भारतातील 1050 किमी

➤ प्राचीन नाव — सतद्रू / सुतुद्री / शतुद्री

➤ तिबेटमध्ये लंगकेन झांगो नावाने ओळख

➤ ताशी गंगमार्गे हिमाचल → पंजाब प्रवेश

➤ पाकिस्तानातील मिथानकोट येथे सिंधू नदीला मिळते


▪️भाक्रा-नांगल बहुउद्देशीय प्रकल्प ⚡️

➤ सतलज नदीवर — पंजाब

➤ जलाशयाचे नाव — गोविंदसागर

भू-आकार (भूरूपे) निर्मिती प्रक्रिया



1) नदीद्वारे निर्माण होणारे भू-आकार

➤ नदीच्या क्षरण कार्यात पाणी चार प्रकारे कार्य करते –

➤ द्रविक क्रिया

➤ अपघर्षण

➤ संधर्षण क्रिया

➤ भक्षणक्रिया


▪️ क्षरण व निक्षेपणामुळे निर्माण होणारे भू-आकार –

➤ धावत्या तयार होणारे प्रवाहवैशिष्ट्य

➤ जलप्रपात / धबधबा

➤ अव्खात दरी

➤ घळई

➤ निदरी

➤ जलविभाजक

➤ नागमोड

➤ नालाकृती सरोवरे

➤ पूरमैदाने

➤ नदी तटमंच

➤ पूरतट

➤ त्रिभुज प्रदेश / डेल्टा


▪️ नदी खोर्‍यांचे प्रकार –

➤ विहंगपद प्रकार

➤ क्षीणोकार प्रकार

➤ धनुष्याकार प्रकार

➤ मैदानप्राय प्रकार


2) हिमनद्या (Glaciers) ❄️


▪️हिमनदीचे खणण कार्य (Erosional Landforms)

➤ हिमेरेषा

➤ हिमगव्हर

➤ श्रृंगे (Aretes)

➤ ‘U’ आकाराची दरी

➤ हिमानी सरोवरे

➤ हिमविदर

➤ लांबट्या/टांगत्या दऱ्या

➤ फियॉर्ड


▪️हिमनदीचे संचयन कार्य (Depositional Landforms)

➤ हिमोढ

➤ हिमानी गाळ

➤ हिमजलौढ निक्षेप

➤ तळ हिमोढ

➤ पार्श्व हिमोढ

➤ मध्य हिमोढ

➤ अंत्य हिमोढ

➤ हिमोढगिरी

➤ एस्कर

➤ कॅम्पस

➤ हिमाजलाढे मैदाने (Outwash plains)


3) वार्‍यामुळे निर्माण होणारे भू-आकार 🌬️


▪️वाऱ्याचे खणण कार्य (Erosional Work)

➤ अपवहन

➤ अपघर्षण

➤ संधर्षण


▪️ क्षरणामुळे तयार होणारे भूविशेष –

➤ भूछत्र खडक

➤ इन्सेलबर्ग

➤ यारदांग

➤ भूस्तंभ

➤ द्वीपगिरि


▪️वाऱ्याचे निक्षेपण कार्य

➤ वालुकागिरी (Dunes)

➤ लोएस क्षेत्र


4) कार्स्ट प्रदेशातील भूरूपे (Karst Landforms)

➤ चुनखडी प्रदेशातील क्षरण व विदलनामुळे निर्माण

▪️सामान्यतः येणारी कार्स्ट भूरूपे —

➤ चुनखडी गुहा

➤ स्टॅलेक्टाइट

➤ स्टॅलेग्माइट

➤ कार्स्ट दरी

➤ सिंकहोल

➤ उवाला

➤ ड्राय व्हॅली


5) सागरी लाटा / किनारी प्रक्रियेमुळे निर्माण होणारे भू-आकार 🌊

➤ सागरकिनारा — किनाररेषा — सागरतट


▪️सागरतटाचे प्रकार

➤ अग्रतट

➤ पश्चतट


▪️क्षरणामुळे तयार होणारे भूरूपकार

➤ विरखंडित सागररेषा

➤ कडा / चबुतरे (Cliffs)

➤ सागरकाठाची गुहा (Sea Caves)

➤ नैसर्गिक चिमणी (Blow Hole)

➤ प्रवेशद्वार (Archway)

➤ नैसर्गिक कमानी (Sea Arch)

➤ सागरी स्तंभ (Stacks)


▪️निक्षेपणामुळे तयार होणारे भू-आकार

➤ अपतट दांडा / वाळूचा दांडा (Spit)

➤ लगून

➤ पुळण (Beach)

➤ स्पीट

➤ हुक

➤ लूप

➤ टोमबोलो

आहारशास्त्र (Dietetics)



१) पोषणतत्त्वे

➤ अन्नातील रासायनिक घटक जे योग्य प्रमाणात घेतल्यास शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत ठेवतात त्यांना पोषणतत्त्वे म्हणतात.

➤ समतोल आहारातील प्रमाण :

▪️ पिष्टमय पदार्थ – ५० ते ७०%

▪️ प्रथिने – १० ते १५%

▪️ स्निग्ध पदार्थ – २० ते ३५%

➤ प्रौढ व्यक्तीस साधारण २४०० कॅलरी ऊर्जा आवश्यक.


२) कर्बोदके / पिष्टमय पदार्थ (Carbohydrates) 🌾

➤ कार्बन + हायड्रोजन + ऑक्सिजन पासून बनलेली संयुगे.

➤ सामान्य सूत्र : Cₙ(H₂O)ₙ

➤ सर्वांत सोपे स्वरूप – ग्लुकोज (त्वरित ऊर्जा).

🔹️उदाहरणे :

➤ माल्टोज = ग्लुकोज + ग्लुकोज (बियामध्ये)

➤ लॅक्टोज = ग्लुकोज + गॅलॅक्टोज (दुधात)

➤ सुक्रोज = ग्लुकोज + फ्रुक्टोज (उसाच्या साखरेत)

➤ सेल्युलोज = ग्लुकोज + ग्लुकोज (वनस्पतींच्या सालीत)

➤ स्टार्च = तांदूळ, गहू, बटाटा इ.

🔹️कार्य :

➤ शरीराला ऊर्जा पुरवणे

➤ प्रथिनांची बचत करणे

➤ स्निग्ध पदार्थांचे पचन सुलभ करणे

➤ सेल्युलोजमुळे मलप्रवृत्ती सुधारते


३) प्रथिने (Proteins) 🧬

➤ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनयुक्त संयुगे.

➤ प्रथिने = अमिनो आम्लांची साखळी (एकूण २० अमिनो आम्ले आवश्यक).

➤ क्रियाशील गट : अमिनो (–NH₂) व कार्बोक्झिल (–COOH).

🔹️स्रोत :

➤ डाळी, तेलबिया, मांस, अंडी

🔹️कार्य :

➤ शरीराची वाढ व झीज भरून काढणे

➤ एंझाइम्स, संप्रेरके, प्रतिपिंडे — सर्व प्रथिनांचेच बनलेले


४) स्निग्ध पदार्थ / मेद (Fats) 🧈

➤ कार्बन + हायड्रोजन + ऑक्सिजन, परंतु हायड्रोजनचे प्रमाण जास्त.

➤ ग्लिसेरॉल + स्निग्ध आम्ले = मेद.

🔹️स्रोत :

➤ तेलबिया, वनस्पती तूप, दूध, तूप, लोणी, मांस, कॉड लिव्हर ऑईल

🔹️कार्य :

➤ ऊर्जेचा अंतिम स्रोत

➤ जीवनसत्त्वांचे वाहक

➤ शरीराचे तापमान संतुलित ठेवणे

➤ अंतर्गत अवयवांचे संरक्षण

➤ अन्नाची चव व रुचि वाढवणे

महत्त्वाचे शास्त्रज्ञ



अ) ॲरिस्टॉटल –

➤ याला "जीवशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने वनस्पती व प्राण्यांचे निरीक्षण करून त्यांच्यातील कार्यक्षम भाग जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

➤ त्याने प्रथम प्राण्यांचे वर्गीकरण केले.


ब) थिओफ्रास्टस –

➤ याला "वनस्पतीशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने वनस्पतींच्या जुन्या वास्तव्यावरून (Habitat) आणि आकारावरून प्रथमच वर्गीकरण केले.


क) कार्ल लिनियस –

➤ याला "आधुनिक जीवशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने प्रथमच वनस्पती व प्राण्यांचे शास्त्रीय नामकरण केले.

➤ त्याने वनस्पती व प्राणी यांना नावे देण्याची द्विनाम पद्धती (Binomial Nomenclature) सुरू केली.


ड) क्युआयर –

➤ याला "जीवाश्म शास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ त्याने प्राण्यांचे अस्थिमुळे साधर्म्य आहे व अस्तित्वात असलेल्या प्राण्यांच्या सांगाड्याच्या तुलनेत अभ्यास केला.


इ) शेलडेन व श्वान –

➤ यांनी "पेशी सिद्धांत" मांडला.

➤ प्रत्येक सजीवाचे शरीर पेशीपासून बनलेले असते.

➤ पेशींना आकार सर्व अवयवांत सारखा असतो.

➤ पेशीद्वारे अनुवांशिक गुण पुढच्या पिढीत संक्रमित केले जातात.


फ) ओपेरिन –

➤ यांनी "सजीवाच्या उत्पत्तीविषयीचा सिद्धांत" मांडला.

➤ चार अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीभोवती उष्ण वायू व धातूंचे बाष्प होते.

➤ हायड्रोजन अधिक क्रियाशील होता; त्याने कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजनशी अभिक्रियेतून मिथेन, अमोनिया, पाणी तयार झाले.

➤ ५०°C तापमानावर अल्कोहोल, ग्लिसरॉल, स्निग्ध आम्ल, अमिनो आम्ल, शर्करा, नायट्रोजनयुक्त पदार्थ निर्माण झाले.

➤ यांच्या संयोगातून प्रथिने, स्निग्ध पदार्थ व कर्बोदके तयार झाली.

➤ यांच्या एकत्रिकरणातून प्राथमिक अवस्थेतील पेशी तयार झाली.

➤ यालाच Chemosynthetic theory म्हणतात.


ग) जॉन लॅमार्क –

➤ याने "सजीवाच्या उत्क्रांतीविषयक सिद्धांत" मांडला.

▪️उपयोग-अनुपयोगी नियम:

➤ अवयवाचा अधिक वापर → विकास

➤ उपयोग न केल्यास → ऱ्हास

➤ उदा. जिराफाची मान लांब, सापाचे पाय नष्ट

▪️संपादित गुण:

➤ एका पिढीत मिळालेले गुण पुढील पिढीत संक्रमित होतात.

➤ हे तत्त्व उत्क्रांती पूर्णपणे स्पष्ट करू शकत नाही.


च) चार्ल्स डार्विन –

➤ याला "उत्क्रांतीवादाचा जनक" म्हणतात.

➤ १८५९ मध्ये Origin of Species लिहून "नैसर्गिक निवड सिद्धांत" मांडला.

▪️Struggle for Existence:

➤ सजीवाला अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो.

▪️Survival of the Fittest:

➤ ज्याच्यात सक्षम गुणधर्म आहेत तोच टिकतो.

▪️Natural Selection:

➤ उपयुक्त गुण पुढील पिढीत जातात.


छ) ह्यूगो डी. व्ह्राईस –

➤ याने "उत्परिवर्तन सिद्धांत" मांडला.

➤ नवीन पिढीमध्ये अचानक बदल होणे = उत्परिवर्तन.


ज) जॉन ग्रेगर मेंडेल –

➤ याला "अनुवांशशास्त्राचा जनक" म्हणतात.

➤ १८६६ मध्ये संकरण प्रयोग केले.

➤ संकरित पिढीत प्रभावी गुण उतरतो.

➤ कमजोर गुण सुप्त राहतो व पुढील पिढीत व्यक्त होतो.

आधिवासातील जीवनपद्धती



1) सहजीवन (Symbiosis) 🤝

▪️दोन किंवा अधिक सजीव एकमेकांकडून फायदा घेऊन निर्माण करतात त्या घनिष्ठ संबंधांना सहजीवन म्हणतात.


🔹️उदाहरणे :

▪️लायकेन (दगडफूल)

➤ शैवाल + कवक यांचे सहजीवन.

➤ कवक पाणी व खनिजे पुरवतो; शैवाल अन्न तयार करून देतो.

▪️वाळवीतील ट्रायकॉनिंफा

➤ वाळवीला लाकूड पचविण्यास मदत.

➤ ट्रायकॉनिंफाला सुरक्षित आश्रय.

▪️शिंबीवर्गीय वनस्पती – रायझोबियम

➤ मुळांच्या गाठींमध्ये नायट्रोजन स्थिरीकरण.

➤ वनस्पतींना नायट्रोजनयुक्त संयुगे मिळतात.

▪️जलव्याल (Hydra) – Zoochlorella शैवाल

➤ शैवाल सूर्यप्रकाशातून अन्न देतो.

➤ Hydra संरक्षण व निवासस्थान प्रदान करते.

▪️बाभळीची झाडे – मुंग्या

➤ मुंग्यांना काट्यांमध्ये निवास व अन्न.

➤ मुंग्या झाडांचे संरक्षण करतात.


2) परजीवन (Parasitism) 

▪️एका सजीवाचा लाभ आणि दुसऱ्याचा तोटा होत असल्यास त्या संबंधाला परजीवन म्हणतात.

▪️तोटा होणारा → पोषिंदा (Host)

▪️फायदा घेणारा → परजीवी (Parasite)


🔹️उदाहरणे :

▪️तंबाखूवरील बंबाकू (Aphids)

➤ वनस्पतीचा रस पिऊन जगतात.

➤ वनस्पतीची वाढ कमी होते.

▪️अमरवेल (Cuscuta) – आंबा/कांचन

➤ हिरव्या रंगाचा अभाव; स्वतः अन्न तयार करू शकत नाही.

➤ पोषिंदाच्या वाहिनीतून रस शोषण.

▪️मानवी शरीरातील जंत (Roundworm इ.)

➤ अन्ननलिकेत राहून अन्न शोषून घेतात.

➤ रक्ताल्पता व पोषणतुटी निर्माण होऊ शकते.