08 October 2019

आरोग्यविम्याशिवाय अमेरिकेत प्रवेशबंदी

◾️ट्रम्प प्रशासन हे आरोग्यविमा आणि वैद्यकीय खर्च करण्यास सक्षम नसलेल्यांना अमेरिकाप्रवेशावर बंदी घालणार आहे.

◾️ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी याची माहिती दिली. ३ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

◾️ट्रम्प यांच्या घोषणेनुसार, जे अमेरिकी आरोग्यसेवेवर भार बनणार नसल्याची खात्री देऊ शकतील त्यांनाच व्हिसा वितरित करण्याच्या सूचना वकिलातीमधील अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहेत.

◾️अमेरिकेत प्रवेश करणाऱ्यांनी येथील आरोग्यसेवेवर भार टाकून अमेरिकी करदात्यांना त्रास देता कामा नये, असे ट्रम्प प्रशासनाद्वारे जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?
   1) निलिमा    2) नीलिमा   
   3) निलीमा    4) नीलीमा

उत्तर :- 2

2) मराठीत एकूण स्वर किती आहेत ?
   1) आठ    2) दहा     
  3) बारा      4) चौदा

उत्तर :- 3

3) ‘वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो’ यास काय म्हणतात ?

   1) बलाघात    2) सीमासंधी   
  3) सुरवली    4) व्यंजनव्दित्त
उत्तर :- 2

4) पुढीलपैकी कोणत्या नामांना धर्मीवाचक नामे असे म्हणतात.

   अ) भाववाचक नामे  ब) विशेषनामे   
   क) सामान्यनामे    ड) पदार्थवाचक नामे

   1) फक्त अ    2) फक्त ब व क    3) वरील सर्व    4) फक्त अ व ब
उत्तर :- 2

5) ‘कोण’, ‘काय’ ही सर्वनामे खालील कोणत्या प्रकारात येतात ?

   1) प्रश्नार्थक व अनिश्चित    2) दर्शक व संबंधी
   3) पुरुषवाचक व अनिश्चित  4) दर्शक व प्रश्नार्थक

उत्तर :- 1

6) ‘उपाहार’ या शब्दाचा अचूक अर्थ शोधून लिहा.
   1) भेट      2) अधिक आहार     
   3) हॉटेल    4) फराळ

उत्तर :- 4

7)’आग्रही’ याच्या विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?

   1) विग्रही    2) दुराग्रही   
   3) ग्रहविरहीत    4) अनाग्रही

उत्तर :- 4

8) ‘धोक्याची कामे करायला कोणी पुढे येत नाही’ या अर्थाची म्हण –

   1) ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी      2) दाम करी काम
   3) मांजराच्या गळयात घंटा कोणी बांधायची      4) गर्जेल तो पडेल काय ?

   उत्तर :- 3

9) इरेला पेटणे : या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ ओळखा.

   1) चूल पेटविणे    2) चुरस वाटणे   
   3) जोरात धावणे    4) विस्तव पेटविणे

उत्तर :- 2

10) दिलेल्या शब्दसमूहासाठी पर्यायी शब्द निवडा : पाण्यातील कचरा.

   1) पाणिवळ    2) पातवडी   
   3) पाणसळ    4) पाणलोट

उत्तर :- 1

महत्त्वाचे प्रश्नसंच 8/10/2019

➡️ भारतरत्न मिळवणारी पहिली महिला?

👉 इंदिरा गांधी

➡️  WHOकशाशी संबंधित आहे ?

👉 जागतिक आरोग्य संघटना

➡️ घटना समितीचे अध्यक्ष कोण?

👉 डॉक्टर राजेंद्र प्रसाद

➡️ विदेशातून पदवी घेणारे  पहिली महिला डॉक्टर कोण?

👉 डॉक्टर आनंदीबाई जोशी

➡️ कोणत्या पुरस्काराला आशियाई नोबेल म्हणून नोबेल म्हणून संबोधतात? साहित्य अकादेमी
👉 रमन मगसेसे

➡️ घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण?

👉 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

➡️ महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता?
👉 सिंधुदुर्ग

➡️ बासरी वादन कोणाला मानाचा दर्जा दिला जातो?
👉 पंडित हरिप्रसाद चौरसिया

➡️ रजाकार ही संघटना कोणत्या संस्थांशी संबंधित आहे?

👉 हैदराबाद

➡️ भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण?

👉 सुलोचना कृपलानी

➡️ सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?

👉 भारतरत्न

➡️ अमेरिकेतील गदर पक्षाचे संस्थापक कोण?
 
👉लाला हरदयाल

➡️ राष्ट्रीय सभेच्या पहिली महिला अध्यक्ष कोण?
👉 डॉक्टर ॲनी बेझंट

➡️ हरिवंश राय बच्चन यांची गाजलेली साहित्यकृती कोणती?

👉 मधूशाळा

पोलीस भरती प्रश्नसंच

1) डॉ. हर्बर्ट क्लेबर कोण होते?
उत्तर : मानसशास्त्रज्ञ

2) ‘जागतिक हिंदू आर्थिक मंच 2019’ची बैठक कुठे झाली?
उत्तर : महाराष्ट्र

3) आंतरराष्ट्रीय वृद्ध दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 1 ऑक्टोबर

4) औद्योगिक उत्पादन विषयक निर्देशांकाची गणना व प्रकाशन कोणती संस्था करते?
उत्तर : केंद्रीय सांख्यिकी संस्था (CSO)

5) “चॅलेंजर टेनिस स्पर्धा” किंवा “ATP चॅलेंज टूर” स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली?
उत्तर : सुमित नागल

6) ‘सुलतान जोहोर चषक’ ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर : हॉकी

7) जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला भालाफेकपटू कोण आहे?
उत्तर : अन्नू राणी

8) राष्ट्रध्वजातील पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याच्या मध्यभागी एकूण किती आरे आहेत?
उत्तर : 24 

9) भारतीय संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर : डॉ. राजेंद्रप्रसाद

10) भारतात किती भाषांना अधिकृत मान्यता देण्यात आली आहे?
उत्तर : 22

वैद्यकीय नोबल यंदा विल्यम केलीन, पिटर रॅटक्लिफ,जॉर्ज सेमेन्झा यांना

●  वैद्यकीय संशोधनासाठीचा जगातील सर्वाधिक मानाचा नोबल पुरस्कार विल्यम केलीन (ज्यनियर), सर पिटर जे. रॅटक्लिफ आणि जॉर्ज एल सेमेन्झा यांना घोषीत करण्यात आला आहे.

●  उपलब्ध ऑक्सिजनमधून पेशी तो कसा मिळवतात, याबाबत त्यांनी केलेल्या संशोधनाचा सन्मान करण्यात आला.

● ऑक्सीजनच्या पातळीला प्रतिसाद देताना ती नियमित करण्यातील गुणसुत्रांचे कार्य त्यांनी सिध्द केले.

★ पुरस्काराचे स्वरुप

● साडेचार कोटी रुपये, २०० ग्रॅम सोन्याचे पदक आणि प्रशस्तीपत्रक असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

● पदकाच्या एका बाजूला नोबेल पुरस्कारचे जनक आल्फ्रेड नोबेल यांचे छायाचित्र, त्यांच्या जन्म आणि मृत्यूची तारीख लिहिलेली असते.

● तर पदकाच्या दुसऱ्या बाजूला युनानी देवी आइसिसचे चित्र आणि पुरस्कारार्थींची माहिती असते.

★ वितरण

● १९०१ ते २०१८ या कालावधीत वैद्यकीय क्षेत्रातील २१६ व्यक्तींना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

● २१६ व्यक्तींपैकी आतापर्यंत १२ महिलांना पुरस्कार देण्यात आला आहे. २००९ साली दोन महिलांना हा पुरस्कार देण्यात आला.

भारताची राज्यघटना प्रश्नसंच ८/10/2019

1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
१. महात्मा गांधी
२. मानवेंद्र नाथ रॉय✅
३. डॉ बाबासाहेब आंबेडकर
४. जवाहरलाल नेहरू

2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?
१. डॉ राजेंद्र प्रसाद
२. एच सी मुखर्जी
३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅
४. पं मोतीलाल नेहरू

3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?
१. एच सी मुखर्जी
२. के एम मुन्शी
३. वल्लभभाई पटेल
४. जे बी कृपलानी✅

4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.
१. कलम न 1✅
२. कलम न 2
३. कलम न 3
४. कलम न 4

5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?
१. यु एस ए
२. जपान
३.जर्मनी
४. ब्रिटिश✅

6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?
१. बी एन राव
२. जवाहरलाल नेहरू
३. के एम मुन्शी
४. एच सी मुखर्जी✅

7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.
१. २२ जुलै १९४७✅
२. १७ नोव्हेंबर १९४७
३. २४ जानेवारी १९५०
४. ४ नोव्हेंबर१९४८

8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?
१. डॉ बाबासाहेब आंबेडकर
२. पं मोतीलाल नेहरू
३. डॉ राजेंद्र प्रसाद
४. जवाहरलाल नेहरू✅

9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.
१. २६/०१/१९५०✅
२. २६/११/१९४९
३. २६/०८/१९४७
४. ०४/११/१९४८

10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?
१. डॉ के एम मुन्शी
२. एन गोपालस्वामी अय्यंगार
३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
४. बी एन राव✅

भूगोल प्रश्नसंच 8/10/2019

1) खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व  पीके ही ‘दिवस तटस्थ पीके (डे न्युट्ल क्रॉप)’ आहेत
   अ) मका, भात, वाटाणा    ब) गहू, रताळी, भात
   क) वाटाण, कपाशी, गहू    ड) टोमॅटो, वाटाणा, कपाशी
   1) अ व ड    2) ब आणि क    3) कव अ    4) ड फक्त
उत्तर :- 4

2) खालीलपैकी कोणत्या घटकाचा वनस्पतीच्या प्रकाशसंश्लेषण, वाढ व उत्पन्न यासाठी उपयोगी ठरणा-या वित्तंचक निर्मितीवर
     होतो ?
   1) वा-याचा वेग    2) पालाश   
   3) सूर्यप्रकाश    4) पाण्याचे रेणू
उत्तर :- 3

3) खालीलपैकी कोणते जैविकखत नाही ?
   1) जीवाणू खत    2) शैवाल खत   
   3) हरीत शेणखत    4) वरील सर्व
उत्तर :- 3

4) खालीलपैकी कोणता खतप्रकार हा नियंत्रित स्वरुपात विरघळणा-या खताच्या गटात मोडत नाही ?
   1) आइबीडीयु     2) सीडीयु   
   3) एमडीयु    4) वरीलपैकी एकही नाही
उत्तर :- 4

5) बियांमधील तेलांचे प्रमाण, फळांमधील व्हिटॅमिन ‘सी’ चे प्रमाण आणि फळांचा रंग वृध्दिगत करणारे पोषण द्रव्य .................
   1) लोह    2) चुना      3) पालाश    4) स्फुरद
उत्तर :- 3

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? ब्लॅक बॉक्स महत्त्वाचा का असतो?


मुंबईतील घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात चार्टर्ड विमान कोसळलं. दुर्घटनेनंतर बचाव दलाला विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला. प्रत्येक विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्सची चर्चा होते. पण हा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय, तो नेमका कसा असतो, त्याचं महत्त्व काय हे जाणून घेऊया.

▪️ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणं अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे विमानाचं फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात.एका उपकरणामध्ये कॉरपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीच मोजमाप होतं.

▪️ब्लॅक बॉक्सची वैशिष्ट्ये:

नावानुसार याचा रंगही काळा असेल, असं वाटत असेल तर ते चुकीचं आहे. कारण ब्लॅक बॉक्सचा रंग नारिंगी असतो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या मागील भागात बसवलेला असतो, कारण दुर्घटनेच्या परिस्थितीत हा भाग सर्वात सुरक्षित समजला जातो.

▪️अपघाताचे कारण जाणण्यासाठी उपयुक्त

ब्लॅक बॉक्स अनेक चाचण्यांमधून जातो. उदाहरणार्थ ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर 'एल-3 एफए 2100' 1110 अंश सेल्सिअस आगीत अनेक तास आणि 260 डिग्री सेल्सिअस तापमानात 10 तास राहू शकतो. इतकंच नाही तर मायनस 55 पासून प्लस 70 अंश सेल्सिअस तापमानातही ब्लॅक बॉक्स काम करतो.विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो.

▪️ब्लॅक बॉक्स लावणारा ऑस्ट्रेलिया पहिला देश

विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिला देश होता. 1960 मध्ये ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा विमानात ब्लॅक बॉक्स लावला होता. भारतात  नागरी उड्डाण संचलनालयाने 1 जानेवारी, 2005 पासून सर्व विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये सीव्हीआर आणि एफडीआर लावणं अनिवार्य केलं.

▪️ब्लॅक बॉक्सचा शोध कोणी लावला?

ऑस्ट्रेलियाचे शास्त्रज्ञ डेव्हिड वॉरेन यांनी 1950 च्या दशकात ब्लॅक बॉक्सचा शोध लावला होता. मेलबर्नच्या वैमानिक संशोधन प्रयोगशाळेत काम करत होते. त्यावेळी कमर्शिअल एअरक्राफ्ट 'कॉमेट'चा अपघात झाला होता. या अपघाताचा तपास करणाऱ्या पथकात त्यांचा समोवश होता. विमान दुर्घटना होण्याआधीच्या घडामोडी रेकॉर्ड करता येईल का असा विचार करुन त्यांनी फ्लाईट डेटा रेकॉर्डरवर काम करायला सुरुवात केली आणि त्यानंतर ब्लॅक बॉक्सचा शोध लागला. क्वीन्सलॅण्डमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर ऑस्ट्रेलिया जगातील पहिला असा देश होता, ज्याने कमर्शिअल विमानात ब्लॅक बॉक्स लावणं अनिवार्य केलं होतं.

07 October 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) योग्य तो पर्याय निवडून खालील म्हण पूर्ण करा.
     शहाण्याला .................. मार.

   1) काठीचा    2) हंटरचा   
   3) चाबकाचा    4) शब्दांचा

उत्तर :- 4

2) ‘अतिशय गर्व होणे’ या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

   1) दोडक्यावानी फुगणे    2) दोन बोटे स्वर्ग उरणे
   3) दोन हात करणे    4) दगडाखालून हात काढून घेणे

उत्तर :- 2

3) अनेक गोष्टीत एकाचवेळी लक्ष देणा-यास ....................... म्हणतात.

   1) कामसू    2) अष्टावधानी   
   3) कार्यरत    4) चौकस

उत्तर :- 2

4) खालील पर्यायी उत्तरातील शुध्द पर्यायी शब्द सांगा.

   1) अग्नीहोत्री    2) अग्निहोत्री   
   3) आग्नीहोत्री    4) आग्निहोत्री

उत्तर :- 2

5) संयुक्त स्वर म्हणजे –

   1) सर्व स्वर एकत्र करणे        2) सर्वांनी मिळून आवाज काढणे
   3) दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले    4) –हस्व उच्चार असलेले

उत्तर :- 3

6) पुढील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – ‘आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले.’

   1) कर्तरी प्रयोग    2) कर्मणी प्रयोग   
   3) भावे प्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 3

7) खाली दिलेल्या सामासिक शब्दातील ‘मध्यमपदलोपी समास’ ओळखा.

   1) साखरभात    2) पीतांबर   
   3) खरेखोटे    4) गल्लोगल्ली

उत्तर :- 1

8) स्पष्टीकरण द्यावयाचे झाल्यास पुढील चिन्ह वापरतात.

   1) अवतरण    2) संयोग     
   3) अपसरण    4) स्वल्पविराम

उत्तर :- 3

9) ‘धोंडा’ शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ?

   1) तत्सम    2) देशी     
   3) परभाषेतील    4) यापैकी कोणत्याच नाही

उत्तर :- 2

10) ‘सूर्य अस्तास गेला’ याचा व्यंग्यार्थ कोणता ?

   अ) सध्या स्नानाची वेळ झाली        ब) अभ्यासाची वेळ झाली
   क) चोरी करण्याची तयारी करण्याची वेळ झाली    ड) गुरे घरी घेण्याची वेळ झाली

   1) सर्व चूक          2) सर्व बरोबर
   3) फक्त अ, ब बरोबर आणि बाकी दोन्ही चूक    4) फक्त अ, ब चूक आणि बाकी दोन्ही बरोबर

उत्तर :- 2

'आरे'आंदोलनः २९ पर्यावरणवाद्यांना अखेर जामीन

- आरे मेट्रो कारशेडसाठी झाडे तोडण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या पर्यावरण प्रेमी आणि 'आरे वाचवा' मोहिमेतील आंदोलनकर्त्या २९ जणांना कोर्टाने आज जामीन मंजूर केला आहे. पर्यावरण प्रेमी आणि आरे वाचवा मोहिमेसाठी आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना पोलिसांनी शनिवारी अटक केली होती. या सर्वांना बोरिवलीच्या कोर्टात हजर केले असता २९ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

- मबुईतील आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल पर्यावरणवाद्यांच्या विरोधात जाताच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन झाडे कापण्याचा प्रकार समोर आला. पर्यावरण प्रेमी आणि 'आरे वाचवा' मोहिमेच्या आंदोलकांना याची माहिती मिळताच त्यांनी रात्रीपासून या ठिकाणी धाव घेत आंदोलन सुरू केले. पोलिसांनी आज आंदोलन करणाऱ्या ३८ जणांना अटक केली. या सर्वांना कोर्टात हजर केले असता यातील २९ जणांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच ५५ जण ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेली तत्काळ याचिका आज दाखल करून घेण्यास हायकोर्टाने नकार दिल्याने पर्यावरणप्रेमींना मोठा झटका बसला आहे.

- गोरेगाव हायवेपासूनच पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. लोकांना आरे परिसरात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला होता. मुंबई 'मेट्रो ३'चे कारशेड आरे कॉलनीत बनविण्याच्या व त्यासाठी तेथील २ हजार ६५६ झाडे तोडण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका काल मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळल्या. तसेच, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने तिथे दाद मागा, असे न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सांगितले होते. रात्रीच्या सुमारास झाडे तोडण्यात येत आहे.

महत्त्वाचे आहे नक्की वाचा भारताची ‘मिसाईल पॉवर’

एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. बॅलेस्टिक मिसाईलमधील संशोधनास भारताने 1960 च्या दशकात प्रारंभ केला.

▪️पृथ्वी-1

सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.

▪️अग्नि-1

अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.

▪️आकाश

जमिनीवर आकाशात मारा करणार्‍या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.

▪️नाग

रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो.

▪️त्रिशूल

जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.

▪️अग्नि 2

एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.

▪️पृथ्वी 3

नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.

▪️ब्राह्मोस

भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.

▪️सागरिका

समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.

▪️धनुष

पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्‍यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

▪️अग्नि-3

अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.

▪️अग्नि-4

पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.

▪️अग्नि-5

भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.

▪️निर्भया

जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.

▪️प्रहार

जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.

जागतिक स्तरावरील सर्वोच्च पुरस्कार मानल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा

◾️यामधील वैद्यकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा करणाऱ्या वैज्ञानिकांना यंदाचे वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले आहे.

◾️विल्यम जी.केलिन, सर पीटर जे. रेटक्लिफ, ग्रेग सेमेन्झा याना संयुक्तरित्या २०१९ नोबेल जाहीर करण्यात आले आहे.

◾️सोमवारी स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये यंदाच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली. अमिरेकेचे विलियम केलिन आणि ग्रेग सेमेन्जा आणि ब्रिटेनचे सर पीटर जे. रेटक्लिफ यांना संयुक्तरित्या नोबेल पुरस्कार दिला आहे. मंगळवारी भौतिकशास्त्रामधील आणि १४ ऑक्टोबर रोजी इतर सहा क्षेत्रामधील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.

◾️ऑक्सिजन सामावून घेण्याच्या पेशी प्रक्रियेचा उलगडा या तिन्ही वैज्ञानिकांनी केला आहे. ऑक्सिजनच्या मात्रामुळे आपल्या सेलुलर मेटाबोलिज्म आणि शारीरिक हालचालीवर प्रभाव करतो. या वैज्ञानिकांच्या शोधामुळे एनिमिया, कँसर आणि अन्य आजारांवरील उपाय जलद होऊ लगाले.

🔷 नोबेल पुरस्काराचे स्वरूप 🔷

◾️नोबेल पुरस्कार म्हणून सन्मानपत्र, सुवर्णपदक (१७५ ग्रॅम), रोख रक्कम ९ मिलियन स्विडिश क्राऊड म्हणजे १४ लाख अमेरिकन डॉलर अर्थात भारतीय ७ कोटी ७० लाख रुपये एवढी आहे.

◾️सुवर्णपदकाचे मूल्य लावले तर ते ५० लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते. काही पुरस्कारार्थींनी त्याची बोली लावून विक्री केली होती. त्यातून त्यांना कोट्यवधी रुपयांची प्राप्ती झाली होती.

current_affairs_Quiz

1) इंडियन ऑइल कंपनीने प्लास्टिकच्या कचर्‍यापासून कोणत्या ठिकाणी रस्ता तयार केला आहे?
उत्तर : फरीदाबाद

2) पान मसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालणारे राज्य कोणते?
उत्तर : राजस्थान

3) पंजाब नॅशनल बँकेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोण?
उत्तर : एस. एस. मल्लिकार्जुन राव

4) महात्मा गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कोणत्या देशाने टपाल तिकीट प्रसिद्ध केले?
उत्तर : पॅलेस्टाईन

5) “इंडिया अँड द नेदरलँड्स - पास्ट, प्रेझेंट अँड फ्यूचर” या पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : वेणू राजामोनी

6) ‘बेस्ट लर्निंग अँड शेअरींग स्पेस अवॉर्ड 2019’ जिंकलेल्या राज्याचे नाव काय आहे?
उत्तर : जम्मू व काश्मीर

7) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्थेच्या भारताच्या कार्यकारी संचालकपदी कोण आहे?
उत्तर : सुरजित भल्ला

8) भारत सरकार कोणत्या सालापर्यंत प्लास्टिक-मुक्त करण्यासाठी वचनबद्ध आहे?
उत्तर : सन 2022

9) ओडिशा राज्य सरकारने लोक-केंद्रित प्रशासन विकासासाठी कोणता उपक्रम राबवला?
उत्तर : मो सरकार पुढाकार

10) तैवानमध्ये नुकत्याच आलेल्या कोणत्या वादळामुळे शेतीचे नुकसान झाले?
उत्तर : मिताग