विकसन संस्था
➤ MPI हा ऑक्सफर्ड पोवर्टी अँड ह्यूमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) या संस्थेने विकसित केला.
प्रकाशन व मोजमाप
➤ 2010 पासून UNDP (United Nations Development Programme) ने OPHI च्या सहकार्याने MPI मोजणे व प्रकाशित करणे सुरू केले.
MPI मोजण्यामागील उद्देश
➤ दारिद्र्य केवळ उत्पन्नावर मोजले जाऊ नये, तर जीवनातील विविध मूलभूत पैलूंचा विचार केला जावा.
➤ शिक्षण, आरोग्य व जीवनमान या तीन प्रमुख परिमाणांवर आधारित मापन.
मुख्य परिमाणे (Dimensions)
✅️ शिक्षण (Education)
➤ कुटुंबातील प्रौढ शिक्षणाचा स्तर
➤ मुलांचे शालेय उपस्थितीचे प्रमाण
✅️ आरोग्य (Health)
➤ बालमृत्यू दर
➤ पोषण स्थिती
✅️ जीवनमान (Living Standards)
➤ स्वच्छ स्वयंपाक इंधनाची उपलब्धता
➤ स्वच्छ पाणी व स्वच्छतागृह
➤ वीजपुरवठा
➤ घरातील रहिवासी स्थिती
➤ मालमत्तेची उपलब्धता
मोजण्याची पद्धत
➤ एखाद्या व्यक्ती/कुटुंबाला बहुआयामी गरीब मानले जाते, जर ते किमान 33% निर्देशकांमध्ये वंचित असतील.
No comments:
Post a Comment