17 October 2025

पोलीस भरती सामान्य ज्ञान उपयुक्त प्रश्न


326) महाराष्ट्राच्या वायव्य सीमेवरून कोणती नदी वाहते?

उत्तर - नर्मदा 

327) मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर - नागपूर 

328) शेतीची अवजारे व ऑईल इंजिन्स यासाठी प्रसिद्ध असणारे किर्लोस्करवाडी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर - सांगली 

329) कोणते शहर पितळी भांडी बनवण्यात परंपरागत व्यवसायात प्रसिद्ध आहे?

उत्तर - भंडारा 

330) खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वाधिक समृध्द आहे?

उत्तर - विदर्भ 

331) महाराष्ट्रातील कोणता विभाग पूर्वी निजामाच्या राज्यात होता?

उत्तर - मराठवाडा 

332) समुद्रात खडकावर बांधलेला मुरूड- जंजिरा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात मोडतो?

उत्तर - रायगड 

333) महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या वने कोणती?

उत्तर - पानझडी वृक्षांची वने 

334) भिल्ल आदिवासी जमातीची लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे?

उत्तर - नंदुरबार 

335) पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे कोठे आढळतात?

उत्तर - विदर्भ 

336) कोकणात कोणती वने आढळतात?

उत्तर - उष्ण कटिबंधीय सदाहरित 

337) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल पुलामुळे कोणत्या राज्यात प्रवेश करता येतो?

उत्तर - गोवा 

338) जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते?

उत्तर - रत्नागिरी 

339) तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते?

उत्तर - भंडारा 

340) पूर्व महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील परंपरागत जलसिंचन तलावास काय म्हणतात?

उत्तर - मालगुझरी 

341) नायगांव अभयारण्य कशासाठी प्रसिध्द आहे?

उत्तर - मोर 

342) महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते?

उत्तर - डॉ.डी.वाय, पाटील स्टेडियम 

343) असोलामेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर - चंद्रपूर 

344) महाराष्ट्रातील कोणती नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते?

उत्तर - वैनगंगा 

345) अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते?

उत्तर - उत्तर महाराष्ट्र

346) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रफिकल मेटेओरॉलॉजी ही केंद्रीय संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर - पुणे 

347) समृद्धी एक्सप्रेस वे कोणत्या दोन शहरांना जोडतो?

उत्तर - नागपूर- मुंबई 

348) समृध्दी एक्सप्रेस वे ची लांबी किती किमी आहे?

उत्तर - 701 किमी

349) शक्ती पीठ महामार्ग कोणत्या दोन शहरांना जोडतो?

उत्तर - नागपूर- गोवा 

350) शक्ती पीठ महामार्ग ची लांबी किती किमी आहे?

उत्तर - 802 किमी

No comments:

Post a Comment