Thursday 28 November 2019

चीनकडून काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये उपस्थित.

चीनने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत काश्मीरचा प्रश्न उपस्थित करून हा तंटा संयुक्त राष्ट्र संहिता व सुरक्षा मंडळ ठराव तसेच द्विपक्षीय करारांच्या  मदतीने शांततामय मार्गाने सोडवावा, असा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानचा सर्वकालीन मित्र असलेल्या चीनने संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा प्रश्न उपस्थित करताना भारताने जम्मू काश्मीरच्या स्थितीत एकतर्फी बदल करू नयेत, असेही म्हटले आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी यांनी सांगितले,की काश्मीर प्रश्न हा भूतकाळातील काही घटनांमुळे मागे राहिलेला तंटा आहे. हा प्रश्न संयुक्त राष्ट्र संहिता, द्विपक्षीय करार व सुरक्षा मंडळाच्या ठरावांच्या आधारे सोडवावा.

जम्मू काश्मीरची स्थिती  बदलणारे कुठलेही निर्णय एकतर्फी घेण्यात येऊ नयेत. भारत व पाकिस्तान यांचा शेजारी देश म्हणून हा प्रश्न प्रभावी मार्गाने हाताळून दोन्ही देशातील संबंध सुरळित व्हावेत अशीच चीनची इच्छा आहे.

भारताने पाच ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरसाठीचा अनुच्छेद ३७० रद्द करून  विशेष दर्जा रद्द केला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 MAY 2024

1) राष्ट्रीय कागद विमान दिवस दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो. 2) व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट...