22 October 2025

समुद्रतळ प्रसार सिद्धांत (Sea Floor Spreading Theory) : हेरी हेस🔸️



समुद्रतळाच्या अभ्यासातून पुढील काही बाबी उघडकीस आल्या :

🔹 समुद्रतळाच्या मध्यभागी Mid Oceanic Ridge जवळ सतत ज्वालामुखिचा उद्रेक होत असतो. त्यामुळे त्या भागात खूप मोठ्या प्रमाणात लाव्हा बाहेर फेकला जातो.


🔹 या मध्य महासागरी कटकाचे (Mid Oceanic Ridge) च्या दोन्ही बाजूस समान अंतरावर असलेल्या खडकांचे वय, रासायनिक घटक व चुंबकीय गुणधर्म सारखे असते. या भागापासून जसे जसे दूर जावे तसतसे खडकांचे वय वाढत जाते.


🔹 समुद्रतळावरील खडक हे खंडाच्या खडकांपेक्षा खूप कमी वयाचे आहेत.


🔹 समुद्रतळावर जमा झालेल्या गाळाची जाडी फार कमी आहे. शास्त्रज्ञांना असे अपेक्षित होते की जर समुद्र खंडाएवढे वयाचे असतील तर गाळाचे वय सुद्धा सारखेच असावे. परंतु कोणत्याच ठिकाणी समुद्रतळातील गाळाचे वय 200 दशलक्ष वर्षांपेक्षा अधिक नाही.


🔹 खोल गर्ता (Deep Trenches) मध्ये भूकंप नाभी (Earthquake focus) हे खोल असतात. तर मध्यसागरी कटकात (Mid Oceanic Ridge) भूकंपनाभी उथळ (Shallow) आहे.


👉 या पुराव्यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञ हेरी हेस यांनी 1961 मध्ये समुद्रतळ प्रसार (Sea Floor Spreading) सिद्धांत मांडले. त्यांनी सांगितले की Mid Oceanic Ridge जवळ सातत्याने ज्वालामुखी उद्रेक होऊन नवीन लाव्हारस बाहेर पडतो व समुद्रतळ तुटून एकमेकापासून दूर जाऊ लागतात. त्यामुळे समुद्रतळाचा प्रसार होतो.


परंतु यामुळे एका समुद्राचा आकार वाढून दुसऱ्या समुद्राचा आकार कमी होत नाही, तर जो समुद्रतळ ज्वालामुखिमुळे दूर ढकलला जातो, तो भाग समुद्री गर्ते मध्ये बुडून नाहीसा होतो.

No comments:

Post a Comment