29 October 2025

ज्वालामुखींचे प्रकार (Types of Volcano Eruptions)


1️⃣ हवाईयन (Hawaiian) प्रकार

➤ शांतपणे उफाळणारा ज्वालामुखी — उध्वंसक नसतो.

➤ भेगीय (Fissure) स्वरूपाचा उद्रेक, लाव्हा कमी उंचीचा शंकू तयार करतो.

➤ लाव्हा आम्लारी (Acidic) स्वरूपाचा असतो.

➤ प्रवाही लाव्हामुळे विस्तीर्ण लाव्हा पठारे तयार होतात.

➤ उदाहरण : मौना लोआ (Mauna Loa), मौना केआ (Mauna Kea) — हवाई बेटे.


2️⃣ स्ट्रॉम्बोलीयन (Strombolian) प्रकार

➤ सतत लहान-लहान उद्रेक होत राहतात, त्यामुळे विध्वंस क्षमता कमी असते.

➤ लाव्हा शंकू मध्यम उंचीचा असतो.

➤ लाव्हा आम्लीय (Acidic) स्वरूपाचा असतो.

➤ उद्रेक वेगाने पण सातत्याने होतात — मध्यम तीव्रतेचे स्फोट.

➤ उदाहरण : स्ट्रॉम्बोली ज्वालामुखी (इटली).


3️⃣ वल्कॅनियन (Vulcanian) प्रकार

➤ काही काळ शांततेनंतर अचानक होणारा तीव्र उद्रेक.

➤ त्यामुळे विध्वंसक शक्ती जास्त असते.

➤ उंच लाव्हा शंकू तयार होतो.

➤ गडगडाटी (Noisy) उद्रेक — दाबाखालील लाव्हा भूगर्भातून बाहेर पडतो.

➤ मोठ्या प्रमाणात राख, धूर आणि वायू उत्सर्जन.

➤ उदाहरण : व्हल्कानो बेट (इटली).


4️⃣ पेलियन (Pelean) प्रकार

➤ सर्वाधिक विध्वंसक ज्वालामुखी प्रकार.

➤ अत्यंत आम्लीय (Highly Acidic) लाव्हा असतो.

➤ उंच आणि तीव्र लाव्हा शंकू तयार होतो.

➤ मोठ्या प्रमाणात उष्णता व ऊर्जा उत्सर्जित होते.

➤ राखेचे ढग व गरम वायू प्रवाह (Pyroclastic flows) दूरवर जातात.

➤ उदाहरण : माँट पेली (Mount Pelée), मार्टिनिक (West Indies).

No comments:

Post a Comment