०४ एप्रिल २०२६

सामान्य ज्ञान - प्रश्न उत्तरे

1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

👉साडी 


2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

👉 अरबी समुद्र 


3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

👉ठोसेघर धबधबा 


4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

👉औरंगाबाद 


5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

👉पणे 


6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

👉 भकंप 


7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

👉 नाशिक 


8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

👉गोदावरी


9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉नांदेड 


10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

👉 औरंगाबाद


11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

👉अकोला


12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

👉1962


13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

👉 थड हवेची ठिकाणे


14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

👉 गडचिरोली 


15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

👉 रत्नागिरी


🔹रामकृष्ण मिशन ची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी विवेकानंद


 🔹आर्य समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- स्वामी दयानंद सरस्वती


🔹परार्थना समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर--------- आत्माराम पांडुरंग


🔹सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?

उत्तर----------महात्मा फुले


🔹दिग्दर्शन हे मासिक कोणी सुरु केले?

उत्तर----------- बाळशास्त्री जांभेकर


🔹इदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरु केले?

उत्तर----------- न्या. रानडे


🔹मानवधर्म सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर ----------- दादोबा पांडुरंग


 🔹निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------ महर्षी धोंडो केशव कर्वे


🔹महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्री कोणी सुरु केले?

उत्तर ------------- लोकमान्य टिळक


🔹आर्य महिला समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ------------- पंडिता रमाबाई


🔹हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

उत्तर-------------- महात्मा गांधी 


🔹भारत सेवक समाज ची स्थापना कोणी केली?

उत्तर ---------------गोपाळ कृष्ण गोखले


 🔹गीताई हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर -------------- विनोबा भावे


🔹सवासदन ची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- रमाबाई रानडे


🔹एसेज ऑन इंडीयन इकोनोमीक्स हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर-------------- न्या. रानडे


🔹परमहंस सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर------------- दादोबा पांडुरंग


 🔹दी प्रोब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहला?

उत्तर------------- डॉ. बाबासाहेब आंबेडकर


🔹सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?

उत्तर-------------- ग. वा. जोशी


 🔹शतपत्रे कोणी लिहली?

उत्तर------------ गोपाल हरी देशमुख (लोकहितवादी)


🔹 गरामगीता कोणी लिहली?

उत्तर------------- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

______________________


महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे?

उत्तर--नाशिक💐✅


 महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? 

उत्तर----सातपुडा💐✅


महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर--यवतमाळ💐✅


 महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ? 

उत्तर---national highway 6 💐✅


स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते? 

उत्तर- भगुर (जी नाशिक )💐✅

 

महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती? 

उत्तर--नांदेड💐✅

 

छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली? 

उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला💐✅


महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? 

उत्तर--अमरावती💐✅

 

पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? 

उत्तर--जुन्नर💐✅


पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? 

उत्तर---भीमा💐✅


 महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?

उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर )💐✅


 महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या ---

>>>36💐✅


महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

उत्तर ---- गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? 

उत्तर---गोदावरी💐✅


महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता?

उत्तर---अहमदनगर💐✅


संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?

उत्तर---अमरावती💐✅

 

भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य कोठे स्थापन करण्यात आले? उत्तर

--कर्नाळा जिल्हा रायगड💐✅

 

यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?

उत्तर---प्रीतिसंगम💐✅

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे? 

उत्तर---मोझरी (जी. अमरावती.)💐✅

 

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात? 

उत्तर--कोयना प्रकल्प💐✅


 महाराष्ट्रातील मातीचे धरण ? 

उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक💐✅


 महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते? 

उत्तर--औरंगाबाद💐✅


 लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? 

उत्तर---बुलढाणा💐✅

समाजसुधारक व त्यांच्या पदव्या


1. जस्टीज ऑफ दि पीस - जगन्नाथ शंकरशेठ


2. मुंबईचा अनभिषिक्त सम्राट -  जगन्नाथ शंकरशेठ


3. मुंबईचा शिल्पकार -  जगन्नाथ शंकरशेठ


4. आचार्य - बाळशास्त्री जांभेकर, विनोबा भावे


5. घटनेचे शिल्पकार - डॉ. बाबासाहेब आंबेडकर


6. मराठीतील पहिले पत्रकार - विनोबा भावे


7. लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख


8. विदर्भाचे भाग्यविधाता - डॉ. पंजाबराव देशमुख


9. समाजक्रांतीचे जनक - महात्मा ज्योतीबा फुले


10. भारतीय प्रबोधनाचे जनक - राजा राममोहन रॉय


11. नव्या युगाचे दूत - राजा राममोहन रॉय


12. आधुनिक भारताचे अग्रदूत - राजा राममोहन रॉय


13. भारतीय पुनरुजीवन वादाचे जनक - राजा राममोहन रॉय


14. हिंदू नेपोलियन - स्वामी विवेकानंद


15. आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते - दादाभाई नौरोजी


16. भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक - न्यायमूर्ती रानडे


17. भारतातील स्वराज्याचे पहिले उद्गाते - दादाभाई नौरोजी


18. पदवीधराजे मुकुटमणी - न्या.म.गो.रानडे


19. नामदार - गोपाळ कृष्णा गोखले


20. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन - महात्मा ज्योतीबा फुले


21. आधुनिक मनू - डॉ. बाबासाहेब आंबेडकर


22. दलितांचा मुक्तीदाता - डॉ. आंबेडकर


23. कर्मवीर - भाऊराव पायगोंडा पाटील


24. आधुनिक भगीरथ - भाऊराव पायगोंडा पाटील


25 महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिग्टन - भाऊराव पायगोंडा पाटील


26. महर्षी - धोंडे केशव कर्वे / विठ्ठल रामजी शिंदे


27. राष्ट्रसंत - तुकडोजी महाराज 

 

28. हिंदुस्थानच्या कुषक क्रांतीचे जनक - पंजाबराव देशमुख


29. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाचे अद्यप्रवर्तक - लोकशाहीवादी गोपाळ हरी देशमुख


30. धन्वंतरी - डॉ. भाऊदाजी लाड


31. राजर्षी - शाहू महाराज


32. वस्तीगृहाचे अद्यजनक - शाहू महाराज


33. सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष - शाहू महाराज


34. तेल्या तांबोळ्यांचे पुढारी - लोकमान्य टिळक


35. असंतोषाचे जनक -  लोकमान्य टिळक   

जहाल राजकारणी

● मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे

: पार्श्वभूमी
• मराठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रचून शिवाजी राजे १६७४ मध्ये पहिले छत्रपती बनले. छत्रपती शिवाजी राज्यांच्या मृत्यूनंतर कनिष्ठ पुत्र राजारामांना गादीवर बसविण्याचा कट उधळून देऊन या संभाजी राजे (१६८०-१६८९) मराठी राज्याचे दुसरे छत्रपती
बनले.

• संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी येसूबाईंनी विश्वासू सरदारांशी चर्चा करून व मराठे शाहीवरचे संकट बाळाजीने ओळखून राजाराम राज्यांना नजर कैदेतून मुक्त करून त्यांना गादीवर बसविले. ‘राजा सलामत तर राज्य सलामत’ या हेतूने
मराठ्यांनी १६८९ मध्ये सुरक्षेसाठी राजारामांना कर्नाटकातील जिंजीस पोहोचविले. मुघलांनी राणी येसूबाई व बाल शाहू यांना कैद केली. १६९७ मध्ये राजाराम महाराष्ट्रात परतल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा २ मार्च, १७०० रोजी वयाच्या केवळ ३० व्या वर्षी मृत्यू झाला.

• राजारामाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाईंनी आपला साडेतीन-चार वर्षाचा मुलगा शिवाजी यास गादीवर बसवून स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व आपल्या हाती घेतले.

 छ.शाहू राजे यांची सुटका व राज्यारोहण

• औरंगजेबच्या मृत्यूनंतर बहादूरशाहने शाहू राजांना मुक्त केले. बाजीरावाने ताराबाईंनी शाहूंच्या हाती मराठेशाहीची सत्ता देण्यास नकार दिला. ताराबाईंचा सेनापती धनाजी जाधव यांनी ऐनवेळी शाहूंची बाजू घेतली. या गृहयुद्धातून झालेल्या खेडच्या युद्धात
(१२ ऑक्टोबर, १७०७) ताराबाईंचा पराभव झाला. शाहू राजांनी सातारचा किल्ला सर करून १२ जानेवारी, १७०८ मध्ये राज्याभिषेक करून राज्यारोहण केले. ते मराठ्यांचे चौथे छत्रपती बनले. ताराबाईंनी कोल्हापूरला मराठ्यांची दुसरी गादी
निर्माण केली. या दोघांमधील यादवी १७३१ च्या वारणेच्या तहापर्यंत चालू राहिली.

● पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२)

 कारणे व महत्त्वाच्या घटना

• बॉम्बे सरकारला महाराष्ट्रात क्लाईव्हने बंगालमध्ये स्थापन केलेल्या दुहेरी शासनव्यवस्थेची स्थापन करण्याची इच्छा होती. पेशवेपदासाठीच्या सत्ता संघर्षाने त्यांना संधी प्राप्त झाली.

• माधवरावांच्या मृत्यूनंतरचा सत्ता संघर्ष: पेशवेपदाची इच्छा असलेल्या रघुनाथरावांनी (माधवरावांचा काका) पेशवा नारायणराव (माधवरावांचा भाऊ) याचा खून घडवून आणला व स्वत:स पेशवा घोषित केले. तेव्हा मराठा दरबारातील नाना फडणीस, महादजी शिंदे, सखाराम बापू वगैरे बारा व्यक्तींनी राघोबाच्या विरोधात बारभाईंचे राजकारण केले. त्यांनी राघोबाला पदच्युत केले व नारायणरावांच्या नुकत्याच झालेल्या मुलाला सवाई माधवराव असे नाव देऊन त्याला पेशवा बनविले व त्याच्या वतीने हे बाराजण राज्यकारभार पाहू लागले.

•राघोबाने गेलेले पेशवेपद मिळविण्यासाठी बॉम्बे प्रेसिडन्सीशी ‘सुरतचा तह’ (१६ मार्च, १७७५) रोजी केला. त्यामुळे युद्धास सुरूवात झाली.

• मात्र सुरतचा तह कलकत्त्याच्या गव्हर्नर-जनरलला पसंद पडला नाही. त्याने बॉम्बे सरकारला मराठ्यांची नवीन तह करायला सांगितले. दीर्घ चर्चेनंतर बॉम्बे सरकारने पुणे दरबारातील शासक गटाशी मार्च १७७६ मध्ये ‘पुरंदरचा तह’ केला. या तहामुळे युद्ध तात्पुरते थांबले. या तहाद्वारे राघोबाला मराठ्यांच्या स्वाधीन
करायचे ठरले व त्याने केलेले पूर्वीचे तह रद्द करण्यात आले.

• मात्र हा तह मुंबईच्या इंग्रजांना नुकसानकारक वाटला. तसेच कंपनीच्या संचालकांनाही तो पसंत पडला नाही. अमेरिकन वसाहती गमावल्याने आता इंग्रजांनी पुन्हा राघोबाची बाजू घेऊन मराठ्यांशी युद्ध सुरू केले. पण पुण्याकडे राघोबाला घेऊन येणाऱ्या इंग्रजांचा महादजी शिंदेंनी तळेगाव येथे पराभव
करून त्यांना ‘तळेगावचा तह’ (१७७९) मान्य करावयास लावला.

• हा तह इंग्रजांनी अमान्य केल्यावर त्यांचा निर्णायक पराभव करण्यासाठी नाना फडणीसाने पेशवे, नागपूरकर भोसले, हैदर अली व निझाम यांचा ‘चतुःसंघ’ इंग्रजांविरूद्ध उभा केला. मात्र धुर्त इंग्रजांनी निझाम व भोसल्यांना फितविले. तसेच गोद्दार्ड
याच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याहून मोठे सैन्य मराठ्यांविरूद्ध पाठविले.

• दोन वर्षे युद्ध असेच चालू राहिले. इंग्रजांनी महादजींकरवी शांततेचा प्रस्ताव मांडला. हैदर न विचारता मराठ्यांनी ‘साल्बाईचा तह’ करून ७-८ वर्षे चाललेले युद्ध संपुष्टात आणले.

● साल्बाईचा तह, १७ मे, १७८२

• साल्बाई या ग्वाल्हेरपासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी महादजी शिंदे (पेशव्यांच्या वतीने) व इंग्रज यांमध्ये हा तह १७ मे, १७८२ रोजी करण्यात आला व पहिले इंग्रजमराठा युद्ध थांबले. या तहाच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्याः

– १)साष्टी, भडोच, मुंबई इंग्रजांकडेच राहतील, तर पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेली ठाणी मराठ्यांना परत केली जातील.
– २)इंग्रजांनी राघोबाची बाजू घेऊ नये.
– ३)इंग्रजांना त्याच्या व्यापारी सवलती पुन्हा प्राप्त होतील.
– ४)दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या दोस्त राज्यांवर हल्ला करायचा नाही.तसेच पेशव्यांनी इतर युरोपीयन शक्तींना मदत करायची नाही.

● महत्व

• हा तह इंग्रजांसाठी खूप महत्वाचा ठरला. खरे तर, तो इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या इतिहासात एक महत्वाचे वळण (turning point) ठरला. या तहामुळे इंग्रजांची मराठ्यांशी २० वर्षे शांतता प्रस्थापित झाल्याने या काळात त्यांनी आपली शक्ती
वाढविली व मराठ्यांव्यतिरिक्त इतर शबूंचा एक-एक करून पराभव केला. नाना फडणीसाला हा तह हैदरच्या मान्यतेशिवाय करायचा नव्हता. त्यामुळे महादजी व नाना यांच्या फूट पडली, तसेच मराठे व हैदर यांचे संबंधही बिघडले.

● दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५)

● कारणे

• १)लॉर्ड वेलस्लीचे मराठ्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे आक्रमक धोरण. त्याला मराठ्यांवर तैनाती फौजेचा तह लादायचा होता.

• २)सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर १७९५ मध्ये राघोबाचा अकार्यक्षम व कर्तव्यशून्य असा मुलगा दुसरा बाजीराव यास पेशवेपद मिळाले. १८०० मध्ये नाना फडणीसाचा मृत्यू झाला व ‘मराठेशाहीतील सारे शहाणपण संपले’. १८ व्या शतकाच्याअखेर पर्यंत अनेक हुशार, मुत्सद्दी व अनुभवी मराठी राजकारण्यांचा मृत्यू झाला होता.

• ३)मराठा सरदारांमधील दुफळी: दौलतराव शिंदे व यशवंतराव होळकर यांच्यातील यादवी. बाजीरावाची होळकरांविरूद्ध शिंद्यांना मदत, यशवंतराव होळकरांनी केलेला पेशवे व शिंदे यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव. या पराभवामुळे बाजीरावाने
संरक्षणासाठी इंग्रजांकडे धाव घेतली व १३ डिसेंबर, १८०२ रोजी ‘वसईचा तह करून इंग्रजांची तैनाती फौज पदरी ठेवण्याचे मान्य करून इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारले.

• ४)वसईच्या तहामुळे इंग्रजांना पेशव्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्राप्त झाला. मात्र इतर मराठा सरदारांनी तहास मान्यता देण्यास नकार दर्शविल्याने दुसऱ्या युद्धास तोंड फुटले.

● महत्त्वाच्या घटना

• १८०३ मध्ये ऑर्थर वेलस्लीने शिंदे-भोसले यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव केला व त्यांच्या तैनाती फौजेचे पुढील तह केले:

१) १७ डिसेंबर, १८०३ रोजी रघुजी भोसले यांच्या बरोबर ‘देवगावचा तह’ केला. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यास भोसल्यांच्या दरबारात रेसिडेन्ट म्हणून नेमण्यात आले.

२) ३० डिसेंबर, १८०३ रोजी दौलतराव शिंदे यांच्या बरोबर ‘सुर्जी अर्जनगावचा तह’ केला. जॉन माल्कम यास शिंद्यांच्या दरबारात रेसिडन्ट म्हणून नेमण्यात आले.

• होळकरांविरूद्ध मात्र इंग्रजांना यश मिळू शकले नाही. शेवटी २४ डिसेंबर, १८०५ रोजी यशवंतराव होळकरांबरोबर इंग्रजांनी ‘राजपूरघाटचा तह’ हा शांततेचा तह केला.

• अशाप्रकारे दुसऱ्या इंग्रज- -मराठा युद्धात भोसले, शिंदे, होळकर यांच्यासारख्या मातब्बर सरदारांना इंग्रजांनी पराभूत केले. भारतात कंपनीची सत्ता सर्वश्रेष्ठ शक्ती (Paramount Power) बनली.

● तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८१७-१८१८)

• कारणे

• आपण एकटे पडलो आहोत याची जाणीव दुसऱ्या बाजीरावाला झाली. त्याने इंग्रजांच्या जोखडातून सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपले स्वातंत्र्य नष्ट झाल्याने मराठा सरदारांमध्यही असंतोष होता.

• गायकवाडांच्या गंगाधरशास्त्रींच्या खूनात बाजीरावाचा व त्याचा सल्लागार त्र्यंबकजी डेंगळे यांचा हात असल्याचा आरोप करून इंग्रजांनी बाजीरावावर जून १८१७ मध्ये ‘पुणे तह’ हा एक
कडक तह लादला, जो वसईच्या तहाला पूरक म्हणून
लादण्यात आला. या तहाने बाजीराव निव्वळ एक संस्थानिक बनला.

• लॉर्ड हेस्टिंगने पिंडाऱ्यांचा बंदोबस्त करण्यापूर्वी त्यासाठी शिंद्यांची मदत घेण्यासाठी दौलतराव शिंदेबरोबर नोव्हेंबर, १८१७ मध्ये ‘ग्वाल्हेरचा तह’ केला. तसेच दुसऱ्या मल्हारराव होळकरांबरोबरच जानेवारी, १८१८ मध्ये ‘मंदासोरचा तह’ केला.

• पुणे तहाच्या विरूद्ध बाजीरावाने बापू गोखलेच्या साहाय्याने लढण्याचे ठरविले. ५ नोव्हेंबर, १८१८ रोजी निर्णायक असे तिसरे युद्ध खडकी येथे सुरू झाले. युद्धात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीरावाने शरणागती पत्करली. त्याच्या बरोबर इतर मराठा सरदार घराणीही इंग्रजांच्या अंकित आले.

• इंग्रजांनी बाजीरावास पेन्शन देऊन त्यास कानपूरजवळ बिठूर येथे रवाना केले. पेशव्यांचा सर्व प्रदेश ताब्यात घेतला.

महत्वाचे प्रश्नसंच

 धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा तयार झाला आहे ?
नंदुरबार.

 गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ?
हरियाणा.

 अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कोणते ?
चौंडी.( अहमदनगर )

 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ?
दिल्ली.

 शिखांचा पवित्र आद्यग्रंथ कोणता ?
गुरूग्रंथ साहेब.

 शरीराचे तापमान मोजण्याचे उपकरण कोणते ?
ज्वरमापी.

 चारमिनार कोणत्या शहरात आहे ?
हैदराबाद.

 पृथ्वीवरील सजीवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?
चार्ल्स डार्विन.

 मूळ रेखावृत्त कोणत्या शहरातून जाते ?
ग्रीनविच.

 मानवी शरीरातील सगळ्यात मजबूत स्नायू कोणता ?
जीभ.

 माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
महात्मा गांधी.

 चैत्यभूमी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?
मुंबई.

 खालसा या पंथाची स्थापना कोणी केली ?
गुरू गोविंदसिंग.

 हाॅकी जादूगर कोणाला म्हणतात ?
मेजर ध्यानचंद.

 लीप वर्षत एकूण किती दिवस असतात ?
३६६ दिवस.

 विश्वनाथन आनंद हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
बुद्धीबळ.

 जगातील क्षेत्रफळाने दुस-या क्रमांकाचा देश कोणता ?
कॅनडा.

 आहाराचे मोजमाप कोणत्या एककात होते ?
कॅलरी.

 वि.वा.शिरवाडकर यांचे टोपणनाव काय आहे ?
कुसुमाग्रज.

 अंतर मोजण्याचे एकक कोणते ?
किलोमीटर..

 आयोडिन या घटकाच्या अभावामुळे कोणता रोग होतो ?
गलगंड.

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठ कोठे आहे ?
औरंगाबाद.

 मॅग्नेशियम या मुलद्रव्याची संज्ञा कोणती ?
Mg.

 गुलाबी शहर कोणत्या शहरास म्हणतात ?
जयपूर.

 सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
महात्मा फुले.

 कोणत्या झाडापासून कात मिळतो ?
खैर.

 आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा केला जातो ?
८ मार्च.

 हत्तीरोगाचा प्रसार कोणत्या डासांमुळे होतो ?
क्युलेक्स मादी.

 अमेरिका खंडाचा शोध कोणी लावला ?
कोलंबस,इटालियन खलाशी.

 आग विझविण्यासाठी कोणता वायू वापरला जातो ?
Co2.

 कोर्णाक मंदिर कोणत्या राज्यात आहे ?
उडीसा.

 भगवान बुद्धांचे निर्वाण स्थळ कोणते ?
 कुशीनगर.

 बाबा आमटे यांचे पूर्ण नाव काय आहे ?
मुरलीधर देविदास आमटे.

 'भारतीय शेक्सपियर' असे कोणाला म्हटले जाते ?
कालिदास.

 विनोबा भावे यांचे जन्मगाव कोणते ?
गागोदे.( रायगड )

 झाडाची पाने कोणत्या घटकामुळे हिरवीगार दिसतात ?
क्लोरोफिल.

 क्षय ( T.B. ) या रोगासाठी कोणती लस वापरतात ?
बीसीजी लस.

 कोणत्या देशाच्या राष्ट्रध्वजावर AK-47 चे चित्र आहे ?
मोझांबिक्यू.

 उष्णता मोजण्याचे एकक कोणते ?
ज्यूल

 संत गाडगे बाबा विद्यापीठ कुुठे आहे ?
अमरावती. ( महाराष्ट्र )

 भारतातील सर्वांत उंच मिनार कोणते ?
कुतुबमीनार.

 पृथ्वीच्या तापमान वाढीस कोणता वायू कारणीभूत आहे ?
Co2.

 नेपोलियन बोनापार्टची जन्मभूमी कोणती ?
कोर्सिका.

 नॅशनल डिफेन्स अँकेडमी कोठे आहे ?
खडकवासला.

 नाना पाटील यांना कोणत्या उपाधीने ओळखले जाते ?
क्रांतिसिंह.

 आशा योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
११ फेब्रुवारी २००५.

 देशातील हरितक्रांतीचे जनक कोण ?
एम. एस. स्वामीनाथन.

 आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या ?
डाॅ. लक्ष्मी स्वामीनाथन.

 वुमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना कोणी केली ?
एनी बेझंट.

 कविता राऊत हे नाव कशाशी संबंधित आहे ?
अथेलेस्टिक.

 'जलमणी योजना' कशाशी संबंधित आहे ?
विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे.

 भारताची प्रथम महिला राष्ट्रपती कोण ?
प्रतिभाताई पाटील.

 मराठवाड्यातील सर्वांत मोठे शहर कोणते ?
औरंगाबाद.

 सौम्या स्वामिनाथन ह्या कशाशी संबंधित आहे ?
चेस.

 कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मचरित्र कोणी लिहिले ?
अनुताई वाघ.

 मासे कोणत्या इंद्रियाद्वारे श्वसन करते ?
कल्ले.

 आंध्रप्रदेशातील नृत्यशैली कोणती ?
कुचिपुडी.

 स्त्री - पुरूष तुलना हा ग्रंथ कोणी लिहिला ?
ताराबाई शिंदे.

 भारताच्या प्रथम महिला लोकसभा सभापती कोण ?
मीरा कुमार.

 महाराष्ट्रातील विमान कारखाना कोठे आहे ?
ओझर मिग.( नाशिक )

 महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी किती आहे ?
८०० किमी.

 चिल्का हे खारया पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
ओरिसा.

 चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे आहे ?
कोल्हापूर.

 ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
बीड.

 चंदनाचे सर्वांधिक उत्पादन कोठे होते ?
कर्नाटक.

 महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ?
गोदावरी.

 भारतातील पहिले संपूर्ण साक्षर राज्य कोणते ?
केरळ.

 रमाबाई रानडे यांनी स्थापन केलेल्या संस्थेचे नाव काय ?
सेवासदन. ( पुणे )

 आस्ट्रेलिया खंडाचा शोध कोणी लावला ?
जेम्स कुक.

 महाराष्ट्रातील आद्यशिक्षिका कोण आहेत ?
सावित्रीमाई फुले.

 आसाम राज्याचे पूर्वीचे नाव काय होते ?
कामरूपा.

 'बावन्न दरवाजांचे शहर' असे कोणत्या शहराला म्हणतात ?
औरंगाबाद.

 संगमरवर हे खनिज कोणत्या राज्यात आढळते ?
राजस्थान.

 भारतरत्न मिळणारे महाराष्ट्रातील पहिले व्यक्ति कोण ?
धोंडो केशव कर्वे.

 कळसूबाई हे नाव कशाशी संबंधित आहे ?
पर्वत शिखर.

 हिमरू शालीकरिता महाराष्ट्रातील प्रसिद्ध ठिकाण कोणते ?
औरंगाबाद.

 भारताची प्रथम महिला अर्थमंत्री कोण ?
निर्मला सितारामन.

 महाराष्ट्रातील पहिले पंचतारांकित हाॅटेल कोणते ?
ताजमहल. ( मुंबई )

 वीरधवल खाडे हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
जलतरण.

 ग्रामोफोनचा संशोधक म्हणून कोणाला ओळखले जाते ?
थाॅमस एडिसन.

 संत ज्ञानेश्वर यांचे पूर्ण नाव काय आहे ?
ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी.

 महाराष्ट्रातील मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अमरावती.

 वनस्पतींना संवेदना असतात याचे संशोधक कोण आहे ?
जगदीशचंद्र बोस.

 आपल्या भारताचे राष्ट्रगीत पूर्णपणे म्हणण्यास अंदाज़े किती वेळ लागतो ?
५२ सेकंद.

 भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात ?
सॅम पित्रोदा.

 भारतीय गानकोकिळा म्हणून कोणाला ओळखले जाते ?
लता मंगेशकर.

 मुळा व मुठा या नद्या कोणत्या शहरातून वाहत जातात ?
पुणे.

 तांबे या खनिजासाठी महाराष्ट्रातील कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
चंद्रपूर.

 WTO चे पूर्ण रूप काय आहे ?
वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन.

 रवींद्रनाथ टागोर हे कोणत्या भाषेतील कवी आहे ?
बंगाली.

 पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला ?
पु. ल. देशपांडे.

 संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते ?
राज्यसभा.

 भारतीय संविधान केव्हा लागू करण्यात आले ?
२६ जानेवारी १९५०.

 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-२०१९ कोणत्या देशाने जिंकली ?
इंग्लंड.

 जागतिक लोकसंख्या दिन कधी साजरा केला जातो ?
११ जुलै.

 केजीबी कोणत्या देशाची गुप्तचर संस्था आहे ?
रशिया.

 राष्ट्रीय मतदार दिवस कधी साजरा केला जातो ?
२५ जानेवारी.

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
सोनेगांव. ( नागपूर )

 मौर्य वंशाचे शेवटचे राजा कोण होते ?
बृहद्रथ.

 संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोठे आहे ?
न्यूयॉर्क.

 गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
आयोडीन.

 नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे ?
कोलकाता.

 रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय आहे ?
गुरूदेव.

 संत नामदेव महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
नरसी. ( हिंगोली )

 प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?
मदुराई. (,तामिळनाडू )

 गलगंड आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो ?
आयोडीन.

 नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ कोठे आहे ?
कोलकाता.

 रवींद्रनाथ टागोर यांचे टोपण नाव काय आहे ?
गुरूदेव.

 संत नामदेव महाराज यांचा जन्म कोठे झाला ?
नरसी. ( हिंगोली )

 प्रसिद्ध मिनाक्षी मंदिर कोठे आहे ?
मदुराई. (,तामिळनाडू )

 दौलताबाद किल्ला कोठे आहे ?
औरंगाबाद.

 चीन या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
टेबल टेनिस.

 विवेकसिंधू हा ग्रंथ कोणी लिहिला ?
मुकुंदराज.

 शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
थर्मामीटर.

 आयझॅक न्यूटन कोणत्या देशाचे शास्त्रज्ञ होते ?
इंग्लंड.

 बुलबुल चक्रीवादळ कोणत्या सागरात तयार झाले होते ?
बंगालचा उपसागर.

 राजाराम मोहन राॅय पुरस्कार - २०१९ कोणाला जाहीर झाला ?
गुलाब कोठारी.

 यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी संस्था कोठे आहे ?
पुणे.

 क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांना देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
द्रोणाचार्य पुरस्कार.

 जलधोरण राबविणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
मेघालय.


 शेअर बाजाराची सुरूवात करणारा जगातील पहिला देश कोणता ?
नेदरलॅंड.

 आशियातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते ?
गोबी वाळवंट.

 गरूड हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे ?
स्पेन.

 'भरतनाट्यम शास्त्रीय नृत्‍य' कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
तामिळनाडू.

 'महाकवी कालिदास' यांचे स्मारक कोछे आहे ?
रामटेक. ( नागपूर )

 हिरोशिमा व नागासाकी ही शहरे कोणत्या देशात आहे ?
जपान.

 दिवस व रात्र कोठे समान असतात ?
विषुववृत्त.

 जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?
रोम.

अलेक्झांडर उर्फ सिंकदर यांच्या गुरूचे नाव काय होते ?
अँरिस्टॅटल.

 छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?
सईबाई.

 केदारनाथ प्राचीन मंदीर भारतातील कोणत्या राज्यात आहे ?
उत्तराखंड.

 'मेरा भारत महान' हा नारा कोणी दिला ?
राजीव गांधी.

 ऑस्कर पुरस्काराची सुरूवात कधी झाली ?
१९२९ मध्ये.

 नर्मदा नदी कोठे जाऊन मिळते ?
अरबी समुद्र.

 'काॅस्टिक सोडा' याचे शास्त्रीय नाव काय आहे ?
सोडियम हायड्राक्साइड.

 महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य काय आहे ?
सदरक्षणाय,खलनिग्रहणाय.

 संविधान सभेचे उपाध्यक्ष कोण होते ?
एच.डी.मुखर्जी.

 लाळेमध्ये कोणते पाचक द्रव्य असते ?
टायलिन.

 कर्बोदके कशापासून बनलेली असतात ?
कार्बन,हायड्रोजन,प्राणवायू.

 मानवी ह्दय कशाचे बनलेले असते ?
स्नायू.

 मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते ?
१३०० ते १४०० ग्रॅम.

 जीएसटी कोणत्या प्रकारचा कर आहे ?
अप्रत्यक्ष कर.

 हुमायुनामा या ग्रंथाचे लेखक कोण ?
गुलबदन बेगम.

 बाणसागर धरण कोणत्या नदीवर आहे ?
सोन नदी.

 भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतो ?
सरन्यायाधिश.

 ब्लू माॅरमाॅन कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे ?
महाराष्ट्र.

 NCC चे घोषवाक्य काय आहे ?
एकता व अनुशासन.

 स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना कधी करण्यात आली ?
३० मार्च १९८५.

 पोलिओ रोगामुळे कोणत्या अवयवास अपाय होतो ?
मज्जासंस्था.

 संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे ?
नारायण सूर्याजीपंत ठोसर.

 ब्लू माॅरमाॅन कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू आहे ?
महाराष्ट्र.

 NCC चे घोषवाक्य काय आहे ?
एकता व अनुशासन.

 स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना कधी करण्यात आली ?
३० मार्च १९८५.

 पोलिओ रोगामुळे कोणत्या अवयवास अपाय होतो ?
मज्जासंस्था.

 संत रामदासांचे पूर्ण नाव काय आहे ?
नारायण सूर्याजीपंत ठोसर.

 भारतात जनगणना दर किती वर्षांनी केले जाते ?
दहा वर्षानंतर.

 गुगली हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
क्रिकेट.

 गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला ?
सारनाथ.

 लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?
गोमती.

 शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात ?
कँल्शिअम फॉस्फेट व कँल्शिअम कार्बोनेट.

 चहामध्ये कोणता घटक असतो ?
टॅनिन.

 इडन गार्डन स्टेडियम कोठे आहे ?
कोलकाता.

 डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोणत्या शहरात घेतली ?
नागपूर.(महाराष्ट्र)

 दिल्ली शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे ?
यमुना.

 बिबि का मकबरा महाऱाष्ट्रातील कोणत्या शहरात आहे ?
औरंगाबाद.

 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
दिल्ली.

 स्वतंत्र भारताचे पहिले उपप्रधानमंत्री कोण होते ?
सरदार वल्लभभाई पटेल.

 सूर्यप्रकाशात किती रंग समाविष्ट असतात ?
सात.

 नर मानवाची लिंग गुणसुत्रे कोणती ?
XY.

 ग्लुकोमिया आजार कोणत्या अवयवात होतो ?
डोळे.

 मानवाचे किती दात पडून नव्याने दात येतात ?
वीस.

 भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे ?
सत्यमेव जयते.

 पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणातून तयार करतात ?
जस्त,तांबे.

 रियो २०२० चा मुख्य उद्देश्य काय होता ?
शाश्वत विकास लक्ष्य.

 गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अमरावती.

 औष्णिक वीज प्रकल्पातून कोणता वायू बाहेर पडतो ?
सल्फर डाय ऑक्साईड.

 कोयना धरण कोणत्या जिल्ह्यात येते ?
सातारा.

 ताजमहल कोणी निर्माण केला ?
मुघल शासक शहाजहान.

 विंचू हा प्राणी कोणत्या संघात मोडतो ?
अर्थोपोडा.

 महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे ?
पुणे.

 २००० रू ची नोट १९७८ नंतर पुन्हा कधी चलनात आली ?
१० नोव्हेंबर २०१६ पासून.

 विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे ?
आर्वी.( पुणे )

 धुपगड पर्वत शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे ?
सातपुडा पर्वत रांग.

 भारतातील सर्वांधिक लागवडीखालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येते ?
भात.

देशातील सर्वोच्च दर्जाची सुरक्षा कोणती ?
एसपीजी.

 सानिया मिर्झा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
टेनिस.

 आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
दयानंद सरस्वती.

 छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक कुठे झाला ?
रायगड.

 महाराष्ट्रातील सर्वांत लोकप्रिय नृत्यप्रकार कोणता ?
लावणी.

 ऑस्कर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
चित्रपट.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ?

⚪️ दराक्ष 

⚪️ मोसंबी 

⚪️ डाळिंब

⚫️ चिकू ☑️


महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने .....जिल्ह्यात आढळतात..?

⚪️ सोलापूर 

⚫️ अहमदनगर ☑️

⚪️ जालना 

⚪️ अमरावती 



पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदुषित शहर कोणते. ?

⚪️ मबई 

⚪️ ठाणे

⚫️ चंद्रपूर ☑️

⚪️ नागपूर 



मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर ....हे आहे. ?

⚪️ कांडला

⚪️ मार्मागोवा 

⚪️ हल्दीया 

⚫️ न्हावा-शेवा ☑️



 लोह व अँल्युमिनीयमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते. ?

⚪️ काळी मृदा 

⚪️ गाळाची मृदा 

⚫️ जांभी मृदा ☑️

⚪️ पिवळसर मृदा 



 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही. ?

⚪️ सांगली 

⚪️ सातारा 

⚫️ *रायगड ☑️*

⚪️ रत्नागिरी 



 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते. ?

⚪️ लोणावळा 

⚫️ चिखलदरा ☑️

⚪️ महाबळेश्वर 

⚪️ माथेरान 



पर्जन्यछायेचा प्रदेशामध्ये ...स्थान आहे. ?

⚪️ महाड 

⚫️ वाई ☑️

⚪️ महाबळेश्वर 

⚪️ नाशिक 



महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे. ?

⚫️ 6 ☑️

⚪️ 4

⚪️ 7

⚪️ 9 



 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरुळ लेणी आहेत. ?

⚪️ पणे 

⚪️ अहमदनगर 

⚫️ औरंगाबाद ☑️

⚪️ लातूर


1) योग्य जोड्या जुळवा.


( अ ) आर्य समाज                               ( i ) स्वामी दयानंद सरस्वती 

( ब ) प्रार्थना समाज                             ( ii ) दादोबा पांडुरंग तर्खडकर 

( क ) डिप्रेस्ड क्लासेस मिशन              ( iii ) म. गो. रानडे 

( ड ) सामाजिक परिषद                       ( iv ) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 

                                                         \  ( v ) विष्णुशास्त्री पंडित


              अ    ब   क   ड

( 1 )        i     iv   ii    v 

( 2 )        iii   ii     i    iv 

( 3 )         v   ii    iv   iii 

( 4 )        i     ii    iv   iii ✔️


2) खालीलपैकी कोणते विधान बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल योग्य नाही ? 

( 1 ) त्यांचे शिक्षक त्यांना बाल बृहस्पती म्हणत.

( 2 ) ते जावरा संस्थानच्या नबाबाचे इंग्रजी शिक्षक होते.✔️

( 3 ) शुन्यलब्धी हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

( 4 ) ते कुलाबा वेधशाळेचे संचालक होते.


3) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 'विद्यार्थी निधी' सुरू करून त्यात जमा झालेला पैसा डेक्कन एज्युकेशन सोसायटीला दिला ? 

( 1 ) महर्षी धोंडो केशव कर्वे ✔️

( 2 ) कर्मवीर भाऊराव पाटील 

( 3 ) पंजाबराव देशमुख 

( 4 ) गोपाळ गणेश आगरकर 


4) मानवधर्मसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ? 

( 1 ) मानवधर्मसभेची स्थापना 1844 मध्ये मुंबई येथे झाली. ✔️

( 2 ) मानवधर्मसभेच्या स्थापनेत दादोबा तर्खडकर , दुर्गादास मंछारा 

( 3 ) सभेचा प्रार्थना दिवस रविवार होता.

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर 


5) ------- ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती.

( 1 ) थ्रोस्टल मिल 

( 2 ) द ओरिएंटल स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी 

( 3 ) बॉम्बे युनायटेड स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी 

( 4 ) बॉम्बे स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी ✔️


6) राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगदगुरु मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक केली ? 

( 1 ) सदाशिव लक्ष्मण पाटील ✔️

( 2 ) गणेश सुदामा पाटील 

( 3 ) वासुदेव जोशी 

( 4 ) माणिकचंद पाटील 


7) नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांतिकारी चळवळीत योगदान दिले ?

( 1 ) तुफानी सेना✔️ 

( 2 ) वानरसेना 

( 3 ) बहुजन सेना 

( 4 ) वरीलपैकी एकही नाही.


8) 'सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लीजन ' ही संस्था कोणी स्थापन केली ? 

( 1 ) सावरकर आणि अनंत कान्होरे

( 2 ) वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर 

( 3 ) अनंत कान्हेरे आणि बाळकृष्ण चाफेकर 

( 4 ) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर ✔️


9) योग्य जोड्या लावा.


( अ ) शिवाजी क्लब        i) नाशिक 

( ब ) आर्य बांधव समाज ii) पुणे 

( क ) चाफेकर क्लब      iii) वर्धा, नागपूर 

( ड ) मित्र मेळा             iv) कोल्हापूर 


           अ     ब   क    ड

( 1 )     i      ii    iii    iv

( 2 )     iv    iii   iii     i ✔️

( 3 )     ii     iv   iii     i

( 4 )     iii    iv    ii     i 


10) खालील वर्णन कोणाचे आहे ? 

त्यांनी आर्य महिला समाज, शारदा मुक्ती सदन, कृपा सदन इ . संस्था उभारल्या. त्यांना 'कैसर - ए - हिंद' ही पदवी देऊन गौरवले गेले. त्यांनी वैद्यकीय पुरवण्यासाठी लेडी डफरीन फंड उभारला.

 1 ) तर्खडकर भगिनी 

( 2 ) रमाबाई रानडे 

( 3 ) ताराबाई शिंदे 

( 4 ) पंडिता रमाबाई ✔️



1) हरिश्चंद्र - बालाघाट ' ही डोंगररांग कोणत्या दोन नद्यांची जल विभाजक आहे ?

( 1 ) तापी व नर्मदा 

( 2 ) गोदावरी व भीमा✔️

( 3 ) भीमा व कृष्णा 

( 4 ) तापी व गोदावरी


2) खालील विधाने पाहा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) विदर्भात पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते.

( ब ) उत्तर कोकणात दक्षिण कोकणापेक्षा जास्त पाऊस पडतो.

( क ) गगनबावड्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त वार्षिक पावसाचे दिवस आहेत.


( 1 ) अ , ब बरोबर 

( 2 ) ब , क बरोबर

( 3 ) अ , क बरोबर ✔️

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर 


 3) जोड्या जुळवा.

      जिल्हा                निर्मिती

( अ ) लातूर       ( i ) 1 जुलै 1998 

( ब ) नंदुरबार    ( ii) 1 मे 1981 

( क ) हिंगोली    ( iii ) 16 ऑगस्ट 1982 

( ड ) सिंधुदुर्ग    ( iv ) 1 मे 1999


            ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )        iii      ii       i      iv

( 2 )        iii       i     iv       ii ✔️

( 3 )        iv       i      ii      iii

( 4 )        iii     iv       i       ii



4) योग्य जोड्या जुळवा.

                धरण                नदी 

( अ ) विल्सन बंधारा      ( i ) गोदावरी 

( ब ) विष्णुपुरी धरण।    ( ii ) येळवंडी 

( क ) भाटघर              ( iii ) मुठा 

( ड ) टेमघर                ( iv ) प्रवरा 


           ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )       ii      iii       i      iv

( 2 )       iv     iii       i      ii

( 3 )       iv      i       ii      iii✔️

( 4 )        i      iv      ii      iii 



5) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) आम्लीय मातीमध्ये कॅल्शियम , मॅग्नेशियमचे प्रमाण कमी व हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते.

( ब ) आम्लीय मातीमध्ये सुधारणा करण्यासाठी जिप्समचा वापर केला जातो.


( 1 ) फक्त अ बरोबर ✔️

( 2 ) फक्त ब बरोबर 

( 3 ) दोन्ही बरोबर 

( 4 ) दोन्ही चूक 


6) खालील शिखरांचा उंचीनुसार चढ़ता क्रम लावा.

( अ ) त्र्यंबकेश्वर 

( ब ) हरिश्चंद्रगड 

( क ) महाबळेश्वर 

( ड ) सप्तशृंगी 

( इ ) राजगड


( 1 ) अ , इ , ड , ब , क ✔️

( 2 ) इ . अ , ड , क , ब 

( 3 ) अ , ड , इ , ब , क 

( 4 ) ड , अ , इ . ब , क  


7) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) लोकसंख्येच्या घनतेबाबत महाराष्ट्र भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

( ब ) महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.


( 1 ) दोन्ही विधाने बरोबर

( 2 ) दोन्ही चूक

( 3 ) फक्त अ बरोबर 

( 4 ) फक्त ब बरोबर ✔️


8) खालील वैशिष्ट्यांवरून वनांचा प्रकार ओळखा.

( अ ) या वनांना 'अल्लापल्ली' असेही म्हणतात.

( ब ) प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर भागात आढळतात.

( क ) आईन , किंडल , आवळा ही वृक्षे आढळतात.


( 1 ) उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने ✔️

( 2 ) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने 

( 3 ) उष्ण कटिबंधीय काटेरी वने 

( 4 ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने


 9) खालीलपैकी कोणत्या नद्या महाबळेश्वर येथून उगम पावतात ? 

( अ ) कृष्णा 

( ब ) सावित्री 

( क ) वेण्णा 

( ड ) गायत्री 

( इ ) कोयना 


( 1 ) अ , इ 

( 2 ) अ , क , इ

( 3 ) अ , ब , ड , इ 

( 4 ) वरीलपैकी सर्व✔️


10) जोड्या जुळवा.

      अभयारण्ये                   जिल्हा

( अ ) तुंगारेश्वर           ( i ) यवतमाळ 

( ब ) टिपेश्वर             ( ii ) रायगड 

( क ) नरनाळा          ( iii ) पालघर

( ड ) कर्नाळा           ( iv ) अकोला 


             ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )         i       iii      ii      iv

( 2 )        iii       i       ii      iv

( 3 )        iii       i      iv       ii✔️

( 4 )        iv      iii      i        ii


1) आसियानसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.

( 1 ) आसियानचे 10 सदस्य देश आहेत .✔️ 

( 2 ) तिचे बोधवाक्य वन व्हिजन वन आयडेंटीटी वन कम्युनिटी ' आहे.

( 3 ) तिची स्थापना 1967 ला बैंकॉक जाहीरनाम्याने झाली,

( 4 ) सर्व विधाने बरोबर 


2) प्रवास आणि पर्यटन निर्देशांक ----- मार्फत जाहीर केला जातो.

( 1 ) डब्ल्यू इ.एफ.✔️

( 2 ) आयएमएफ 

( 3 ) वर्ल्ड बँक 

( 4 ) संयुक्त राष्ट्र 


3) वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक ------- प्रसिद्ध करते.

( 1 ) आयएमएफ✔️

( 2 ) यूएन

( 3 ) वर्ल्ड बैंक 

( 4 ) डब्ल्यूईएफ 


4) माराकेश करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.

( अ ) त्याचा संबंध दृष्टीहीन व्यक्तीशी व त्यांच्याशी संबंधित स्वामित्व हक्काच्या गोष्टी जसे की पुस्तक यासारख्या गोष्टींशी संबंधित आहे.

( ब ) भारत हा करार स्वीकारणारा प्रथम देश आहे. योग्य विधान / ने निवडा.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब

( 3 ) अ , ब दोन्ही✔️

( 4 ) यापैकी नाही.


5) गॅट्स् करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.

( अ ) क्रॉस - बॉर्डर पुरवठा : एका सदस्यांच्या प्रदेशातून दुसऱ्या सदस्यांच्या प्रांतात असलेला सेवा प्रवाह 

( ब ) परदेशात होणारी सेवा : एखादा ग्राहक सेवा घेण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या प्रदेशात जातो.

( क ) व्यावसायिक उपस्थिती : एखाद्या सदस्याचा सेवा पुरवठादार क्षेत्रीय उपस्थिती स्थापित करतो.

( ड ) नैसर्गिक व्यक्तीची उपस्थिती : सेवेच्या पुरवठ्यासाठी एका सदस्याची व्यक्ती दुसऱ्या सदस्याच्या क्षेत्रात प्रवेश करते. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा. 


( 1 ) अ , ब 

( 2 ) ब , क 

( 3 ) अ , ब , क 

( 4 ) वरीलपैकी सर्व✔️


6) खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान / ने निवडा.

( अ ) फेरा कायदा 1973 मध्ये पहिल्यांदा संमत केला.

( ब ) भारत सरकारने फेरा कायदा फेमा कायद्याने बदलला.


( 1 ) फक्त अ

( 2 ) फक्त ब ✔️

( 3 ) अ , ब दोन्ही 

( 4 ) यापैकी नाही.


7) कृषी अनुदानासंबंधी खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान / ने ओळखा.

( अ ) ब्ल्यू बॉक्स : - प्रत्यक्षात व्यापारावर काहीही परिणाम होत नाही,

( ब ) अॅम्बर बॉक्स : - व्यापारावर सर्वात जास्त परिणाम करतात.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब

( 3 ) अ , ब दोन्ही

( 4 ) यापैकी नाही✔️


8) भौगोलिक निर्देशांकासंबंधी खालील विधाने पहा व योग्य विधान / ने निवडा.

( अ ) एखाद्या वस्तूची विशिष्ट ठिकाणामुळे असणारी खासियत भौगोलिक निर्देशांक दर्शवितो.

( ब ) ओदिशाला अलिकडेच रसगुल्ल्यांसाठी भौगोलिक निर्देशांक मिळाला.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब 

( 3 ) अ , ब दोन्ही ✔️

( 4 ) यापैकी नाही.


9) भारतातील उदारीकरणाच्या परिणामांसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने निवडा.

( अ ) कर कमी झाले.

( ब ) बाजार नियंत्रणमुक्त झाला.

( क ) गुंतवणुकदारास राजकीय गोष्टींचा धोका कमी झाला.


( 1 ) अ , ब 

( 2 ) ब , क

( 3 ) अ , क 

( 4 ) अ , ब , क ✔️


10) डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली ?

( 1 ) 15 एप्रिल 1993 

( 2 ) 15 जुलै 1993

( 3 ) 15 एप्रिल 1994✔️

( 4 ) 15 जुलै 1994


🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.


१) मोद्रिक धोरण.

२)राजकोषीय धोरण ✔️✔️

३)द्रव्य निर्मिती 

४) चलनविषयक धोरण

_____________________________


🟠 सटेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे. 

१) लोखंड व कार्बन

२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️

३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट

४) लोखंड टीन व कार्बन

_____________________________


🟡 गरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

 

१)छोटा नागपूर

२)अरवली ✔️✔️

३) मालवा

४) विध्य

_____________________________


🟢  खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.

१) कांगारू 

२) पेग्विन

३) व्हेल

४) प्लॅटिपस ✔️✔️

_____________________________


🔵 पचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे 

१)दुसरे

२)पाचवे

३)सातवे

४)नववे ✔️✔️

_____________________________

🟣  रक्तगटाचा शोध कोणी लावला

 

१) लॅडस्टयनर ✔️✔️

२)फुन्क

३)स्टेड

४)विल्यम हार्वे

_____________________________


⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते

१)पारा 

२) चांदी

३) पाणी ✔️✔️

४) लोखंड

_____________________________

🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.


१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी  ✔️✔️

२) लोकमान्य टिळक

३) न्यायमूर्ती रानडे

४)म.गांधी

_____________________________


🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो

१)ग्लुकोज

२) लक्टोज

३)रेनिन

४)केसिन ✔️✔️

_____________________________


🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.

१)सी -१४  ✔️✔️

२) सी -१३

३) सी -१२

४) यापैकी एकही नाही


 1) खालीलपैकी कोणत्या घटकाकडून प्रथिनांचे अमिनो आम्लात पचन होते ? 

( 1 ) अमायलेज 

( 2 ) ट्रिप्सिन ✔️

( 3 ) लायपेज पेप्सीन 

( 4 ) पेप्सीन


2) पियूषिका ग्रंथीसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.

( 1 ) पियूषिका ग्रंथी ‘ मास्टर ग्रंथी ' म्हणून ओळखली जाते.

( 2 ) ही सर्वांत लहान अंतःस्रावी ग्रंथी आहे.

( 3 ) ही ग्रंथी मेंदूमध्ये वसलेली असते.

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर ✔️


3) खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाला वार्धक्यविरोधी जीवनसत्त्व म्हणतात ? 

( 1 ) लॅक्टिक अॅसिड 

( 2 ) अॅस्कॉर्बिक ✔️

( 3 ) फॉर्मिक अॅसिड 

( 4 ) इथेनॉल 


4) खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसँकेराईड आहे ? 

( 1 ) ग्लुकोज 

( 2 ) फ्रुक्टोज 

( 3 ) सुक्रोज ✔️

( 4 ) सेल्युलोज 


5) मानवी शरीरात जवळजवळ किती की.मी लांबीच्या रक्तवाहिन्या असतात ?

( 1 ) 10000 

( 2 ) 97000✔️

( 3 ) 98500

( 4 ) 98000


6) पेशींमधील ------ पेशीचे ऊर्जाकेंद्र म्हणतात. 

( 1 ) हरितलवक 

( 2 ) तंतूकणिका✔️

( 3 ) रायबोझोम्स  

( 4 ) लयकारिका


7) खालीलपैकी कोणती ग्रंथी सर्वांत मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे ? 

( 1 ) कंठग्रंथी ✔️

( 2 ) पियूषिका ग्रंथी 

( 3 ) लाळग्रंथी  

( 4 ) यकृत 


8) प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतींमधील कोणत्या भागात होते ? 

( 1 ) पाने

( 2 ) हिरवी खोडे 

( 3 ) थोड्या प्रमाणांत फुलांमध्ये 

( 4 ) वरीलपैकी सर्व ✔️


9) भारतीय आहारात व्हिटॅमिन - ए मुख्यत्वे ----- पासून मिळते.

( 1 ) फायटिन 

( 2 ) टँनिन

( 3 ) ऑक्सिटोसिन 

( 4 ) कँरोटीन ✔️


10) उत्क्रांतवादी दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणता प्राणी माणसाशी साधर्म्य साधतो ? 

( 1 ) डॉल्फीन ✔️

( 2 ) उडणारा मासा 

( 3 ) शार्क 

( 4 ) कासव




समाजसुधारक

◀️◀️समाजसुधारक ▶️▶️
♦️१८६५- न्या. रानडे -पुनर्विवाह उत्तेजक मंडळी 
♦️१८७४ - विष्णू शास्त्री पंडित कुसाबाईशी पुनर्विवाह केला
♦️१८९३ - महर्षी धोंडो केशव कर्वे गोदुबाई शी पुनर्विवाह केला 
♦️१८८९- पंडिता रमाबाई शारदा सदन (मुंबई)
♦️ १८९९ - महर्षी धोंडो केशव कर्वे अनाथ बालिका आश्रम 
♦️१९०१ - शाहू महाराज विक्टोरिया मराठा बोर्डींग
♦️१९१० - हृदयनाथ कुंझर सेवा समिती 
♦️१९१० - महर्षी धोंडो केशव कर्वे निष्काम कर्ममठ
♦️१९१८ - शाहू महाराज आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा  
♦️१९२१ - विनोबा भावे पवनार आश्रम
♦️ १९२३ - वि. रा. शिंदे अहिल्याश्रम

भारत सरकार कायदा, 1935 मधील भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेल्या प्रमुख तरतुदी



१) संघराज्यीय योजना (Federal Scheme)

⭐️ केंद्र व प्रांतांमधील अधिकारांची स्पष्ट विभागणी.

⭐️ भारतात संघराज्याचे (Federal) तत्त्व याच कायद्यातून स्वीकारले गेले.


२) अधिकारांची विभागणी (Division of Powers)

⭐️ तीन सूचींची व्यवस्था : फेडरल, प्रांतीय, समवर्ती.

⭐️ भारतीय संविधानात त्या अनुक्रमे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची म्हणून स्वीकारल्या.

 ⭐️1935 च्या केंद्रीकरणाच्या अनुभवावरून नव्या संविधानात अधिक संतुलित केंद्र-राज्य संबंध रचले गेले.


३) विधानमंडळ व कार्यपालिका यांचे विभाजन

  ⭐️Legislature आणि Executive स्वतंत्र ठेवण्याचे तत्त्व.

⭐️ मात्र 1935 च्या कायद्यात Governor-General कडे अत्यधिक अधिकार होते.


४) राज्यपालाचे पद (Office of Governor)

⭐️ राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालाची संकल्पना.

⭐️ या पदाचे स्वरूप जवळजवळ तसेच भारतीय संविधानाने स्वीकारले.


५) न्यायव्यवस्था (Judiciary)

  ⭐️1937 मध्ये फेडरल कोर्ट स्थापन.

  ⭐️ हाच ढाचा पुढे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्मितीचा आधार.


६) लोकसेवा आयोगे (Public Service Commissions)

⭐️ फेडरल PSC → UPSC

⭐️ प्रांतीय PSC → राज्य लोकसेवा आयोग

⭐️ सार्वजनिक सेवांची निवड व संघटनासाठी स्वतंत्र आयोगांची परंपरा.


७) आणीबाणीच्या तरतुदी (Emergency Provisions)

⭐️ राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याची तरतूद.

⭐️ भारतीय संविधानातही अशाच प्रकारच्या आपत्कालीन तरतुदी समाविष्ट.


८) प्रशासकीय ढाचा (Administrative Details)

⭐️ भारतीय प्रशासनाची रचना, विभागांची मांडणी, अधिकारपद्धती — मोठ्या प्रमाणात 1935 च्या कायद्यावर आधारित.

⭐️ प्रांतांच्या प्रशासनासाठी स्पष्ट कार्यपद्धती.