1️⃣ पार्श्वभूमी व आरंभ
➤ 1929 च्या लाहोर अधिवेशनात ‘संपूर्ण स्वराज्य’ हे राष्ट्रध्येय ठरविण्यात आले.
➤ याच अधिवेशनात सविनय कायदेभंगाचा ठराव मंजूर करण्यात आला.
➤ सविनय कायदेभंग चळवळीसाठी ‘मीठ’ या वस्तूची निवड करण्यात आली.
2️⃣ दांडी यात्रा (12 मार्च ते 6 एप्रिल 1930)
➤ एकूण अंतर : 385 कि.मी. (240 मैल) – साबरमती ते दांडी.
➤ गांधीजींसोबत 78 सहकारी सहभागी झाले.
➤ 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी दांडी किनाऱ्यावर मिठाचा सत्याग्रह केला.
➤ नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना “नेपोलियन अल्बावरून पॅरिसकडे गेला” या घटनेशी केली.
3️⃣ महिलांचा सहभाग 👩🦰
➤ सरोजिनी नायडू
➤ कमलादेवी चट्टोपाध्याय
➤ कमला नेहरू
➤ हेमप्रभा दास
➤ सुचेता कृपलानी
➤ कस्तूरबा गांधी
➤ हंसाबाई मेहता
➤ अवंतीबाई गोखले
4️⃣ सविनय कायदेभंगाचे स्वरूप व प्रमुख केंद्रे
➤ पेशावर सत्याग्रह : नेतृत्व – अब्दुल गफार खान.
➤ सोलापूर सत्याग्रह : लष्करी कायदा अस्तित्वात असताना गिरणी कामगारांनी सत्याग्रह केला.
मल्लाप्पा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आली.
➤ धारासना सत्याग्रह (गुजरात) : नेतृत्व – सरोजिनी नायडू, मीराबेन.
➤ बॉम्बे चौपाटीवर : कमलादेवी चट्टोपाध्याय व अवंतिकाबाई गोखले यांनी मिठाचा सत्याग्रह केला.
➤ महाराष्ट्रात : वडाळा, मालवण, शिरोडा, दहीहंडा इ. ठिकाणी मिठाचा सत्याग्रह.
➤ कर्नाटकात : ‘सनिकट्टा’ येथे मिठाचा सत्याग्रह.
➤ ज्या ठिकाणी समुद्र किनारा नव्हता, तेथे इतर अन्यायकारक कायद्यांचा भंग करण्यात आला.
5️⃣ इतर स्थानिक चळवळी
➤ महाराष्ट्रातील पुसद येथे बापूजी अणे यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह झाला.
➤ सातारा जिल्ह्यातील बिळाशी येथे राजुताई कदम यांच्या नेतृत्वाखाली जंगल सत्याग्रह.
➤ गुजरातमध्ये : खेडा, बाडोली, जंबुसार, भरुच येथे साराबंदी चळवळ राबविण्यात आली.
6️⃣ जनसहभाग व प्रतीकात्मक उपक्रम
➤ प्रभातफेरी, मुलांची वानरसेना या आंदोलनात सक्रिय होती.
➤ देशभरात ब्रिटिश कायद्यांविरुद्ध असहकार, बंद, सभा, निदर्शने झाली.
No comments:
Post a Comment