06 September 2025

चालू घडामोडी :- 05 सप्टेंबर 2025



◆ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ भारताने 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला.

◆ 2025 च्या शिक्षक दिनाची थीम "पुढील पिढीच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे" ("Inspiring the Next Generation of Learners") आहे.

◆ जागतिक शिक्षक दिन हा दरवर्षी 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

◆ 2024 च्या जागतिक शिक्षक दिनाची थीम "Valuing Teacher Voices" होती.

◆ स्टार्टअप्स आणि नवोन्मेषकांना पाठिंबा देण्यासाठी DPIIT आणि ICICI बँकेने सामंजस्य करार केला.

◆ भारतीय वंशाचे अमेरिकन अमित क्षत्रिय यांची नासाच्या असोसिएट प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ लेखक अमीष त्रिपाठी यांनी त्यांची 'द चोला टायगर्स: द अवेंजर्स ऑफ सोमनाथ' ही कादंबरी लाँच केली.

◆ अनुभवी लेग-स्पिनर अमित मिश्राने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

◆ IAS अधिकारी पियुष गोयल यांनी खाण मंत्रालयाच्या सचिवपदाचा पदभार स्वीकारला.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2025 जाहीर केले.

◆ राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2025 च्या एकूण क्रमवारीत IIT मद्रास अव्वल स्थानावर आहे. 

◆ भारतीय विज्ञान संस्था (IISc) बंगळूरूची NIRF 2025 नुसार देशातील सर्वोत्तम विद्यापीठ म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

◆ NIRF 2025 नुसार IIM अहमदाबाद हे भारतातील पहिल्या क्रमांकाचे व्यवस्थापन महाविद्यालय ठरले आहे.

◆ नमुना नोंदणी प्रणाली (SRS) 2023 च्या अहवालानुसार, मणिपूर राज्यात सर्वात कमी बालमृत्यू दर (IMR) नोंदवला गेला आहे.