29 October 2025

काही महत्त्वाच्या नियुक्त्या सर्व परीक्षांसाठी


◈ सोनाली मिश्रा : रेल्वे संरक्षण दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नेमणूक. 


◈ डॉ.अजय कुमार : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त. 


◈ भानू प्रताप शर्मा : वित्तीय सेवा संस्था ब्युरोचे  (FSIB) अध्यक्ष. 


◈ उमा कांजीलाल : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नेमणूक. 


◈ अभिजात शेठ : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक. 


◈ एस.महेंद्र देव : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष. 


◈ ॲनालेना बेयरबॉक : संयुक्त राष्ट्र आमसभेच्या पुढील प्रमुख म्हणून निवड. 


◈ डॉ.जेनिफर सिमन्स : सुरिनामच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. 


◈ दीपक बागला : नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनचे संचालक म्हणून निवड. 


◈ साहिल किनी : रिझर्व्ह बँक इनोव्हेशन हबचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ नितीन गुप्ता : राष्ट्रीय वित्तीय अहवाल प्राधिकरणाचे अध्यक्ष. 


◈ राजेश कुमार : महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी. 


◈ क्रिस्टी कोव्हेंट्री : आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या पहिल्या महिला आणि पहिल्या आफ्रिकन अध्यक्ष. 


◈ अनुराधा ठाकूर : आर्थिक व्यवहार विभागाच्या पहिल्या महिला सचिव. 


◈ संजोग गुप्ता : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) मुख्य कार्यकारी अधिकारी. 


◈ सुनील जयवंत कदम : सेबीचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती. 


◈ केशवन रामचंद्रन : भारतीय रिझर्व्ह बँकेने कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती.

ज्वालामुखींचे प्रकार (Types of Volcano Eruptions)


1️⃣ हवाईयन (Hawaiian) प्रकार

➤ शांतपणे उफाळणारा ज्वालामुखी — उध्वंसक नसतो.

➤ भेगीय (Fissure) स्वरूपाचा उद्रेक, लाव्हा कमी उंचीचा शंकू तयार करतो.

➤ लाव्हा आम्लारी (Acidic) स्वरूपाचा असतो.

➤ प्रवाही लाव्हामुळे विस्तीर्ण लाव्हा पठारे तयार होतात.

➤ उदाहरण : मौना लोआ (Mauna Loa), मौना केआ (Mauna Kea) — हवाई बेटे.


2️⃣ स्ट्रॉम्बोलीयन (Strombolian) प्रकार

➤ सतत लहान-लहान उद्रेक होत राहतात, त्यामुळे विध्वंस क्षमता कमी असते.

➤ लाव्हा शंकू मध्यम उंचीचा असतो.

➤ लाव्हा आम्लीय (Acidic) स्वरूपाचा असतो.

➤ उद्रेक वेगाने पण सातत्याने होतात — मध्यम तीव्रतेचे स्फोट.

➤ उदाहरण : स्ट्रॉम्बोली ज्वालामुखी (इटली).


3️⃣ वल्कॅनियन (Vulcanian) प्रकार

➤ काही काळ शांततेनंतर अचानक होणारा तीव्र उद्रेक.

➤ त्यामुळे विध्वंसक शक्ती जास्त असते.

➤ उंच लाव्हा शंकू तयार होतो.

➤ गडगडाटी (Noisy) उद्रेक — दाबाखालील लाव्हा भूगर्भातून बाहेर पडतो.

➤ मोठ्या प्रमाणात राख, धूर आणि वायू उत्सर्जन.

➤ उदाहरण : व्हल्कानो बेट (इटली).


4️⃣ पेलियन (Pelean) प्रकार

➤ सर्वाधिक विध्वंसक ज्वालामुखी प्रकार.

➤ अत्यंत आम्लीय (Highly Acidic) लाव्हा असतो.

➤ उंच आणि तीव्र लाव्हा शंकू तयार होतो.

➤ मोठ्या प्रमाणात उष्णता व ऊर्जा उत्सर्जित होते.

➤ राखेचे ढग व गरम वायू प्रवाह (Pyroclastic flows) दूरवर जातात.

➤ उदाहरण : माँट पेली (Mount Pelée), मार्टिनिक (West Indies).

लाव्हामुळे तयार होणारी भूरूपे (Landforms Formed by Lava)


1️⃣ भूअंतर्गत लाव्हा भूरूपे (Intrusive Volcanic Landforms)

✅️ ➤ लाव्हा जमिनीच्या आत थंड झाल्यावर तयार होणारी भूरूपे.

✅️ ➤ यामध्ये खालील रचना आढळतात –

  🔸 बॅथोलिथ (Batholith)

   ➤ पृथ्वीच्या गर्भात मोठ्या खोलीवर थंड झालेला प्रचंड लाव्हाचा थर.

   ➤ हे खडक पर्वताच्या पाया भागात आढळतात.

  🔸 डाईक (Dyke)

   ➤ लाव्हा भेगेतून वर येऊन थंड होतो व उभे स्तंभ तयार करतो.

   ➤ हे उभ्या भेगांमध्ये घुसलेले घनरूप खडकाचे थर असतात.

  🔸 सिल (Sill)

   ➤ लाव्हा आडव्या थरांमध्ये प्रवेश करून थंड झाल्यास तयार होणारे सपाट खडकाचे थर.

  🔸 लॅकॅालिथ (Laccolith)

   ➤ लाव्हा वरच्या थरांना उचलून त्याखाली थंड होऊन तयार झालेली गुमटाकार रचना.

   ➤ यामुळे वरचा प्रदेश थोडा उंच दिसतो.

  🔸 स्टॉक (Stock)

   ➤ बॅथोलिथपेक्षा आकाराने लहान, पण खोलवर तयार होणारी घनरचना.


2️⃣ बाह्य लाव्हा भूरूपे (Extrusive Volcanic Landforms)

✅️ ➤ लाव्हा जमिनीवर बाहेर पडून थंड झाल्यावर तयार होणारी भूरूपे.

✅️ ➤ यामध्ये खालील प्रकार येतात –

  🔸 कॅल्डेरा (Caldera)

   ➤ ज्वालामुखीचा स्फोट झाल्यानंतर त्याच्या मुखाचा भाग कोसळल्याने तयार झालेला मोठा खोल खड्डा.

  🔸 लाव्हा शंकू (Lava Cone)

   ➤ लाव्हा व राखेच्या थरांच्या साचण्याने तयार झालेली शंकूच्या आकाराची रचना.

  🔸 बेसॉल्ट मैदान (Basalt Plain)

   ➤ सतत लाव्हा वाहून आल्याने व थंड झाल्याने तयार झालेली सपाट काळ्या दगडांची मैदानं.

  🔸 पठार (Plateau)

   ➤ लाव्हाच्या अनेक थरांच्या थंड होण्याने तयार झालेली उंच व सपाट भूप्रदेशाची रचना.

   ➤ उदाहरण: दख्खन पठार (Deccan Plateau) — भारतातील सर्वात प्रसिद्ध लाव्हा पठार.

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे (DPSP)


कलम 36: 

व्याख्या "राज्य" ची व्याख्या (संविधानाच्या भाग 3 प्रमाणे).


कलम 37: 

अंमलबजावणी DPSP कायदेशीररित्या बंधनकारक नसली, तरी शासनासाठी मूलभूत आहेत.


कलम 38: 

सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करणे, असमानता कमी करणे.


कलम 39: 

आर्थिक तत्त्वेसमान उपजीविकेची साधने, संपत्तीचे समान वितरण, लिंग समता, कामगार आणि बालकांचे शोषण टाळणे.


कलम 39A: 

मोफत कायदेशीर सहाय्य आर्थिक कमतरतेमुळे कोणालाही न्याय नाकारला जाऊ नये.


कलम 40: 

ग्रामपंचायतींची स्थापना ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण स्वराज्याला प्रोत्साहन.


कलम 41:

काम, शिक्षण आणि सामाजिक सहाय्यकाम, शिक्षण आणि बेरोजगारी, वृद्धापकाळ, अपंगत्व यामध्ये सहाय्य प्रदान करणे.


कलम 42: 

कामगारांचे संरक्षण कामाच्या न्याय्य आणि मानवीय परिस्थिती, प्रसूती लाभ सुनिश्चित करणे.


कलम 43: 

कामगारांना योग्य वेतन आणि जीवनमान सुनिश्चित करणे; कुटीर उद्योगांना प्रोत्साहन.


कलम 43A: 

कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करणे.


कलम 44:

एकसमान नागरी कायदा सर्व नागरिकांसाठी एकसमान नागरी कायदा लागू करणे.


कलम 45: 

बालकांचे शिक्षण 14 वर्षांखालील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे.


कलम 46:

मागासवर्गीयांचे संरक्षण अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे शैक्षणिक, आर्थिक हितांचे संरक्षण.


कलम 47: 

आरोग्य आणि जीवनमान पोषण, जीवनमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे; दारूबंदीला प्रोत्साहन.


कलम 48: 

कृषी आणि पशुसंवर्धन शेती आणि पशुसंवर्धनाचे आधुनिकीकरण; गायींचे संरक्षण.


कलम 48A: 

पर्यावरण संरक्षण , जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि सुधारणा.


कलम 49: 

राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण.


कलम 50:

न्यायपाल आणि कार्यपाल यांचे विभक्तीकरण लोकसेवा व्यवस्थेत न्यायपाल आणि कार्यपाल यांचे विभक्तीकरण.


कलम 51: 

आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य आंतरराष्ट्रीय शांतता, मैत्री आणि कायद्याचा आदर वाढवणे.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

भारतातील क्रांतिकारी चळवळी: महत्त्वाचे टप्पे (१८७९ – १९१९)



1.🚩 बंगालमधील क्रांतिकारी चळवळ

➤ प्रारंभ (१९०२)

  ➡️ छोट्या क्रांतिकारी गटांची स्थापना — मिदनापूर व कलकत्ता येथील अनुशीलन समिती (प्रमथनाथ मित्र, पुलिन बिहारी दास, बारिंद्रकुमार घोष).

➤ प्रचाराची साधने

  ➡️ १९०६ पासून युगांतर हे क्रांतिकारी साप्ताहिक सुरू झाले.

  ➡️ १९०५–०६ पर्यंत संध्या व युगांतर यांसारख्या वृत्तपत्रांनी क्रांतिकारी दहशतवादाचा पुरस्कार केला.

➤ महत्त्वाच्या घटना

  ➡️ १९०७ — पूर्व बंगालच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नरवर हल्ल्याचा प्रयत्न.

  ➡️ १९०८ — प्रफुल्ल चाकी व खुदीराम बोस यांनी मुझफ्फरपूरचे मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. खुदीराम बोस यांना फाशी, प्रफुल्ल चाकी यांनी आत्महत्या केली.

  ➡️ १९०८ — अलिपूर बॉम्ब कट प्रकरण : अरविंद घोष, बारिंद्र घोष व इतरांवर खटला.

  ➡️ १९०८ — बऱ्हा डकैती : ढाका अनुशीलनने सरकारी खजिना लुटण्याचा प्रयत्न.

  ➡️ १९१२ — दिल्ली कट : रासबिहारी बोस व सचिन सन्याल यांनी व्हाईसरॉय हार्डिंग यांच्या मिरवणुकीवर बॉम्ब फेकला.

  ➡️ पहिले महायुद्ध (१९१४–१९१८) : जतीन दास व युगांतर गट जर्मन कटात सामील — जर्मनीच्या मदतीने सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न (अयशस्वी).


2.🦁 महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ

➤ आद्य क्रांतिकारक

  ➡️ १८७९ — वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी शेतकरी व गरीब लोकांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. (भारताचा आद्य सशस्त्र क्रांतिकारी उठाव).

➤ जनजागृती

  ➡️ १८९० चे दशक — लोकमान्य टिळक यांनी शिवाजी व गणपती उत्सवांद्वारे तरुणांमध्ये जहाल विचार व देशभक्ती निर्माण केली.

  ➡️ केसरी व मराठा या नियतकालिकांद्वारे ब्रिटिशविरोधी विचारांचा प्रसार.

➤ चाफेकर बंधू

  ➡️ १८९७ — प्लेग कमिशनर रँड व ले. आयर्स्ट यांची पुण्यात चाफेकर बंधूंनी (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) हत्या केली. (भारताच्या राजकीय हत्येचे पहिले मोठे क्रांतिकारी कृत्य).

➤ सावरकर आणि अभिनव भारत

  ➡️ १८९९ — विनायक व गणेश सावरकर यांनी मित्र मेळा या गुप्त संस्थेची स्थापना.

  ➡️ १९०४ — मित्र मेळा → अभिनव भारत संघटनेत रूपांतर.

  ➡️ १९०९ — नाशिक कट खटला : अनंत कान्हेरे यांनी जिल्हाधिकारी जॅक्सन यांची हत्या केली.


3.⚔️ पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ

➤ नेतृत्व आणि प्रचार

  ➡️ लाला लजपत राय, सरदार अजित सिंग, आगा हैदर सय्यद हैदर रझा, भाई परमानंद, लालाचंद ‘फलक’, सुफी अंबाप्रसाद इ. नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध चळवळ चालवली.

  ➡️ सरदार अजित सिंग यांनी भारत माता सोसायटी ची स्थापना केली.

  ➡️ लाला लजपत राय यांचे पंजाबी व अजित सिंग यांचे भारत माता वृत्तपत्रे क्रांतिकारक विचारांचे प्रसारक.

➤ महत्त्वाची घटना

  ➡️ गदर चळवळ (१९१३) : लाला हरदयाल यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थापना केली. उद्देश — ब्रिटिश राजवट उलथविण्यासाठी जगभरातील भारतीयांना एकत्र आणणे.

  ➡️ पहिल्या महायुद्धादरम्यान पंजाबातील क्रांतिकारकांचा क्रांतीचा प्रयत्न.

  ➡️ रासबिहारी बोस यांनी उत्तर भारतातील अनेक क्रांतिकारी कारवायांत पडद्यामागून नेतृत्व केले.

वनस्पतींचे वर्गीकरण


##  मुख्य प्रकार दोन  :

अ) अबीजपत्री (Cryptogamae) 

ब)  बीजपत्री  ( Phanerogame)

--------------=========---------------

अ) अबीजपत्री (Cryptogamae)::

- हे अपुष्प वनस्पती असून यांना बिया येत नाहीत.

-  यांचे तीन विभागात विभाजन करण्यात येते..

1) थॅलोफायटा  ( Thalophyta ) ::

- 'शैवाळाचा विभाग'

- मूळ, खोड, पाने नसतात.

- पाण्यात वाढतात.

* उदाहरण := 

- शैवाळ :: स्पायरोगायरा, कारा, युलोथ्रीक्स,जेलेडीयम, क्लोरेल्ला, कोंड्रस, बट्राकोस्पर्मम.

---------------------------------------------------

2) ब्रायोफायटा ( Bryophyta ) ::

- मुळांऐवजी मुलाभ (Rhuzoid ) असतात. जे वनस्पतींना आधार देतात व अवशोषण करतात.

- उभयचर वनस्पती म्हणून ओळख.

* वर्गीकरण 2 गट ::

i) लिव्हरवार्टस ( हिपॅटेसी )::  

- साधे ब्रायोफायटा

* उदाहरण :: 

रिक्सीया, मर्केन्शीया, पेलीया, लेज्यूनिआ.


ii)माँसेस (मुस्सी ) ::

- प्रगत ब्रायोफायटा

* उदाहरण ::

फ्युनारिया, पॉलीट्रायकम 

--------------------------------------------------

3) टेरिडोफायटा ( Pteridophyta) ::

- अबीजपत्री वर्गातील सर्वात प्रगत व पहिली संवहनी संस्था.

- खरी मुळे, पाने व खोड असलेल्या वनस्पती.

- विकसित वनस्पती

* उदाहरण ::

सिलोटम, इकवीसॅटम, मारसेलिया, नेरीस, ऑडिएन्टम, नेचे, लायकोपोडीअम,

सिलॅजिनेला.

----------------==--------==-----------------

ब) बीजपत्री ( Phanerogamae ) ::

- या बिया येणाऱ्या वनस्पती.

* 2 गटात वर्गीकरण ::


i) अनावृत्तबीजी (Gymnosperms) ::

   - बीयांची निर्मिती होते पण त्या फळामध्ये बंदिस्त नसतात.

- म्हणजे यांना फळे येत नाहीत.

* उदाहरणे ::

पायनस (देवदर), सायकस,पिसिया (ख्रिसमस ट्री ), गिन्कगो बायलोबा.


ii)आवृत्तबीजी वनस्पती ( Angiosperms) :: 

- बिया फळामंध्ये बंदिस्त असतात यांना फळे येतात.

** 2 प्रकार :: 

a) एकबीजपत्री ( monocotyledonous ) ::

- एकाच दलाचे बीज.

* उदाहरणे :: 

कांदा, केळी, बांबू, लसूण, तांदूळ, मका, ज्वारी, गहू.


b) द्विबीजपत्री (Dicotyledonous ) :: 

- दोन दलाचे बीज.

*  उदाहरणे ::

आंबा, पिंपळ, मोहरी,सूर्यफूल, शेंगदाणा.


बहुमताचे प्रकार आणि वापर

 

▪️ साधे बहुमत

▪️ पूर्ण बहुमत

▪️ प्रभावी बहुमत

▪️ विशेष बहुमत

▪️ विशेष बहुमत + साध्या बहुमताने 50% राज्यांची मान्यता


1) साधे बहुमत (Simple Majority)

✅ स्पष्टीकरण :

▪️ उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 50% पेक्षा जास्त (50% + 1) असे बहुमत संदर्भित करते.

▪️ कार्यशील बहुमत म्हणून देखील साधे बहुमत ओळखले जाते.


💥 उदाहरण :

→ लोकसभेतील सदस्य संख्या : 545

→ अनुपस्थित सदस्य : 45

→ मतदान न करणारे : 100

→ म्हणजे उपस्थित व मतदान करणारे : 400

→ 400 च्या 50% पेक्षा जास्त म्हणजे 200 + 1

→ तर लोकसभेतील साधे बहुमत असेल : 201


✅ वापर / उपयोग :

सर्वसाधारण धन/वित्त विधेयक पारित करण्यासाठी

अविश्वास प्रस्ताव / विश्वास प्रस्ताव / निंदाव्यंजक प्रस्ताव / स्थगन प्रस्ताव पारित करण्यासाठी

उपराष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यासाठी लोकसभेत

आर्थिक आणीबाणी लागू करण्यासाठी

राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी

कलम 2 व 3 नुसार नवीन राज्य निर्मिती

संसदेत विधापरिषद निर्मिती / नष्ट करण्यासाठी


2) सर्वकष बहुमत / पूर्ण बहुमत (Absolute Majority)

✅ स्पष्टीकरण :

▪️ सदनाच्या एकूण सदस्य संख्येपैकी 50% पेक्षा जास्त सर्वंकष बहुमत संदर्भित करते.


💥 उदाहरण :

→ लोकसभा सदस्य संख्या : 545

→ तर लोकसभेतील सर्वंकष बहुमत : 545 च्या 50% + 1 = 273


✅ वापर / उपयोग :

सर्वंकष बहुमताचा वापर केंद्र आणि राज्य सदनांमध्ये सहसा होत नाही.

परंतु केंद्र किंवा राज्य सरकारे स्थापनेवेळी या बहुमताचा वापर होतो. (सर्वसाधारण निवडणुकांनंतर)


3) प्रभावी बहुमत (Effective Majority)

✅ स्पष्टीकरण :

▪️ सदनाच्या सदस्य संख्येच्या (रिक्त जागा वगळता) 50% पेक्षा जास्त (50% + 1) संख्या प्रभावी बहुमत संदर्भित करते.

▪️ 50% of the effective strength of the house

▪️ When Indian Constitution mentions "All the then member" that refers to the effective majority.


💥 उदाहरण :

→ लोकसभा सदस्य संख्या : 545

→ रिक्त जागा : 45

→ म्हणजे त्यावेळी सदनाची कार्यक्षम संख्या : 500

→ प्रभावी बहुमत : 500 च्या 50% + 1 = 251


✅ वापर / उपयोग :

उपराष्ट्रतींना पदावरून दूर करण्यासाठी राज्यसभेत वापर (कलम 67b)

लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करणे

राज्य विधानसभेचे व विधान परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना पदावरून दूर करणे


4) विशेष बहुमत (Special Majority)

💥 साधे बहुमत, सर्वंकष बहुमत, प्रभावी बहुमत या व्यतिरिक्त असलेले बहुमत हे विशेष बहुमत प्रकारात येईल.


✅ विशेष बहुमताचे 4 प्रकार आहेत :


💥 प्रकार 1 : कलम 249 नुसार विशेष बहुमत

▪️ सदनातील उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमत

🔸 उदाहरण :

→ राज्यसभा सदस्यसंख्या : 245

→ फक्त 150 सदस्य उपस्थित व मतदान करणारे

→ तर विशेष बहुमत लागेल : 101


✅ वापर / उपयोग :

👉 राज्यसूचीतील विषयांवर कायदा करण्याचा संसदेला अधिकार प्रदान करण्यासाठी


💥 प्रकार 2 : कलम 368 नुसार विशेष बहुमत

▪️ सदनातील एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने (50% + 1) आणि उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 बहुमताने संमत


💥 उदाहरण :

→ लोकसभा सदस्य संख्या : 545

→ एकूण बहुमत (50% + 1) = 273

→ उपस्थित व मतदान करणारे : 500

→ त्यांचे 2/3 = 334


✅ वापर / उपयोग :

घटनादुरुस्ती विधेयके पारित करण्यासाठी

सर्वोच्च व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांना पदावरून दूर करणे

महालेखापरीक्षक आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून दूर करणे

राष्ट्रीय आणीबाणीस मान्यता देण्यासाठी दोन्ही गृहात


❇️ विशेष बहुमताचे उर्वरित 2 प्रकार :


💥 प्रकार 3 : कलम 368 नुसार विशेष बहुमत + साध्या बहुमताने 50% राज्यांची मान्यता

▪️ प्रकार 2 नुसार विशेष बहुमत + निम्म्यापेक्षा जास्त राज्यांच्या विधानसभांतील साध्या बहुमताने विधेयक पारित


👉 उदाहरण :

→ प्रकार 2 नुसार विशेष बहुमत

→ 28 राज्यांपैकी 50% + 1 म्हणजे 15 राज्यांची मान्यता


✅ वापर / उपयोग :

संघराज्यीय संरचनेतील बदल होत असलेल्या घटनादुरुस्तीसाठी

उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे स्थान

National Judicial Appointment Commission (NJAC) ही या प्रकारातील दुरुस्तीचे उदाहरण


💥 प्रकार 4 : कलम 61 नुसार विशेष बहुमत

▪️ सदस्यांच्या एकूण संख्येच्या 2/3 बहुमताने

→ लोकसभा : 545 च्या 2/3 = 364 मते

→ राज्यसभा : 245 च्या 2/3 = 164 मते


✅ वापर / उपयोग :

👉 राष्ट्रपतींवरील महाभियोगावेळी हे बहुमत लागते.

रिओ परिषद


🌍 रिओ परिषद व पर्यावरणाशी संबंधित करार

🔹️जागतिक स्तरावर कायद्याच्या शासन विकासासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी जागतिक आराखडा ठरला.

महिला सक्षमीकरण, स्थानिक शासन व बिगर सरकारी संघटनांना यावर भर देतो.

पर्यावरण बचाव, वनसंवर्धन

क) कायदे आणि करार

रिओ परिषदेने यांच्याशी संबंधित ३ कायदेशीर व बंधनकारक करार मांडण्यात आले :


1️⃣ जैविक विविधता अभिसंधी (Convention on Biological Diversity)

➤ सदस्य : १९६

➤ अंमलात : २९ डिसेंबर १९९३

➤ उद्दिष्टे :

▪ जैविक विविधता घटकांचा शाश्वत वापर करणे

▪ उत्कोनीय सोतांचा लाभ न्यायपूर्ण देणे


2️⃣ संयुक्त राष्ट्र पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट (UNFCCC – United Nations Framework Convention on Climate Change)

➤ सदस्य : १९७

➤ अंमलात : २१ मार्च १९९४

➤ उद्दिष्ट :

▪ वातावरणातील हरितगृह वायूंचे (GHG) प्रमाण पर्यावरणाला घातक ठरेल एवढ्या स्तरापेक्षा कमी ठेवणे


3️⃣ संयुक्त राष्ट्रसंघ वाळवंटीकरण प्रतिबंध अभिसंधी (UNCCD – United Nations Convention to Combat Desertification)

➤ सदस्य : १९७

➤ अंमलात : २६ डिसेंबर १९९६

➤ उद्दिष्टे :

▪ वाळवंटीकरण रोखणे

▪ दुष्काळग्रस्तांसाठी लागवडीस प्रोत्साहन देणे

▪ दुर्भिक्षकाळासाठी लागवडीस सहाय्य करणे


🔹️स्पष्टीकरण

➤ १९७२ ची UNEP आणि ब्रुटलँड आयोगाच्या शिफारशीने प्रेरित होऊन १९९२ ला ब्राझीलमधील रिओ डी जानेरो या शहरात पहिली वसुंधरा परिषद भरली. तिलाच रिओ परिषद म्हणतात.

➤ या परिषदेचे शीर्षक होते :


🔹️संयुक्त राष्ट्राची पर्यावरण व विकास परिषद (UNCED – United Nations Conference on Environment & Development)

➤ या परिषदेने ३ आराखडे बनविले :

अ) रिओ घोषणापत्र

▪ विविध देशांच्या आणि समाजाच्या सहकार्याने नवीन आणि समान न्याय देणारी जागतिक भागीदारी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली.

ब) अजेंडा २१

▪ जून १९९२ ला हा करार संमत झाला.

▪ शाश्वत विकासासाठी आंतरव्यवस्थांना स्थानिक, राष्ट्रीय व प्रादेशिक सहकार्यात कृती आराखडा बनविणे.

४७ वी आसियान शिखर परिषद – मलेशिया (२६ ते २८ ऑक्टोबर २०२५)



१. प्रमुख वैशिष्ट्ये

➤ ४७ वी आसियान शिखर परिषद आणि २२ वी आसियान-भारत शिखर परिषद मलेशियामध्ये आयोजित.

➤ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत व्हर्च्युअल पद्धतीने सहभाग नोंदवला.

➤ मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम हे यजमान.

➤ आसियान देशांसह अमेरिका, चीन, जपान, दक्षिण कोरिया व अन्य प्रमुख भागीदार देशांच्या नेत्यांचा सहभाग.


२. भारताशी संबंधित महत्त्वपूर्ण घोषणा 🇮🇳

➤ नरेंद्र मोदी यांनी २०२६ हे वर्ष "आसियान–भारत सागरी सहकार्य वर्ष" म्हणून साजरे करण्याची घोषणा केली.


३. २०२५ च्या शिखर परिषदेची थीम

➤ "समावेशकता आणि शाश्वतता" (Inclusivity and Sustainability)


४. नवीन सदस्य देशाचा समावेश

➤ २६ ऑक्टोबर २०२५ रोजी तिमोर-लेस्टे (Timor-Leste) ला आसियानचा नवीनतम सदस्य म्हणून अधिकृत मान्यता.

➤ त्यामुळे आसियान समूहात आता एकूण ११ देशांचा समावेश झाला.


५. आसियानचे सदस्य देश (२०२५ नुसार)

➤ ब्रुनेई

➤ कंबोडिया

➤ इंडोनेशिया

➤ लाओस

➤ मलेशिया

➤ म्यानमार

➤ फिलीपिन्स

➤ सिंगापूर

➤ थायलंड

➤ व्हिएतनाम

➤ तिमोर-लेस्टे (नवीन सदस्य)


६. अध्यक्षपदाचे तपशील

➤ २०२५: मलेशिया

➤ २०२६: फिलीपिन्स


७. परिषदेचे महत्त्व

➤ आसियान क्षेत्रातील सागरी सुरक्षा, आर्थिक सहकार्य आणि शाश्वत विकास या विषयांवर भर.

➤ भारत-आसियान संबंध अधिक दृढ करण्यासाठी सागरी भागीदारी आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी या विषयांवर विशेष लक्ष.

चालू घडामोडी :- 28 ऑक्टोबर 2025



◆ रस्त्यांवरील खड्डे आणि खुल्या मॅनहोल्समुळे जीव गमवावा लागल्यास अशा प्रकरणात मृत व्यक्तीच्या वारसांना 6 लाख रुपये, तर अपघातात जखमी झालेल्यांना 50 हजार ते 2.5 लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.

◆ भारत पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट (APAC-AIG) बैठकीचे आणि कार्यशाळेचे आयोजन करत आहे. 

◆ भारतीय वेटलिफ्टर प्रितीस्मिता भोईने बहरीनमधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये मुलींच्या 44 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला 'मोंथा' असे नाव थायलंड देशाने दिले आहे. 

◆ प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या 74 व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले.

◆ दरवर्षी जागतिक स्ट्रोक दिन 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

◆ 20 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान संयुक्त राष्ट्र सप्ताह साजरा करण्यात येतो.

◆ कॅथरीन कॉनोली यांची आयर्लंडच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

◆ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियन कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) ने मॉस्को येथे सुखोई सुपरजेट SJ-100 या, नागरी विमानाच्या निर्मितीसाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली. 

◆ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे ज्याचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे.

◆ जागतिक पोलिओ दिन 2025 ची थीम "पोलिओ संपवा: प्रत्येक मूल, प्रत्येक लसीकरण, सर्वत्र" (End Polio: Every child, every immunization, everywhere) ही आहे.

◆ जागतिक पोलिओ दिन 2024 ची थीम "प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्याचे जागतिक ध्येय" ही होती.