१) पोषणतत्त्वे
➤ अन्नातील रासायनिक घटक जे योग्य प्रमाणात घेतल्यास शरीराच्या सर्व क्रिया सुरळीत ठेवतात त्यांना पोषणतत्त्वे म्हणतात.
➤ समतोल आहारातील प्रमाण :
▪️ पिष्टमय पदार्थ – ५० ते ७०%
▪️ प्रथिने – १० ते १५%
▪️ स्निग्ध पदार्थ – २० ते ३५%
➤ प्रौढ व्यक्तीस साधारण २४०० कॅलरी ऊर्जा आवश्यक.
२) कर्बोदके / पिष्टमय पदार्थ (Carbohydrates) 🌾
➤ कार्बन + हायड्रोजन + ऑक्सिजन पासून बनलेली संयुगे.
➤ सामान्य सूत्र : Cₙ(H₂O)ₙ
➤ सर्वांत सोपे स्वरूप – ग्लुकोज (त्वरित ऊर्जा).
🔹️उदाहरणे :
➤ माल्टोज = ग्लुकोज + ग्लुकोज (बियामध्ये)
➤ लॅक्टोज = ग्लुकोज + गॅलॅक्टोज (दुधात)
➤ सुक्रोज = ग्लुकोज + फ्रुक्टोज (उसाच्या साखरेत)
➤ सेल्युलोज = ग्लुकोज + ग्लुकोज (वनस्पतींच्या सालीत)
➤ स्टार्च = तांदूळ, गहू, बटाटा इ.
🔹️कार्य :
➤ शरीराला ऊर्जा पुरवणे
➤ प्रथिनांची बचत करणे
➤ स्निग्ध पदार्थांचे पचन सुलभ करणे
➤ सेल्युलोजमुळे मलप्रवृत्ती सुधारते
३) प्रथिने (Proteins) 🧬
➤ कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजनयुक्त संयुगे.
➤ प्रथिने = अमिनो आम्लांची साखळी (एकूण २० अमिनो आम्ले आवश्यक).
➤ क्रियाशील गट : अमिनो (–NH₂) व कार्बोक्झिल (–COOH).
🔹️स्रोत :
➤ डाळी, तेलबिया, मांस, अंडी
🔹️कार्य :
➤ शरीराची वाढ व झीज भरून काढणे
➤ एंझाइम्स, संप्रेरके, प्रतिपिंडे — सर्व प्रथिनांचेच बनलेले
४) स्निग्ध पदार्थ / मेद (Fats) 🧈
➤ कार्बन + हायड्रोजन + ऑक्सिजन, परंतु हायड्रोजनचे प्रमाण जास्त.
➤ ग्लिसेरॉल + स्निग्ध आम्ले = मेद.
🔹️स्रोत :
➤ तेलबिया, वनस्पती तूप, दूध, तूप, लोणी, मांस, कॉड लिव्हर ऑईल
🔹️कार्य :
➤ ऊर्जेचा अंतिम स्रोत
➤ जीवनसत्त्वांचे वाहक
➤ शरीराचे तापमान संतुलित ठेवणे
➤ अंतर्गत अवयवांचे संरक्षण
➤ अन्नाची चव व रुचि वाढवणे
No comments:
Post a Comment