22 October 2025

महत्वाचे कंप (Sound & Vibration – Key Points) 🎵


🔹️ ध्वनीची निर्मिती वस्तूच्या कंपनामुळे होते. प्रत्येक ध्वनीचे मूळ कुठल्या तरी कंप पावणाऱ्या वस्तूमध्ये असते.


🔹️ ध्वनीचे प्रसारण अनुतरंगाच्या रूपात (Longitudinal Waves) होते.


🔹️ ध्वनीच्या प्रसारणासाठी स्थायू, द्रव किंवा वायू माध्यमाची आवश्यकता असते.


🔹️ ध्वनीचा वेग स्थायू माध्यमात द्रव व वायू माध्यमापेक्षा जास्त असतो.


🔹️ जर १/१० सेकंदाच्या आत दोन ध्वनी आपल्या कानावर पडले, तर त्यांचे स्वतंत्र ज्ञान होत नाही.


🔹️ ध्वनीच्या हवेतील वेगावर तापमान, आर्द्रता व वारा परिणाम करतात.


🔹️ हवेचे तापमान १°C ने वाढविल्यास, ध्वनीचा वेग ०.६ m/s ने वाढतो.


🔹️ दमट हवेत ध्वनीचा वेग कोरड्या हवेपेक्षा जास्त असतो.


🔹️ ध्वनीचा परिणामी वेग = ध्वनीचा वेग + वाऱ्याच्या वेगाची सदिश बेरीज.


🔹️ चंद्रावर माध्यम नसल्यामुळे ध्वनी ऐकू येत नाही.


🔹️ ध्वनीचा वेग प्रकाशापेक्षा कमी असल्यामुळे वीज चमकल्यानंतर ढगांचा गडगडाट थोड्या वेळाने ऐकू येतो.


🔹️ प्रत्यक्ष ध्वनी ऐकल्यानंतर १/१० सेकंदाने प्रतिध्वनी आला, तरच तो स्वतंत्रपणे ऐकला जातो.


🔹️ प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तक पृष्ठभागाचे अंतर ≥ 17 m असले पाहिजे.


🔹️ वटवाघूळ अंधारात उडण्यासाठी प्रतिध्वनी तत्वाचा उपयोग करते.


🔹️ SONAR (Sound Navigation and Ranging) तत्त्वाने पाण्याची खोली मोजता येते.


🔹️ ध्वनीचा द्रव माध्यमातील वेग > वायू माध्यमातील वेग.


🔹️ निर्वातात ध्वनीचे प्रसारण होत नाही.


🔹️ ०°C तापमानास, हवेतील ध्वनीचा वेग ३३२ m/s असतो.


🔹️ ध्वनीचे परावर्तन प्रकाशाप्रमाणे होते, पण त्यासाठी विस्तृत परावर्तक पृष्ठभाग आवश्यक असतो.


🔹️ ध्वनी एखाद्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन पुन्हा ऐकू येतो.

No comments:

Post a Comment