Thursday 14 November 2019

शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation)

🚦पार्श्वभूमी : चीन, कझाकस्तान, किर्गिझस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या देशांनी मिळून १९९६मध्ये ‘शांघाय–५’ या संघटनेची स्थापना केली होती.

🚦त्यानंतर १५ जून २००१ रोजी उझबेकिस्तान हा या संघटनेत सामील झाला. त्यानंतर संघटनेचे नाव ‘शांघाय सहकार्य संघटना’ (SCO) किंवा ‘शांघाय करार’ असे ठेवण्यात आले.

🚦युरोप आणि रशिया या दोन्ही खंडांतील देशांच्या सहभागाने बनलेली अशी ही (युरेशियन) राजकीय, आर्थिक आणि लष्करी संघटना होय.
           
🚦USSR च्या विघटनानंतर वॉर्सा करार रद्द झाला, त्यानंतर पश्चिमी गटाच्या नाटो या संघटनेला शह देण्यासाठीच शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना झाली.

🎯सदस्य :-

🚦वरील सहा देश अधिक भारत आणि पाकिस्तान या देशांनी जून २०१७ साली या संघटनेत सामील

🎯निरीक्षक सदस्य :-

🚦अफगाणिस्तान, बेलारूस, इराण आणि मंगोलिया  

🎯संवाद भागीदार देश :-

🚦अझरबैजान, कंबोडिया, नेपाळ, श्रीलंका आणि टर्की हे सहा देश

🎯निरीक्षक संघटना :-

🚦संयुक्त राष्ट्र आमसभा, युरोपियन युनियन, आशियान ही संघटना,  राष्ट्रकूल परिषद आणि इस्लामिक सहकार्य परिषद या संघटनांमध्ये शांघाय सहकार्य संघटनेला निरीक्षक म्हणून प्रवेश देण्यात आला आहे.

🚦एकत्रित लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या एकचतुर्थांश इतकी होते. 

🎯रचना :-

🚦राष्ट्रप्रमुखांची समिती ही निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे. शासकीय प्रमुखांची समिती ही निर्णय घेणारी दुसऱ्या क्रमांकाची समिती आहे.

🎯सचिवालय :- बिजिंग

🚦दहशतवादी, फुटीरतावादी आणि अतिरेक्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी शांघाय सहकार्य संघटनेने क्षेत्रीय दहशतवादविरोधी समिती निर्माण केली आहे. या समितीचे मुख्य कार्यालय ताश्कंद येथे आहे.

🚦एप्रिल २००६ साली क्षेत्रीय दहशतवादविरोधी समिती स्थापन.

🚦ऑक्टोबर २००७ मध्ये सामूहिक सुरक्षा संघटना स्थापन.

🚦एक लष्करी गट म्हणून काम करणार नसल्याचे या संघटनेने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार...!

➡️एनडीएच्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब 🔖यांचा आहे एनडीएत समावेश 🔴भाजप- २४० 🔴तेलुगु देशम - १६ 🔴संयुक्त जनता दल १२ 🔴शिवसेना - ...