30 July 2025

पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना 2025




• प्रारंभ – 16 जुलै 2025

• कालावधी – 2025 ते 2026


• योजनेचा उद्देश –

उत्पादकता वाढवणे

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे

प्रत्येकी शेतकरीस अंदाजे ₹24,000 उत्पन्न

शेतकऱ्यांना – देशातील कमी उत्पादन करणारे 100 जिल्हे

अन्नबळजावणी – योजना राबवली जाणार

हरित क्रांतीप्रमाणे – देशात हिरवळ वाढवून अन्नसुरक्षा सुनिश्चित करणे

सेंद्रिय व नैसर्गिक खतांचा वापर प्रोत्साहन

शाश्वत शेतीस प्रोत्साहन


• केंद्र, राज्य आणि राष्ट्रीय सहकार संघटनांमार्फत योजना अंमलबजावणी केली जाईल


शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन

• 10 फेब्रुवारी – जागतिक दलहन दिन

• 15 मार्च – आंतरराष्ट्रीय कृषी यांत्रिकी दिवस

• 21 मार्च – जागतिक वनीकरण दिन

• 22 मार्च – जागतिक जल दिन

• 5 जून – जागतिक पर्यावरण दिन

• 1 जुलै – डॉकटर दिवस (महासत्ता)

• 3 जुलै – आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्ती दिन

• 16 ऑक्टोबर – जागतिक अन्न दिवस

• 5 डिसेंबर – जागतिक मृदा दिन

• 23 डिसेंबर – कृषी दिन

• 26 नोव्हेंबर – राष्ट्रीय दूध दिन

• 2 ऑक्टोबर – जैविक शेती दिवस

• 12 जानेवारी – राष्ट्रीय युवा दिन

• 15 ऑक्टोबर – महिला शेतकरी दिन

oneliner

◾️आंध्रप्रदेश : ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य

◾️गुजरात : ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य 

◾️मेघालय : जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य 

◾️तेलंगणा : पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य 

◾️दिल्ली :भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य 

◾️राज्यस्थान : होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य

◾️महाराष्ट्र : स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे पाहिले राज्य 

◾️महाराष्ट्र : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना सुरू करणारे पाहिले राज्य

◾️महाराष्ट्र : महिला आरक्षण देणारे : भारतातील पाहिले राज्य

◾️दिल्ली: देशातील पहिले केरोसीनमुक्त शहर 

◾️केरळ:  हे सर्वांना इंटरनेटचा मूलभूत हक्क देणारे पहिले राज्य बनले आहे

◾️राज्यस्थान :आरोग्य हक्क कायदा’ लागू करणारे राजस्थान हे देशातील पहिले 

◾️उत्तराखंड :पूर्व-प्राथमिक स्तरावर "नवीन शैक्षणिक धोरण" लागू करणारे पाहिले राज्य

◾️कर्नाटक : ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर (GCC) धोरण आणणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

◾️उत्तराखंड : विद्यार्थी संघटनांच्या निवडणुकीत मुलींसाठी 50% जागा राखीव ठेवणारे  पहिले राज्य

◾️उत्तराखंड : जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक 

◾️राज्यस्थान : रस्ता सुरक्षा कृती योजना स्वीकारणारे पहिले राज्य ठरणार आहे

◾️केरळ : जैवविविधतेची नोंद करणारे पहिले राज्य ठरले आहे

◾️बिहार : ट्रैफिक चे ऑडिट करणारे पाहिले राज्य

◾️बिहार : इथेनॉल प्रोत्साहन धोरण लागू करणारे देशातील पाहिले राज्य

SDG शाश्वत विकास ध्येये


🔴 SDG शाश्वत विकास ध्येये म्हणजे काय ? 

👉 SDG (Sustainable Development Goals) म्हणजे शाश्वत विकास ध्येये ही एकूण 17 आंतरराष्ट्रीय उद्दिष्टांची मालिका आहे.

🎯🎯शाश्वत प्रगती साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 2015 साली 17 ध्येये (Goal) आणि 169 (लक्ष्ये) Target निश्चित केली आहेत.✔️✔️

📣📣 सप्टेंबर 2015 मध्ये न्यूयॉर्क येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास शिखर परिषदेत 17 SDG सह 2030 पर्यंत चा शाश्वत विकास अजेंडा स्वीकारण्यात आला.⭐️


1) दारिद्र्य निर्मूलन (No Poverty)


2) उपासमार संपवणे (Zero Hunger)


3) आरोग्य आणि कल्याण (Good Health and Well-being)


4) दर्जेदार शिक्षण (Quality Education)


5) लिंग समानता (Gender Equality)


6) स्वच्छ पाणी आणि स्वच्छता (Clean Water and Sanitation)


7) स्वस्त आणि स्वच्छ ऊर्जा (Affordable and Clean Energy)


8) चांगले काम आणि आर्थिक वाढ (Decent Work and Economic Growth)


9) उद्योग, नवकल्पना आणि पायाभूत सुविधा (Industry, Innovation and Infrastructure)


10) विषमता कमी करणे (Reduced Inequalities)


11) शाश्वत शहरे आणि समुदाय (Sustainable Cities and Communities)


12) जबाबदार वापर आणि उत्पादन (Responsible Consumption and Production)


13) हवामान बदलावरील कृती (Climate Action)


14) पाण्याखालील जीवन (Life Below Water)


15) जमिनीवरील जीवन (Life on Land)


16) शांतता, न्याय आणि सक्षम संस्था  (Peace, Justice and Strong Institutions)


17) ध्येयांसाठी जागतिक भागीदारी (Partnerships for the Goals)



🔴 IMP आहे पाठ करून घ्या 🔴

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस


👩‍💻भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबई मध्ये झाली.

पहिले अधिवेशन गोकुलदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये पार पडले. 🎯

पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेश चंद्र बॅनर्जी होते.✅

अधिवेशनात तब्बल 72 प्रतिनिधींनी भाग घेतला होता.✅


🔴1) काँग्रेस पहिले अधिवेशन

👉 व्योमेशचंद्र बॅनर्जी ⭐️

👉 1885⭐️

👉 बॉम्बे (मुंबई) ⭐️


🔴2) काँग्रेस दुसरे अधिवेशन

👉 दादाभाई नौरोजी 

👉 1886

👉 कोलकाता 


🔴3) काँग्रेस तिसरे अधिवेशन

👉 सैयद बदरुद्दीन तैय्यबजी

👉 1887

👉 मद्रास (चेन्नई)


⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️⭐️


🔴काँग्रेस अधिवेशन 1907

👉 1907 मधील काँग्रेस अधिवेशन सूरत येथे झाले.🔥

👉 अध्यक्ष रासबिहारी घोष होते✔️

👉अधिवेशनात काँग्रेसमध्ये मवाळ (Moderates) आणि जहाल (Extremists) या दोन गटांमध्ये उघडपणे फूट पडली, यालाच "सूरत फूट" (Surat Split) म्हणतात.⭐️


🔴काँग्रेस अधिवेशन 1916

👉 1916 मधील काँग्रेस अधिवेशन लखनऊ येथे झाले.🔥

👉 अध्यक्ष अंबिका चरण मजुमदार 

👉 या अधिवेशनात काँग्रेसमधील मवाळ (Moderates) आणि जहाल (Extremists) गट पुन्हा एकत्र आले. ⭐️

👉 याच अधिवेशनात काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ऐतिहासिक लखनऊ करार झाला.


🔴काँग्रेस अधिवेशन 1924

👉 1924 मधील काँग्रेस अधिवेशन बेळगाव येथे झाले.🔥

👉 या 39 व्या अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधी होते. गांधीजींनी काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद फक्त एकदाच स्वीकारले होते.✔️✔️


🔴काँग्रेस अधिवेशन 1936

👉 हे 1936 चे अधिवेशन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील फैजपूर या गावात झाले.

👉  हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ग्रामीण अधिवेशन होते ⭐️⭐️

👉 अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू

भारतातील महत्त्वाचे बंदर (IMP Port)

🔴1) कांडला बंदर (Kandla Port)

👉  2017 मध्ये नावात बदल होऊन दीनदयाल बंदर नाव देण्यात आले.✔️

👉  गुजरात राज्यात (कच्छ जिल्हा)


🔴2) मुंबई बंदर ( Mumbai Port) 

👉 मुंबई (महाराष्ट्र )


🔴3) JNPT (न्हावा शेवा)

👉  जवाहरलाल नेहरू बंदर (न्हावा शेवा)

👉 नवी मुंबई शहर (रायगड जिल्हा) ⭐️

👉 King Port of Arabian sea ✔️

👉 भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर 🔥


🔴4) वाढवण बंदर (Vadhavan Port)

👉 महाराष्ट्रात नवीन होणारे बंदर

👉 पालघर जिल्हा⭐️


🔴5) मुरगाव बंदर ( Mormugao Port)

👉 गोवा राज्यात


🔴6) न्यू मंगलोर बंदर (New Mangalore port)

👉 कर्नाटक राज्यात 


🔴7) कोची बंदर (Kochi Port)

👉 केरळ राज्यात

👉 Queen Port Of Arabian sea ✔️


🔴8) तुतीकोरिन बंदर (Tuticorin Port)

👉  2011-12 नाव बदलून V.O. चिदंबरनार पोर्ट करण्यात आले.✔️

👉 तामिळनाडू राज्यात 


🔴9) चेन्नई बंदर (Chennai Port)

👉 तामिळनाडू राज्यात 

👉 भारतातील दुसरे सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे.✔️


🔴10) इन्नोर बंदर (Ennore Port)

👉 2014 मध्ये नावात बदल करून कामराजा बंदर करण्यात आले.✔️

👉 तामिळनाडू राज्यात 

👉 Kamarajar Port First major port in India registered as a company✔️


🔴11) विशाखापट्टणम बंदर (Visakhapatnam Port)

👉 यालाच Vizag Port म्हणतात

👉 आंध्र प्रदेश राज्यात 


🔴12) पारादिप बंदर (Paradip Port)

👉 ओडिसा राज्यात 

👉 महानदी आणि बंगालच्या उपसागराच्या संगमावर 


🔴13) कोलकाता बंदर (Kolkata Port)

👉 2020 मध्ये नावात बदल करून शामा प्रसाद मुखर्जी बंदर करण्यात आले 

👉 पश्चिम बंगाल राज्यात 

👉 या बंदरात दोन डॉक सिस्टम आहेत एक Kolkata Dock system दुसरे Haldia Dock complex 

👉 हुगळी नदीवर हे बंदर आहे.

👉 Only Riverine Major Port in India 


🔴14) पोर्ट ब्लेअर बंदर (Port Blair Port)

👉 अंदमान मधील एक बंदर 


🔴15 ) विंझिजम बंदर (Vizhinjam Port)

👉 केरळ राज्यात 

👉भारताचे पहिले खोल पाण्याचे ट्रान्सशिपमेंट बंदर आहे ( Deep-Water Transshipment Port) ⭐️


🔴16) मुंद्रा बंदर (Mundra Port)

👉  गुजरात राज्यात

👉 भारतातील सर्वात मोठे खाजगी बंदर 


३० जुलै २०२५ वन लाइनर करंट अफेयर्स


१. जागतिक मानव तस्करी प्रतिबंधक दिवस दरवर्षी कधी साजरा केला जातो? 

🎖️ ३० जुलै 


२. भारतातील पहिली पिराटुला वुल्फ स्पायडर, पिराटुला एक्यूमिनाटा कोणत्या राज्यात सापडली आहे? 

🎖️ पश्चिम बंगाल 


३. भारताचा पहिला हायड्रोजन-ऑक्सिजन प्रोपल्शन इंजिन यशस्वीपणे कोणत्या राज्यात चाचणीसाठी वापरला गेला? 

🎖️कर्नाटक 


४. रेमोना परेरा कोणत्या शास्त्रीय नृत्याशी संबंधित आहेत ज्यांनी अलीकडे सातत्याने १७० तास नृत्य करून जागतिक विक्रम केला आहे? 

🎖️ भरतनाट्यम 


५. गजैप नावाचा जगातील सर्वात शक्तिशाली गैर-परमाणु बम कोणत्या देशाने सादर केला आहे? 

🎖️ तुर्की 


६. भारतातील पहिला हिंदी माध्यम एमबीबीएस कॉलेज कोणत्या शहरात उभारला जाणार आहे? 

🎖️ जबलपूर 


७. अलीकडे मास्टरकार्डने पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्यासोबत सहकार्य केले आहे? 

🎖️आंध्र प्रदेश 


८. हेपेटायटिस जागरूकता सप्ताह २६ जुलैपासून कधीपर्यंत साजरा केला जाईल? 

🎖️१ ऑगस्ट 


९. जर्मनीमध्ये आयोजित २०२५ विश्व विद्यापीठ खेळांमध्ये भारताने कोणती स्थान मिळवली आहे? 

🎖️ २० वा (१२ पदके - २ सुवर्ण, ५ रजत आणि ५ कांस्य)


१०. प्रा. लता पांडे आणि डॉ. रामानंद यांनी संपादित “छात्रों का सतत कल्याण: उच्च शिक्षा में एक सामूहिक उत्तरदायित्व” या पुस्तकाचे विमोचन कोणाने केले आहे? 

🎖️पुष्कर सिंह धामी


११. प्राचीन पांडुलिपी डिजिटल करण्यासाठी 'ज्ञान भारतम मिशन' कोणत्या नेत्याने सुरू केले? 

🎖️ नरेंद्र मोदी 


१२. २९ वी आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये अंडर-१५ बालिका एकल विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले आहे? 

🎖️दिव्यांशी भौमिक 


१३. अलीकडे बाघ घनतेच्या बाबतीत जागतिक स्तरावर तिसरे स्थान कोणत्या ठिकाणी आहे? 

🎖️ काजीरंगा टायगर रिझर्व्ह 


कलम 14

भारतीय संविधानाचा कलम 14 (Article 14) हा समानतेच्या हक्कांशी (Right to Equality) संबंधित आहे. हा कलम भारतातील सर्व नागरिकांना कायद्याच्या दृष्टीने समानता आणि कायद्याच्या समान संरक्षणाची हमी देतो.


कलम 14 चे महत्त्वाचे मुद्दे:


समानतेचा अधिकार: भारतातील कोणत्याही व्यक्तीला (नागरिक असो वा परदेशी) कायद्याच्या आधी समान वागणूक दिली जाईल. कोणत्याही व्यक्तीला लिंग, जात, धर्म, वंश, जन्मस्थान इत्यादी आधारावर भेदभाव केला जाणार नाही.


कायद्याचे समान संरक्षण: देशातील प्रत्येक व्यक्तीस कायद्याचे समान संरक्षण मिळेल. याचा अर्थ असा की, जेव्हा एखादी व्यक्ती समान परिस्थितीत असेल, तेव्हा तिला समान कायद्याचे संरक्षण मिळायला हवे.


समानता आणि तर्कसंगत वर्गीकरण: 

जरी कलम 14 सर्वांसाठी समानतेचा अधिकार देतो, तरीही तर्कसंगत वर्गीकरण (Reasonable Classification) अनुमत आहे. म्हणजे, काही विशिष्ट परिस्थितींमध्ये वेगवेगळ्या गटांसाठी भिन्न कायदे असू शकतात, पण ते तर्कसंगत आणि न्याय्य असले पाहिजेत.

यासाठी दोन अटी पूर्ण कराव्या लागतात: 

समूहामध्ये समरसता असावी – म्हणजे, गटामध्ये असलेल्या लोकांमध्ये समान वैशिष्ट्ये असावी.

वर्गीकरणाचा उद्देश न्याय्य आणि तार्किक असावा – म्हणजे, त्यामागे वैध आणि न्याय्य कारण असावे.


कलम 14 अंतर्गत महत्त्वाचे न्यायालयीन निर्णय:


State of West Bengal v. Anwar Ali Sarkar (1952) – यात सांगितले गेले की, कोणत्याही कायद्याने किंवा धोरणाने अवैध भेदभाव निर्माण होऊ नये.


E.P. Royappa v. State of Tamil Nadu (1974) – यात सांगितले गेले की, समानता म्हणजे केवळ भेदभावाचा अभाव नव्हे, तर याद्वारे स्वेच्छाचारी निर्णयांना आळा बसला पाहिजे.


Maneka Gandhi v. Union of India (1978) – या प्रकरणात कलम 14 चे अधिक विस्तृत अर्थ लावण्यात आले आणि याला कलम 19 आणि कलम 21 सोबत वाचले पाहिजे, असे स्पष्ट करण्यात आले.


कलम 14 चा अपवाद:


कलम 14 सर्वसामान्य नियम सांगतो, परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये काही अपवाद देखील आहेत:


President आणि Governors यांना काही घटनात्मक विशेषाधिकार आहेत.


संसद आणि विधिमंडळ सदस्यांना विशिष्ट अधिकार आणि विशेष संरक्षण दिले जाते.


आरक्षण धोरणांमध्ये (SC, ST, OBC साठी) समानतेचा तत्त्व लवचिक पद्धतीने वापरला जातो.


निष्कर्ष:

कलम 14 हा भारतीय लोकशाहीचा एक आधारस्तंभ आहे. तो प्रत्येक व्यक्तीस कायद्याच्या आधी समानता देतो, पण त्याच वेळी तर्कसंगत वर्गीकरणाची संकल्पना देखील मान्य करतो, जेणेकरून सामाजिक न्याय व वास्तववादी व्यवस्थापन शक्य होईल.

भारतीय संविधानाचे प्रमुख उगमस्थाने

#Polity 


🔹 🇬🇧 ब्रिटन (UK Constitution)

संसदीय लोकशाही

कायद्याच्या अधीनता (Rule of Law)

मंत्रीपरिषद प्रणाली

एकेरी नागरिकत्व


🔹 🇺🇸 अमेरिका (U.S. Constitution)

मुलभूत हक्क

स्वतंत्र न्यायपालिका

राष्ट्रपती पद्धत

न्यायिक पुनरावलोकन

उपराष्ट्रपती पद


🔹 🇮🇪 आयर्लंड

राज्य धोरणात्मक तत्वे (DPSP)

राष्ट्रपतींची निवड पद्धत

राज्यसभा नामनिर्देशन


🔹 🇨🇦 कॅनडा

केंद्र-राज्य अधिकार वाटप

मजबूत केंद्र

अवशिष्ट अधिकार


🔹 🇦🇺 ऑस्ट्रेलिया

समवर्ती सूची

व्यापार स्वातंत्र्य

संसद सदस्यांची संयुक्त बैठक


🔹 🇩🇪 जर्मनी (Weimar Republic)

आणीबाणीतील मूलभूत हक्क निलंबन


🔹 🇷🇺 रशिया (पूर्व सोव्हिएत युनियन)

मूलभूत कर्तव्ये


🔹 🇫🇷 फ्रान्स

स्वातंत्र्य, समता, बंधुता


📌 हे मुद्दे लक्षात ठेवले तर कोणताही प्रश्न चुकणार नाही!

🔔 अभ्यास करत राहा, यश तुमचं निश्चित आहे!

गोदावरी नदी

🔷 उगम:

▪️ त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्हा (महाराष्ट्र)


🔷 लांबी:

▪️ एकूण – सुमारे 1,465 कि.मी.

▪️ महाराष्ट्रात – सुमारे 730 कि.मी.


🔷 क्षेत्रफळ (MH):

▪️ सुमारे 3 लाख चौ. कि.मी.

▪️ त्यापैकी सुमारे 48% क्षेत्र महाराष्ट्रात

---

🟠 मुख्य संगम:

▪️ गोदावरी व प्रभा, इंद्रावती, मंजीरा, प्राणहिता नद्यांचा संगम

▪️ शेवटी आंध्र प्रदेशमधून बंगालच्या उपसागरात मिळते

---

⚫️ गोदावरी खोऱ्यातील जिल्हे:

▪️ नाशिक, अहमदनगर, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड

▪️ मराठवाडा आणि विदर्भातील महत्त्वाचे सिंचन व जलसंधारण स्रोत

---

🔵 गोदावरी नदीच्या उपनद्या:

🟤 उजव्या उपनद्या:

▪️ पैनगंगा, वैनगंगा, प्राणहिता

⚫️ डाव्या उपनद्या:

▪️ दारणा, मंजीरा, इंद्रावती, पूर्णा

मुख्य नद्या व त्यांचे उगमस्थाने

🔹 1. गोदावरी

📍 उगम: ब्रम्हगिरी पर्वत (नाशिक)

📏 लांबी: 668 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – कादवा, शिवना, खान, दुधना, दक्षिण पुणी, प्राणहिता, इंद्रावती

• दक्षिणेकडील – दारण, प्रवर, मुंढा, बोरी, सिंधफणा, बिंदुसरा, कुंडलिका, मांजरा

---


🔹 2. भीमा

📍 उगम: भीमाशंकर (पुणे)

📏 लांबी: 451 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – वेळ, कन्हडी, घोड, सीना, पुण्णगावती, भोगावती

• दक्षिणेकडील – भामा, इंद्रायणी, पवना, मुकाई, मुठा, नीरा, माण

---


🔹 3. कृष्णा

📍 उगम: महाबळेश्वर

📏 लांबी: 282 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – येरेळा, नंदळा, अग्नी

• दक्षिणेकडील – कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा

---


🔹 4. वर्धा

📍 उगम: मुलताई, मध्यप्रदेश

📏 लांबी: 455 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – कारण, वेणा, जाम, बोर, ईरई, वेनगंगा

• दक्षिणेकडील – माऊ, पेंचगंगा, वेल्गला, निरगुडा

---


🔹 5. वैनगंगा

📍 उगम: शिवनी, मध्यप्रदेश

📏 लांबी: 295 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – वाघ, चुलबंद, गाढवी, दीना

• दक्षिणेकडील – कन्हान, मुल, सुर, पेंच, नाग

---


🔹 6. पैनगंगा

📍 उगम: अर्जिता डोंगर

📏 लांबी: 495 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – सूद, अर्णवा, विदर्भ, वाचाडी, अरुणावती

• दक्षिणेकडील – कयाश

---


🔹 7. नर्मदा

📍 उगम: अमरकंटक, मध्यप्रदेश

📏 लांबी: 54 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – अरुणावती, गोमती, वाकी, मोर, गुड्डी, अमेर

• दक्षिणेकडील – गिरणा, बोरी, वाघूर, अंजन, पुणी, शिवार

---


🔹 8. तापी

📍 उगम: मुलताई, बैतुल जिल्हा

📏 लांबी: 228 कि.मी.

➡️ उपनद्या:

• उत्तरकडील – कुर, हो, आगर

• दक्षिणेकडील – गिरणा, अंबी, सुडसी, शिवार

---


📌 तयारी सुरू ठेवा! 

दुर्गाबाई देशमुख

• प्रख्यात नेते टी. प्रकाश यांच्या बरोबर त्यांनी मीठाच्या सत्याग्रहात भाग


• 25  मे 1930 रोजी दुर्गाबाई यांना अटक करण्यात आली आणि एका वर्षाची शिक्षा झाली. बाहेर येताच दुर्गाबाईंनी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल पुन्हा त्यांना अटक केली गेली आणि 3 वर्षांची तुरुंगवास


• "चिंतामण अँड आय" हे त्यांचे आत्मचरित्र 


• आंध्र महिला सभा (1937), विश्वविद्यालय महिला संघ, नारी निकेतन या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे विकासासाठी प्रयत्न केले.


• महिला शिक्षणाच्या राष्ट्रीय समितीच्या त्या पहिल्या अध्यक्ष होत्या. आंध्र प्रदेशातील गावांमध्ये शिक्षणाचा प्रसार केल्याबद्दल त्यांना नेहरू साक्षरता पुरस्कार दिला.


• सुकाणू समितीमधील एकमेव महिला सदस्या


• 1953 मध्ये दुर्गाबाई यांनी मध्यवर्ती समाज कल्याण मंडळाची स्थापना केली आणि अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली


• 1958 साली यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला.


• संविधान सभेततील 15 महिलांपैकी त्या एक

मद्रास प्रांतातून निवड

केशवराव मारुतीराव जेधे

 जन्म -21 एप्रिल 1896 (पुणे)


• "शिवाजी आमचा राणा आणि मराठी आमचा बाणा" या ध्येयाने वाटचाल करणारा सत्यशोधक म्हणून केशवरावांची ओळख 


• शिवाजी महाराजांच्या मर्जीतील कान्होजी जेधे हे केशवरावांचे पूर्वज होते. केशवरावांच्या वडिलांचा पुण्यात भांड्याचा कारखाना होता.


• 1928 मुंबई इलाखा शेतकरी परिषदेचे सचिव होते. (पुणे)

• 1929 - सातारा जिल्हा मराठा परिषदेचे अध्यक्ष 


• पुणे येथे ब्राह्मणेत्तरांनी स्थापन केलेल्या "छत्रपती शिवाजी मेळ्यासाठी" 1923-30 पर्यंत पद्यरचना केली. गाणी गायली.


• 1925 मध्ये सत्यशोधक दिनकरराव जवळकरांच्या "देशाचे दुश्मन" पुस्तिकेला लिहिलेल्या प्रस्तावनासाठी न्या.फ्लेमिंग यांनी सहा महिन्याची शिक्षा सुनावली. पुढे न्या.लॉरेन्स यांच्या कोर्टात निर्दोष सुटका


• काही दिवस श्री शिवस्मारक हे पत्र चालवले. महाड व पुणे येथील पर्वती मंदिर सत्याग्रहात सहभागी 


• 1925 रोजी पुणे नगरपालिकेचे सदस्य असताना बुधवार पेठेत महात्मा फुलेंचा पुतळा उभारावा असा ठराव मांडला परंतु सनातन्यांनी बहुमताच्या जोरावर नगराध्यक्ष ल. ज.आपटे यांनी जोरावर तो फेटाळून लावला.  केशवराव जेधे, वायाळ, सणस, विठ्ठलराव झेंडे यांनी सभात्याग केला.


• गांधीजींच्या प्रभावाखाली आलेल्या केशवरावांनी पुढे काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.


सिंधू संस्कृतीतील प्रमुख ठिकाणे मॅप




📍 1. हडप्पा (Pakistan)

 🔹 नदी : रावी 🌊

 🔹 उत्खनन करणारे : दयाराम साहनी 🕵️

 🔹 ई.स. : 1921 📅


📍 2. मोहनजोदाडो (Pakistan)

 🔹 नदी : सिन्धू 🌊

 🔹 उत्खनन करणारे : राखालदास बनर्जी 🕵️

 🔹 ई.स. : 1922 📅


📍 3. कालीबंगन (Rajasthan)

 🔹 नदी : घग्गर 🌊

 🔹 उत्खनन करणारे : बी. बी. लाल & बी. के. थापर 🕵️‍♂️

 🔹 ई.स. : 1953 📅


📍 4. चहुंदडो (Pakistan)

 🔹 नदी : सिन्धू 🌊

 🔹 उत्खनन करणारे : गोपाल मजूमदार 🔍

 🔹 ई.स. : 1931 📅


📍 5. लोथल (Gujarat)

 🔹 नदी : भोगावा 🌊

 🔹 उत्खनन करणारे : रंगनाथ राव 🏺

 🔹 ई.स. : 1955-62 📅


📍 6. रोपर (Punjab)

 🔹 नदी : सतलज 🌊

 🔹 उत्खनन करणारे : यज्ञदत्त शर्मा 🔎


📚 ही ठिकाणे सिंधू संस्कृतीच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात! 🏺✨


आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन 29 जुलै


2024 थीम - कृतीचे आवाहन


◾️2010 पासून व्याघ्र दिन साजरा केला जातो

◾️2010 साली सेंट पीटर्सबर्ग, रशिया समितीमध्ये  29 जुलै तारखेचा निर्णय घेतला

◾️TX2 असे ध्येय ठेवले होते - वाघांची संख्या दुप्पट करणे

◾️वैज्ञानिक नाव - पँथेरा टायग्रीस

◾️प्रत्येक 4 वर्षाला व्याघ्र गणना केली जाते

◾️जगाच्या 70% वाघ एकट्या भारतात आहेत

◾️टायगर स्टेट - मध्यप्रदेश ला म्हणतात

◾️संपूर्ण देशभरात 2022 व्याघ्रगणनेनुसार देशात 3167 वाघांची नोंद झाली (2023 -3882 झाली)


वाघांना वाचवण्यासाठी सरकारचे प्रयत्न

1969 - सर्व प्रकारच्या जनावरांच्या कातडी निर्यातीवर बंदी

1972 - वन्यजीव संवर्धन कायदा

1973 - प्रोजेक्ट टायगर सुरू

2010 - जागतिक व्याघ्र दिन सुरवात

2023 - International Big Cat Alliance


महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्प 

🐅 नवेगाव-नागझिरा (गोंदिया)

🐅 बोर - (वर्धा)

🐅 सह्याद्री - (सांगली,सातारा ,कोल्हापूर)

🐅 मेळघाट - (अमरावती)

🐅 पेंच व्याघ्र प्रकल्प -(नागपुर)

🐅 ताडोबा-अंधारी - (चंद्रपूर)


‼️ काही महत्वाचे

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे


मेळघाट व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प आहे


बोर व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प


काकोरी ट्रेन ॲक्शन



> उत्तर प्रदेश सरकारने काकोरी ट्रेन लुटीच्या  ऐतिहासिक घटनेचे नामांतर काकोरी ट्रेन अॅक्शन असे झाले आहे.


> भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान 9 ऑगस्ट 1925 रोजी लखनऊजवळील काकोरी गावानजीक उत्तर रेल्वे मार्गावर क्रांतिकारकांनी हा रेल्वे दरोडा टाकला होता.


> काकोरी दरोड्यात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि ठाकूर रोशन सिंह यांना 19 डिसेंबर 1927 रोजी फाशी देण्यात आली.


> हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) द्वारे या दरोड्याचे नियोजन करण्यात आले होते.


> हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA):


----- राम प्रसाद बिस्मिल यांनी 1923 मध्ये या पक्षाची स्थापना केली.


------ 1922 मध्ये चौरी चौरा घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन बंद केले. हे पक्षाच्या स्थापनेमागील मुख्य कारण ठरले होते.


------- पक्षाचे इतर प्रमुख सदस्यः ----

सचिंद्रनाथ सन्याल आणि जोगेशचंद्र चॅटर्जी (जे अनुशीलन समितीचे सदस्यही होते)


----- लाला हर दयाल यांच्या आशीर्वादाने बिस्मिल यांनी 1923 मध्ये अलाहाबाद येथे पक्षाची घटना लिहिली.


----- सन्याल यांनी 'क्रांतिकारी' नावाचा पक्षाचा जाहीरनामा लिहिला होता.


----- ब्रिटिश राजवट उलथून टाकत 'फेडरल रिपब्लिक ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया' साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले होते.


---- यामध्ये सार्वत्रिक मताधिकाराची  मागणी करण्यात आली होती.


----- 1924- 1925 मध्ये, अनेक तरुण पक्षात सामील झाले, त्यामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद ही प्रमुख नावे होती.



150 वर्ष पूर्ण होत आहे

नोंद असू द्या.....❤️❤️🙏🙏

पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर




 पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे कार्य


●●  त्यांचे बंगाली भाषेतील लिखाण तसेच बंगाली लिपीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांनी संस्कृत भाषेत मोठी विद्वत्ता प्राप्त केल्यामुळे त्यांना 'विद्यासागर'  उपाधी मिळाली. त्यांनी बंगालमध्ये अनेक विद्यालये स्थापन केली. रात्री पाठशाळा स्थापन केल्या. 


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहाचा आग्रह धरला.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हिंदू धर्मातील विधवांना दिली जाणारी वागणूक, विधवांची होणारी हेळसांड, अपमान, अन्याय याला वाचा फोडण्याचे काम विद्यासागर त्यांनी केले.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहावरील बंदी हटवण्याची मोहीम सुरू केली.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी धर्मशास्त्रात विधवा पुनर्विवाहाला मान्यता आहे हे सिध्द केले. 1851 मध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर कलकत्ता येथे संस्कृत कॉलेजचे प्राचार्य म्हणून सेवा बजावली.

 

( हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, धर्म शास्त्र यामध्ये विधवा पुनर्विवाह मान्यता आहे हे पटवून कोणी दिले)  जस सती बद्दल combine पूर्व प्रश्न होता तसा प्रश येऊ शकतो...)



●●  पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनार्थ 'पराशरसंहिता' या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करून त्याच्या प्रती इंग्रज अधिकाऱ्यांना दिल्या.


●● 1856 मध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे कलकत्ता येथे भारतातील पहिला विधवा विवाह घडून आला.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 1855 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत करण्याची विनंती 'ग्रांट' यांना केली. त्यामुळेच गव्हर्नर लॉर्ड डलहौसीच्या कालखंडात 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला.


●●  'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण' या वृत्तीचे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर नव्हते तर ते कर्ते सुधारक होते.


●● त्यांनी जवळजवळ 35 विधवा पुनर्विवाह घडवून आणले व स्वतःच्या मुलाचा एका विधवेशी विवाह लावून दिला.


●●  पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरने विधवा, कुमारिका, प्रौढ विधवा स्त्रिया यांच्या अन्यायाला वाचा फोडली.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी भारतीय महिलांच्या बंध विमोचनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले.


1857 च्या उठावाच्या बद्दल मते.....




(  सगळे वाक्य आयोगाचे प्रश्न आहेत )


●● बेंजामिन डिझरायली------राष्ट्रीय उत्थान


●● स्टॅन्ले वॉलपर्ट-------ही घटना लष्करी बंडापेक्षा काही अधिक होती परंतू प्रथम स्वातंत्र्ययुध्दापेक्षा बरीच कमी होती.


●● गो.स. सरदेसाई----सत्तावन सालचा क्षोभ


●● डॉ. सेन------धार्मिक संघर्षाचे रुप घेऊन सुरु झालेला उठाव पुढे स्वातंत्र्यसंग्राम बनला.


●● टी.आर. होल्म-----संस्कृत आणि टोळीवाद असा संघर्ष म्हणजे १८५७ चा उठाव असा त्यांचा दृष्टीकोन होता.


●● एन.आर.फाटक----१८५७ ची घटना स्वातंत्र्ययुध्द नव्हते  ( शिपायांची भाऊगर्दी )


●● वि.दा. सावरकर----स्वातंत्र्ययुध्द





संविधान सभेतील सुकाणू समितीबद्दल थोडक्यात माहिती

संविधान सभेतील सुकाणू समितीचे काम अत्यंत महत्त्वाचे होते. सुकाणू समितीला इंग्रजीत "Steering Committee" असे म्हणतात. या समितीची प्रमुख भूमिका संविधान सभेचे काम सुरळीत, नियोजित आणि योग्य प्रकारे पार पाडणे ही होती.


सुकाणू समितीचे मुख्य काम:

1. सभेचे अजेंडा ठरवणे:

प्रत्येक बैठकीचे अजेंडा (कार्यक्रम) ठरवणे, कोणते मुद्दे कधी चर्चेस घ्यायचे, याचे नियोजन करणे.


2. वेळापत्रक ठरवणे:

संविधान निर्मिती प्रक्रियेचा कालावधी ठरवणे व विविध समित्यांचे काम वेळेत पूर्ण होईल याची जबाबदारी घेणे.


3. सभेची दिशा निश्चित करणे:

विविध समित्यांकडून येणारे अहवाल, मसुदे, शिफारसी योग्य वेळी सभेपुढे मांडणे आणि चर्चेसाठी पुढे नेणे.


4. संविधान मसुदा तयार होईपर्यंत समन्वय साधणे:

इतर समित्यांमध्ये समन्वय ठेवणे आणि कामाच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे.


5. कार्यप्रणाली निश्चित करणे:

संविधान सभेची कार्यपद्धती, नियम, चर्चेचे स्वरूप, मतदान इत्यादी बाबी ठरवण्यास मदत करणे.


सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते?

डॉ. राजेंद्र प्रसाद हे सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. ते संविधान सभेचेही अध्यक्ष होते.

स्वतंत्र भारताचे प्रथम नेता / मंत्री


💘 प्रथम राष्ट्रपती - राजेंद्र प्रसाद


⚡️ प्रथम उपराष्ट्रपती - सर्वपल्ली राधाकृष्णन


💘 प्रथम प्रधानमंत्री - जवाहरलाल नेहरू


⚡️ प्रथम उपप्रधानमंत्री - वल्लभ भाई पटेल


💘 प्रथम गृहमंत्री - वल्लभ भाई पटेल


⚡️ प्रथम कृषी मंत्री - राजेंद्र प्रसाद


💘 प्रथम कायदा मंत्री - भीमराव आंबेडकर


⚡️ प्रथम रेल्वे मंत्री - आसफ अली


💘 प्रथम अर्थ मंत्री - लिआकत अली


⚡️ प्रथम शिक्षण मंत्री- अबुल कलाम आझाद


💘 प्रथम संरक्षण मंत्री - बलदेव सिंह


⚡️ प्रथम आरोग्य मंत्री - गजान्तर आली


💘 प्रथम दूरसंचार मंत्री - अब्दुल नस्तर


⚡️ प्रथम श्रम मंत्री - जगजीवन राम

➖➖➖➖➖➖➖➖➖

क्रमाने आहेत लक्षात ठेवा.

• ऑगस्ट घोषणा - 1940


• क्रिप्स योजना - 1942


• राजाजी योजना - जुलै 1944


• गांधी-जिन्हा बोलणी 9 ते 27 सप्टेंबर 1944


• देसाई-लियाकत अली योजना 1945


• वेव्हेल योजना 14 जून 1945


• सिमला परिषद - 25 जून ते 14 जुलै 1945


• कॅबिनेट (त्रिमंत्री) मिशन - 16 मे 1946


• ऍटलीघोषणा - 20 फेब्रुवारी 1947


• माउंटबॅटन योजना 3 जून 1947


• भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 18 जुलै 1947


संविधान सभेची सत्रे -


पहिले सत्र - 9 ते 23 डिसेंबर 1946

दुसरे सत्र - 20 ते 25 जानेवारी 1947

तिसरे सत्र - 28 एप्रिल ते 2 मे 1947

चौथे सत्र - 14 ते 31 जुलै 1947

पाचवे सत्र - 14 ते 30 ऑगस्ट 1947


सहावे सत्र - 27 जानेवारी 1948 (सर्वात छोटे)

सातवे सत्र - 4 नोव्हेंबर 1948 ते 8 जानेवारी 1949(सर्वात मोठे)


आठवे सत्र - 16 मे ते 16 जून 1949

नववे सत्र -  30 जुलै ते 18 सप्टेंबर 1949 

दहावे सत्र - 6 ते 17 ऑक्टोबर 1949

अकरावे सत्र - 14 ते 26 नोव्हेंबर 1949


(संविधान सभेची संविधान सभा म्हणून शेवटची सभा 24 जानेवारी 1950 रोजी झाली, ज्या दिवशी 284 सदस्यांनी घटनेच्या तीन प्रतींवर सह्या केल्या)


पिट्स इंडिया कायदा -1784


(पिट्स ब्रिटनचा पंतप्रधान होता)


√ बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना ब्रिटनमध्ये झाली

त्यात सहा सदस्य होते जे कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवत असत.


√ सेक्रेटरी ऑफ स्टेट हा बोर्डाचा अध्यक्ष असेल. त्याला निर्णायक मताचा अधिकार असेल.


√ कंपनीचा महसूल, सर्व मुलकी व्यवहार तसेच भारतातील ब्रिटिश लष्कर यावर देखरेखीचे व नियंत्रणाचे अधिकार बोर्डाला होते.


√ कंपनीतील सर्व अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार संचालकांकडे असेल. सोबत मुलकी व लष्करी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात/वृद्धी करण्याचा अधिकारही संचालकांनाच असेल.


√ कंपनीच्या अमलाखालील सर्व प्रदेशांचा उल्लेख प्रथमच "ब्रिटिश प्रदेश" असा करण्यात आला.


√ गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये त्याच्या व्यतिरिक्त तीन सदस्य असावेत. त्यापैकी एक सदस्य भारतातील ब्रिटिश लष्कराचा सेनापती असावा.


√ इतर इलाख्यांपेक्षा बंगालच्या सरसेनापतीचा दर्जा उच्च असेल.


संसदीय कामकाज

💈प्रश्नांचा प्रकार कसा आहे त्यासाठी पुढीलप्रमाणे रंगीत पेपर छापले जातात:


1) तारांकित प्रश्न हिरवा रंगाचा पेपर

2) अतारांकित प्रश्न पांढऱ्या रंगाचा पेपर

3) अल्पसूचना प्रश्न फिकट गुलाबी रंगाचा पेपर

4) खाजगी सदस्यांना विचारले जाणारे प्रश्न  पिवळ्या रंगाचा पेपर


💈तारांकित प्रश्न

तोंडी उत्तर अपेक्षित असते.

पूरक प्रश्न विचारले जातात.

हिरव्या रंगात छापले जातात.


सदस्य एका दिवशी एका पेक्षा जास्त प्रश्न विचारू शकतात. महत्तम 20 प्रश्न एका दिवशी घेतले जातात.


💈अतारांकित प्रश्न

लेखी उत्तर द्यावे लागते.

पूरक प्रश्न विचारला जात नाही.

आकडेवारीची मागणी,प्रशासकीय तपशील असलेले मुद्द्यांवर प्रश्न विचारले जातात.


प्रश्न संख्या - प्रत्येकी सदस्य 4 प्रश्न

महत्तम 230 प्रश्न असतात.

पांढऱ्या रंगात छापले जातात.