1.📍 ऐतिहासिक पार्श्वभूमी➤ उत्तर प्रदेश सरकारने या घटनेच्या नावात बदल करून "काकोरी ट्रेन लूट"ऐवजी "काकोरी ट्रेन ॲक्शन" असे केले आहे.
➤ ➤ यामागे उद्देश क्रांतिकारकांचे राष्ट्रवादी योगदान अधोरेखित करणे हा आहे.
2.📍 घटना व दिनांक
➤ 9 ऑगस्ट 1925 रोजी लखनऊजवळ काकोरी गावाजवळ उत्तर रेल्वे मार्गावर दरोडा टाकण्यात आला.
➤ ➤ या दरोड्याचा उद्देश सरकारकडून मिळणाऱ्या निधीचा वापर सशस्त्र क्रांतीसाठी करणे होता.
3.📍 सहभागी क्रांतिकारक
➤ राम प्रसाद बिस्मिल
➤ अशफाकुल्ला खान
➤ राजेंद्र लाहिरी
➤ ठाकूर रोशन सिंह
➤ ➤ या चौघांना 19 डिसेंबर 1927 रोजी फाशी देण्यात आली.
4.📍 दरोड्याचे नियोजन - हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA)
➤ HRA ची स्थापना राम प्रसाद बिस्मिल यांनी 1924 मध्ये केली.
➤ ➤ चौरी चौरा घटनेनंतर गांधीजींनी असहकार आंदोलन मागे घेतले. त्यामुळे हिंसक क्रांतीकडे तरुण वळले.
➤ पक्षाचे इतर प्रमुख सदस्य:
➤ ➤ सचिंद्रनाथ सन्याल
➤ ➤ जोगेशचंद्र चॅटर्जी (अनुशीलन समितीचे सदस्य)
5.📍 पक्षाचे विचारसरणी व उद्दिष्टे
➤ लाला हर दयाल यांच्या प्रेरणेतून पक्षाचा घटनात्मक मसुदा अलाहाबाद येथे तयार झाला.
➤ सचिंद्रनाथ सन्याल यांनी 'क्रांतिकारी' नावाचा जाहीरनामा लिहिला.
➤ ➤ उद्दिष्ट: ब्रिटीश सत्तेची उलथापालथ करून "फेडरल रिपब्लिक ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया" स्थापणे.
➤ ➤ सार्वत्रिक मताधिकाराची जोरदार मागणी करण्यात आली होती.
6.📍 पुढील सहभागी क्रांतिकारक व विस्तार
➤ 1924-25 मध्ये अनेक तरुण क्रांतिकारक पक्षात सामील झाले:
➤ ➤ भगतसिंग
➤ ➤ सुखदेव
➤ ➤ चंद्रशेखर आझाद
➤ पक्षाचे नाव पुढे "हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA)" असे ठेवण्यात आले.
7.📍 ऐतिहासिक महत्त्व व स्मरण
➤ काकोरी ॲक्शन ही घटना भारतीय क्रांतिकारी इतिहासातील मैलाचा दगड ठरली.
➤ ➤ ती एक सुसंघटित आणि धाडसी योजना होती, ज्यात क्रांतिकारकांनी ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान दिले.
➤ या घटनेला आता 100 वर्ष होत चालली आहेत – त्यामुळे इतिहासातील या धाडसपूर्ण क्रांतीस पुन्हा उजाळा देणे गरजेचे आहे.
8.📍 शिकवण व प्रेरणा
➤ देशासाठी बलिदान, साहस, संघटन आणि विचारसरणी यांचे उत्तम उदाहरण.
➤ ➤ या क्रांतिकारकांनी जात, धर्म वा भाषा न पाहता एकत्र येऊन देशासाठी प्राण अर्पण केले.
➤ आधुनिक भारतात या क्रांतीचा आदर्श सामाजिक सलोखा, स्वाभिमान व जबाबदारीसाठी प्रेरणा ठरतो.
No comments:
Post a Comment