♦️👉2011 सालाच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 (112,374,333) इतकी आहे.
यामध्ये पुरुषांची लोकसंख्या 5 कोटी 82 लाख 43 हजार 056 (58,243,056) तर महिलांची लोकसंख्या 5 कोटी 41 लाख 31 हजार 277 (54,131,277) आहे.
II. लोकसंख्येचा दशकीय वाढ - 2011:
2001 ते 2011 दरम्यान महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर 9.20% इतका आहे.
2001 साली राज्याची एकूण लोकसंख्या 9 कोटी 68 लाख 78 हजार 627 होती.
2011 साली ती 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 इतकी झाली आहे.
III. महाराष्ट्र लोकसंख्या घनता - 2011:
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता (दर चौरस किलोमीटर) 365 आहे.
राष्ट्रीय सरासरी घनता 382 आहे.
IV. साक्षरतेचा दर:
महाराष्ट्राचा साक्षरतेचा दर 82.34% आहे.
पुरुष साक्षरतेचा दर 89.82%, तर महिलांचा साक्षरतेचा दर 75.48% आहे.