Sunday 16 August 2020

अखेर रशियात करोना व्हायरसच्या लसीला मंजुरी, पुतिन यांनी मुलीला दिला लसीचा डोस



◾️रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने करोना व्हायरसच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. कुठल्याही सरकारच्या आरोग्य मंत्रालयाची मंजुरी मिळवणारी ही जगातील पहिली लस ठरली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या लसीची मंजुरी दिल्याची माहिती दिली. माझ्या मुलीला सुद्धा याच लसीचा डोस देण्यात आला असे पुतिन यांनी सांगितले. रॉयटर्सने हे वृत्त दिले आहे.

👮‍♀रशियाच्या गामालिया इंस्टिट्यूट ऑफ अ‍ॅपिडेमियोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीने ही लस विकसित केली आहे. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत या लसीच्या मानवी चाचण्या झाल्या आहेत. लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकता तपासण्यासाठी अंतिम फेजच्या क्लिनिकल चाचण्या सुरु राहणार असल्या तरी सर्वसामान्यांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

👮‍♀अमेरिका, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि फ्रान्स या देशांच्या आधी रशियाला करोना व्हायरसवरील लसीची निर्मिती करायची होती. त्या दृष्टीने रशियाकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. सप्टेंबर आणि ऑक्टोंबरपासून या लसीची निर्मिती करण्याचा रशियाचा मानस आहे. रशियात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अध्यक्षतेखाली लस निर्मितीबद्दल एक बैठक पार पडली होती. त्या बैठकीत रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन एकच गोष्ट म्हणाले होते कि, “करोना व्हायरसवर आपण जी लस बनवू, त्याबद्दल आपल्याला पूर्ण खात्री असली पाहिजे तसेच काळजीपूर्वक, संतुलन ठेवून आपल्याला करोनावर लसीची निर्मिती करायची आहे.”

No comments:

Post a Comment

Latest post

नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार...!

➡️एनडीएच्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब 🔖यांचा आहे एनडीएत समावेश 🔴भाजप- २४० 🔴तेलुगु देशम - १६ 🔴संयुक्त जनता दल १२ 🔴शिवसेना - ...