29 January 2021

मुंबईला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा किंवा…”; भाजपा नेत्याची मागणी.


🟠कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादामुळे दोन्ही राज्यांमधील नेत्यांकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणामध्ये वादग्रस्त भागाला केंद्रशासित घोषित करण्याची मागणी केली. त्यानंतर आता भाजपाचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणामध्ये प्रतिक्रिया दिलीय.


🟠लक्ष्मण सवादी यांनी, “ज्या क्षेत्रावरुन महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये वाद आहे त्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची अशी मागणी आहे की मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा. माझीही हीच मागणी आहे,” असं मत व्यक्त केलं आहे. इतकचं नाही सवादी यांनी मुंबईलाच केंद्रशासित प्रदेश घोषित करण्याची मागणीही केलीय. “जोपर्यंत मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश केला जात नाही तोपर्यंत मुंबईला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात यावं अशी मागणी मी केंद्र सरकारकडे करतो,” असं सवादी म्हणाले आहेत.


🟠कर्नाटकव्याप्त भूभाग महाराष्ट्रात आणणारच असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद -संघर्ष आणि संकल्प’ पुस्तकाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. “मला आता नुसत्या रडकथा नकोत, तर जिंकण्याच्या दृष्टीने प्रत्येक पाऊल पडलं पाहिजे,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.  “सीमाभाग हा कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र आहे. तुम्ही महाराष्ट्रातच आहात.


🟠कर्नाटक सरकार उर्मटपणाने एक एक पाऊल टाकत आहे. एखादं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर काही करायचं नसतं, तो कोर्टाचा अपमान ठरतो. पण तरीही बेळगावचं नामांतर करण्यात आलं. त्याला उपराजधानी केली गेली. विधीमंडळाचं अधिवेशन केलं जातं. हा न्यायालयाचा अपमान नाही का?,” अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर काही तासांमध्येच सवादी यांनी मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी केलीय.

8 वर्षे जुन्या वाहनांवर ‘हरित कर’ लागू केला जाणार


▪️कद्रीय सरकार भारत सरकारच्या केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने 8 वर्षे जुन्या वाहनांवर ‘हरित कर’ (ग्रीन टॅक्स) लागू करण्याची मंजुरी दिली.


▪️वाहनाला फिटनेस प्रमाणपत्र देताना हा कर वसूल केला जाणार. या करामधून मिळणारा पैसा प्रदुषण नियंत्रणासाठी खर्च केला जाणार आहे.


🛑ठळक बाबी....


▪️8 वर्षे जुन्या वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट रिन्यू करताना रस्ता कराच्या 10 ते 25 टक्के इतका हरित कर लागू केला जाऊ शकतो.


▪️याव्यतिरिक्त सरकारी विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या वाहनांच्या अ-नोंदणीकरण आणि भंगारात काढण्यासाठीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. 15 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांसाठी हा नियम असणार आहे.


▪️15 वर्षांनंतर नोंदणी प्रमाणपत्राचे नुतनीकरण करताना खासगी वाहनांवर हरित कर लागू केला जाणार. मात्र सार्वजनिक वाहतूक विभागाच्या गाड्यांवर कमी हरित कर लागू केला जाणार.सरकारने जास्त प्रदूषण असेलल्या शहरांमधील वाहनांसाठी जास्त कर लागू करण्याचा प्रस्ताव दिला आहे.


▪️सर्वाधिक प्रदूषित असलेल्या शहरांमध्ये नोंदणीकृत वाहनांवर सर्वाधिक करीत कर आकारला जाणार

आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखलं; ७००० किमीचं अंतर केलं पार.



🔰फरान्सकडून विकत घेतलेली अत्याधुनिक राफेल लढाऊ विमानांची तिसरी बॅच गुरुवारी भारतात दाखल झाली. नॉनस्टॉप ७००० किमीचं अंतर या विमानांनी पार केलं. दरम्यान, हवेतचं या इंधन भरण्याची कमालही या विमानांनी केली. भारतीय हवाई दलानं  माहिती दिली.


🔰फरान्सच्या इस्ट्रेस एअर बेसवरुन निघालेली ही तीन विमानांची बॅच भारतातील एअर बेसवर दाखल झाली. या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी युएई एअर फोर्सने पाठवलेल्या इंधन टँकरसाठी भारताने ट्विटद्वारे आभार मानले.


🔰भारताने फ्रान्सकडून एकूण ३६ राफेल विमानं विकत घेतली आहेत. यांपैकी आत्तापर्यंत भारतात तीन बॅचमध्ये एकूण ९ विमानं दाखल झाली आहेत. येत्या मार्चमध्ये तीन आणखी राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. त्यानंतर एप्रिल महिन्यांत आणखी सात विमानं येतील. पाच विमानांची पहिली बॅच भारतात २८ जुलै रोजी दाखल झाली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये विमानांची दुसरी बॅच भारतात दाखल झाली होती.

Online Test Series