30 July 2025

पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर




 पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे कार्य


●●  त्यांचे बंगाली भाषेतील लिखाण तसेच बंगाली लिपीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांनी संस्कृत भाषेत मोठी विद्वत्ता प्राप्त केल्यामुळे त्यांना 'विद्यासागर'  उपाधी मिळाली. त्यांनी बंगालमध्ये अनेक विद्यालये स्थापन केली. रात्री पाठशाळा स्थापन केल्या. 


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहाचा आग्रह धरला.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हिंदू धर्मातील विधवांना दिली जाणारी वागणूक, विधवांची होणारी हेळसांड, अपमान, अन्याय याला वाचा फोडण्याचे काम विद्यासागर त्यांनी केले.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहावरील बंदी हटवण्याची मोहीम सुरू केली.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी धर्मशास्त्रात विधवा पुनर्विवाहाला मान्यता आहे हे सिध्द केले. 1851 मध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर कलकत्ता येथे संस्कृत कॉलेजचे प्राचार्य म्हणून सेवा बजावली.

 

( हा प्रश्न विचारला जाऊ शकतो, धर्म शास्त्र यामध्ये विधवा पुनर्विवाह मान्यता आहे हे पटवून कोणी दिले)  जस सती बद्दल combine पूर्व प्रश्न होता तसा प्रश येऊ शकतो...)



●●  पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवा पुनर्विवाहाच्या समर्थनार्थ 'पराशरसंहिता' या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर करून त्याच्या प्रती इंग्रज अधिकाऱ्यांना दिल्या.


●● 1856 मध्ये पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे कलकत्ता येथे भारतातील पहिला विधवा विवाह घडून आला.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी 1855 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत करण्याची विनंती 'ग्रांट' यांना केली. त्यामुळेच गव्हर्नर लॉर्ड डलहौसीच्या कालखंडात 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा संमत झाला.


●●  'लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण' या वृत्तीचे पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर नव्हते तर ते कर्ते सुधारक होते.


●● त्यांनी जवळजवळ 35 विधवा पुनर्विवाह घडवून आणले व स्वतःच्या मुलाचा एका विधवेशी विवाह लावून दिला.


●●  पंडित ईश्वरचंद्र विद्यासागरने विधवा, कुमारिका, प्रौढ विधवा स्त्रिया यांच्या अन्यायाला वाचा फोडली.


●● पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी भारतीय महिलांच्या बंध विमोचनातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले.


No comments:

Post a Comment