30 July 2025

काकोरी ट्रेन ॲक्शन



> उत्तर प्रदेश सरकारने काकोरी ट्रेन लुटीच्या  ऐतिहासिक घटनेचे नामांतर काकोरी ट्रेन अॅक्शन असे झाले आहे.


> भारतीय स्वातंत्र्य चळवळीदरम्यान 9 ऑगस्ट 1925 रोजी लखनऊजवळील काकोरी गावानजीक उत्तर रेल्वे मार्गावर क्रांतिकारकांनी हा रेल्वे दरोडा टाकला होता.


> काकोरी दरोड्यात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक राम प्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि ठाकूर रोशन सिंह यांना 19 डिसेंबर 1927 रोजी फाशी देण्यात आली.


> हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) द्वारे या दरोड्याचे नियोजन करण्यात आले होते.


> हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA):


----- राम प्रसाद बिस्मिल यांनी 1923 मध्ये या पक्षाची स्थापना केली.


------ 1922 मध्ये चौरी चौरा घटनेमुळे महात्मा गांधींनी असहकार आंदोलन बंद केले. हे पक्षाच्या स्थापनेमागील मुख्य कारण ठरले होते.


------- पक्षाचे इतर प्रमुख सदस्यः ----

सचिंद्रनाथ सन्याल आणि जोगेशचंद्र चॅटर्जी (जे अनुशीलन समितीचे सदस्यही होते)


----- लाला हर दयाल यांच्या आशीर्वादाने बिस्मिल यांनी 1923 मध्ये अलाहाबाद येथे पक्षाची घटना लिहिली.


----- सन्याल यांनी 'क्रांतिकारी' नावाचा पक्षाचा जाहीरनामा लिहिला होता.


----- ब्रिटिश राजवट उलथून टाकत 'फेडरल रिपब्लिक ऑफ द युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया' साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे जाहीरनाम्यात म्हटले होते.


---- यामध्ये सार्वत्रिक मताधिकाराची  मागणी करण्यात आली होती.


----- 1924- 1925 मध्ये, अनेक तरुण पक्षात सामील झाले, त्यामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि चंद्रशेखर आझाद ही प्रमुख नावे होती.



150 वर्ष पूर्ण होत आहे

नोंद असू द्या.....❤️❤️🙏🙏

No comments:

Post a Comment