०४ ऑगस्ट २०२६

पंचायत_समिती

पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती:


महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.

निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.


आरक्षण :

1. महिलांना : 50 %

2. अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)

3. इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)


विसर्जन : 

राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.


कार्यकाल : 5 वर्ष


राजीनामा :

सभापती - जिल्हा परिषदेच्याअध्यक्षांकडे

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे 


त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 

30 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन : 

सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसाच्या  आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन :

 सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - दरमहा रु 8,000/- व इतर सुखसुविधा पंचायत समितीची बैठक - कलम क्र. 117 व 118 नुसार वर्षात 12 म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1 अंदाज पत्रक - गटविकासअधिकारी तयार करतो व त्याला जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे.


गटविकास अधिकारी :

निवड - गटविकास अधिकारी

नेमणूक - राज्यशासन

कर्मचारी - ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी

नजिकचे नियंत्रण - मुख्य कार्यकारी अधिकारी

पदोन्नती - उपमुख्य कार्यकारी अधिकारी


कार्य व कामे :

1. पंचायत समितीचा सचिव

2. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.

3. वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या राजा मंजूर करणे.

4. कर्मच्यार्यांवर नियंत्रण ठेवणे.

5. पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

6. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणे.

7. पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांस सादर करणे.

8. अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.

9. महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.


पंचायत समितीची कामे :

1. शिक्षण

2. कृषी

3. वने

4. समाजकल्याण

5. पशुसंवर्धन व दुग्धविकास

6. सार्वजनिक आरोग्य सेवा

7. दळणवळण

8. समाजशिक्षण

Mpsc pre exam samples Questions

 1) खालीलपैकी कोणते विधान भारतीय राज्यघटनेच्या चौथ्या परिशिष्टाचे अचूक वर्णन करते?

 A. या परिशिष्टात राज्यघटनेत समाविष्ट भाषांची यादी समाविष्ट आहे.

 B. या परिशिष्टात केंद्र आणि राज्यामधील अधिकारांचे वाटप याची यादी समाविष्ट आहे.

 C. या परिशिष्टात राज्यसभेतील जागांची वाटणी समाविष्ट आहे.🔰

 D. या परिशिष्टात आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतूदींचा समावेश आहे.

________________________

2) खालीलपैकी कोणते आदेश हे फक्त न्यायिक आणि अर्धन्यायिक अधिसत्तेविरोधात काढता येतात ?

 A. प्रतिषेध🔰

 B. उत्प्रेक्षण

 C. बंदी प्रत्यक्षीकरण

 D. अधिकारपृच्छा.

________________________

3) योग्य कथन ओळखा :

(a) भारताच्या निवडणूक आयोगाची स्थापना 26 नोव्हेंबर 1949 रोजी झाली.

(b) संयुक्त राष्ट्रे व राष्ट्रकुल सचिवालयाच्या सहकार्याने इतर राष्ट्रांतील निवडणूकीसाठी भारताचा निवडणूक आयोग तज्ञ व निरीक्षक उपलब्ध करून देतो.

पर्यायी उत्तरे :

 A. फक्त (a)

 B. फक्त (b) 🔰

 C. (a) आणि (b) दोन्ही

 D. (a) आणि (b) दोन्ही नाही.

________________________

________________________

4) खालीलपैकी कोण स्वतंत्र पक्षाचे नेते नव्हते ?

 A. सी. राजगोपालाचारी

 B. मिनू मसानी 

 C. पी.सी. जोशी🔰

 D. के.एम. मुन्शी.

______________________

5) भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या कलमांद्वारे/कलमाद्वारे निवडणुकीच्या संदर्भात हस्तक्षेप करण्यास न्यायालयांवर बंदी आहे ?

(a) कलम 324

(b) कलम 325

(c) कलम 327

(d) कलम 329

पर्यायी उत्तरे :

 A. (a) आणि (b) अचूक आहे 

 B. फक्त (c) अचूक आहे

 C. फक्त (d) अचूक आहे🔰

 D. (a) आणि (d) अचूक आहे.

________________________

6) मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यासंबंधित घटना दुरुस्ती कोणती आहे ?

 A. एकसष्टावी घटना दुरुस्ती🔰

 B. बेचाळीसावी घटना दुरुस्ती

 C. त्रेसष्टावी घटना दुरुस्ती

 D. शहाऐंशीवी घटना दुरुस्ती.

________________________

7) लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती साठी किती राखीव मतदार संघ आहेत ? 

 A. एस.सी. - 78, एस.टी. - 39

 B. एस.सी. - 84, एस.टी. - 47🔰

 C. एस.सी. - 81, एस.टी. - 39

 D. एस.सी. - 79, एस.टी. - 41.

________________________


8) योग्य पर्यायांची निवड करा :

(a) गटविकास अधिकारी हा पंचायत समिती कार्यालयाचा प्रमुख असतो.

(b) गटविकास अधिकारी हा गटपातळीवरील विस्तार अधिका-यांचा कप्तान असतो.

(c) गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा सचिव असतो.

(d) गटविकास अधिकारी हा गट पातळीवरील राजकीय उपक्रमांचा समन्वयक असतो.

पर्यायी उत्तरे :

 A. (b) आणि (d) फक्त

 B. (c) आणि (d) फक्त

 C. (a), (b), (c) आणि (d)

 D. (a), (b) आणि (c) फक्त.🔰


________________________


9) 73 व्या घटनादुरुस्तीद्वारे पंचायती राज संबंधी खालीलपैकी कोणती तरतूद करण्यात आलेली आहे ?

 A. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव असलेल्या जागा व्यतिरिक्त एक तृतीयांश जागा या महिलांसाठी राखीव असतील.

 B. पंचायती राज्यातील निर्वाचित सदस्यांना दोन पेक्षा अधिक अपत्ये असतील तर ते आपले पद धारण करण्यास अपात्र ठरतील.

 C. पंचायतीची निवडणूक लढण्यासाठी किमान वय 25 वर्षे असेल.

 D. मध्यम आणि जिल्हा स्तरावरील पंचायतीच्या अध्यक्ष पदासाठी अप्रत्यक्ष निवडणूक (मतदान).🔰


________________________


10) राज्याच्या राज्यपालाच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

(a) राज्य शासनाचे कामकाज अधिक सुलभ पद्धतीने करण्यासाठी राज्यपाल नियम करू शकतात.

(b) अनुच्छेद 356 खालील आणीबाणीच्या काळात राज्यपाल राज्याची विधान परिषद विसर्जित करु शकतात.

(c) राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्याच्या अपात्रतेच्या प्रश्नासंबंधी राज्यपालास निर्णय घेण्याचा अधिकार आहे.

(d) एकदा का रज्यपालांनी विधेयक राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवले तर त्या विधेयकाचे कायद्यात रूपान्तर करणे हे राष्ट्रपतीच्या हातात असते, त्यापुढे राज्यपालांची कोणतीही भूमिका असत नाही.

पर्यायी उत्तरे

 A. (b) फक्त

 B. (b), (c), (d)

 C. (a), (d)🔰

 D. (a), (b), (d).


1) राज्याच्या मंत्रिमंडळाबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे?

 A. मंत्र्यांची नियुक्ती ही पाच वर्षांच्या कालावधीसाठी होते.

 B. राज्यात मंत्र्यांची एकूण सदस्य संख्या ही राज्याच्या दोन्ही सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या पंधरा टक्क्यांपेक्षा जास्त नसावी

 C. दहाव्या अनुसूची खाली अपात्र ठरलेला विधानसभेचा सदस्य हा राज्यमंत्रिमंडळाचा सदस्य होण्यास पात्र असतो.

 D. मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याविषयी कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.🔰

________________________

2)जिल्हा परिषदेच्या अथवा तिच्या समितीच्या कोणत्याही आदेशाची अथवा ठरावाची अंमलबजावणी थांबविण्याचा (निलंबित करण्याचा) अधिकार कोणास आहे?

 A. जिल्हाधिकारी

 B. विभागीय आयुक्त 🔰

 C. मुख्य कार्यकारी अधिकारी

 D. वरीलपैकी कोणालाही नाही.

________________________

3)खालील विधाने विचारात घ्या :

(a) सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा उच्च न्यायालयाच्या कोणत्याही न्यायाधीशाने आपली कर्तव्ये पार पाडतांना केलेल्या वर्तणूकीबाबत राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही.

(b) विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत एखादी तथाकथित नियमबाह्य गोष्ट घडली आहे या कारणास्तव राज्य विधिमंडळातील कोणत्याही कामकाजाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेतला जावू शकतो.

पर्यायी उत्तरे :

 A. विधान (a) बरोबर🔰

 B. विधान (b) बरोबर

 C. दोन्हीही विधाने बरोबर

 D. दोन्हीही विधाने चुकीची.

________________________

________________________


4)पंचायती राज संबंधी अशोक मेहता समितीच्या शिफारशी :

(a) त्रि-स्तरीय पद्धती ऐवजी द्विस्तरीय पद्धतीची निर्मिती करण्यात यावी.

(b) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी जागांमध्ये आरक्षण असावे.

(c) पंचायती राज कामकाजात राजकीय पक्षांचा सहभाग नसावा.

(d) विसर्जित केल्यास, एका वर्षात निवडणूका घेतल्या पाहिजेत.

पर्यायी उत्तरे :

 A. (a), (b), (c)

 B. (b), (c), (d)

 C. (a), (b)🔰

 D. (a), (d).

________________________

5)खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

 A. जे.व्ही.पी. समितीने भाषा हा राज्य पुनर्रचनेचा आधार मानण्यास नकार दिला होता.

 B. फझल अली आयोगाने 'एक भाषा-एक राज्य' हे तत्त्व नाकारले होते.

 C. फझल अली आयोगाने 15 घटकराज्ये आणि 6 केन्द्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती.🔰

 D. राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 अन्वये 14 घटकराज्ये आणि 6 केन्द्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले.

________________________

6)74 व्या घटनादुरुस्ती अधिनियम, 1992 बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. या कायद्याने भारतीय राज्यघटनेला भाग IX-A हा नव्याने समाविष्ट झाला.

 B. या कायद्याने राज्यघटनेमध्ये नव्याने बाराव्या अनुसूचीचा देखील समावेश झाला.

 C. बाराव्या अनुसूचीमध्ये नगरपालिकांच्या एकोणतीस कार्याचा समावेश आहे.🔰

 D. वरीलपैकी एकही नाही.

________________________

7) खालील विधाने विचारात घ्या :

(a) भारताच्या संसदेद्वारा करण्यात आलेले क्षेत्रातील, नावातील आणि सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास आहे.

(b) राज्याच्या सीमेबाबतीत संबंधित राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?;

 A. फक्त (a)

 B. फक्त (b) 

 C. (a) आणि (b)

 D. दोन्हीही चुकीची.🔰

________________________

8) खालील विधाने विचारात घ्या :

(a) पंचायत समितीमार्फत सरपंच समिती नेमली जाते.  

(b) सरपंच समिती पंचायत समितीला सल्ला देते व मार्गदर्शन करते.

(c) पंचायत समितीचा सभापती हा सरपंच समितीचा पदसिद्ध सभापती असतो.

(d) विस्तार अधिकारी (पंचायती) हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो.

योग्य विधाने निवडा :

 A. (a) आणि (b)

 B. (a), (b) आणि (c)

 C. (a), (b) आणि (d)🔰

 D. वरील सर्व.

________________________

9) 'पंचायती राज संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळात पंचायती राज मंत्री नियुक्त करावा'अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली?

 A. बलवंतराय मेहता समिती

 B. अशोक मेहता समिती 🔰

 C. जी.व्ही.के. राव समिती

 D. एल.एम. सिंघवी समिती.

________________________


10) कथन (A) : संविधानानुसार मुख्यमंत्री राज्यपालाच्या इच्छेपर्यंत पदावर राहतो.

कारण (R) : मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे होते.

 A. (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत व (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण आहे.🔰

 B. (A) आणि (R) दोन्ही बरोबर आहेत परंतु (R) हे (A) चे खरे स्पष्टीकरण नाही.

 C. (A)बरोबर आहे परंतु (R) चूक आहे.

__________

1)समवर्ती सूचीतील विषयाबाबत राज्याने मंजूर केलेला कायदा केन्द्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ ठरतो :

A. जर तो केन्द्रीय कायद्याच्या अगोदर मंजूर झाला असेल तर.

 B. जर राज्यविधिमंडळाने मंजूर केलेला आणि राष्ट्रपतीने मान्यता दिलेला कायदा केन्द्रीय कायदा मंजूर होण्याच्या अगोदर असल्यास.🔰

 C. जर सर्वोच्च न्यायालयाने तसा निर्णय दिल्यास.

 D. जर बहुसंख्य राज्याच्या विधिमंडळांनी तसा निर्णय घेतल्यास.

____________________________

2)महानगरपालिकेबाबत खालील विधाने विचारात घ्या.

(a) निर्वाचित नगरसेवकांची किमान संख्या 65 असावी.

(b) निर्वाचित नगरसेवकांची कमाल संख्या 221 असावी.

(c) नामनिर्देशित नगरसेवकांची संख्या 7 पेक्षा जास्त नसावी.

वरील विधानांपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. (a)

 B. (b) 

 C. (c)🔰

 D. यापैकी एकही नाही.

____________________________

3)खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

 A. सर्व अर्थ (धन) विधेयके [अनुच्छेद-110] ही वित्त विधेयके असतात परंतु सर्व वित्त विधयके [अनुच्छेद-117] ही अर्थ (धन) विधेयके नसतात.

 B. वित्त विधेयक [अनुच्छेद-117(3)] हे राज्यसभेद्वारा फेटाळले अथवा दुरुस्त केले जावू शकत नाही.🔰

 C. वित्त विधेयका [अनुच्छेद-117(3)] बाबत दोन्ही सभागृहामध्ये मतभेद असल्यास कोंडी सोडविण्यासाठी राष्ट्रपती दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावू शकतो.

 D. वरीलपैकी एकही नाही.

____________________________

____________________________

4)भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांना पदावरुन दूर करण्यासाठी खालीलपैकी कोणाला पदावरुन दूर करण्याची कारणे व पद्धत वापरली जाते ? 

 A. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष

 B. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 🔰

 C. भारताचे महान्यायवादी 

 D. लोकसभेचे सभापती.

__________


5)भारतीय राज्यघटना कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणत्या विभागाची असते ? 

 A. खर्च विभाग

 B. महसूल विभाग 

 C. आर्थिक व्यवहार विभाग🔰

 D. संरक्षण विभाग.

____________________________

6)खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?

 A. कोठारी समिती 1974 मध्ये नियुक्त करण्यात आली.

 B. कोठारी समितीने आपला अहवाल 1976 मध्ये सादर केला.

 C. कोठारी समितीच्या शिफारशी 1977 मध्ये स्विकारण्यात आल्या.🔰

 D. कोठारी समितीच्या शिफारशी 1979 मध्ये अंमलात आल्या.

____________________________

7)अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) नियमाअंतर्गत विशेष अधिकारी म्हणून ___ च्या पेक्षा कमी दर्जाचे अधिका-याची नेमणूक करता येत नाही.

 A. जिल्हा दंडाधिकार

 B. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी 🔰

 C. जिल्हा न्यायाधीश

 D. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश.

____________________________

8)भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ____ मध्ये अटक वे नजरकैदेच्या विरोधातील संरक्षणाच्या तरतूदी दिलेल्या आहेत.

 A. 20

 B. 21 

 C. 22🔰

 D. वरीलपैकी कोणतेही नाही.

____________________________

9)माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद ___ अंतर्भूत असून सदरचा हक्क फक्त ___ असेल.

 A. 15, नागरिकांना

 B. 21, सरकारी दफ्तरांना

 C. 19(1)(a), नागरिकांना🔰

 D. 19(1), सरकारी अधिका-यांना.

____________________________

10)सायबर अपिलेट ट्रीब्यूनलच्या अध्यक्ष व सदस्यांची निवड कोण करतात ?

 A. भारताचे राष्ट्रपती

 B. राज्याचे राज्यपाल

 C. भारताचे पंतप्रधानांच्या सल्ल्याने केंद्र सरकार

 D. भारताचे सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने केंद्र सरकार.🔰

____________________________


पंचायतराज प्रश्नसंच

 *1) पंचायतराज पद्धती भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली?*

✔️राजस्थान


*2) "स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक" म्हणून कोणास संबोधले जाते?*

लार्ड रिपन ✔️


*3) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली?*

✔️ 1 मे 1962


*4) महाराष्ट्र "लोकशाही विकेंद्रीकरणाची "शिफारस कोणत्या समितीने केली?*

✔️ वसंतराव नाईक समिती


*5) भारतातील पंचायत राज योजना कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे?*

✔️ बलवंतराय मेहता समिती


*6) घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे "पंचायत राज "सुरू करण्यात आले?* 

✔️ 40


*7) पंचायतराजची देशात केव्हा सुरूवात झाली?*

✔️ 1959


*8) पंचायतराज मुळ संकल्पना कोणाच्या विचारांवर आधारित आहे?*

✔️ महात्मा फुले


*9) पंचायतराज संदर्भातील पहिला अहवाल कोणी सादर केला?*

✔️ बलवंतराय मेहता


*10) भारतातील स्थानिक स्वराज्याची संकल्पना ----------तत्त्वावर आधारलेली असते?*

✔️ लोकशाही


*11) ग्रामपंचायत कार्यकाळ किती वर्षांचा आसतो ?* 

✔️ 5 वर्षे


*12) महाराष्ट्रात ग्रामपंचायत कायदा केव्हा अस्तित्वात आला?*

✔️ 1959


*13) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?  अथवा ग्रामपंचायत दफ्तर कोण सांभाळतो?* 

✔️ गरामसेवक


*14) ग्रामपंचायत किती लोकसंख्येत स्थापन करता येते ?*

✔️ 600


*15) पंचायत राज्याचा सर्वात खालचा (निम्नस्तर) कोणता?*

✔️ गरामपंचायत


*16) ग्रामपंचायत सदस्य संख्या किती आहे ?*

✔️ 7 ते 17


*17) ग्रामपंचायतीसाठी मतदाराचे वय किती वर्षे पाहिजे ?*

✔️ 18 वर्षे


*18) ग्रामपंचायतीच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो ?*

✔️  सरपंच


*19) ग्रामपंचायतीतील सदस्यांची संख्या निर्धारित करण्याचे आधिकार कोणाला आहे  ?*

✔️ जिल्हाधिकारी


*20) ग्रामपंचायत ग्रामसभेची ------------समिती आसते?*

✔️ कार्यकारी


*21) गावातील जनता व गट प्रशासन यांच्यातील शासकीय दुवा कोण?*

✔️  गरामसेवक


*22) सरपंचाची निवड कोणामार्फत केली जाते  ?* 

✔️  थट जनतेमधून


*23) जन्म - मृत्यू विवाह यांची नोंद ठेवण्याचे कार्य कोण करते ?*

✔️ ग्रामसेवक


*24) ग्रामसभेत कोण कोण असतो?*

✔️ गावातील मतदार


*25) ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक याची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते?*

✔️ मख्य कार्यकारी अधिकारी


*26) जिल्हा परिषद व ग्राम पंचायतीमधील दुवा कोणता?*

✔️पचायत समिती


*27) पंचायत समितीचा कार्यकाळ?*

✔️ 5 वर्षे


*28) पंचायत समितीचा पदसिद्ध सचिव कोण?*

✔️ गटविकास अधिकारी


*29) गटविकास अधिकार्याची नेमणूक कोण करते?*

✔️ राज्य शासन


*30) पंचायत समितीतील आर्थिक वर्षाची सुरूवात होणारा महिना कोणता?*

✔️एप्रिल


*31) जिल्हा परिषदेचा कार्यकाळ किती वर्षांचा आसतो ?*

✔️ 5 वर्षे


*32) महाराष्ट्रातील जिल्हा परिषद अध्यक्ष दर्जा?*

✔️ उपमंत्रीपद


*33) जिल्हा परिषदेचा स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष?*

✔️ जिल्हा परिषद अध्यक्ष।


राज्यघटना प्रश्नसंच

 १) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?

अ) कलम ३५२

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६२

=======================

:) उत्तर............ क) कलम ३६० :)

=======================

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?

अ) युद्ध

ब) परकीय आक्रमण

क) अंतर्गत अशांतता

ड) वरीलसर्व

==========================

:) उत्तर......... क) अंतर्गत अशांतता :)

==========================

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?

अ) दोन महिने

ब) तीन महिने

क) चार महिने

ड) सहा महिने

=====================

:) उत्तर....... क) चार महिने :) 

=====================

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?

अ) चंडीगड

ब) लक्षद्वीप

क) दिल्ली

ड) महाराष्ट्र

=====================

:) उत्तर..... क) दिल्ली :) 

=====================

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?

अ) उच्च न्यायालय

ब) सर्वोच्य न्यायालय

क) दोन्ही

ड) यापैकी नाही 

========================

:) उत्तर........ अ) उच्च न्यायालय :)

========================

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?

अ) कलम १३

ब) कलम ३२

क) कलम २२६

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर....... क) कलम २२६ :) 

=====================

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?

अ) राजमन्नार आयोग

ब) सच्चर आयोग

क) सरकारिया आयोग

ड) व्ही. के. सिंग

==========================

:) उत्तर....... क) सरकारिया आयोग :)

==========================

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?

अ) कलम २८०

ब) कलम २८२

क) कलम २७५

ड) कलम २८४

=====================

:) उत्तर....... अ) कलम २८० :)

=====================

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२

क) कलम २६३

ड) कलम २६४

=====================

:) उत्तर....... ब) कलम २६२ :)

=====================

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

=====================

:) उत्तर........ अ) कलम ३२४ :)

=====================

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती 

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

========================

:) उत्तर....... अ) संथानाम समिती :)

========================

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

=====================

:) उत्तर........ अ) पाच वर्षे :) 

=====================

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश

=====================

:) उत्तर...... पर्याय (ड) :)

=====================

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग

========================

:) उत्तर....... ड) निवडणूक आयोग :)

========================

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

=====================

:) उत्तर.......... ब) राज्य :) 

=====================

1. सरपंच किवा उपसरपंच यांच्याविरुध्द अविश्वासाचा ठराव मांडायचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान किती सदस्यांनी मांडावा लागतो ? - 
१/३✅ 
१/२
२/३
३/४

🔹 2. स्थानिक स्वराज्य संस्थानच्या जनक कोणाला म्हणतात ?
पंडित नेहरू 
महात्मा गांधी
लॉर्ड लिटन 
लॉर्ड रिपन✅

🔹 3. ६०० ते १५०० लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये किती सभासद असतात?
२ 
७✅

🔹 4. पशुसंवर्धन व दुग्धविकास समिती कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार स्थापन झाली ?
पी.बी.पाटील 
ल .ना . र्बोगीरवर✅ 
वसंतराव नाईक
यापैकी नाही

🔹 5. सरपंचाच्या गैराहाजेरीमध्ये ग्रामपंचायतीचे कार्य कोण पाहतो ?
ज्येष्ठ पंच 
ज्येष्ठ
उपसरपंच✅
ग्रामसेवक

🔹 6. ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती ?
ग्रामसभा 
सरपंच समिती 
ग्रामपंचायत✅
यापैकी नाही

🔹 7. उपसरपंच पदासाठी किमान वयाची पात्रता काय असावी लागते ?
१८ वर्ष 
२० वर्ष 
२१ वर्ष✅
२५ वर्ष

🔹 8. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये किती सरपंच असतात ?
दोन 
तीन
चार
फक्त एक✅

🔹 9. ग्रामसेवकाच्या कार्यावर कोणाचे नजिकचे नियंत्रण असते ?
गटविकास अधिकार✅ 
तलाठी
सरपंच
बी. डी. ओ.

🔹 10. बलवंतराय मेहता समितीतील इतर सदस्य कोण होते ?
डी.पी. ठाकूर 
बी. जी. राव
फुलसिंग
वरील सर्व

हे नक्की वाचा :- परीक्षेसाठी महत्वाचे

◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक


◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच


◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक


◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच


◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच


◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती


◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी


◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती


◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी


◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO


◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष


◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष


◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO


◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी


◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी


◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष 


◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी


◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त


◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर


◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त


ग्रामीण प्रशासन प्रश्न व उत्तरे.

1)पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलवतो??

1)सभापती

2)विस्तार अधिकारी

3)राज्य शासन

4)जिल्हा अधिकारी✅


2)सरपंच समितीचा सचिव कोण असतो?

1)सरपंच

2)उपसरपंच

3)विस्तार अधिकारी

4)ग्रामसेवक ✅


3)वित्त आयोगाची मुदत किती वर्षाची असते??

1)3

2)4

3)5 ✅

4)6


4)महाराष्ट्रात जिल्हापरिषद केव्हा स्थापन करण्यात आली?

1)1958

2)1968

3)1962✅

4)1661


5)ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो???

1)सरपंच

2)गटविकास अधिकारी

3)ग्रामसेवक ✅

4)उपसरपंच


6)GST चे दर किती प्रकारचे असतात?

1)2

2)4

3)5 ✅

4)6


7)ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी किती सभासद संख्या असते??

1)5

2)11

3)9

4)7✅


8)राजा केळकर हे प्रसिद्ध संग्रहालय कोठे आहे??

1)नांदेड

2)पिंपरी

3)पुणे ✅

4)नाशिक


9)झिरो माईल  स्थान कोणत्या शहरात आहे??

1)मुंबई

2)पुणे

3)नागपूर✅

4)नाशिक


10) सातारा आणि सांगली ता दोन जिल्ह्यांत ------हे मसाल्याचे पीक जास्त होते???

1)मिरची

2)हळद ✅

3)धणे

4)लसुण


ग्रामपंचायत बद्दल संपूर्ण माहिती


कायदा - 1958 (मुंबई ग्रामपंचायत अधिनियम)

कलम 5 मध्ये प्रत्येक गावासाठी एक ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे. 

परंतु एखाद्या गावामध्ये 600 लोकसंख्या असेल त्याठिकाणी गट ग्रामपंचायत स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सभासद व त्यांची विभागणी - कमीत-कमी 7 व जास्तीत जास्त 17



लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची सभासद संख्या :

लोकसंख्या :


1. 600 ते 1500 - 7 सभासद

2. 1501 ते 3000 - 9 सभासद

3. 3001 ते 4500 - 11 सभासद

4. 4501 ते 6000 - 13 सभासद

5. 6001 ते 7500 - 15 सभासद

6. 7501 त्यापेक्षा जास्त - 17 सभासद


निवडणूक - प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.

कार्यकाल - 5 वर्ष

विसर्जन - कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी राज्यसरकार विसर्जित करू शकते.


आरक्षण :

1. महिलांना - 50%

2. अनुसूचीत जाती/जमाती - लोकसंख्येच्या प्रमाणात

3. इतर मागासवर्ग - 27% (महिला 50%)



ग्रामपंचायतीच्या सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याला 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्याचे गावच्या मतदान यादीत नाव असावे.


ग्रामपंचायतीचे विसर्जन : विसर्जित झाल्यापासून सहा महिन्याच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे तिच्या राहिलेल्या कालावधीसाठी पुढे काम करणे.

सरपंच व उपसरपंच यांची निवड : निवडून आलेल्या सदस्यांमधूनच ग्रामपंचायतीच्या पहिल्या सभेच्या वेळी केले जाते.

सरपंच व उपसरपंचाचा कार्यकाल : 5 वर्ष इतका असतो परंतु त्यापूर्वी ते आपला राजीनामा देतात.


राजीनामा :

सरपंच - पंचायत समितीच्या सभापतीकडे देतो.

उपसरपंच - सरपंचाकडे

निवडणुकीच्या वेळी वाद निर्माण झाल्यास :


सरपंच-उपसरपंचाची निवड झाल्यापासून 15 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्‍याकडे तक्रार करावी लागते व त्यांनी दिलेल्या निर्णयानंतर त्याविरोधी 15 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे तक्रार करावी लागते.


अविश्वासाचा ठराव :

सरपंच आणि उपसरपंचाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही व तो फेटाळला गेल्यास पुन्हा त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.

बैठक : एका वर्षात 12 बैठका होतात (म्हणजे प्रत्येक महिन्याला एक)

अध्यक्ष : सरपंच असतो नसेल तर उपसरपंच

तपासणी : कमीत कमी विस्तारात अधिक दर्जाच्या व्यक्तीकडून तपासणी केली जाते.

अंदाजपत्रक : सरपंच तयार करतो व त्याला मान्यता पंचायत समितीची घ्यावी लागते.

आर्थिक तपासणी : लोकल फंड विभागाकडून केली जाते.



ग्रामसेवक / सचिव :

निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

नेमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी

नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी

कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा


कामे :


1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे

3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

5. व्हिलेज फंड सांभाळणे.

6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.


ग्रामपंचातीची कामे व विषय :

1. कृषी

2. समाज कल्याण

3. जलसिंचन

4. ग्राम संरक्षण

5. इमारत व दळणवळण

6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

7. सामान्य प्रशासन


ग्रामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

बैठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)

सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच

ग्रामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.