Sunday 26 December 2021

गुंतवणुकीचे प्रकार.

१) कंपन्याचे भाग भांडवल

२) मुच्युअल फंडाचे वा युनिट ट्रस्टचे युनिट्स

३) बॅंकातील चालू वा बचत खाती किंवा मुदतीच्या ठेवी

४) पतपेढ्या, चिट फंड, क्रेडिट सोसायट्या यांतील ठेवी

५) भिशी योजना

६) शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या विमा योजना

७) पोस्ट खात्यातील विविध अल्पबचत योजना

८) राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना

९) प्रॉव्हिडंट फंड

१०) वैयक्तिक विमा योजना

११) सरकारने किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी बाजारात विक्रीसाठी आणलेले कर्जरोखे

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠म्युचुअल फंड.💠💠

🅾म्युचुअल फंड म्हणजे सहसा तज्ञ मंडळीकडून सांभाळल्या जाणाऱ्या अशा पैशांचा स्त्रोत जो की, एखाद्या गुंतवणूकदारांच्या समूहाकडून आलेला असतो.

🅾म्युचुअल फंडाचे प्रबंधक पुष्कळ गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करतात व तो विविध रोख्यांमधे जसे की, शेअर, रोखे बंध किंवा बाजारातील अन्य विकाल्पांमधे अथवा या सर्वांच्या मिश्र योजनेत गुंतवतात.

🅾यात फंडांचे गुंतवणुक उदिष्ट ठरलेले असते. संयुक्तरीत्या म्युचुअल फंडाकडून जो पैसा सांभाळला जातो त्यास सहसा खाते (पोर्टफ़ोलिओ) असे संबोधतात.

🅾प्रत्येक युनिटमध्ये गुंतवणूकदारांची समान मालकी असतेच, शिवाय जे उत्पन्न ही संपूर्ण रक्कम तयार करते त्यातही असते. म्युचुअल फंडांची त्यांच्या रचनेनुसार विभागणी होते.

🅾खुल्या योजना नेहमीच युनिटची विक्री व खरेदी करीत असतात. जेव्हा फंड विकतात तेव्हा  गुंतवणूकदार खरेदी करतात आणि जेव्हा गुंतवणूकदार पैसा काढतात, तेव्हा हे फंड पुन्हा युनिटची खरेदी करतात.

🅾खरेदी किंवा पैसे काढणे हे सर्व एकूण मालमत्तेच्या किमतीवर आधारीत असते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠म्युचुअल फंडांचे प्रकार.💠💠

🅾प्रत्येक म्युचुअल फंडाचे गुंतवणुकीचे एक पुर्वनिश्चित असे उद्दिष्ट असते. ज्यात त्या फंडाचे पैसे कुठल्या प्रकारच्या प्रकारात व कशा योजनांनी गुंतविले जाणार हे ठरले असते. म्युचुअल फंडाचे खालील प्रकार आहेत.

१) खुले फंड( open ended ) : अशा फंडांची कोणतीही परिपक्वता तारीख नसते.

🅾गुंतवणूकदार खुल्या फंडांचे युनिट खरेदी अथवा विक्री संपत्ति प्रबंधन करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयातून किंवा त्यांच्या गुंतवणूक सेवा केंद्रावरून किंवा शेअरबाजाराच्या माध्यमातून करू शकतात.

🅾खरेदी किंवा विक्री मूल्य हे नेहमी म्युचुअल फंडाच्या एकूण मालमत्ता किंमतीवर आधारित असते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠म्युचुअल फंडाची ठळक वैशिष्ठे .💠💠

🅾तज्ञांकडून व्यवस्थापन- पैसा हा नेहमी त्या फंडाच्या प्रबंधकाकडून गुंतविला जातो.

🅾विकेंद्रीकरण- विकेंद्रीकरण ही एक गुंतवणुकीची अशी युक्ती आहे ज्यामुळे संपूर्ण पैसा एकाच टोपलीत ठेवला जात नाही. जसे , सर्व अंडी एकाच पिशवीत असायला नकोतअसे म्हणतात !!

🅾म्युचुअल फंडाच्या माध्यमातून शेअरची मालकी घेतल्यामुळे स्वतःचे शेअर किंवा रोखेपत्र यांच्यातील जी जोखीम असते ती विभागली जाते.

🅾स्वस्त माध्यम- हे फंड एकाच वेळेस खूप शेअर्स विकत अथवा खरेदी करत असल्यामुळे जी काही व्यवहार किंमत असते, ती एखादया एकट्या व्यक्तीने केलेल्या व्यवहाराच्या तुलनेत अतिशय कमी येते .

🅾रोख उपलब्धता- जशे शेअर, म्युचुअल फंडाचे युनिट विकून लागलीच रोख रक्कम प्राप्त होऊ शकते.

🅾म्युचुअल फंडाचे युनिट घेणे सोपे आहे. पुष्कळ बॅंका त्यांचे स्वतःचे म्युचुअल फंड उपलब्ध करून देतात व  गुंतविण्याची रक्कम देखील लहान असते.

🅾गुंतवणूकदारांनी पैसा गुंतवण्यापूर्वी या सर्व बाबींचा नीट अभ्यास करूनच पैसे गुंतवायला हवेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠२) ठराविक काळात बंद होणारे फंड ( close ended ).💠💠

🅾हे फंड विशिष्ट कालावधीसाठीच चालतात.

🅾एका परिपक्वता तिथीला सर्व युनिटचे पैसे परत मिळतात व योजना बंद होते.

🅾याचे युनिट शेअरबाजारात नोंदणी होतात. जेणे करून रोख रक्कम पुरविता येणे सोपे होते.

🅾गुंतवणूकदार, याचे युनिट शेअर बाजारातील चढाव – उतारानुसार विकत घेऊ शकतात किंवा विकू शकतात.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠३) रोखेबंध फंड (BOND FUND).💠💠

🅾 एक स्थिर उत्पन्न देण्याचा प्रयत्न या प्रकारात होतो.

🅾गुंतवणूक ही सहसा शासकीय व वित्तीय ऋण पत्रात असते.

🅾जरी फंडाची किंमत वाढली तरी, ह्याचे मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणूकदारांना स्थिर पैसा पुरवणे हेच आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...