◆ रस्त्यांवरील खड्डे आणि खुल्या मॅनहोल्समुळे जीव गमवावा लागल्यास अशा प्रकरणात मृत व्यक्तीच्या वारसांना 6 लाख रुपये, तर अपघातात जखमी झालेल्यांना 50 हजार ते 2.5 लाख रुपयांपर्यंत नुकसानभरपाई देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
◆ भारत पहिल्यांदाच आशिया पॅसिफिक अपघात तपास गट (APAC-AIG) बैठकीचे आणि कार्यशाळेचे आयोजन करत आहे.
◆ भारतीय वेटलिफ्टर प्रितीस्मिता भोईने बहरीनमधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये मुलींच्या 44 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे.
◆ बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला 'मोंथा' असे नाव थायलंड देशाने दिले आहे.
◆ प्रसिद्ध अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या 74 व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले.
◆ दरवर्षी जागतिक स्ट्रोक दिन 29 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
◆ 20 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान संयुक्त राष्ट्र सप्ताह साजरा करण्यात येतो.
◆ कॅथरीन कॉनोली यांची आयर्लंडच्या राष्ट्रपती म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ माजी न्यायमूर्ती रंजना देसाई यांची आठव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
◆ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) आणि रशियन कंपनी युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन (UAC) ने मॉस्को येथे सुखोई सुपरजेट SJ-100 या, नागरी विमानाच्या निर्मितीसाठी सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी केली.
◆ हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) ही एक भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील एरोस्पेस आणि संरक्षण कंपनी आहे ज्याचे मुख्यालय बेंगळुरू येथे आहे.
◆ जागतिक पोलिओ दिन 2025 ची थीम "पोलिओ संपवा: प्रत्येक मूल, प्रत्येक लसीकरण, सर्वत्र" (End Polio: Every child, every immunization, everywhere) ही आहे.
◆ जागतिक पोलिओ दिन 2024 ची थीम "प्रत्येक मुलापर्यंत पोहोचण्याचे जागतिक ध्येय" ही होती.
No comments:
Post a Comment