♦️स्थापना व रचना
🔹️ कलम 263 नुसार, राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रपती आंतरराज्य परिषद नियुक्त करू शकतात.
🔹️ आंतर-राज्य परिषद 28 मे, 1990 रोजी स्थापन झाली.
🔹️ परिषदेची पुनर्रचना 11 नोव्हेंबर, 1999 रोजी करण्यात आली.
♦️अध्यक्ष व सदस्य
🔹️ पंतप्रधान हे आंतर-राज्य परिषदेचे अध्यक्ष असतात.
🔹️ सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे परिषदेचे सदस्य असतात.
♦️बैठका व कार्यपद्धती
🔹️ आंतर-राज्य परिषदेच्या बैठका पडद्याआड (गुप्तरित्या) घेतल्या जातात.
🔹️ परिषदेत विचारार्थ येणारे मुद्दे सहमतिने सोडवले जातात.
♦️कार्यक्षेत्र
🔹️ राज्या-राज्यांतील तंटे – उद्भवलेल्या तंट्यांबाबत चौकशी करणे व सल्ला देणे.
🔹️ समाईक हितसंबंधांचे विषय –
• राज्यांपैकी सर्व, काही किंवा संघराज्य व एक/अधिक राज्ये यांच्या सामाईक हिताशी संबंधित विषयांवर अन्वेषण व चर्चा करणे.
🔹️ धोरण समन्वय व शिफारशी –
• अशा कोणत्याही विषयावर शिफारशी करणे.
• विशेषतः धोरणे व कारवाई यांचा अधिक चांगला समन्वय साधण्यासाठी शिफारशी करणे.
No comments:
Post a Comment