एखाद्या राज्यातील शासनयंत्रणा कोलमडल्यास, घटनेप्रमाणे कारभार चालू शकणार नाही, अशी राज्यपालांची खात्री झाल्यास राज्यपाल तसा अहवाल राष्ट्रपतींना पाठवितात. त्या अहवालाबाबत खात्री झाल्यास राष्ट्रपती तेथील सरकार बडतर्फ करू शकतात.
कलम 356 नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतींने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू करण्यात येते.
पुन्हा निवडणूक होईपर्यंत तेथे राष्ट्रपती राजवट लागू केली जाते हा कालावधी 6 महिन्यापर्यंत वाढविता येतो.
राज्यात जास्तीत जास्त 3 वर्षे राष्ट्रपती राजवट लावू शकता येते. (भारतात प्रथम पंजाब राज्यात 1951 साली 356 कलम लावल्या गेले.)
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्याचे सर्व अधिकार केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे एकवटतात.
राष्ट्रपती राजवटीच्या कालावधीत विधानसभा निलंबित अवस्थेत राहते. ती स्थापनही झाली नसेल तर तिचे गठनही निलंबित राहते.
राज्यपालांच्या मदतीसाठी तीन सनदी अधिकारी सल्लागार म्हणून काम करतात. राज्याचे सर्व प्रशासन राज्यपालांच्या अधिकार कक्षेत येते. विधानसभा जे कायदे करते ते कायदे संसदेत केले जातात.
संसदेच्या दोन्ही सभागृहांची संमती न मिळाल्यास राष्ट्रपती राजवट सहा महिन्यांनी संपुष्टात येते. संसदेची संमती घेऊन एका वेळी सहा महिने अशा प्रकारे जास्तीत जास्त तीन वर्षे राष्ट्रपती राजवट लागू राहू शकते. मात्र राष्ट्रपती राजवट एक वर्षाहून अधिक काळ लागू ठेवायची असेल तर संबंधित राज्यात निवडणूक घेणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाचे प्रमाणपत्र सक्तीचे असते. देशात आधीपासूनच आणिबाणी पुकारलेली असेल तर एखाद्या राज्यातील राष्ट्रपती राजवट एक वर्षांहून जास्त काळ लागू ठेवता येऊ शकते.
राज्यातील शासन राज्यघटनेनुसार चालविता येण्यासारखी परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्याची खात्री झाल्याने राज्यपालांनी तशी शिफारस केल्यास लागू असलेली राष्ट्रपती राजवट केव्हाही संपुष्टात आणता येते. सरकार स्थापन न होऊ शकल्याने लावलेली राष्ट्रपती राजवट सरकार स्थापनेची शक्यता निर्माण होईल तेव्हा उठविता येते. लागू केलेली राष्ट्रपती राजवट उठविण्यासाठी संसदेच्या संमतीची गरज नसते.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपाल राजकीय पक्षांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावू शकतात. सर्वांत जास्त संख्या असलेल्या किंवा बहुमताचा आकडा शक्य असलेल्या राजकीय पक्षांना सत्तास्थापनेचा दावा करता येतो. त्यांना ठराविक मुदत देऊन बहुमत सिद्ध करण्यास सांगितले जाते.
राष्ट्रपती राजवटीच्या काळात मंत्रिमंडळच नसते. त्यामुळे पालकमंत्री असण्याचा प्रश्नच नाही. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी ध्वजारोहण करतात.
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
06 August 2020
राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? राष्ट्रपती राजवट केव्हा लागते?
प्रसिध्द ठिकाणांबद्दल वापरलेले नाव
● मुंबई : भारताचे प्रवेशद्वार
● म्यानमार : सोनेरी पॅगोडांची भूमी
● स्वित्झर्लंड : युरोपचे क्रिडांगण
● शिकागो : उद्यानांचे शहर
● रवांडा : आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
● श्रीलंका : पाचूंचे बेट
● पॅलेस्टाईन : पवित्रभूमी
● प्रेअरी प्रदेश : जगाचे धान्याचे कोठार
● फिनलंड : हजार सरोवरांचा देश
● बंगळूर : भारताचे उद्यान
● बहरिन : मोत्यांचे बेट
● बाल्कन प्रदेश : युरोपचा सुरुंग
● बेलग्रेड : श्वेत शहर
● मुंबई : सात टेकड्यांचे शहर
● बेल्जियम : युरोपचे रणक्षेत्र
● इजिप्त : नाईलची देणगी
● ऑस्ट्रेलिया : कांगारूचा देश
● काश्मीर : भारताचे नंदनवन
● कॅनडा : बर्फाची भूमी
● जयपूर : गुलाबी शहर
● कोलकाता : राजवाड्यांचे शहर
● क्यूबा : जगाचे साखरेचे कोठार
● कॅनडा : मॅपल वृक्षांचा देश
● कॅनडा : लिलींचा देश
● कोची : अरबी समुद्राची राणी
● जिब्राल्टर : भू-मध्य समुद्राची किल्ली
● आफ्रिका : काळे खंड
● आयर्लंड : पाचूंचे बेट
● झांझिबार : लवंगांचे बेट
● तिबेट : जगाचे छप्पर
● जपान : पूर्व गोलार्धातील इंग्लंड
● थायलंड : पांढऱ्या हत्तींचा देश
● दामोदर नदी : बंगालचे दुःखाश्रू
● नॉर्वे : मध्यरात्रीच्या सुर्याचा देश
● पामीरचे पठार : जगाचे आढे
● न्यूयॉर्क : गगनचुंबी इमारतींचे शहर
● अमेरिका : सूर्यास्ताचा देश
● अमृतसर : सुवर्णमंदिरांचे शहर
● जपान : उगवत्या सुर्याचा देश
मानवाच्या इतिहासातील दुर्दैवी दिवस
आज 6 ऑगस्ट. आजच्याच दिवशी दुसऱ्या महायुद्धात जपानमधील 'हिरोशिमा' शहरावर मित्र राष्ट्रांनी अणुबॉम्ब टाकून या शहरास बेचिराख केले.
अणुबॉम्बच्या विध्वंसक परिणामामुळे हिरोशिमा शहरात मोठी जीवित हानी झाली. या दुर्दैवी घटनेला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. याबाबत काही घडामोडी जाणून घेऊयात.
शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन यांनी पदार्थाला शक्तीमध्ये व शक्तीला पदार्थात द्रव्यशक्ती समीकरणाद्वारे परावर्तीत करणे शक्य असल्याचा सिद्धांत मांडला.
दुस-या महायुद्धापूर्वी शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांच्याकडून प्रेरणा घेऊन शास्त्रज्ञ डॉ. रॉबर्ट ओपेनहाइमर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.
या कार्यात जर्मनी, युरोप आणि अमेरिकेच्या प्रमुख वैज्ञानिकांचा सहभाग होता. अथक परिश्रमानंतर १३ जुलै १९४५ ला एलामोगेडरोच्या वाळवंटात या अणुबॉम्बची चाचणी घेण्यात आली.
या चाचणीत भल्यामोठ्या ज्वालाचा स्फोट होऊन एक मैल त्रिज्येतील जीवजंतू मृत्युमुखी पडून ९ मैलापर्यंत ज्वालांची उष्णता पसरली.
त्यानंतर दोन बॉम्बच्या निर्मितीचा निश्चय करण्यात आला. त्यापैकी एक अणुबॉम्ब हिरोशिमा शहरात टाकण्यात आला.
६ ऑगस्ट १९४५ हा मानवाच्या इतिहासातील अतिशय दुर्दैवी दिवस. मित्र राष्ट्रांनी जपानमधील 'हिरोशिमा' शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकून जग स्तब्ध केले.
अणुबॉम्बचा प्रभावामुळे तीन लाख वस्तीचे शहर क्षणात नष्ट झाले. विज्ञानानेच मानवाच्या आत्मविश्वासावर केलेला तो मोठा हल्ला होता.
मानवाच्या क्रुरतेपुढे मानवाच्या साहस व शौर्याला पराजय पत्करावा लागला. जपानने या बॉम्ब हल्ल्यानंतर शरणागती पत्करली.
हिरोशिमावर टाकलेला बॉम्ब हा युरेनियम गन टाईप अॅटोमिक बॉम्ब होता. त्याचा स्फोट या शहराच्या २००० फूट उंचावर झाला.
हिरोशिमाचा पाच चौरस मैल भाग नष्ट होऊन निम्मे लोक बॉम्ब टाकलेल्या दिवशीच मरण पावले. तदनंतरच्या महिन्यात अनेक जखमी उत्सर्जित किरणाच्या आजारामुळे मृत्यू पावले.
या बॉम्बस्फोटानंतर जगभरात संतापजनक तीव्र पडसाद उमटले, या बॉम्बचे जनक डॉ. ओपेनहाईमर यांनी आपला राजीनामा देऊन मानवतेचा संदेश जगास दिला.
त्यानंतर जगभरात आण्विक शस्त्रास्त्र कमी करण्यासाठी मॉस्कोत एक करार करून अणुबॉम्बच्या भूमिगत चाचण्यास संमती देऊन हवा व पाणी या चाचण्यांस विरोध करण्यात आला.
चालू घडामोडीचे प्रश्न व उत्तरे
Q1) जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात येत आहे?
उत्तर :- जम्मू व काश्मीर
Q2) कोणत्या संस्थेत “विमेन आंत्रेप्रेनेऊरशिप अँड एंपोवरमेंट (WEE) कोहोर्ट” उपक्रमाचा प्रारंभ केला गेला?
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली
Q3)कोणत्या बँकेनी ‘कोना कोना उम्मीद’ मोहीमेचा प्रारंभ केला?
उत्तर :- कोटक महिंद्रा बँक
Q4) "स्वच्छ भारत रेव्होल्यूशन” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?
उत्तर :- परमेश्वरन अय्यर
Q5) कोणत्या संस्थेच्यावतीने “सहकार कूपट्यूब NCDC चॅनेल” कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ
Q6 'खेलो इंडिया’योजनेच्या सर्वसाधारण परिषदेच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर :- किरेन रीजीजू
Q7) कोणत्या व्यक्तीची ऑल इंडिया रेडिओच्या वार्ता सेवा विभागाच्या महासंचालक पदावर नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :- जयदीप भटनागर
Q8) कोणत्या राज्याने महिला सक्षमीकरणासाठी ITC, HUL आणि P&G या संस्थांसोबत सामंजस्य करार केला?
उत्तर :- आंध्रप्रदेश
Q9) कोणत्या संस्थेला ‘गांधीयन यंग टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन अवॉर्ड 2020’ हा पुरस्कार देण्यात आला?
उत्तर :- भारतीय तंत्रज्ञान संस्था, खडगपूर
Q10) कोणत्या व्यक्तीची HDFC बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर :- शशिधर जगदीशन ( अगोदरचे आदित्य पुरी )
Q1) कोणत्या व्यक्तीने गुयाना देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली?
उत्तर :- डॉ इरफान अली
Q2) कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी 'ई-रक्षा बंधन' कार्यक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- आंध्रप्रदेश
Q3) कोणत्या राज्य सरकारने “एक मास्क-अनेक जिंदगी” मोहीम राबविण्यास सुरुवात केली?
उत्तर :- मध्यप्रदेश
Q4) कोणत्या संकल्पनेखाली 2020 सालाचा ‘जागतिक स्तनपान आठवडा’ आयोजित करण्यात आला?
उत्तर :- सपोर्ट ब्रेस्टफीडिंग फॉर ए हेल्दीयर प्लॅनेट
Q5) “सियासत में सदस्यता” हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर :- विजय कुमार चौधरी
Q6) कोणत्या संस्थेत मोतीबिंदूवरील उपचारासाठी अॅस्पिरिन औषधापासून नॅनोरोड विकसित करण्यात आले?
उत्तर :- इन्स्टिट्यूट ऑफ नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी
Q7) कोणत्या संस्थेला पर्यावरण शाश्वतीकरण श्रेणीत ‘FICCI CSR पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले?
उत्तर :- दालमिया भारत ग्रुप
Q8) कोणती व्यक्ती जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी मंडळाच्या बैठक सत्राचे अध्यक्ष होते?
उत्तर :- डॉ. हर्ष वर्धन
Q9) कोणत्या राज्यात फिरते ‘iMASQ कोविड-19 तपासणी केंद्र’चे अनावरण करण्यात आले?
उत्तर :- तेलंगणा
Q10) कोणता देश आशिया-प्रशांत क्षेत्रासाठीच्या कार्यकारी मंडळात ‘संयुक्त राष्ट्रसंघ-निवासक्षेत्र’ यांच्यावतीने सदस्य म्हणून निवडला गेला?
उत्तर :- इराण
पोलीस भरती महत्त्वाचे प्रश्न उत्तरे
१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?
१) पुणे
२)नागपूर
३)मुंबई
४)अहमदनगर ✅
२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?
१)नाशिक
२)पुणे
३)मुंबई उपनगर ✅
४)मुंबई शहर
३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?
१)ठाणे जिल्हा
२)पुणे जिल्हा
३) वाशिम जिल्हा
४)परभणी जिल्हा ✅
४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
१)१६ ✅
२)०९
३)१३
४)१०
५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?
१) आंध्र प्रदेश
२)तेलंगणा
३)मध्य प्रदेश ✅
४)कर्नाटक
६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?
१) पूर्व - पश्चिम
२) पश्चिम - उत्तर
३)उत्तर - पूर्व ✅
४) दक्षिण - पूर्व
७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?
१)भिलेवडा
२) भिल्लेश्र्वर
३) भिवटेकडी
४) भिलठाण ✅
८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) अमरावती
२) लात्तुर
३) सोलापूर
४)बुलढाणा ✅
९) सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) चंद्रपूर
२) नागपूर
३) भंडारा
४) यवतमाळ ✅
१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) सांगली
२)सातारा ✅
३)धुळे
४) औरंगाबाद
११) धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
१)४ ✅
२)१०
३)१४
४)१६
१२) तोरणमाळ डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जळगाव जिल्हा
२) बुलढाणा जिल्हा
३)नाशिक जिल्हा
४) नंदुरबार जिल्हा ✅
१३) खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?
१) वाशिम जिल्हा
२) धुळे जिल्हा
३) जळगांव जिल्हा ✅
४)हिंगोली जिल्हा
१४) गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जालना जिल्हा
२)परभणी जिल्हा
३) सातारा जिल्हा
४) औरंगाबाद जिल्हा ✅