28 June 2025

28 जून - चालू घडामोडी 2025

1) 'द वन: क्रिकेट, माय लाईफ अँड मोअर' हे पुस्तक कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने लिहिले आहे ?

✅ शिखर धवन 


2) The New World २१ century Globel order and India Book कोणी लिहिले आहे ?

✅ राम माधव 


3) ब्लूमबर्ग फिलान्थ्रॉपीजचा जागतिक तंबाखू नियंत्रण पुरस्कार २०२५ भारतासह किती देशाला मिळाला आहे ?

✅ ६ देश 


4) JCB पुरस्कार बंद करण्यात आला आहे. तो कोणत्या क्षेत्राशी सबंधित दिला जात होता ?

✅ साहित्य 


5) 2025 ची नाटो शिखर परिषद कोठे पार पडली ?

✅ हेग, नेदरलँड


6) इंटरनॅशनल Society of blood transfusion द्वारा मान्यता प्राप्त नवीन रक्त समूहाचं नाव काय आहे ?

✅ EMM negetive


7) जागतिक शांतता निर्देशांक २०२५ मध्ये १६३ देशांच्या यादीत भारताची रँक कितवी आहे ?

✅ ११५ वी 


8) जागतिक शांतता निर्देशांक २०२५ मध्ये १६३ देशांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे ?

✅ आइसलँड


9) महाराष्ट्रात २६ जून रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो ?

✅ सामाजिक न्याय दिन


10) जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन कधी साजरा करण्यात येतो ? 

✅ २६ जून

चालू घडामोडी :- 27 जून 2025

◆ व्यवसाय जबाबदारी आणि शाश्वतता अहवाल (BRSR) SEBI या संस्थेने सुरू केला.


◆ जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत अलीकडेच समाविष्ट झालेले सालखान जीवाश्म उद्यान उत्तर प्रदेश राज्यात आहे.


◆ केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिले सागरी एनबीएफसी, सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (SMFCL) सुरू केले.


◆ आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती (IOC) च्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष "केर्सी कोव्हेंट्री" बनल्या आहेत.


◆ दरवर्षी 25 जून रोजी आंतरराष्ट्रीय नाविक दिन साजरा केला जातो. 


◆ आंतरराष्ट्रीय नाविक दिन 2025 ची थीम "आमचा समुद्र, आमची जबाबदारी, आमची संधी" (Our Ocean, Our Responsibility, Our Opportunity) अशी आहे.


◆ आंतरराष्ट्रीय नाविक दिनाची 2024 ची थीम "भविष्यात नेव्हिगेट करणे: सुरक्षितता प्रथम!" आहे.


◆ भारतातील पहिली क्वांटम कॉम्प्युटिंग व्हॅली आंध्र प्रदेश राज्यात स्थापन होत आहे.


◆ भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य केरळ राज्यात स्थापन करण्यात आले आहे.


◆ पासपोर्ट सेवा पोर्टल परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केले आहे.


◆ 2025 च्या अमरनाथ यात्रापूर्वी भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांवर सुरू केलेल्या कारवाईचे नाव "ऑपरेशन बिहाली" आहे.


◆ कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी उष्णता आणि जिवाणू संसर्गापासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी एक सुधारित CRISPR साधन विकसित केले आहे.


◆ बनकाचेरला जलाशय प्रकल्पावरून "तेलंगणा आणि आंध्र प्रदेश" या दोन राज्यांमध्ये आंतरराज्यीय पाणी वाद सुरू आहे.


◆ द्वारका एक्सप्रेसवे हा भारतातील पहिला मार्ग बनला आहे ज्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित ॲडव्हान्स्ड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ATMS) बसवले आहे.


बंगालचे गव्हर्नर-जनरल (1773–1833)


1.वॉरेन हेस्टिंग्ज (1773–1785)

✅️ ➤ रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 अंतर्गत पहिले गव्हर्नर-जनरल

✅️ ➤ रोहिला युद्ध, पहिले मराठा युद्ध

✅️ ➤ दीवान पदाचा वापर आणि महसूल सुधारणा

✅️ ➤ नंदकुमार प्रकरण व इलाहाबाद करार


2.लॉर्ड कॉर्नवॉलिस (1786–1793)

✅️ ➤ कायमस्वरूपी जमीन महसूल व्यवस्था (Permanent Settlement)

✅️ ➤ दुसरे म्हैसूर युद्ध

✅️ ➤ न्याय व्यवस्थेत सुधारणा व सिव्हिल सेवा सुरू


3.लॉर्ड वेलस्ली (1798–1805)

✅️ ➤ सहकार प्रणाली (Subsidiary Alliance)

✅️ ➤ चौथे म्हैसूर युद्ध – टीपू सुलतानचा पराभव

✅️ ➤ मराठ्यांवर लष्करी दबाव


4.लॉर्ड मिंटो I (1807–1813)

✅️ ➤ मिंटो-अमर सिंग करार (नेपाळ संबंध)

✅️ ➤ किल्ल्यांवर वर्चस्व वाढवले

✅️ ➤ व्यापारी ठाण्यांचे संरक्षण


5.लॉर्ड हेस्टिंग्ज (1813–1823)

✅️ ➤ पहिला आंग्ल-नेपाळ युद्ध

✅️ ➤ पहिला आंग्ल-मराठा युद्ध (1817–1818)

✅️ ➤ पिंडाऱ्यांचा नाश

✅️ ➤ 1813 चा चार्टर ॲक्ट


6.लॉर्ड अमहर्स्ट (1823–1828)

✅️ ➤ पहिले बर्मी युद्ध (1824–26)

✅️ ➤ सिंधवरील नियंत्रण वाढवले


🔆 भारताचे गव्हर्नर-जनरल (1833–1858)

7.लॉर्ड विल्यम बेंटिक (1828–1835)

✅️ ➤ सती प्रथेवर बंदी (1829)

✅️ ➤ थग प्रथा नष्ट करणे

✅️ ➤ इंग्रजी शिक्षणाला प्राधान्य

✅️ ➤ 1833 चा चार्टर ॲक्ट


8.लॉर्ड ऑकलंड (1836–1842)

✅️ ➤ पहिले अफगाण युद्ध (1838–42)

✅️ ➤ सैधव धोरणाचा प्रारंभ


9.लॉर्ड हार्डिंग I (1844–1848)

✅️ ➤ पहिला सिख युद्ध

✅️ ➤ सतलज प्रदेशावर ताबा


10.लॉर्ड डलहौसी (1848–1856)

✅️ ➤ “Doctrine of Lapse” नीती

✅️ ➤ दुसरा सिख युद्ध

✅️ ➤ टेलीग्राफ व रेल्वे यंत्रणा सुरू

✅️ ➤ सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना

✅️ ➤ पोस्टल युनिफिकेशन


🔆 व्हाइसरॉय (1858–1947)

11.लॉर्ड कॅनिंग (1856–1862)

✅️ ➤ 1857 चा उठाव आणि कंपनीचा शेवट

✅️ ➤ भारत शासन ॲक्ट 1858

✅️ ➤ इंडियन पेनल कोड व इंडियन कौन्सिल ॲक्ट 1861

✅️ ➤ पहिला व्हाइसरॉय


12.लॉर्ड लॉरेन्स (1864–1869)

✅️ ➤ दुसरा अफगाण धोरण

✅️ ➤ भूकंपग्रस्त मदत कार्य


13.लॉर्ड लिटन (1876–1880)

✅️ ➤ 1877 मध्ये दिल्लीत समारंभ – व्हिक्टोरिया सम्राज्ञी घोषित

✅️ ➤ मुद्रण स्वातंत्र्य दमन (Vernacular Press Act)

✅️ ➤ दुसरे अफगाण युद्ध

✅️ ➤ कडव्या दुष्काळाकडे दुर्लक्ष


14.लॉर्ड रिपन (1880–1884)

✅️ ➤ स्थानिक स्वराज्याला प्रोत्साहन (Local Self Government)

✅️ ➤ इल्बर्ट बिल (1883) – वादग्रस्त ठरले

✅️ ➤ प्रेस स्वातंत्र्याचे समर्थन


15.लॉर्ड डफरिन (1884–1888)

✅️ ➤ काँग्रेसची स्थापना (1885)

✅️ ➤ सुधारक धोरणांचे समर्थन


16.लॉर्ड लॅन्सडोन (1888–1894)

✅️ ➤ दुसरा इंडियन कौन्सिल ॲक्ट (1892)

✅️ ➤ दुहेरी धोरण – राजकीय संवाद व नियंत्रण


17.लॉर्ड कर्झन (1899–1905)

✅️ ➤ बंगाल फाळणी (1905)

✅️ ➤ शैक्षणिक सुधारणांसाठी इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट (1904)

✅️ ➤ पुरातत्व विभागाची स्थापना


18.लॉर्ड मिंटो II (1905–1910)

✅️ ➤ मिंटो-मॉर्ले सुधारणा (1909)

✅️ ➤ मुस्लीम पृथग्नता राजकारणाचा प्रारंभ


19.लॉर्ड हार्डिंग II (1910–1916)

✅️ ➤ राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे स्थलांतर

✅️ ➤ दिल्ली दरबार (1911)

✅️ ➤ बंगाल फाळणी रद्द


20.लॉर्ड चेल्म्सफर्ड (1916–1921)

✅️ ➤ मोंटेग्यू-चेम्सफर्ड सुधारणा (1919)

✅️ ➤ रॉलेट कायदा, जालियनवाला बाग हत्याकांड

✅️ ➤ भारत सरकार ॲक्ट 1919


21.लॉर्ड रीडिंग (1921–1926)

✅️ ➤ स्वराज पक्षाची स्थापना

✅️ ➤ चोऱी-चरखा आंदोलन


22.लॉर्ड इरविन (1926–1931)

✅️ ➤ सायमन कमिशन विरुद्ध आंदोलन

✅️ ➤ गांधी-इरविन करार (1931)

✅️ ➤ पहिले गोलमेज परिषद


23.लॉर्ड विलिंग्डन (1931–1936)

✅️ ➤ दुसरे व तिसरे गोलमेज परिषद

✅️ ➤ भारतीय कायदे मंडळ सुधारणा


24.लॉर्ड लिनलिथगो (1936–1944)

✅️ ➤ दुसरे भारत शासन ॲक्ट (1935) अंमलात

✅️ ➤ दुसरे महायुद्धात भारताचा सहभाग

✅️ ➤ 'अगस्त ऑफर' (1940)


25.लॉर्ड वेव्हल (1944–1947)

✅️ ➤ शिमला परिषद (1945)

✅️ ➤ अंतर्गत मंत्रिमंडळ योजना


26.लॉर्ड माउंटबॅटन (1947)

✅️ ➤ स्वतंत्र भारताचे शेवटचे व्हाइसरॉय

✅️ ➤ भारत-विभाजन योजना (3 जून योजना)

✅️ ➤ स्वतंत्र भारताचा पहिले गव्हर्नर-जनरल


27.चक्रवर्ती राजगोपालाचारी (1948–1950)

✅️ ➤ भारताचे पहिले व शेवटचे मूळ भारतीय गव्हर्नर-जनरल

✅️ ➤ 1950 मध्ये गव्हर्नर-जनरल पद समाप्त – राष्ट्रपतीपद सुरू


सिंधू/हडप्पा खोरे संस्कृती





1. 📍 भौगोलिक विस्तार (Area Coverage)

✅️ ➤ पश्चिम : सुत्कागेंडोर (बलुचिस्तान, पाकिस्तान) – दश्क नदी

✅️ ➤ दक्षिण : दाईमाबाद (महाराष्ट्र) – गोदावरी नदी

✅️ ➤ पूर्व : आलमगीरपूर (उत्तर प्रदेश) – हिंडन नदी

✅️ ➤ उत्तर : मांडा (जम्मू) – चिनाब नदी

✅️ ➤ त्रिकोणी भौगोलिक प्रदेश, साधारणतः 1600 किमी x 1400 किमी क्षेत्र

✅️ ➤ 1500 हून अधिक स्थळे; यापैकी ~1100 भारतात


2. 📅 कालखंड व स्वरूप (Chronology & Nature)

✅️ ➤ कालावधी : इ.स.पू. 3300 ते इ.स.पू. 1300 (मुख्य कालावधी : 2600–1900 BCE)

✅️ ➤ प्रारंभिक हडप्पा, प्रौढ हडप्पा, उत्तर हडप्पा – तीन टप्पे

✅️ ➤ प्रोटो-इतिहास व कांस्ययुगीन नागर संस्कृती

✅️ ➤ लिपी सापडली, पण अद्याप अपठित


3. 🔍 शोधकर्ते व उत्खनन (Discovery and Excavations)

✅️ ➤ 1921 – दयाराम सहानी (हडप्पा)

✅️ ➤ 1922 – आर. डी. बॅनर्जी (मोहनजोदडो)

✅️ ➤ मुख्य योगदान – सर जॉन मार्शल

✅️ ➤ इतर महत्त्वाचे उत्खननकर्ते – बी.बी. लाल, वसंत शिंदे, एम.एस. वैद्य


4. 🏙️ प्रमुख 6 शहरे (Major Cities)

✅️ ➤ हडप्पा (पाकिस्तान)

✅️ ➤ मोहनजोदडो (पाकिस्तान)

✅️ ➤ गन्वारीवाला (पाकिस्तान)

✅️ ➤ धोलावीरा (गुजरात)

✅️ ➤ राखीगढी (हरियाणा)

✅️ ➤ कालीबंगन (राजस्थान)


5. 📏 आकारानुसार महत्त्वाची स्थळे (Important Sites by Size)

✅️ ➤ सर्वात मोठे स्थळ – मोहनजोदडो (~250 हेक्टर)

✅️ ➤ भारतातील सर्वात मोठे स्थळ – राखीगढी (~350 हेक्टर)

  ➤ शोधकर्ता – डॉ. सुरजबान

  ➤ नदी – घग्गर

✅️ ➤ धोलावीरा – त्रिस्तरीय नगर, जलसंधारणाचे उत्तम उदाहरण


6. ⚓️ बंदरनगरे (Port Cities)

✅️ ➤ लोथल – गोदी, जलमार्ग व्यापार

✅️ ➤ सुत्कोटदा – घोड्याचे व बंदराचे पुरावे

✅️ ➤ इतर : बालथळ, केसरी, कांढला (संभाव्य स्थळे)


7. 🏛️ भांडाराच्या राजधानी स्वरूपाच्या शहरे (Dual Capitals - Piggott)

✅️ ➤ हडप्पा – उत्तरेकडील राजकीय केंद्र

✅️ ➤ मोहनजोदडो – दक्षिणेकडील सांस्कृतिक केंद्र


8. 👥 लोकांचा वंश व उगम (People & Origin)

✅️ ➤ द्रविडियन, भूमध्य वंशीय व प्रोटो-ऑस्ट्रलॉइड मिश्र वंश

✅️ ➤ आर्यपूर्व नागर संस्कृतीचे प्रतिनिधित्व

✅️ ➤ राखीगढी DNA पुरावे – आनुवंशिक माहिती मिळवलेली


9. 🛤️ वाहतूक व संपर्क (Transport & Connectivity)

✅️ ➤ बैलगाड्या, जलमार्ग, रथांची शक्यता

✅️ ➤ सरळ व समांतर रस्ते

✅️ ➤ लोथल – गोदी, जलमार्ग व्याप्ती


10. 🗿 सांस्कृतिक एकात्मता (Cultural Uniformity)

✅️ ➤ विटांची एकसारखी रचना (1:2:4 प्रमाण)

✅️ ➤ एकसारखी लिपी, शिक्के, वजनमापन

✅️ ➤ धर्म, स्थापत्यशास्त्र व नागरी योजनांमध्ये सातत्य


🔎 निष्कर्ष

✅️ ➤ सिंधू खोरे संस्कृती ही स्थापत्य, नागरी व्यवस्था, स्वच्छता, व्यापार व धार्मिक दृष्टिकोनातून प्रगत संस्कृती होती

✅️ ➤ तिच्या अनेक वैशिष्ट्यांचा ठसा भारतीय उपखंडातील पुढील संस्कृतींवर स्पष्टपणे आढळतो.


सिंधू संस्कृतीतील प्रमुख शोध (Indus Valley Civilization - प्रमुख स्थळे व वैशिष्ट्ये)


1. मोहनजोदडो (Mohenjodaro – सिंधू नदी, पाकिस्तान)

✅️ ➤ महास्नानगृह – (11.88 मी x 7.01 मी x 2.43 मी), सार्वजनिक स्नानगृह

✅️ ➤ पशुपती मूर्ती – ध्यानमग्न योगमुद्रेतील देव, सभोवताली हत्ती, गेंडा, वाघ, म्हैस

✅️ ➤ नृत्य करणारी मुलगी – कांस्यातील कलात्मक मूर्ती

✅️ ➤ अन्न साठवण कोठारे व जलनाल व्यवस्था

✅️ ➤ स्नानगृहे, विहिरी – स्वच्छतेवर भर

✅️ ➤ बहुमजली घरे व ग्रिड पद्धतीतील रस्ते

✅️ ➤ शिक्कांवर लिपी व प्राणीचित्र

✅️ ➤ मृतदेह ठेवण्यासाठी लाकडी पेट्यांचा वापर (secondary burial clue)


2. हडप्पा (Harappa – रावी नदी, पाकिस्तान)

✅️ ➤ धान्य साठवण कोठारे

✅️ ➤ वजनमाप प्रणाली व मृत्तिका शिक्के

✅️ ➤ शहराची नागरी व प्रशासकीय विभागणी

✅️ ➤ दफन संस्कृतीचे पुरावे

✅️ ➤ ग्रिड पद्धतीने रस्त्यांचे नियोजन

✅️ ➤ धातुकाम व मण्यांचे उद्योग

✅️ ➤ टेराकोटा खेळणी व प्राणीप्रतीके


3. कालीबंगन (Kalibangan – घग्गर नदी, राजस्थान)

✅️ ➤ वैशिष्ट्यपूर्ण विटा

✅️ ➤ नांगराच्या खुणा असलेले शेतीचे अवशेष

✅️ ➤ अग्निकुंड व भिंती – धार्मिक विधींसाठी

✅️ ➤ घोड्याचे पुरावे

✅️ ➤ शहराची तीन भागांत विभागणी

✅️ ➤ नियोजनबद्ध जलनाल व्यवस्था

✅️ ➤ नादी व पाणवठ्यांचे उपयोग


4. लोथल (Lothal – भोगवा नदी, गुजरात)

✅️ ➤ बंदर शहर – जलवाणिज्याचे केंद्र

✅️ ➤ अग्निकुंड – धार्मिक उपयोग

✅️ ➤ मौल्यवान दगड, मोती उद्योग

✅️ ➤ दरवाजे थेट मुख्य रस्त्याला उघडणारे – विशेष वैशिष्ट्य

✅️ ➤ भाताचे पहिले पुरावे

✅️ ➤ घोड्याचे पुरावे

✅️ ➤ जलाशय व जलव्यवस्थापन

✅️ ➤ मृत्तिकाशिक्के – व्यापारासाठी वापर


5. चन्हूदारो (Chanhudaro – सिंधू नदी, पाकिस्तान)

✅️ ➤ मोत्यांचे उत्पादन

✅️ ➤ सौंदर्यप्रसाधनांचे पुरावे – काजळदाणी, सुगंधी तेल

✅️ ➤ चामड्याचे काम

✅️ ➤ वस्त्रनिर्मिती व धातुकाम

✅️ ➤ खेळणी व फुलदाण्यांच्या आकृती

✅️ ➤ लघु घरांचे नागरी नमुने


6. सुतकागेंडोर / सुतकोटदा (Sutkagendor / Sutkotda – बलुचिस्तान, पाकिस्तान)

✅️ ➤ घोड्याचे पुरावे

✅️ ➤ बंदराचे पुरावे

✅️ ➤ ओमान व पश्चिम व्यापाराचे संकेत

✅️ ➤ अरबी समुद्रावरील महत्त्वाचे बंदर


7. बनवाली (Banawali – हरियाणा)

✅️ ➤ मातीचे नांगर

✅️ ➤ शेतीचे अवशेष – गहू, बार्ली

✅️ ➤ वेगळ्या शैलीतील विटा

✅️ ➤ नागरी नियोजन व टाकी व्यवस्था

✅️ ➤ वस्तीचे नकाशानुसार नियोजन


8. रंगपूर (Rangpur – गुजरात)

✅️ ➤ भाताचे पुरावे

✅️ ➤ मातीची भांडी व शेती अवशेष

✅️ ➤ नैऋत्य भारतातील सिंधू प्रभाव

✅️ ➤ जलवाहन व्यवस्थेचे अवशेष

✅️ ➤ दगडी व लाकडी घरांची उदाहरणे


🔎 सामान्य वैशिष्ट्ये:

✅️ ➤ ग्रिड पद्धतीने रचलेली शहरे

✅️ ➤ विहिरी, जलनाल, जलनिकासी यंत्रणा

✅️ ➤ वजनमापासाठी प्रमाणित मापे

✅️ ➤ शिक्के – व्यापार, धार्मिक उपयोग

✅️ ➤ धार्मिक श्रद्धा – मातृदेवता, योगमुद्रेतील प्रतीके

✅️ ➤ अत्यंत शांतताप्रिय समाज – शस्त्रप्रयोगाचे अभाव

✅️ ➤ विकसित शहरी जीवन – धातुकाम, वस्त्रनिर्मिती, मण्ये

✅️ ➤ कृषी – गहू, बार्ली, भात, कापूस उत्पादन

✅️ ➤ स्थलनियोजन, वीज-जलवहन यांचे तत्त्वज्ञान पुढील संस्कृतींना प्रेरणा

सिंधू खोरे संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये (Main Characteristics of Indus Valley Civilization)

1. स्वच्छ व नियोजित समाजरचना (Highly Hygienic and Well-Organized Society)

✅️ ➤ सार्वजनिक आरोग्य व स्वच्छतेला अग्रक्रम

✅️ ➤ प्रत्येक घरात स्वतंत्र स्नानगृह व पाण्याचा निचरा

✅️ ➤ विहिरी, टाकी, व निचऱ्याच्या गटारींचे उत्कृष्ट नियोजन

✅️ ➤ सार्वजनिक शौचालयांचे अवशेष

✅️ ➤ कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थित व्यवस्थापन


2. नियोजित नगररचना (Grid Pattern Town Planning)

✅️ ➤ रस्ते काटकोनात एकमेकांना छेदणारे

✅️ ➤ शहरांचे विभाग – गढी (Citadel), मध्यवर्ती क्षेत्र, रहिवासी भाग

✅️ ➤ विटा – 1:2:4 प्रमाणात भाजलेल्या (Standardized bricks)

✅️ ➤ ठराविक जागी सार्वजनिक इमारती, धान्यकोठारे

✅️ ➤ बहुमजली घरे, दरवाजे मुख्य रस्त्यावर न उघडणारे (Security-conscious design)


3. स्त्रीप्रधान व मातृदेवीपूजक समाज (Matriarchal & Goddess Worship)

✅️ ➤ मातृदेवींच्या मृत्तिकामूर्ती – उर्वरतेचे प्रतीक

✅️ ➤ शक्यत: स्त्री नेतृत्व व सामाजिक महत्त्व

✅️ ➤ स्त्री व योगमुद्रांतील मूर्ती – धार्मिक व सामाजिक भूमिका

✅️ ➤ मातृदेवी व निसर्गाची देवता म्हणून पूजन

✅️ ➤ स्त्री शक्तीचा प्रतीकात्मक सन्मान


4. नैसर्गिक व प्रतीकात्मक देवतेची उपासना (Worship of Natural and Symbolic Deities)

✅️ ➤ वृक्ष (पीपळ), नद्या, जनावरांचे पूजन

✅️ ➤ पशुपती महादेव मूर्ती – ध्यानमुद्रेतील, सभोवती प्राणी

✅️ ➤ योनिलिंग, वृषभ (नंदी) यांचे पूजन

✅️ ➤ अग्नी, जल, भूमीचे प्रतीक पूजाविधी

✅️ ➤ कोणतीही भव्य मंदिरे किंवा मूर्तिपूजेचे स्थळ आढळले नाही – सूक्ष्म पूजाविधी संकेत


5. कांस्य युगातील संस्कृती (Bronze Age Culture)

✅️ ➤ तांब्या व कास्य मिश्र धातू वापरून हत्यारे, भांडी, मूर्ती तयार

✅️ ➤ "नृत्य करणारी मुलगी" मूर्ती – कांस्याचा उत्कृष्ट नमुना

✅️ ➤ धातुकाम – तांब्याचे छिन्नी, भाले, आरसे

✅️ ➤ लोहाचा वापर नव्हता – त्यामुळे युगात लोहयुगापूर्व काल समजला जातो

✅️ ➤ हत्ती दातापासून वस्त्रनिर्मिती व दागिने तयार


6. व्यापारकेंद्रित समाज (Trade-Based Society)

✅️ ➤ देशांतर्गत व्यापार – कच्छ, महाराष्ट्र, पंजाब यांच्याशी

✅️ ➤ परदेशी व्यापार – मेसोपोटेमिया, ओमान, अफगाणिस्तानशी संबंध

✅️ ➤ लोथल व सुतकोटदा ही बंदर शहरे

✅️ ➤ वजनमाप पद्धती – घन मापे, तराजू

✅️ ➤ शिक्के – ओळख, मालवाहतूक व व्यापारासाठी

✅️ ➤ व्यापारासाठी बैलगाड्या, बोटींव्दारे वाहतूक संकेत

✅️ ➤ व्यापारी वस्तू – मोती, मण्ये, तांबे, कापूस, लाजवर्त (Lapis lazuli), सोनं, चांदी


7. लेखन प्रणाली व लिपी (Undeciphered Script and Communication)

✅️ ➤ सिंधू लिपी – अद्याप न उलगडलेली

✅️ ➤ चित्रलिपी व चिन्हांचा वापर

✅️ ➤ शिक्कांवर लिपी – धार्मिक, व्यापार संदर्भ

✅️ ➤ लेखन केवळ व्यापारापुरता मर्यादित असावा अशी शक्यता


8. कृषिप्रधान अर्थव्यवस्था (Agrarian Economy)

✅️ ➤ शेती – गहू, बार्ली, भात, कापूस

✅️ ➤ मातीचे नांगर – बनवाली येथे सापडले

✅️ ➤ कृत्रिम सिंचन यंत्रणा, विहिरी

✅️ ➤ जनावरांचे पालन – बैल, मेंढ्या, बकऱ्या

✅️ ➤ उष्टावलेली शेतजमीन वापरण्याची कलपणा


9. हस्तकला व उद्योग (Artisan Craftsmanship & Industries)

✅️ ➤ मण्ये तयार करणं, वस्त्रनिर्मिती

✅️ ➤ चामड्याचे काम, दगडावरील कोरीव काम

✅️ ➤ लोणच्याच्या बाटल्यांसारखी मृत्तिकापात्रे

✅️ ➤ सौंदर्यप्रसाधने – सुगंधी तेल, काजळदाणी

✅️ ➤ दगडी शिल्पकला व टेराकोटा मूर्ती


🔎 महत्त्वाचा निष्कर्ष

✅️ ➤ सिंधू खोरे संस्कृती ही एक परिपूर्ण शहरी नागरी जीवनाची उन्नत नमुना होती.

✅️ ➤ तिचे स्थापत्यशास्त्र, व्यापार, धार्मिक श्रद्धा, स्वच्छता आणि सामाजिक रचना भारतीय उपखंडातील पुढील संस्कृतींवर खोलवर प्रभाव टाकणारे होते.

✅️ ➤ आधुनिक नागरी व्यवस्थेसाठीही तिचे तत्त्वज्ञान आजही प्रेरणादायी ठरते.


सिंधू खोरे संस्कृती – मुख्य आयात सामग्री (Major Imports in IVC)

1. तांबे (Copper)

✅️ ➤ राजस्थान (खेतडी) – भारतातील प्रमुख खाण

✅️ ➤ बलुचिस्तान – द्रव्य बनवण्यासाठी वापर

✅️ ➤ ओमान – पुरातत्व उत्खननांतून पुरावे उपलब्ध (Magan म्हणून उल्लेख)


2. चांदी (Silver)

✅️ ➤ अफगाणिस्तान – सीमोल्लंघन व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र

✅️ ➤ इराण – वस्तु विनिमय स्वरूपातील व्यापार संबंध


3. सोनं (Gold)

✅️ ➤ कर्नाटक – प्राचीन सोन्याच्या खाणी (Kolar Gold Fields)

✅️ ➤ अफगाणिस्तान – मध्य आशियातील सांस्कृतिक व व्यापारी संपर्क

✅️ ➤ इराण – मौल्यवान धातूंचे आयात केंद्र


4. टिन (Tin)

✅️ ➤ अफगाणिस्तान – कांस्य तयार करण्यासाठी तांब्याबरोबर मिश्रण

✅️ ➤ इराण – धातुकाम व भांडी बनविण्याच्या उपयोगासाठी


5. लॅपिस लेझुली (Lapis Lazuli)

✅️ ➤ मेसोपोटेमिया – निळसर रंगाचा मौल्यवान दगड

  ➤ दागिने, शिक्के व सौंदर्यप्रसाधने यामध्ये वापर

  ➤ बदलापुरते व्यापार (transit trade) अफगाणिस्तानमार्गे होत असे


6. शिसं (Lead)

✅️ ➤ इराण – मृदू धातू, सीलबंद वस्तूंमध्ये वापर


📦 इतर आयात वस्तू (Other Probable Imports)

✅️ ➤ नील (Indigo) – रंगासाठी, शक्यता द्रविड भाषिक प्रदेशातून

✅️ ➤ साजसामान व दागिने – मेसोपोटेमियातून

✅️ ➤ समुद्रमार्गाने लोखंडाची शक्य आयात (पुष्टी नसलेली)

✅️ ➤ नैसर्गिक खडे व खनिजे – पश्चिम व मध्य आशियातून


🌐 व्यापारी संबंध व वैशिष्ट्ये

✅️ ➤ सिंधू संस्कृतीचे व्यापारी संबंध मेसोपोटेमिया, फारस (इराण), ओमान व अफगाणिस्तान या प्रदेशांशी होते

✅️ ➤ मेसोपोटेमियन मजकुरांमध्ये ‘Meluhha’ या नावाने उल्लेख – संशोधक IVCशी संबंधित मानतात

✅️ ➤ समृद्ध बंदरव्यवस्था (लोथल, सुत्कोटदा) हे आयात-निर्यात व्यापाराचे प्रमुख केंद्र

✅️ ➤ आयात वस्तूंचा उपयोग मुख्यतः धातुकाम, दागदागिने, व्यापार चिन्हे, व सामाजिक प्रतिष्ठेसाठी


🔎 निष्कर्ष

✅️ ➤ सिंधू संस्कृती ही एक जागतिक दृष्टीकोन असलेली नागरी संस्कृती होती

✅️ ➤ विविध देशांतील नैसर्गिक संसाधने आयात करून स्थानिक उद्योग व व्यापाराची भरभराट साधण्यात ती यशस्वी ठरली

✅️ ➤ आयातीत वस्तूंच्या उपयोगामध्ये तांत्रिक प्राविण्य व सौंदर्यशास्त्र यांचा सुंदर संगम दिसून येतो


सिंधू खोरे संस्कृतीचा ऱ्हास – कारणे, सिद्धांत व शास्त्रज्ञांची मते

1.📉 ऱ्हासाची सुरुवात व स्वरूप

✅️ ➤ अंदाजे इ.स.पू. 1900 पासून टप्प्याटप्प्याने ऱ्हास

✅️ ➤ नागरी व्यवस्थेचा ऱ्हास, शहरांची gradual abandonment

✅️ ➤ ही समजूत बहुतेक पुरातत्त्ववेत्ते व इतिहासकारांमध्ये स्वीकारली गेली आहे (Marshall, Wheeler यांचे प्रारंभिक निरीक्षण)


2.🌊 नैसर्गिक आपत्ती सिद्धांत

प्रमुख शास्त्रज्ञ : R.E.M. Wheeler

✅️ ➤ पूर व भूकंपांमुळे नागरी केंद्रांचे विनाश

➤ घरं व रस्ते गाळाने झाकले गेले (30 फूटपर्यंत साचलेला गाळ)

➤ भूगर्भीय हालचालींमुळे नदीच्या प्रवाहात अडथळा

✅️ ➤ टीका : सर्व भागांचा ऱ्हास स्पष्ट होत नाही; tectonic effect सर्व नदीमार्ग रोखू शकत नाही


3.🌊 सिंधू नदीचा मार्ग बदल सिद्धांत

प्रमुख शास्त्रज्ञ : Raikes व G.F. Dales

✅️ ➤ सिंधू नदी नागरी भागांपासून दूर गेली

✅️ ➤ पाण्याची टंचाई, कृषी व जलसंवर्धन व्यवस्था ढासळली

✅️ ➤ हडप्पामधील साचलेला गाळ वाऱ्यांमुळे, पूरामुळे नव्हे

✅️ ➤ टीका : मोहनजोदडोचे abandonment स्पष्ट होते, पण संपूर्ण ऱ्हासाचे स्पष्टीकरण अपूर्ण


4.🌦️ हवामान बदल सिद्धांत (Climate Change)

प्रमुख शास्त्रज्ञ : B.B. Lal, R.S. Bisht

✅️ ➤ कोरडे हवामान वाढले; अर्ध-कोरड्या क्षेत्रांत (Harappa) कृषी ऱ्हास

✅️ ➤ घग्गर-हकरा नदी (सरस्वती) आटली

✅️ ➤ tectonic हालचालींमुळे नदी मार्ग बदलले

✅️ ➤ टीका : घग्गर नदी आटण्याचे अचूक कालमापन उपलब्ध नाही


5.⚔️ आर्य आक्रमण सिद्धांत (Aryan Invasion Theory)

प्रमुख शास्त्रज्ञ : Mortimer Wheeler

✅️ ➤ आर्य आक्रमणामुळे संस्कृतीचा ऱ्हास

➤ मोहनजोदडो व हडप्पामधील सांगाडे – युद्धजन्य हत्येचा पुरावा

➤ ऋग्वेदातील ‘दास’ किल्ले व ‘पूरंदर’ देवाचा उल्लेख

✅️ ➤ टीका : आर्यांचे आगमन इ.स.पू. 1500 नंतरचे; हडप्पा ऱ्हास इ.स.पू. 1800 मध्ये

➤ सांस्कृतिक संघर्ष होण्याची शक्यता कमी


6.🌱 पर्यावरणीय असंतुलन सिद्धांत (Ecological Imbalance Theory)

प्रमुख शास्त्रज्ञ : D.P. Agrawal, S.P. Gupta

✅️ ➤ अति जंगलतोड, अन्नसंपत्तीचा अति वापर

✅️ ➤ हवामानात कोरडेपणा, सरस्वती नदीचे आटणे

✅️ ➤ कृषी आधारशिला ढासळली

✅️ ➤ लोकांचे गंगा खोऱ्यात स्थलांतर


7.🔄 परंपरेचे सातत्य (Continuity Theory)

प्रमुख शास्त्रज्ञ : Jim Shaffer, B.B. Lal, R.S. Bisht

✅️ ➤ ‘ऱ्हास’ ऐवजी ‘सातत्य आणि रूपांतरण’

✅️ ➤ काही स्थळे टिकून राहिली

✅️ ➤ धार्मिक चिन्हे (स्त्रीमूर्ती, योगमुद्रा) हिंदू परंपरेवर प्रभाव

✅️ ➤ मण्ये, धातुकाम, कापूस शेतीसारख्या तंत्रांचा उत्तरभारतीय संस्कृतींमध्ये वापर


🔎 निष्कर्ष

सिंधू संस्कृतीचा ऱ्हास हा एका घटकामुळे नव्हे, तर पर्यावरणीय, भौगोलिक, सामाजिक व सांस्कृतिक घटकांच्या संयुक्त प्रभावामुळे झाला. मात्र, तिच्या स्थापत्य, कृषी व धार्मिक परंपरांचा ठसा पुढील भारतीय संस्कृतींवर स्पष्टपणे आढळतो.


राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 सामान्य विज्ञान -General Science

1. भौतिकशास्त्र (PHYSICS)


➤ मोजमापन – Measurement

➤ गुरुत्वाकर्षण – Gravitation

➤ दाब – Pressure

➤ ऊर्जा, कार्य आणि शक्ती – Energy, Work and Power

➤ ध्वनी – Sound

➤ प्रकाश – Light

➤ विद्युतधारा – Electric Current

➤ चुंबकत्व आणि विद्युत चुंबकीय पट्टा – Magnetism and Electromagnetic Field

➤ सूर्यमाला – Solar System

➤ समीकरणे – Equations

➤ शोध आणि पुरस्कार – Discoveries and Awards


2. रसायनशास्त्र (CHEMISTRY)


➤ द्रव्य आणि वर्गीकरण – Matter and its Classification

➤ अणू व त्याची संरचना – Atoms and their Structure

➤ मूलद्रव्य आणि आवर्तसारणी – Elements and Periodic Table

➤ खनिजे व धातुके – Minerals and Metallurgy

➤ कार्बनचे जग – The World of Carbon

➤ आम्ल, आम्लारी व क्षार – Acids, Bases and Salts

➤ रासायनिक अभिक्रिया – Chemical Reactions

➤ किरणोत्सारिता – Radioactivity

➤ दैनंदिन वापर – Daily Uses


3. जीवशास्त्र (BIOLOGY)


➤ पेशी, उती आणि प्रकार – Cells, Tissues and their Types

➤ रक्ताभिसरण – Circulatory System

➤ श्वसनसंस्था – Respiratory System

➤ उत्सर्जन संस्था – Excretory System

➤ पचनसंस्था – Digestive System

➤ प्रजनन संस्था – Reproductive System

➤ अस्थिसंस्था – Skeletal System

➤ मानवातील ग्रंथी, संप्रेरके व विकरे – Human Glands, Hormones and Disorders

➤ जैवतंत्रज्ञान – Biotechnology

➤ मानवी उत्क्रांती – Human Evolution

➤ प्राणी वर्गीकरण – Animal Classification

➤ वनस्पतीशास्त्र – Botany


4. आरोग्यशास्त्र (HEALTH SCIENCE)


➤ पोषण – Nutrition

➤ मानवी आजार – Human Diseases


5. विज्ञान व तंत्रज्ञान (SCIENCE & TECHNOLOGY)


➤ आण्विक ऊर्जा – Nuclear Energy

➤ अवकाश तंत्रज्ञान – Space Technology

➤ संगणक – Computer (चालू घडामोडी संदर्भात)


📌 सूचना (Important Note)


Study करत असताना वरील Topics पूर्ण होतं आहेत का याची खात्री करून घ्या.


📚 स्रोत (Sources):


1.९ वी व १० वी राज्य मंडळाची विज्ञानाची पुस्तके आणि 11 वी  12 विज्ञानाची पुस्तके


2. भस्के सरांचा updated Science book


3. PYQ (पूर्व प्रश्नपत्रिका) विश्लेषण पुस्तक


👉🏻 तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या गरजेनुसार एकच सर्वसमावेशक पुस्तक निवडावं.


👉🏻 तुमच्याकडे चांगले Class Notes असतील, तर त्यांचा व्यवस्थित उपयोग करावा.


👉🏻 जेव्हा आपण PYQs (मागील प्रश्नपत्रिका) चा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा मिळते.


राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 अर्थव्यवस्था - Economy

1.राष्ट्रीय उत्पन्न - National Income, GDP, GNP, NDP, NNP, GDP Per Capita income, Green GDP, Gross Happiness Index.


2.आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास व मानव विकास - Economic Growth, Economic Development and Human Development


3.शाश्वत विकास - Sustainable Development, SDGs, MDGs, Paris Agreement etc


4.दारिद्र्य आणि बेरोजगारी - Poverty and Unemployment, Pverty Alleviation Programms


५. कृषी आणि जमीनसुधारणा - Agriculture and Land Reforms


६. बँकिंग - Banking


७. सार्वजनिक वित्त - Public Finance, Gender Budget


८. चलन आणि भाववाढ - Currency and Inflation


९. नियोजन/पंचवार्षिक योजना - Planning/Five-Year Plans


१०. जनसांख्यिकी - Demography


११. आर्थिक समावेशन : आरोग्य, शिक्षण, रोजगार, ग्रामीण आणि शहरी विकास - Economic Inclusion: Health, Education, Employment, Rural and Urban Development


१२. सामाजिक समावेशन : बालक, महिला, अपंग आणि सामाजिक सुरक्षा - Social Inclusion: Children, Women, Disabled and Social Security


१३. आर्थिक सुधारणा आणि LPG धोरण - Economic Reforms and LPG Policy


१४. आंतरराष्ट्रीय संस्था - International Institutions


१५. इतर -Others


📌 सूचना (Important Note)


Study करत असताना वरील Topics पूर्ण होतं आहेत का याची खात्री करून घ्या.


📚 स्रोत (Sources):

1.राज्य मंडळाची पुस्तके (State Board Sources)


2. देसले सरांचं इकॉनॉमिक्स बुक Part 1 & Part 2 ( Selected Topics )


3. कोळंबे सरांचा इकॉनॉमिक्स बुक


4.PYQ (पूर्व प्रश्नपत्रिका) विश्लेषण पुस्तक


👉🏻 सध्या मार्केटमध्ये अनेक उत्तम पुस्तकं उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुसार एकच परिपूर्ण पुस्तक निवडा.


👉🏻 चांगले Class Notes असतील तर त्याचा पुरेपूर उपयोग करा. आर्थिक वृद्धी, आर्थिक विकास आणि मानव मानवी विकास  या टॉपिक साठी


👉🏻 जेव्हा आपण PYQs चा ट्रेंड पाहू, तेव्हा अभ्यासाला अधिक स्पष्ट दिशा मिळेल.


👉🏻 भारताचा इकॉनॉमिक सर्वे आणि महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे चालू वर्षाचा


सामान्य विज्ञान टॉपिक निहाय नोट्स


✅ ज्ञानेंद्रिये (Sensory Organs):-

🔰 प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.


✅ डोळे (Eyes) 👀 :-

🔰 ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.

🔰 पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.

🔰 अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.

========================

💘 बुबुळ (Cornea):-

🔰 नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.

🔰 बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.

========================

💘 दृष्टिपटल (Retina):

🔰 हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.

========================

💘 दृष्टीसातत्य :

🔰 वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.

========================

💘 दृष्टिदोष (Defects Of Vision):

🔰 दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.

💘) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Near-sightedness):

🔰 जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.

🔰 डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते.

🔰 प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.

⭐️ उपाय: अंतर्गोल (Concave) भिंगाचा चष्मा

========================

💘) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):

◆ दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.

◆ डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.

⭐️ उपाय: बहिर्गोल (Convex) भिंगाचा चष्मा.

========================

💘) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):

◆ बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो.

◆ त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात.

◆ हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो. 

⭐️ उपाय: दंडगोलाकार (Cylindrical) भिंगाचा चष्मा. 

========================

💘) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):

🔰 वाढत्या वयामुळे होणार दोष दूरदृष्टीतेचा एक प्रकार समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.

⭐️ उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे. 

पोलीसभरती प्रश्नसंच

 ०१) महाराष्ट्रात काजू संशोधन केंद्र कोठे आहे ?

- वेगुर्ला.(सिंधुदुर्ग )


०२) सरदार वल्लभभाई पटेल यांचे प्रचलित नाव काय आहे ?

- भारताचे बिस्मार्क.


०३) डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

- अकोला.


०४)) भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण आहे ?

- डॉ.व्हर्गीस कुरियन.


०५) भारतातील किती राज्यांस समुद्रकिनारा लागला आहे ?

- नऊ.


०१) महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे आहे ?

- डिग्रज.(सांगली)


०२) कस्तुरबा गांधी यांचे प्रचलित नाव कोणते आहे ?

- बा.


०३) डॉ.बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

- दापोली.(रत्नागिरी)


०४) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहे ?

- सँम पित्रोदा.


०५) भारतातील सर्वांत मोठी आदिवासी जमात कोणती आहे ?

- गोंड.


०१) महाराष्ट्रात हळद संशोधन केंद्र कोठे आहे ?

- डिग्रज.(सांगली)


०२) कस्तुरबा गांधी यांचे प्रचलित नाव कोणते आहे ?

- बा.


०३) डॉ.बाबासाहेब सावंत कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

- दापोली.(रत्नागिरी)


०४) भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहे ?

- सँम पित्रोदा.


०५) भारतातील सर्वांत मोठी आदिवासी जमात कोणती आहे ?

- गोंड.


०१) महाराष्ट्रात नारळ संशोधन केंद्र कोठे आहे ?

- भाट्ये.(रत्नागिरी)


०२) ब्रिजलाल बियाणी यांचे प्रचलित नाव काय आहे ?

- विदर्भ केसरी.


०३) आधुनिक भारताचे शिल्पकार कोण आहे ?

- जवाहरलाल नेहरू.


०४) भारतातील सर्वांत मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे ?

- वुलर.


०५) राजीव भाटीया हे चित्रपटात कोणत्या नावाने कार्यरत आहे ?

- अक्षय कुमार.


०१) महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे ?

- श्रीवर्धन.(रायगड)


०२) रशियामधून प्रक्षेपित केलेला भारताचा पहिला उपग्रह कोणता आहे ?

- आर्यभट्ट.


०३) भारतीय राष्ट्रवादाचे जनक कोण ?

- सुरेंद्रनाथ चँटर्जी.


०४) जगप्रसिध्द पुष्कर सरोवर कोठे आहे ?

- अजमेर.(राजस्थान)


०५) देवदत्त पिरोशीमल यांना कोणत्या नावाने ओळखतात ?

- देव आनंद.


०१) महाराष्ट्रात राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र आहे ?

- राजगुरूनगर.(पुणे)


०२) औद्यागिक क्षेत्रामध्ये शक्तीच्या मापनासाठी कोणते एकक वापरतात ?

- अश्वशक्ती.


०३) भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार कोण आहे ?

- सरदार वल्लभभाई पटेल.


०४) अमिताभ बच्चन यांचे खरे आडनाव कोणते आहे ?

- श्रीवास्तव.


०५) जुदो हा कुस्ती सारखा खेळला जाणारा खेळ कोणत्या देशातील आहे ?

- जपान.


०१) महाराष्ट्रात मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र कोठे आहे ?

- नागपूर.


०२) कोणत्या प्रक्रियेने पृथ्वीचे अंदाजे वय काढणे शक्य आहे ?

- कार्बन डेटिंग.


०३) मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोण आहे ?

- आचार्य बाळशास्त्री जांभेकर.


०४) युसुफ खान चित्रपटसृष्टीत कोणत्या नावाने परिचित आहे ?

- दिलीप कुमार.


०५) भारताची अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे ?

- मिश्र.


०१) महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?

- १ मे १९६०.


०२) कृष्णा नदी कोठे उगम पावते ?

- महाबळेश्वर.


०३) भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक कोण आहे ?

- दादासाहेब फाळके.


०४) सुनील दत्त यांचे खरे नाव काय आहे ?

- बलराज.


०५) भारतात राष्ट्रपती,उपराष्ट्रपती निवडण्याचे काम कोण करते ?

- विधीमंडळ.

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे


1. प्रश्न: नुकतेच ‘G7 शिखर परिषद 2025’ कुठे आयोजित होणार असल्याची घोषणा झाली?

   उत्तर: कॅनडा


2. प्रश्न: 2025 मध्ये जगातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प सुरू करणारा देश कोण ठरला?

   उत्तर: भारत (राजस्थान – खेतेरी)


3. प्रश्न: ‘BRICS नवीन विकास बँक’च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली?

   उत्तर: दिल्मा रुसॅफ (ब्राझीलच्या माजी राष्ट्राध्यक्ष)


4. प्रश्न: 2025 मध्ये ‘ऑलिम्पिक डे’ कधी साजरा करण्यात आला?

   उत्तर: 23 जून


5. प्रश्न: नुकतेच प्रसिद्ध लेखक ‘अमिताव घोष’ यांना कोणता साहित्य पुरस्कार जाहीर झाला?

   उत्तर: O. Henry पुरस्कार


6. प्रश्न: WHO ने जाहीर केलेल्या ‘Global Tobacco Epidemic Report 2025’ मध्ये भारताची स्थिती कशी आहे?

   उत्तर: तंबाखू नियंत्रणात प्रगती करणारा देश म्हणून उल्लेख


7. प्रश्न: ‘आंतरराष्ट्रीय MSME दिवस’ कधी साजरा केला जातो?

   उत्तर: 27 जून


8. प्रश्न: नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या शहरात ‘ई-बस डिपो’चे उद्घाटन झाले?

   उत्तर: पुणे


9. प्रश्न: ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने’च्या पुढील हप्त्याचे वितरण कधी झाले?

   उत्तर: 27 जून 2025


10. प्रश्न: भारतीय नौदलाचे नवीन चीफ ऑफ नेव्हल स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती झाली?

    उत्तर: वाइस ॲडमिरल धनंजय सिंग

ठळक बातम्या. २८ जुन २०२५.


१.दिल्ली-मुंबई एक्सप्रेस


- भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) राष्ट्रीय महामार्गावर देशातील पहिला वन्यजीव ओव्हरपास कॉरिडॉर बांधला आहे.

- प्रकल्पात पाच ओव्हरपास आणि भारतातील सर्वात लांब वन्यजीव अंडरपास समाविष्ट आहेत, जे सर्व नैसर्गिक अधिवासांना त्रास न देता प्राण्यांची सुरक्षित हालचाल सक्षम असेल.


२.शांघाय सहकार्य संघटना. 


- २०२५ ची एससीओ परिषद चीनमधील किंगदाओ येथे झाली.

- स्थापना: २००१ (शांघाय फाइव्ह, १९९६ पासून विकसित)

- सदस्य (२०२५): भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, इराण, बेलारूस

- मुख्यालय: सचिवालय - बीजिंग, RATS (प्रादेशिक दहशतवाद विरोधी संरचना) - ताश्कंद.


३.ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद.


- ताश्कंद येथे उझचेस कप मास्टर्स २०२५ जिंकून वर्षातील त्यांचे तिसरे मोठे बुद्धिबळ विजेतेपद मिळवले.

- डी. गुकेश (२७७६.६) – आता जागतिक क्रमवारीत ५ वा.


४.सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड.


- देशातील पहिली सागरी क्षेत्र -केंद्रित नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) - सागरमाला फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (SMFCL)

- कंपनी कायदा २०१३ अंतर्गत ऑगस्ट २०१६ मध्ये एसएमएफसीएलची स्थापना सागरमाला डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड म्हणून करण्यात आली.


५.हॉकी इंडिया मास्टर्स कप २०२५


- हॉकी इंडिया मास्टर्स कप २०२५ च्या पहिल्या आवृत्तीत , हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा आणि हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू यांनी अनुक्रमे महिला आणि पुरुष गटाचे विजेतेपद जिंकले . 

- मास्टर कप ४० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुष खेळाडूंसाठी होता आणि महिलांसाठी ३५ वर्षांपेक्षा जास्त वयाचा निकष होता.

- मास्टर्स कप २०२५ मध्ये बारा पुरुष आणि आठ महिला संघांनी भाग घेतला.