30 July 2025

पिट्स इंडिया कायदा -1784


(पिट्स ब्रिटनचा पंतप्रधान होता)


√ बोर्ड ऑफ कंट्रोलची स्थापना ब्रिटनमध्ये झाली

त्यात सहा सदस्य होते जे कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवत असत.


√ सेक्रेटरी ऑफ स्टेट हा बोर्डाचा अध्यक्ष असेल. त्याला निर्णायक मताचा अधिकार असेल.


√ कंपनीचा महसूल, सर्व मुलकी व्यवहार तसेच भारतातील ब्रिटिश लष्कर यावर देखरेखीचे व नियंत्रणाचे अधिकार बोर्डाला होते.


√ कंपनीतील सर्व अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार संचालकांकडे असेल. सोबत मुलकी व लष्करी कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात/वृद्धी करण्याचा अधिकारही संचालकांनाच असेल.


√ कंपनीच्या अमलाखालील सर्व प्रदेशांचा उल्लेख प्रथमच "ब्रिटिश प्रदेश" असा करण्यात आला.


√ गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये त्याच्या व्यतिरिक्त तीन सदस्य असावेत. त्यापैकी एक सदस्य भारतातील ब्रिटिश लष्कराचा सेनापती असावा.


√ इतर इलाख्यांपेक्षा बंगालच्या सरसेनापतीचा दर्जा उच्च असेल.


No comments:

Post a Comment