03 August 2025

भारतातील मृदेचे प्रकार


📌 १. लॅटेराइट माती

➤ क्षेत्र: २.४ लाख चौ.कि.मी.

➤ प्रमुख भाग: पूर्व व पश्चिम घाट, राजमहाल टेकड्या, नागपूर पठार, मेघालय

➤ वैशिष्ट्ये:

▸ उच्च तापमान आणि जोरदार पावसामुळे तयार होते

▸ सिलिका आणि चुना वाहून जातात; लोह व ॲल्युमिनियम हायड्रॉक्साइड शिल्लक राहतात

▸ नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम व सेंद्रिय पदार्थ कमी

▸ भात, चहा, कॉफी, रबर, सुपारीसाठी योग्य


📌 २. तांबडी किंवा पिवळी माती

➤ क्षेत्र: ३.५ लाख चौ.कि.मी.

➤ प्रमुख भाग: ओडिशा, छत्तीसगड, गंगेच्या दक्षिण भागात

➤ वैशिष्ट्ये:

▸ अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांमधून निर्माण

▸ लोह ऑक्साईडमुळे लाल रंग, ओलसर स्थितीत पिवळी

▸ पीएच: 6.6 ते 8.0

▸ जलधारण क्षमता कमी

▸ गहू, भात, डाळी, तंबाखू यासाठी योग्य


📌 ३. काळी माती (काळी कापूस माती)

➤ क्षेत्र: ४.४६ लाख चौ.कि.मी. (१४.२%)

➤ प्रमुख भाग: महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, दख्खन पठार

➤ वैशिष्ट्ये:

▸ बेसॉल्ट खडकांमधून तयार

▸ टिटॅनियम फेराइटमुळे काळा रंग

▸ जलधारण क्षमता अत्यधिक, भेगा पडतात

▸ स्वयंनांगरणी माती (cracking → aeration)

▸ कापूस, ऊस, सोयाबीन, ज्वारी यासाठी योग्य


📌 ४. वाळवंटी/शुष्क माती

➤ क्षेत्र: १.४२ लाख चौ.कि.मी. (४.३२%)

➤ प्रमुख भाग: पश्चिम राजस्थान, हरियाणा, दक्षिण पंजाब, पश्चिम गुजरात

➤ वैशिष्ट्ये:

▸ वाळूमय, सच्छिद्र

▸ नायट्रोजन, लोह, फॉस्फरस कमी

▸ वनस्पती कमी, सेंद्रिय घटक न्यून

▸ योग्य सिंचनाने गहू, ज्वारी, बार्लीसारखी पिके


📌 ५. खारवट व अल्कधर्मी माती

➤ क्षेत्र: पश्चिम उत्तर प्रदेश, गंगा-यमुना खोऱ्याचा भाग, पंजाब, हरियाणा

➤ वैशिष्ट्ये:

▸ अपुरा जलनिःस्सारण, कमी पावसामुळे तयार

▸ ‘रेह’, ‘उसर’, ‘कल्लर’ अशी नावे

▸ सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम लवण अधिक

▸ नायट्रोजन व कॅल्शियम कमी

▸ शेतीसाठी अयोग्य, पुनर्सुधार आवश्यक


📌 ६. दलदली/पिटमय माती

➤ क्षेत्र: २.४ लाख चौ.कि.मी.

➤ प्रमुख भाग: सुंदरबन, अलेप्पी, उत्तर बिहार, अलिबाग, तमिळनाडू

➤ वैशिष्ट्ये:

▸ जास्त पावसामुळे व आर्द्रतेमुळे तयार

▸ आम्लीय व सेंद्रिय घटक समृद्ध

▸ सेंद्रिय पदार्थांची साठवणूक अधिक

▸ भात, ऊस, नारळ लागवडीस उपयुक्त


📌 ७. वन व पर्वतीय माती

➤ क्षेत्र: २.८५ लाख चौ.कि.मी. (८.६८%)

➤ प्रमुख भाग: हिमालय व इतर डोंगराळ भाग

➤ वैशिष्ट्ये:

▸ अपरिपक्व व अल्प विकसित

▸ ह्युमस अधिक

▸ फॉस्फरस, चुन्याचे प्रमाण कमी

▸ जंगलांचे पीक व चहा, सफरचंद लागवडीस योग्य


📌 ८. गाळाची माती

➤ क्षेत्र: १५ लाख चौ.कि.मी. (४०%)

➤ प्रमुख भाग: गंगेचे मैदान, नर्मदा-तापी खोरे, किनारी प्रदेश

➤ वैशिष्ट्ये:

▸ नद्या व सागरी गाळातून निर्माण

▸ सुपीकता खूप जास्त

▸ पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस भरपूर

▸ ‘भाबर’ आणि ‘तराई’ स्वरूपात उपलब्ध

▸ विविध प्रकारची पिके (गहू, भात, ऊस, भाजीपाला)

No comments:

Post a Comment